मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या आईने अकबरी इतकंच त्याच्या खालचं टण्याचं पोस्टही मजेशीर आहे Proud

तो बुधवार नसल्यामुळे असं झालं असेल. :P: टण्या स्वॉरी हां! हलकेच घेणे.(माझी पोस्ट बर्का!)

आईने अकबरी हे पान सुवर्णाक्षरानी लिहून ठेवण्यासारखे आहे.

तो बुधवार नसल्यामुळे असं झालं असेल. : टण्या स्वॉरी हां! हलकेच घेणे.(माझी पोस्ट बर्का!)
>> त्याने शुक्रवार असल्यामुळे असं झाल्याचं कबूल केलाय/..

नवीन मायबोलीवर च्यायला, संतु, लालभाई हे आयडी नसल्यामुळे व्ही अँड सी मधे मजा येत नाही.
--------------
नंदिनी
--------------

माझी मायबोलीशी ओळख २००२च्या डिसेंबरात झाली. मी तेव्हा युकेमध्ये होतो. ख्रिस्तमसच्या निमित्ताने झालेल्या एका मराठी गटगमध्ये'परदेशात मराठी वाचनाची भूक न भागणे' असा विषय निघाला असता एका माबोकरानेच मायबोलीचा उल्लेख केला. नंतर काही महिने रोमात राहून फक्त वाचन चालले होते. बरेच वाद/चर्चा वगैरे. बरेच साहित्यसुद्धा. बाफांना भेटी देऊदेऊन इथली भाषा कळू लागली. बीबी, दिवे, इ.
.
२००३ च्या मध्यास गुलमोहरवर कवितांची आवक बरीच वाढली. तेव्हा जुने-नवे वाद सुरू झाला, कवितांचा दर्जा आणि त्यावरील प्रतिक्रियांचा दर्जा यावर मोठा वाद झडला. मोठा म्हणजे त्यात सहभागी लोक जे लिहित ते वरचे होते म्हणून मोठा. त्या सुमाराला एक कविता टाकावी अशी खुमखुमी आल्याने नोंदणी करून काही(च्या) काही कविता मध्ये या वादावरच एक कविता टाकली. ती माबोवरची पहिली पोस्ट. त्यावर मिलिंदा किंवा असामी की अशाच कोणीतरी 'कविता चांगली आहे, पण जरा जपून रहा' असा सल्लाही दिला होता Happy आता त्यात मी अतिशय चालूपणा करून दोन्ही बाजूंना टोमणे मारले होते, तेव्हा कोणीतरी 'नाव स्लार्टी असले तरी झेफॉडसारखा दुतोंडी आहे' अशा अर्थाची प्रतिकवितासुद्धा केली होती.
.
तेव्हा पुपुवर देशाबाहेरचे लोक बरेच असायचे. तिथे 'चहा टाका, कंटाळा आला, क्रिकेट, हाणा रे याला/हिला' असा टीपी चाललेला असायचा. जीटीपी, पुपु या बाफांवर प्रशासकांची ती सुप्रसिद्ध लाल धमकी/इशारा सतत असायचाच.
.
या सुरुवातीच्या काळात एक खूपच महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. कुठल्याही बाफचा स्वतःचा 'वेग' असतो. (पोस्ट येण्याजाण्याचा वेग नव्हे!) धावत्या बसमध्ये चढायचे असेल तर पळत जाऊन चढणे हेच सर्वात उत्तम असते. तुम्ही जागच्या जागी उभे राहून वेगात जाणार्‍या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केलात तर अपघात होण्याची शक्यता जास्त. (law of conservation of momentum). इथली बस आपल्यासाठी थांबत नसते, तेव्हा ती पकडावी असे वाटत असेल तर आपणच प्रयत्न करावेत हे याच काळात स्वानुभवातून शिकलो.
.
ता.क. विजयरावांना मात्र पूर्ण अनुमोदन. देवाधर्माचे दिवस गेले हे खरेच Happy

  ***
  Real stupidity beats artificial intelligence.

  या सुरुवातीच्या काळात एक खूपच महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. कुठल्याही बाफचा स्वतःचा 'वेग' असतो. (पोस्ट येण्याजाण्याचा वेग नव्हे!) धावत्या बसमध्ये चढायचे असेल तर पळत जाऊन चढणे हेच सर्वात उत्तम असते. तुम्ही जागच्या जागी उभे राहून वेगात जाणार्‍या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केलात तर अपघात होण्याची शक्यता जास्त. (law of conservation of momentum). इथली बस आपल्यासाठी थांबत नसते, तेव्हा ती पकडावी असे वाटत असेल तर आपणच प्रयत्न करावेत>>>>> अगदी अगदी, खूप मोदक Happy

  त्याने शुक्रवार असल्यामुळे असं झाल्याचं कबूल केलाय/..>>हो हो परत स्वॉरी बर्का टण्या.

  एस्सार्के, एवढं घाबरत का आहेस टण्याला?

  विजयरावांना मात्र पूर्ण अनुमोदन. देवाधर्माचे दिवस गेले हे खरेच >>> माझेही अनुमोदन. च्यायला चर्चांचे दिवसच गेले माबोवरुन. (त्यामूळेच वर व्हि अ‍ॅन्ड सी बद्दल जास्त लिहीले Happy ) सगळा साला, तापच झालाय आजकाल. एखादी पोस्ट कोणीतरी लिहीत, दुसरे त्याची तार काढत राहतात.

  अन दुसरी महत्वाची गोष्ट कळाली अश्यात की विजयराव पण वाचक आहेत. (पार्ल्याची पोस्ट), त्यांचाशी वादाशिवाय कधी बोलने झाले न्हवतेच. विजयराव लिहत चला इकडे तिकडे. (लालभाईपण वाचक होते. वाचन्याच्या स्पिडच्या बाफवर बरीच चर्चा झाली होती त्यांच्यासोबत. विजयराव आमचे बिछडे लालभाई तुम्हीच का? ~ड )

  घाबरण्याचा प्रश्न नाहिये. एकतर अजुन पर्यंत असं व्यक्तीगत कुणाबद्दल पोस्टलं नाही. आणि दुसरं तुम्ही लिहील्याप्रमाणे माझं होऊ नये

  "सगळा साला, तापच झालाय आजकाल. एखादी पोस्ट कोणीतरी लिहीत, दुसरे त्याची तार काढत राहतात."

  केदार, तुम्ही टण्याला पाहिले आहे का? व्यायामाने शरीर मजबूत केलेला तो एक तरुण मुलगा आहे. (डोक्याने नसे ना का हुषार!) तो रागवला तर न तुटलेले हाड शिल्लक रहाणार नाही एसार्केंच्या शरीरात!

  नुकताच पुण्याला जाऊन आलो असल्याने असे आपोआप लिहील्या गेले माझ्या हातून, नाहीतर टण्याच्या डोक्याबद्दल कशाला लिहीले असते? पण हा तिथल्या पाण्याचा प्रभाव, मी केवळ निमित्तमात्र!

  बाकी केदार पण बहुधा त्याच गावचा! खुश्शाल सांगतो आहे एसार्केला, घाबरू नकोस. मग टण्याने मारले त्यांना की हा गंमत बघत बसेल. ह्या सगळ्या भानगडी माहित आहेत हो आम्हाला!!
  Light 1

  म्हणुन तर मी "वाचत" रहाते. फारशी पोष्टापोष्टी करत नाही.
  वाचत=पढना|
  वाचत=बचना|

  माझी मायबोली शी ओळख जरा गमतिशीर रीत्या च झाली.मी मराठी कवीता शोधत होते अचानक मायबोलि ची लीक सापडली.तेह्वा मुखप्रुश्ठावर झक्की-हुड भेटी चे फोटो होते,मला आधी तो फोटो पाहुन कुणाच्या एकस्श्ठी चे(कीव्हा पंच्चाह्त्री किवां एका ची एक्साशठी आणी एकाची पंच्चातरी ) चे फोटो आहेत वाट्ले.पण वाचल्यानंतर कळले हे तर दोन जीवलग मीत्रां(?????) च्या भेटी चे फोटो आहेत.मग काय सगळा व्रुत्तांत वाचुन काढला.त्याचे प्रतीसाद वाचायला पण मजा आली.म हळु-हळु सगळ गुलमोहर च वाचुन काढल्.पण कधी लिहील नाही कुठ काही. पण खर च सर्व लेख्,कथा,ललीत्,कवीता छान वाटल्या.वीनोदी लेखां नी तर खुपच हसवल्.असेच छान -छान लीहीत जा.मायबोली अशीच फुलो-फळो हीच सदीच्छा.

  तेव्हा पुपुवर देशाबाहेरचे लोक बरेच असायचे. तिथे 'चहा टाका, कंटाळा आला, क्रिकेट, हाणा रे याला/हिला' असा टीपी चाललेला असायचा. जीटीपी, पुपु या बाफांवर प्रशासकांची ती सुप्रसिद्ध लाल धमकी/इशारा सतत असायचाच. >>> गेले ते दिन गेले.. Sad आजकाल पुर्वीसारखे मिंग्लिश बोलणारे पण कोणी नाहीत.. स्टोर्वी, कलंदर७७, रचना_बर्वे, ह्ह, योगिबेअर, सशल ही टाळकी कुठे गायब आहेत आजकाल.. शोभत नाही हो..

  नमस्कार,

  मी मायबोलीवर यायला लागलो ते २००५ पासुन..आम्ही जागा शोधत होतो पुण्यात तेव्हा काही महिती हवी होती म्हणुन मी दोन तीन फोरम वर पोस्ट्स टाकल्या धडाधड तेव्हा " अहो अशी पोस्ट्स वाढवुन अ‍ॅडमिन चे काम वाढवु नका" अशी प्रेमळ(!) शब्दात समज मिळाली. Happy तेव्हा जरा खट्टु झालो पण तरिही येतच राहिलो. पुढे "देव म्हणजे काय" आणि " अनिरुद्ध बापू" या दोन बाफ वर चर्चेत भाग घेतला, मग सारे ग म प. मालिका इ इ आवडीच्या बा फ वर लिहित्/वाचत राहिलो. माझा सहभाग passive राहिलाय म्हणजे मी स्वतः काहीच लिहिले नाही पण जे आवडले त्यावर प्रतिक्रिया जरुर लिहितो.

  इथल्या काही लोकांचे साहित्य, चित्रकला, पाककृती इ.इ मधले कौशल्य पाहुन थक्क व्हायला होते.
  काही मायबोलीकर खुप प्रतिभावंत आहेत.

  काही वेळा वाद होतात ,पण वाद कुठल्या कुटुंबात होत नाहीत? शेवटी सगळे एकत्र येतात हे महत्वाचे.

  धन्यवाद!

  मध्यंतरी मला मराठीत लिहीण्याची खाज निर्माण झाली. दोन प्रोजेक्टच्या मधल्या काळात केवळ वेळ जात नसल्यामुळे मला हा अविचार सुचला. मासिकाला लिखाण पाठवून 'साभार परत' अशी प्रतिक्रिया घ्यायचं अचाट मानसिक बळ नव्हतं. आणि मी मराठीतून भंकस कुठे व कशी करता येईल याचा नेटवर शोध घ्यायला लागलो. प्रथम मला marathiblogs.net सापडलं. तिथं घुसल्यावर कळलं की मला गुगल किंवा तत्सम साईटवर आधी काहीतरी पाडायला पाहीजे.. मग त्याची लिंक marathiblogs.net द्यायला पाहीजे. हा द्राविडी प्राणायम करण्याची इच्छा मला नव्हती. चुकून कुणाला त्या लिंकवर जावसं वाटलं तर तो माणूस तुमच्या ब्लॉगवर येणार, फारच आवडली तर खाली प्रतिक्रिया टाकणार. या प्रकारात इतरांच्या ओळखी, मैत्री जुळण्याची सुतराम शक्यता नव्हती. म्हणून ते सगळं मला अनावश्यक, लांबलचक आणि कंटाळवाणं वाटलं.

  मग एक दिवस अलिबाबाच्या गुहेसारखा मायबोलीचा दरवाजा उघडला. सुरवातीला इतरांचं वाचलं. नंतर 'बघतोस काय सामिल हो' असं कुणीतरी मनात ओरडल्यामुळे मी पण लिहायला लागलो. इथं साभार परत यायची भीति नव्हती आणि तुमचं लिखाण प्रकाशनायोग्य आहे की नाही हे ठरवणारे ढुढ्ढाचार्यही नव्हते.. हे मला सगळ्यात जास्त आवडलं.

  आत्तापर्यंत तरी सगळ्या प्रतिक्रिया बर्‍या किंवा चांगल्या अशाच प्रकारात मोडणार्‍या आहेत. सुदैवाने, वाईट प्रतिक्रिया मला मिळाली नाही अजून. काही जणांनी प्रचंड स्तुति केली त्यामुळे मला खूप अवघडल्या सारखं झालंय.. लिहीतांना अपेक्षांचं एक अदृश्य दडपण जाणवायला लागलंय. बघू. कधी तरी त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेलच.

  कट्टा निघाल्यापासून तर जमेल तेवढा वेळ तिथेच टीपी करतो... कॉलेजमधे असताना कुठेतरी पडिक राहून टवाळक्या करण्याचा आनंद नव्यानं मिळतोय त्यामुळे. मला या प्रवासात काही मित्रमैत्रिणी मिळाल्या, पण अजूनपर्यंत कुणालाच प्रत्यक्ष भेटायला जमलेलं नाही. असो. अजून वेळ आहे. मला मायबोलीवर येऊन अजून एक वर्ष देखील नाही झालं!

  मी कुठल्याही वादात अजून तरी पडलेलो नाही. फार वेळ नसल्यामुळे एखादा वाद का सुरु झाला आणि त्यात चूक कुणाची होती / नव्हती इ.इ. बद्दल वाचणं शक्य नसतं आणि आवडंतही नाही.

  असो. फार पाल्हाळ लावलं मी! मायबोलीला अशी सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि माझे लेख वाचणार्‍यांना / प्रतिक्रिया टाकणार्‍यांनाही तितकेच धन्यवाद!

  <<वाईट प्रतिक्रिया मला मिळाली नाही अजून>>

  कविता लिहा! लग्गेच मिळेल.

  <<स्टोर्वी, कलंदर७७, रचना_बर्वे, ह्ह, योगिबेअर, सशल ही टाळकी कुठे गायब आहेत आजकाल.>>
  मला पण त्यांची खूप आठवण येते. पण त्यांनी मिंग्लिशची कास धरली. मी प्रखर प्रतिकार केला. ते गेले, नि मी राहिलो!! आता ते जर मराठीत लिहीतील तर ते रहातील.

  केदार भाउ,
  तो लाल भाई मी नव्हेच. खरे तर आज काल लाल भाई कुठे असतात काय करतात ही उत्सुकता मलाही आहे.

  लॅबमधे टाइमपास करायची वेळ आली म्हणून 'मराठी' संबंधी काहीतरी गुगललं आणि मायबोली गावली. चिनी, जपानी, रशियन, इज्रायली सगळी मंडळी आपापल्या भाषेतल्या साइट्स उघडून वाचायची. प्रोफेसर आला तर त्यालाही भाषांतर करून सांगायची. तेव्हा सुदैवानं मला लपून मायबोलीवर यावं लागलं नाही. Happy
  पहीले सहा महीने रोमात काढले. 'जनरल आयडीया' घेतली Proud मग सभासद म्हणून नाव नोंदवलं. आधी 'भोचक भवानी' ह्या नावानं यायचं ठरवलं होतं. पण मृण्मयी हे नाव प्रचंड आवडत असल्यामुळे शेवटी तेच घेतलं.
  सुरवातीची रोमन लिपीतली पोस्ट्स आजही आठवतात. कुणीही ढुंकून पाहीना. आणि एक प्रकारे तेच चांगलं झालं. देवनागरीत टाइप करायला शिकण्याचं सबळ कारण मिळालं. पोस्ट टाकलं पण कुठे? हेच शोधण्यात फार वेळ जायचा. मग एका कागदावर कुठून कुठे गेले ते लिहून काढायला लागले. आता वाटतं ते कागद जपून ठेवले असते तर त्यावर ललित लिहिलं असतं. Proud
  माझ्या काही पोस्ट्सवर पेंढ्या (हा देखिल येत नाही आजकाल. की वेषांतर करून येतोस?) नागपुरच्या काहीतरी आठवणी सांगायला लागला. त्यात झक्कींचे पण कमेन्ट्स आले. आणि जरा मायबोलीने सामावून घेतलं असं वाटायला लागलं. तेवढ्यात नागपूरकर विरुध्द अ-नागपुरकर असं पेटलं. (ओळखा कश्यामुळे Happy ) मी पण हात धुवून घेतले. Proud एव्हाना आणखी काही 'आयड्या' ओळखीच्या झाल्या होत्या. त्यांच्याबरोबर पार्ल्यात आणि न्यु जर्सी बाफवर संचार सुरु झाला. तो आजतागायत आहे.

  चांगले वाईट अनुभव सगळ्यांप्रमाणेच मलाही आले. पण ओळखदेख नसलेल्या कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून वाईट वगैरे वाटलं नाही. ए. वे. ए. ठी. झाल्यापासून बर्‍याच आयडीमागची खरीखुरी माणसं भेटल्यापासून मायबोलीकरांमधे 'चांगले लोक' भरपूर आहेत ह्याची खात्री पटली. वेळप्रसंगी मदतीला धावून जाणार्‍या, एकेमेकांना फोन करून धीर देणार्‍या मायबोलीकरांबद्दल पाहून, वाचून ह्या साईटवर येत रहावसं वाटतं. टिंगल, टवाळक्या करणारी हीच आयडी जेव्हा 'मी आहे. लागेल ती मदत करेन" असं सांगते तेव्हा सार्वजनिक ठिकाणी केलेल्या लिखाणावरून माणुस कसा ते ठरत नाही हे फार फार प्रकर्शानं जाणवलं.

  म्हणुनच उत्तम साहित्याबरोबर कधी कधी रटाळ वाटणारा गुलमोहरपण चालतो. कडाक्याची भांडणं बघुनही मायबोलीच 'होमपेज' असते. जास्त चिडचिड केली की नवरा आणि पोर 'मायबोलीवर गेली नाहीस का?' असं विचारतात. ह्यातच सगळं आलं, नाही का?! Happy

  .

  तशी मायबोली आणि माझी ओळख अगदी अलिकडचिच अशी म्हणता येइल.. अगदी ३-४ महिने फार फार-तर.
  तसे पहाता माझे जपान मधे येणे हेच मायबोली वर यायला कारणिभूत ठरले...

  पण सुरुवातिचे बरेच दिवस प्रचंड कामाचा रगाडा, आणि त्यात येणारा दिवस कसा सुरु होउन संपे ते पण समजायचे नाही..पण जसजसे आर्थिक मंदीचे चटके बसायला सुरुवात झाली, काम पण कमी झाले, आणि ऑफिस मधे फावला वेळपण मिळु लागला..त्यातुनच मग मराठी ई-पुस्तके शोधताना गुगल ने मायबोलिच्या दिवाळी अंकावर आणुन सोडले.. तो अंक अगदी आधाश्यासारखा वाचुन काढला..आणि त्यात योगायोगाने सायुरींचा जापान मधली खाद्यजंत्री वर लेख होता...प्रचंड आवडला कारण ते स्वतः मी अनुभवत होतो....मग त्याला प्रतिसाद देण्याच्या निमित्ताने सदस्य झालो..

  मराठी टायपाला अवघड गेले नाही कारण तशी सवय होती, पण ते सदस्यत्व, संपादन्,विचारपुस वैगेरे शब्दांमुळे डोक्यात आधी शिट्ट्या वाजल्या, पण नंतर सवय झाली..असेच मग पहिल्यांदा जपान, मग कोल्हापुर आणि अश्याच काही बीबींवर पोस्त केल्या..लोकांचे साहित्य वाचत गेलो..आणि रोज माबोवर संदीप असणे(संपुर्ण दिवस पडीक) सुरु झाले... त्यातच मग एक दिवस कट्ट्याचे निमंत्रण मिळाले..आणि आपसुकच कट्ट्याचा कट्टर कट्टेकर बनलो... नविन ओळखी झाल्या, नविन मित्र मिळाले..

  पाककृती विभागात पण मी आपले काही बाळबोध प्रश्ण विचारले, आणि माबोच्या सुगरणींनी त्वरित प्रतिसाद ही देउन सहकार्य केले..तीच गोष्ट जपान बी बी ची ही....
  माझ्यामते आपण कायम समान आवडी-निवडी, सारख्या विचारसरणी असण्यार्‍या लोकांच्या शोधात असतो...त्यांच्याशी त्या विषयांवर बोलायला, चर्चा करायला कायम आतुर असतो...आणि
  हेच काम माझ्यासाठी मायबोलिने अगदी सोपे करुन दिले आहे असेच म्हणेन..

  तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन पण आनंद वाटला...
  माबोशी जे नाते जोडले गेलेय ते आता कायमचेच.. Happy

  ०-------------------------------------------------०
  नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
  आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

  तुमच्या सगळ्यांच्या अनुभवात आता माझाही.
  मायबोलीची माझी ओळख कशी आणि कधी झाली हे मलाच आठवत नाहीये. बहुदा २००३ साल असावे. गुगल कृपेने काहीतरी शोधतांना मी बकुळीची फुले या पानावर लँड झाले. इंतरनेटवर काहीतरी मराठी वाचता येत हेच माझ्यासाठी फार धक्कादायक होत. तेव्हा मी फक्त बकुळीची फुले एवढच वाचुन कुठेही इकडे तिकडे क्लिकत न बसता साईट बंद केली. फक्त एक शहाणपणा केला होता ते म्हणजे साईट बुकमार्क केली होती. नंतर काही महिन्यांनी परत आले तेव्हा बकुळीची फुले, चोखंदळ ग्राहक ,महाराष्ट्र धर्म वाढवावा,व्यक्तिपासून वल्लीपर्यंत, पांढर्‍यावरचे काळे,तंत्रलेल्या मंत्रबनात, आरोह अवरोह, शुभंकरोती कल्याणम्,विखुरलेले मोती अस सगळ कधीतरी येवुन वाचत होते.

  नंतर काही दिवसांनी अचानक गुलमोहरचा शोध लागला. मराठी साहित्य वाचायला मिळतय याचा फार आनंद झाला, ते पण मी अश्या ठीकाणी असतांना की जिथे मराठी तर जावुच दे मोडकं तोडकं इंग्रजी बोलणारे जरी कोणी सापडले तरी खूप झाले. मग अधुन मधुन त्याचे वाचन सुरु झाले. तो पर्यंत काही महिन्यांनी यायच्या ऐवजी काही आठवड्यांनी इथे यायला लागले. तेव्हा गेल्या १,२,७ दिवसातील पोस्ट असे यायचे माबोच्या पानावर उजव्या कोपर्‍यात. तिथे बघीतल्यावर मग हितगुजचा शोध लागला. हे सगळे होई पर्यंत बहुदा २००५ उजाडले होते. मी पहिल्याच वेळी सगळ्या टॅबवर टिचक्या मारल्या असत्या तर .... आता जर तर वाटुन काय, देर आए दुरुस्त आए :फिदी:.

  आता काही आठवड्याने इथे येणे काही दिवसांनी भेट देणे झाले होते आणि त्यानंतर मी कधी रोज माबोवर यायला लागले कळले पण नाही. त्यानंतर बहुदा वर्षभरतरी मी वाचनमात्र माबोवर यायचे. दररोज वाचायला लागल्यावर मी आपोआप सगळ्या विभागांतल्या वेगवेगळ्या चर्चा, वादविवाद, गुलमोहरातले लेखन यात रस घायला लागले. ते सगळे वाचत असतांना आपोआप सगळे आयडी ओळखीचे वाटायला लागले. सगळे एकमेकांची कशी मस्त खेचतात हे बघुन मला आपण पण त्यांच्या गप्पात भाग घ्यायला हवा असे वाटायला लागले. प्रतिसाद द्यायला हात एकदम शिवशिवायला लागले तेव्हा मग मी अधिकृत मायबोलीकर झाले. Happy

  आता अशी परिस्थिती आहे की एकवेळ इ-मेल चेक करायला वेळ नाही मिळाला तरी चालेल पण मायबोलीवर चक्कर मारलीच पाहीजे. माझे हे मायबोली प्रेम घरी-दारी, मित्र-मैत्रीणींना सगळ्यांना माहित आहे. त्याच्यावरुन मला खूप चिडवतात पण. मायबोली नक्की काय आहे हे मायबोलीवर नसलेल्यांना समजावून सांगणे अशक्य. इथे मला माझ्या सारख्याच आवडी निवडी असणारे, तसेच वेगवेगळ्या विषयातले तज्ञ लोक भेटले. एवढ्या सगळ्या चांगल्या लोकांना एकाच ठिकाणी भेटता आले, त्यांची ओळख झाली, बर्‍याच मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटले. आता काहीजण अगदी चांगले मित्र-मैत्रीणी बनलेत. या सगळ्याचा किती मानसिक आधार मिळतो याचे मोजमाप करणेच शक्य नाही.

  मायबोलीवर कशी आले? अजुनही आठवतेय. इथे कॉलेजमधे जायला सुरु केले तेव्हा नशिबाने तिथे २-३ मराठी मैत्रीणी मिळाल्या त्यातली एक मैत्रिण मायबोलीची नियमीत वाचक होती आणि अजुनही आहे. एका क्वार्टरब्रेक मधे तिने मला लिंक दिली आणि बेटीची फुलाची गोष्ट वाचायला दिली. कोण बेटी, कोण मायबोली काही माहिती नव्हते. पण त्या गोष्टीमुळे मायबोली माझी झाली. त्या १५ दिवसात धपाधप सगळा गुलमोहोर वाचला. सगळेच बहुतेक मिंग्लिशमधे लिहायचे. पण तेव्हा ते वाचायला देखील मस्त वाटायचे. बेटी, पराग, शुमा यांच्या कविता आवडायच्या किंवा त्यांच्याच कविता थोड्या कळल्यासारख्या वाटायच्या.
  मग हळूहळू जीटीपी, पीपी असले बीबी कळले. तिथे स्टोर्वी, चाफा वगैरे मिग्रजीत गप्पा मारत chafa = teafa, storvi = godamvi असले काही काही. एकही शब्द कळायचा नाही. मग सवय झाली. मग कराडचा बीबी सापडला म्हणुन आयडी काढला. स्वागत समितीने मस्त पुष्पगुच्छ देउन स्वागत केले होते. तिथुन मिलिंदाची इमेल आली तशीच आनंद घळसासीची पण.
  मग हळुच आहारशास्त्र बीबी वर गेले तिथे पण लोक अगदी नेहेमी एकमेकांना मदत करताना पाहीले. तिथे तेव्हा पर्टुच्या बर्‍याच कोल्हपुरी रेसिपीज होत्या. वाचुन अगदी घरी गेल्यासारखे वाटे. मग मी पण बिनधास्तपणे सल्ले देणे आणि घेणे करु लागले. लालू, प्रिया, ललिता, दिनेश वगैरेनी वेळोवेळी मदत केली.
  कधीतरी इतरकलांचा बीबी सुरु केला. खुप लोकाना विणकाम भरतकामाचे सल्ले दिले आणि घेतले पण. तेव्हा मायबोली खूप घरगुती वाटे. आता खुप प्रकारचे लोक इथे येतात. मधुनच कसले कसले वाद पेट घेतात थोड्याच दिवसात सगळे शमुन जाते आणि परत मायबोलीकर एकमेकांना मदत करायला खेचायला रिकामे होतात. एका मायबोलीकर माझ्याकडे मधे राहुन गेले त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्र होता. फक्त ऑनलाईन ओळखीवर आपल्याला असे कोणी घरी रहायला जागा देईल यावर त्यांचा विश्वासच बसेना. आमच्याकडे राहुन पाहुणचार घेतल्यावर त्याला पण वाटले 'मायबोलीमे कुछ तो दम है|' याशिवाय असे अशक्यच! Happy

  मायबोलीनेच माझा पहिला लेख प्रसिद्ध केला तोवर मी ब्लॉगवर हातपाय मारत होते पण खरी प्रसिद्धी मायबोलीमुळेच मिळाली. अतिशय जिवाभावाच्या मैत्रिणीपण मिळाल्या. आता मी वेळीअवेळी लॅपटॉप घेउन बसले की नवरा ओळखतो की मायबोलीचे वाचन चालू आहे आता कमितकमी एक तासाची निश्चिंती!

  एसारके, आईने अकबरीच्या लिंकबद्दल आभार. अशक्य हसलो. शेजारच्या क्युबिकलमधला बघायला आला काय झाले म्हणून. Rofl Rofl
  ********************************
  द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

  काही वर्षांपुर्वी मराठीवर्ल्ड्.कॉम ह्या वेबसाईटची मी नियमित वाचक होते. ह्या ऑफिसमध्ये जॉईन झाल्यावर कितीतरी दिवस ती साईट काही केल्या ओपनच होत नव्हती. मग गूगलमध्ये सर्च करता करता मायबोली.कॉम सापडलं. मला वाटलं मराठीवर्ल्डचं नाव बदलून हे नाव ठेवलं की काय... कुतुहलाने साईटवर क्लिक केलं, तर ही वेगळीच साईट होती. तेव्हा राहुल देशपांडेची मुलाखत आणि केपीचा वेंधळेपणा मुख्यपृष्ठावर झळकत होते. Happy मुलाखत वाचल्यावर केपीने अर्धी अर्धी फाडलेली नोट वाचलं. खुप हसले होते तेव्हा... मग अर्काईव्हज् चा शोध लागला. अधाशासारखा वेंधळेपणाचा बीबी वाचून काढला. ऑफिसात वाचणं अशक्य होतं इत्के मजेशीर किस्से होते. मग काही दिवसांनी परत मायबोलीवर आले तेव्हा पूनम (psg) ची 'क्लिक' ही अप्रतिम सुंदर कथा मुख्यपृष्ठावर होती. ती वाचून काढली. पाठोपाठ गुलमोहराचा शोध लागला. भारावून जाऊन तेही वाचून काढलं. दाद, psg, सुपरमॉम, श्रद्धाके, अज्जुका सारख्या अनेक लेखकांच्या प्रेमात पडून रजिस्ट्रेशन केलं. इतके दिवस आपल्याला ह्या साईटचा शोध कसा काय नाही लागला ह्याचं दु:खमिश्रीत आश्चर्य वाटलं. माझी पहिली पोस्ट मी 'मला आलेले मजेशीर अनुभव' मध्ये टाकली. 'माझ्या शहरात' श्रीवर्धन, मुलुंड, सिंहगड रोड वर धम्माल चालू असायची. तेव्हा हळूच मुलुंड बीबीवर एक पोस्ट टाकून पाहिली. तेव्हा तिकडे स्वागत झालं. पब्लिक फोरमवर एक्स्पोज व्हायचा पहिलाच अनुभव होता. जराशी भिती मनात होती. पण पहिल्याच पोस्टनंतर इन्द्राने मेल पाठवून आपण एकाच ऑफिसात आहोत असं सांगितलं. तेव्हा मायबोलीवर सभ्य माणसंच Wink वावरतात, नव्हे हुंदडतात ह्याचा शोध लागला. तेव्हापासून सुरू झालेला माझा मायबोलीवरचा वावर आत्तापर्यंत अव्याहत आहे. रजिस्ट्रेशन केल्यापासून मला कुठल्याही प्रकारचा कंपूशाहीचा अनुभव आलेला नाही. थोडेसे वादविवाद झाले, पण ते तेवढ्यापुरतेच. लॉग्-ऑफ केल्यावर सगळं विसरून जायचं, पुन्हा दुसर्‍या दिवशी लॉग्-इन केल्यावर परत मस्ती मजा चालू ह्या धोरणामुळे मला त्या वादविवादांचा त्रास झाला नाही. मायबोलीवरच्या प्रतिभावान लेखकांच्या कथा, ललित वाचून मलाही काही लिहून पाहण्याची उर्मी आली. ह्या हक्काच्या व्यासपीठावरची माझी पहिलीच कथा इथल्या वाचकांना आवडली, लिखाणातल्या घोडचुका वाचकांनी माफ केल्या, त्यात सुधारणा सुचवल्या, पुढील लिखाणासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले म्हणून मी थोडंफार काही लिहू शकले/ शकत्येय. मग मायबोलीकरांचं जीटीजी काय असतं ह्याचा अनुभव घेतला. वर्षाविहाराचा आनंद लुटला. माणसं प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्याशी असणारे 'ऑनलाईन' नातेसंबंध अधिक दृढ होतात, गैरसमज टाळले जातात ह्याची खात्री पटली. मायबोलीकरांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झालेल्या वैचारीक देवाण-घेवाणीतून माझ्या विचारांमध्ये परीपक्वता आली. मायबोलीवरच मला अगदी जीवाभावाचे असे चांगले मित्र-मैत्रीणी मिळाले. मायबोलीचे हे ऋण विसरता येणं शक्य नाही. अज्जुकाने म्हटल्याप्रमाणे मायबोलीचे हे देणं कसं फेडता येईल ह्याची संधी शोधतेय....

  २७ एप्रिलला मला रजिस्ट्रेशन करून २ वर्ष पूर्ण होतील.

  हे मनातलं सगळं लिहिण्याची, व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दिपूर्झा तुझे अनेक अनेक आभार..

  रुनी, आपण दोघी एकाच साली आलो की चुकत माकत माबोवर. Happy
  २००१,२००२ च्या आसपास कधीतरी मायबोलीवर चक्कर टाकली होती पण नुसता मुखवटा पाहून घेतला होता. इकडे तिकडे क्लिक करुन खोलात शिरायची तसदी तेव्हा घेतली नव्हती. जपानमध्ये २,४ मराठी मैत्रिणी होत्या मराठी बोलायला. पण वाचायचं काय? पेपर वगैरे वाचला तरी म्हणावं तेव्हढं समाधान होत नव्हतं.मराठी पुस्तकंही लिमीटेडच होती. ब्लॉग्ज वगैरे तेव्हा नव्हतेच. अशातच माझी बहीण मायबोलीकर 'समी' भेटली आणि मायबोली जॉईन कर म्हणाली. तिच्या आज्ञेचं पालन करुन आयडी घेतला आणि पार्ल्यात लिहायला लागले ते आजतागायत.

  बर्‍याच लोकांच्या ओळखी झाल्या पण भेटणं झालं ते मात्र यंदाच्या बारातल्या जीटीजीलाच. आधी थोड्याफार मंडळींचे फोटो पाहिले असल्याने खूप जुनी ओळख असल्यासारखं वगैरे वाटलं. Wink आयडीमागे लपलेले चेहरे प्रत्यक्षात पाहून खूप आनंद वाटला.

  आता रोज मेल बघितली नाही तरी चालते, ऑर्कुटवर गेलं नाही तरी चालतं पण मायबोलीवर चार पाच तासात एक चक्कर टाकली नाही तर मात्र काहीतरी हरवल्यासारखं वाटतं हे नक्की.
  अ‍ॅडमिननी ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्याचे कोटी,दशकोटी आभार आणि ते व्यक्त करायची संधी दिल्याबद्दल दिपूर्झाचेही.

  दिपूर्झा बघ लिहितेय मी,

  ह्म्म्म.. मोठी गोष्टच आहे. २००३ असेल वर्ष. मला कसा शोध लागला हिगूचा(मी कित्येक दिवस फक्त हितगूजच म्हणत होते).
  शाळेतून घरी आल्यावर बोर व्हायचे. नुकतेच आई पप्पांपासून जरा लांबच अ‍ॅडमिशन मिळाले होते एका दुसर्‍या स्टेट मध्ये,मग काय करायचे असा पेच असायचा. घरी येवून पुन्हा वाचन बोर्.(अभ्यासाचे वाचन खूप होते.). त्यात एक दिवस आई आली होती. मी आईची मराठी गाणी सीडी कॉपी करत होती तर तीची सीडी खराब केली मी(नक्की काय झाले आठवत नाही) ..झाले वैतागली आई. मी म्हटले त्यात काय आपण गाणी शोधून सुद्धा डॉउनलोड करूया. तेव्हा मराठी गाणी असे गूगल मध्ये शोधल्यावर मिळाली ही साईट. पण बोर झाले. इथे तिथे पाहीले तेव्हा बहुतेक मिंग्लीश होते लिहिलेले. आधी कधी घरी मराठी तसे अजिबात वाचले नाही का सहसा लिहिले नाही(शाळेत हिंदी शिवाय). तेव्हा मी काय कप्पाळ लिहिणार. मग २००५ उजाडले, काहीतरी असेच पुन्हा शोधत होते अन कांदापोहे अनुभव असे मिळाले. मग सहज क्लीक करून वाचले. ते मराठीत होते. हसायला आले म्हणून आणखी पाने वाचली. त्यावेळेला 'योग' ह्यांचीच काहीतरी एक गोष्ट होती,ती सुद्धा वाचली.स्वताच्या खर्‍या नावाची आयडी घेतली(हा पक्केपणा न्हवता अन नंतर कळले की खोटी आयडी घेतली तर बरे म्हणून;म्हटले जावू दे ना पुन्हा कोण उघडणार अकॉउंट. असो :). मग माझा असाच एक प्रश्ण विचारला.(ते कमालीच अचाट मराठीत) टाईप केले. अजूनही आठवते की १ तास लागला २ ओळी लिहायला,बोर झाले खरे तर. एक तर व्याकरण वगैरे काही कळत न्हवते, त्यात ते ट ला म असे करत लिहिले. माझ्या त्या प्रश्णावर काहींनी अगदी ईमेल लिहून मदत केली वा समजावून दिले. मला एकदम आश्चर्य की लोक कसे काय इतका वेळ घालून मदत करतात अनोळखी लोकाना? त्यातूनच छान friends मिळाले. मग मी माझे दोन तीन कांदेपोहे अनुभव लिहिले. :). तेव्हा चंपक वगैरेने काहीतरी मजेशीर उत्तर दिले होते.(कुठे असतो तो?). बी होताच प्रश्ण विचारयला. Happy आणि बरेच जणं.
  बर्‍याच वेळा शब्द चक्क कॉपी केले(म्हणजे दोन स्क्रीन उघडून काहींचे पोस्टमधले शब्द उचलले नी लिहायला शिकले). घरी सुद्धा सांगितले, सगळे चकीत. मग त्या दरम्यान जेवण करायचा छांद लागला घरापासून दूर असल्याने मग इथे लिहायला लागले. आज मलाच चकीत व्हायला होते की मी इतके मस्त मराठी लिहिते.(अजून चुका असतील). बरे वाईट अनुभव काय सगळ्यांना मिळतात्,मलाही मिळाले. पण त्यात काय. Happy रात्री रात्री जागून काहीतरी टाईप करायचे कुठल्या कुठल्या बीबीवर.
  खूप छान मित्र/मैत्रीणी मिळाले. फोन वर गप्पा अश्या की अगदी बरेच दिवसापासून ओळ ओळखतो. मग ,हे वाचले का? ते वाचले का? अग तो हा आहे, अग तो ना काय कविता लिहितो. मग समजावून सांगणे कविता. हा लेख वाचलास? ती रेसीपी टाक ना हिगूवर? मी त्यावेळी हितगूजच असे म्हणायचे. असे दर संध्याकाळी सुरु झाले. तर ते असे अजून चालू आहे..... Happy

  शिकागो मराठी मंडळ अस्तित्वात आहे. Happy http://www.mahamandalchicago.org/ इथे पाहा. काही लागल्यास माझ्या आयडीवर क्लिक करुन निरोप लिहा.

  Pages