मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अनुभव आहेत सगळ्यांचे. वाचुन मस्त वाटल, खूप खूप जुन्या गोष्टी, जुनी मित्रमंडळी आठवली.

मी मायबोलीवर आले १९९९ मधे. नुकताच कामाच्या ठिकाणी अगदी पुर्ण नेट अ‍ॅक्सेस मिळाला होता. तेव्हा गुगल होत कि नाही आठवत नाही पण मराठी अस सर्च केल आणि हितगुज मिळाल. तिथे my city मधे कुठेतरीच जाउन उगिच हाय हॅलो मेसेज टाइप केला. तेव्हा सभासद होण्याची आवश्यकता नसायची. माझ्या त्या पोस्ट वर बहुदा समर्‍याने उत्तर दिलेल. नंतर अजुनही वेगवेगळे बीबी आहेत हे कळल मग काय सगळीकडे संचार सुरु झाला. खर्‍या नावानेच सभासद बनले. त्यावेळी खूप मोजकिच मंड्ळी असायची हितगुज वर.
तेव्हा झालेली मित्रमंडळी म्हणजे मिल्या, समर्‍या, एसविसमिर, असामि, स्टोरवी, पूनम, विकास, मेधा हि अजुनही अगदी छान संपर्कात आहेत. हितगुजवरच सगळ्या पहिल माझ GTG होत किरणबरोबर Happy
तेव्हा पासुन तो जो भेटतोय तो आजतागायत :p
झक्कि म्हणतात तस आम्ही म्हणे मायबोलीवरच आद्य जोडप आहोत. आद्य म्हंटल कि कायच्याकायच वाटतय पण खरच १ तप होत आल. Happy

नंतर खूप एवेएठी झाली. बे एरियात पहिल झाल. तेव्हाची कित्येक जण हल्ली दिसत पण नाहित.
लिंबोणी, स्वप्ना, काउखान, समिर७५, कॅचमी, समुराई कित्येक नाव पण आठवत नाहित आता.
नंतर मुबईत्, शिट्टीत, बारात, पुण्यात अजुनही माबोकर भेटतच असतात.

देशात असतो तेव्हा माझ माबोवर येण जवळ्जवळ बंद होत. पुन्हा जेव्हा कधी येते तेव्हा खूप नविन आयडी दिसतात. सुरवातीला कुठेच लिहिल जात नाही मग हळुहळु सगळ सुरळीत होतः)

मायबोलीला अगदी आत्ता आत्ता पर्यंत मी हितगुजच म्हणत होते. नविन माबो सुरु झाल तेव्हा काही केल्या माझ लॉगइन होईना तेव्हा SVS ला खूप सतावल. माझ लॉगईन होत नाही म्हणजे काय? पण नंतर कळल कि मी मुळी hitguj.com करते तस करुन आता चालणार नाही. त्यानंतर मला वाटत माझ्या बोलण्यात माबो येउ लागल.

आजही जगात कुठेही जायच असुदे पहिले तिथे आपले माबोकर आहेत कि नाही ते मी पहाते कारण १००% मदत मिळणारच अशी खात्री असते ना. Happy

माबोचा आलेला एक चांगला अनुभव इथे लिहायचा राहुन गेला. माझा बालमित्रं मुंबईत असतो आणि एके दिवशी (जुलै ०९ मध्ये) त्याचा मला फोन आला की त्याला तातडीने रू. १५,००० लागणार आहेत. आणि त्यातल्या त्यात ही काही तासातच. म्हणजे बँक ट्रन्स्फरचा ही प्रश्न नव्हता कारण ऑथोरायजेशनला ही बँक २४ तास घेतेच. मला काही सुचेना काय करावे Sad मग एकदम आठवलं की आपला एक माबोकर विशाल कुलकर्णी खारघरला राहतो मग त्याला थोडा घाबरत फोन केला, आणि सर्व काही सांगितलं. तोवर त्याला मी फक्त एकदाच पुण्यात भेटले होते ते ही गृपमध्ये आणि फक्त २/३ तास. त्यात एकमेकांविषयी जास्ती बोलणं झालं नव्हतं. (म्हणजे अगदी पैशाची देवाण-घेवाण करण्या इतपत ओळख झाली नव्हती.) पण खरडवही किंवा इमेल्स मध्ये बोलत होतो आम्ही. मी अडचण सांगितल्यावर त्याने कोणतीही शंका न विचारता किंवा आढेवेढे न घेता मी तुझ्या मित्राला पैसे देतो मग तु नंतर माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर कर असं सांगितलं. अशा प्रकारे माझ्या मित्राला अगदी वेळेत पैसे मिळाले विशालकडून.
आजकाल इतकं कोण करतं? Sad वर्षानुवर्ष मैत्री असली तरिही पैशाचा विषय आला की चेहरे आपोआप बदलतात. मग हा कोण कुठला विशाल त्याने मदत करायची खरंतर काही गरज नव्हती, पण फक्त मायबोलीचा प्लॅटफॉर्मच असा आहे ज्याने हा 'विश्वास' निर्माण केला आहे. Happy

माझी मायबोलीशी खर्रीखुर्री ओळख झाली ती मी सदस्य झाले तेवढ्या आठवड्यांपूर्वी. माझी बहिण बर्‍याच आधीपासून माबोकर होती. ती नेहमी माबोवरच्या पाककॄती करायची. (पण ती माझ्या अर्ध्यानेही माबोवर नसते). तिच्यामुळे माबोबद्दल ऐकले होते. कुठेतरी या साइटबद्दल वाचले होते की काय, नक्की आठवत नाही पण मागे एकदा असाच फेरफटकाही मारला होता असं वाटतयं. बस्स. माबोची केवळ एवढीच ओळख होती. वीसेक आठवड्यापूर्वी अचानक हे सारे बदलले. आणि माबो आता माझ्या जीवनात अढळस्थान मिळवून बसलीये.

अमेरिकेतल्या माँटाना स्टेट मधलं हंग्री हॉर्स नावाचं एक गाव. मी आणि माझ्याबरोबरचे इतर ग्लेशियर नॅशनल पार्कला भेट द्यायला आलेलो. रात्री सगळे झोपले पण मला झोपच येईना. म्हणून बहिणीचा लॅपटॉप उघडला ... तर माबोची साइट उघडी होती. सहज चाळा म्हणून भटकायला लागले ...अणि 'मला चुकीची ऐकू आलेली गाणी' या बाफवर थडकले. मग काय? वेड्यासारखी वाचत आणि एकटीच खिदळत बसले. हसू काही केल्या आवरेना. खरंच पोट दुखेस्तोवर आणि डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलेय मी त्या रात्री. जवळ जवळ ३.३०-४ वाजेपर्यंत जागी होते. त्यादिवसापासून माबोशी गट्टी जमली ती जमलीच. ५-६ दिवसांनी घरी परत आल्यावर लगेच मेंबर झाले.

आयडी काय घ्यावा हा प्रश्न होताच. मग माझ्या नावाच्या अद्याक्षरांवरून तयार झालेले 'मा' आणि नावाचे पहिले अक्षर 'मी' .... असं काहितरी काहिही लॉजिक नसलेलं 'मामी' नाव घेतलं. माझी पहिली पोस्ट टाकली होती ती 'हिंदी-इंग्रजी चित्रपटातील goof-ups' वर. तर ती पोस्ट सगळ्यांना जामच आवडली. मला ही मग हुरूप आला. त्याचवेळी असेही लक्षात आले की माबोवर आधीच एक मामी आहेत - अश्विनीमामी. मी विचार करत होते की, आपला आयडी बदलावा की काय. पण तोवर मला माझा आयडी आवडायला लागला होता. मग तसाच ठेवला. (अर्थात अश्विनीमामींचा मान मोठा)

नंतर एकदा मायबोली तळातून वाचताना, काही काही लोकांच्या जीवनातील अनुभव वाचून मी स्तंभितच झाले होते. कारण तोवर या लोकांना मी त्यांच्या लेखातून भेटले होते आणि त्यांच्या लेखातून कुठेही निराशावादी सुर नव्हता. उलट दिसला तो दुर्दम्य आशावाद. त्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण झालाय. सगळ्या प्रकारचे लोक दिसले, दिसतायत. अनेक लोकं अनेक नमुने..... मज्जाच आहे सगळी.

आता खरंतर मायबोलीवरून घरी माझी खूपच खेचली जाते.नवरा त्याच्या मोडक्या मराठीत म्हणतो : जा जा माबोवर ..लोकं ओरडतायत्...मामी कुठे गेली???? लेकपण म्हणायला लागलीये - जेव्हा बघावं तेव्हा तुझं मायबोली चालू असतं. तिला कार्टून-नेटवर्क बंद करायला सांगितलं की लगेच माझी माबो काढते.

पण एव्हाना मी कट्टर माबोकर बनलेली असल्यामुळे थोडीच असल्या गोष्टींनी घाबरतेय?

नमस्कार मायबोलीकरांनो __^__.

माझं मायबोली शी ओळख २००१ साला पासुन. गुगल वर मराठी साईट सर्च केल्यावर मायबोली ची दुवा सापडली, तेव्हा मुंबईकर ह्या नावाने मी मायबोली वर बागडत होतो. तेव्हा चे माबोकर आता फार क्वचित दिसतात. द पुणेकर, राधा टी, नंदिनी (pls correct me if I am wrong), रा ना जाधव, चुणचुणीत, महेश, नवा नवा. जी टी पी वर फार धम्माल करायचो. तेव्हा उस गावचे मित्र मंडळीं बरोबर फार छान गट्टी जमली होती. द पुणेकर आणि पुणेरी टीम च्या पुणेरी पाट्या तर फार धम्माल होते आणि ते पाट्या काल्पनिक नसायचे (nothing to hurt anybody else Light 1 ).

२००१ ची मुंबई ग ट ग बोरीवली ला झाली, ते मी पवई उद्यान ला करण्याचे फार प्रयत्न केले, पण नॅशनल पार्क सगळ्यांना सोयीचे ठरते, म्हणुन नॅशनल पार्क फिक्स झाले. काही कारणास्तव मी त्या ग ट ग ला जाऊ शकलो नाही, आणि मायबोली वर बागडनं सुध्दा बंद झालं. वर्ष भर मायबोली वर येणं झालं नाही आणि नंतर मायबोली वर रोमात यायचो. पासवर्ड विसरलो होतो ( नेमस्तक, अ‍ॅडमीन हे पासवर्ड मला आता मिळु शकतं का ? लॉगीन : mumbaikar ).

२००६ मध्ये परत mhamaikar या नावाने प्रकट झालो, पण रोमा मध्येच असायचो. मायबोली शी दुरावा शक्यच नव्ह्तं. २-३ बाफ वर लिहीलं आणि परत मायबोली रोमात गेलो. आता महिना - २ महिन्यां पासुन दररोज येतो.

मायबोली का आवडते : माहित नाही, पण करमत नाही मायबोली शिवाय.

Happy

मायबोलीचा लळा लागलाय आता... खर म्हणजे व्यसन झाले आहे.मला पण जवळ-जवळ एक वर्ष होईल.
एक मित्र ..सखा.. आणि बरच काही आहे मायबोली माझ्यासाठी....
ही तार कधी जुळली कळलच नाही ....खुप काही शिकवलय आणि शिकतोय..
असाच स्नेह राहु द्या मायबोलीकर्स......धन्स लोक्स...:)

नंदिनी (pls correct me if I am wrong) <<< मला वाटते तुम्हाला 'नंदिता' म्हणायचे असावे. Happy

मंजू, तुझी पोस्ट आता वाचली मागच्या पानावरची.
केपीने अर्धी अर्धी फाडलेली नोट वाचलं<<< तो किस्सा केपीचा नसून माझ्या आठवणीप्रमाणे अथकाचा होता. Happy

हो नंदिता... टिकूजीनीवाडी गटगला भेट झाली होती...

मुंबईकर... रा. ना. जाधवने मायबोली संन्यास घेतला आहे.

अरे वा ! मस्त अनुभव आहेत सगळ्यांचे,
मी बहुतेक ९८-९९ ला दसर्‍याचं ग्रिटिंग पाठवण्यासाठी नेटवर ग्रिटींग शोधत होतो तेव्हा मायबोलीवर दसर्‍याचं मराठी ग्रिटींग पाहुन मला आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटलं , त्यानंतर अधनं मधनं मायबोलीवर येत राहीलो , वाचत राहिलो. पण दसरा दिवाळीच्या ग्रिटींगसाठी मात्र आवर्जुन मायबोलीवर यायचो .प्रत्यक्षात सदस्य व्हायला मात्र बरीच वर्ष लागली.

अपुन के लिये तो मायबोली इतनाही काफी है.....१०-११ वर्ष उलटुन गेली, अनेक बिनाचेहर्‍याचे मित्र. आगोदर सगळा टीपी जिटीपी वर व्हायचा, सगळे एकाच ठिकाणी भेटायचे खुप ओळखी व्हायच्या. \
ओळखींबद्दल जास्त लिहीत नाही Happy

तिथे एक विषय चालू झाला की टाईम झोन प्रमाणे एका कडुन दुसरी कडे पास केला जायचा, मग मी गेल्यावर काय काय धम्माल आली याची चर्चा व्हायची. स्क्रीन शॉट्स पाठवले जायचे, खेचाखेची , गटबाजी, भांडण, हहपुवा... मी जातोय मिटींगला तोवर तू सांभाळ... कहर असायचा....

तो जिटीपी चा मजा आज नाही.... चाळ नावाची वाचाळ वस्ती आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आल्या सारखं झालय.. ह्या कानाचा त्या कानाला पत्ता नाही. Sad
वेळ बदलतो, माबो पण बदलत गेली.... पण मुळ विणच येवढी घट्ट आहे की तुटू दे म्हंटली तरी तुटेन...

बरेच जुने माबोकर सरावाने वाट चुकुन येतात आणि बदललेलं रुप पाहुन निघुन जातात....:(

जिटीपी पुन्हा सुरू झालाच पाहीजे... F5 मारत बसायची मजाच वेगळी होती....

तो जिटीपी चा मजा आज नाही.... चाळ नावाची वाचाळ वस्ती आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आल्या सारखं झालय.. ह्या कानाचा त्या कानाला पत्ता नाही. Sad <<<

सत्या, अगदीच असे नाही, विपू नावाची कोणी खबरी कामवाली बाई दिलीय की म्हणे अ‍ॅडमिनांनी. Lol

दि, १/१/२०१० काहीतरी नविन उपक्रम करण्याच मनात होत. दि. २/१/२०१० मिलिंद जोगळेकर याने लिहिलेल्या ११ पुस्तकांच्या एकाचवेळी झालेल्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. सर्वांच्याच मते एका वेळी ११ पुस्तके प्रकाशित करणे म्हणजे मोठा विक्रम होता.

माझी हस्त लिखीते याच साठी धुळखात पडली होती अनेक कथाबीज मनात रुंजी घालत होती. कोण प्रकाशकाच्या दारी खेपा मारणार? साभार् परत हा अपमानजनक शेरा मारुन परत आलेली पाकिट कोण उघडणार ? यासाठी मी दोन पावल मागे होतो.

एका मैत्रीणीने तिने मायबोलीवर लिहलेल्या लेखाची लिंक पाठवली. त्या लिंकच्या आधारे लिंक लागली. सुरवातीला साधारण आठवड्याला एक या वेगाने कथा लिहल्या.

जेव्हा १२ कथा लिहुन झाल्या तेव्हा मनाला धडका देणारा लिहीण्याचा आवेग जरा ओसरला. मायबोलीची गोडी मात्र तशीच राहिली.

काही नविन मित्र/मैत्रिणी मिळाले. मुलीची बदली ठाण्याला होउ घातली होती तेव्हा स्वत:चा रिकामा फ्लॅट भाड्याच काय त्यात नंतर पाहु म्हणणारा मायबोलीकर मित्र मिळाला.

२०१० साल अतिशय आनंदात गेल. इथे वाद होतात. मायबोलीमुळे कामाचा वेळ जातो अस वाटत पण मन पुन्हा पुन्हा इकडे धाव घेत.

ती आईने अकबरी वाचायची प्रचंड उत्सुकता आहे ... लिंक उघडत नाहीये.... काय बरं करावे??????
:हे पोस्ट 'मदत हवीये' मधे घालावे का? अशा विचारात पडलेली बाहुली:

हरे राम ...... हसुन हसुन पुरेवाट झाली ... हे लिहिणे सुध्दा पुरेसं ठरणार नाही अशी हसतेय. Biggrin Biggrin Biggrin
'आईने अकबरी' प्रकरण हा माबेच्या इतिहासातील अत्युच्च पान आहे. ही अशी 'आईने अकबरी' अकबराच्या आईने वाचली तर?????

हे हे हे ... माझं नेहेमी तुमच्या दोघांच्या नावात सॉल्लिड कन्फ्युजन होतं.....

>> मामी आधी मी 'सूर्यकिरण' पडल्यावर.. 'इंद्रधनुष्य' तरफडतो. Light 1 Lol

आईने अकबरी .. Rofl खरोखर हहपुवा आहे.

धन्स डॅफ आणि इंद्रधनुष्य. Happy
रा. ना. जाधवने मायबोली संन्यास घेतला आहे. << का बरे ??? Sad
तो फार अ‍ॅक्टिव सदस्य होता.

बरेच जुने माबोकर सरावाने वाट चुकुन येतात आणि बदललेलं रुप पाहुन निघुन जातात << अगदी अगदी.
माझे ही तसंच होतं, सगळेच देवनागरी मध्ये लिहित होते आणि मला देवनागरी मध्ये लिहायला जमत नव्हतं Sad

आता जमतंय थोडं थोडं. Happy

<< तिथे एक विषय चालू झाला की टाईम झोन प्रमाणे एका कडुन दुसरी कडे पास केला जायचा>>

सत्यजित यांस अनुमोदन.

कित्येक वेळेस मी ऑफिस मधुन सुटल्यावर रात्री उशीरा सायबर कॅफे मधुन माबो अक्सेस करायचो, आपण पास केलेल्या कॉमेंट्स वर काय राडा चाललंय हे बघायचो. काही वेळा रात्री ११.०० वाजे पर्यंत सायबर कॅफे मध्ये एकटा असायचो, व्यसन लागल्यासारखं.

रा ना जाधव ने सन्यास वगेरे काही घेतलेला नाही रे..............

काम वाढत गेल आणि इकडे फिरकण आपो आप कमी होत गेल,
तरी ही पुण्याला गेलो तर जुन्या माय्बोलीकरा.न्ची जमेल तशी भेट घेण चालु असत

मुबई चे जुने माय्बोलीकर सध्या स.न्पर्कात आहेत, पण त्या.न्च्याही प्राप.न्चीक जवाब्दार्या इतक्या वाधल्यात की ते प्रुवी प्रेम कविता लिहायचे आता मात्र्तुव , पित्रुत्व वगेरे वर कविता लिहायला लागलेत.......... Happy

सि.न्हगड, बोरिवली, तिकुजीनी वाडी, मोदी रेसोर्त आणि इतर छोट्या जी. टी. जी च्या सगळच्याआठवणी अजुन जुन्या हित्गुज्वर जाउन ताज्या करुन घेतो.

पर्वाच परवलीचा श्ब्द मागुन घेतला आहे Happy

आता जमेल तस येत जाणार आहे......... Happy

Pages