युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

त्यांचं असं म्हणणं आहे की तळताना ही पावडर वापरली की तेलाची, इंधनाची बचत होते, लोणी कढवताना त्यात ही पावडर घातली की बेरी कमी राहते वगैरे वगैरे.
Submitted by वावे >>>>
हे सगळे ती पावडर का / कसे घडवून आणते त्याचे स्पष्टीकरणही दिलेय का? साईट बघावी लागेल.
थोडक्यात तयार तूप आणि बाहेरचे तळलेले पदार्थ खाताना आता अधिक विचार करावा लागेल.

तेलाची बचत पैशाच्या दृष्टीने गौण आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.
पण ह्या पावडरचे (त्यात perlite आहे) दीर्घकाळ वापरासाठी आरोग्यावर काय परिणाम होतात तेही बघायला हवे.

पावडर घालून तळणासाठी वापरलेले तेल फिल्टर करून परत वापरता येते, पण परत तळणासाठी नाही तर भाज्या, फोडणी साठी असे त्या साईटवर लीहिलंय. पण हेच पावडर न वापरता केलेल्या तळणाच्या तेलालाही लागु नाही का?

आता या पावडरने तेल कमी लागतं (आरोग्याला कमी अपायकारक) म्हणुन, जास्त वेळा तळण केले जाऊन एकंदर पोटात जाणाऱ्या तेलाचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त असं नाही ना होणार?

फ्राय पावडर नक्की काय आहे . एफ एस एस आय अप्रुव्हड आहे का असा प्रश्न मी विचारला होता विश्नु मनोहर ना एका व्हिडीओ खाली कमेंट मध्ये त्याला काहीही उत्तर नाही. त्याचे केमि कल कंपोझिशन कळल्या शिवाय वापरू नये. व्यावसायिक लोक पैसे वाचवायला काहीही करतात इथे मुंबईत अनेक वेळा वापरलेले तेल विकले जाते तो विषयच नको विष्णु मनोहर ला सायन्स फारसे माहीत नाही. व टेक्निकल डॉक्स उपलब्ध नाहीत ह्या पावडरची. ते सांगणे जबाबदारी असते उत्पादकांची. काळजी घ्या वापरताना.

किमान घरगुती वापराला तरी त्यातल्या त्यात कमी वेळा तळण करणे हाच बेस्ट उपाय वाटतो,
जर फार सोवळे वगैरे कल्पना त्रास देत नसतील तर तळण वाले तेल दिव्याला वापरुनही संपवता येईल.
(कोजागिरीला आम्ही घमेल्यात जुने रद्दी कागद आणि एक्स्पायर झालेली हेअर ऑईल संपवली.ब्राह्मी माका युक्त शेकोटी.)

ब्राह्मी माका युक्त शेकोटी >>> Lol
मी शक्यतो तळण करून उरलेले तेल तुळशीपुढच्या पणतीत घालायला वापरते. ते पण अलीकडे काही वर्षात .पूर्वी वापरायचे भाजी, आमटी त.

उरलेले तेल वापरायला आणि फेकायला नको वाटतं...क्वचित काही बनवलंच तरी कमी तेलात तळते किंवा शैलो फ्राय..
कधी पापड,पूरी तळलेले चपाती/डोसे साठी वापरते पण भजी, वडे केले तर नको वाटते ते तेल परत वापरायला.

तेल नको तर एअर फ्रायर वापरणे

उगाच तेलातून उठून पावडरमध्ये पडणे नको

एअर फ्रायरच्या रेडिएशन ने कँसर होतो , असे कुणीतरी आणि 10 वर्षाने पेपर पब्लिश करेलच
तोवर वापरा
Proud

Happy
मी डॉ. वर्षा जोशींचा मेल आयडी शोधून त्यांना या संदर्भात ईमेल केली आहे. स्वयंपाकघरातील विज्ञान पुस्तकाच्या लेखिका.
त्यांनी उत्तर दिलं तर इथे लिहीनच!

मला फ्राय पावडर वापरायचीच आहे असं काही नाही Happy

जाहिरात खूप वेळा पाहिली म्हणून आपली उत्सुकता! मुळात फारसं तळण होतच नाही घरात. झालं तरी ते तेल काही मी परत वापरत नाही. कारण एकदोनदा वापरून पाहिलं तेव्हा अगदीच तेलकट चव आली पदार्थाला. यावर्षी दिवाळीत केलेल्या तळणाचं तेल मी पणत्या लावायला वापरून टाकलं.

या सीझनमध्ये फ्रेश मटार मिळतात.. सोलून एअरटाईट बॉक्स मधे, फ्रिजरमधे ठेवल्यास टिकतात का?
मी कधी केले नाहीएत असे स्टोर..कुणी करत असल्यास किती काळ टिकतात सांगु शकाल का?

इथे बघा कसे करावेत ते. आम्ही या पद्धतीने करतो.

स्वयंपाकात एका वेळेला जेवढे लागतील तेवढे तेवढे एकेका हवाबंद पिशवीत पॅक करावेत.

हो छान टिकतात. मी फ्रोझन मटार विकत आणते. माझे लवकर संपतात पण त्यावरच्या एक्स्पायरी डेटनुसार ते वर्षभर टिकत असावेत.

स्वयंपाकात एका वेळेला जेवढे लागतील तेवढे तेवढे एकेका हवाबंद पिशवीत पॅक करावेत.>>>> मग अश्या किती पिशव्या कराव्या लागतील! ते फ्रीझ करताना अधून मधून हलवून ठेवले तर चिकटून एकत्र होणार नाहीत आणि चिकटलेच तर त्यावर बत्ता मारून वेगळे करायचे. मला मूठभर लागतात तेव्हा मी तसेच करते.

पाहिला विडिओ.. साधारण किती महिने टिकतात आणि समजा दिवसभर लाईट नसेल तर खराब होतील का?? आमच्या इथे महिन्यात एकदा पूर्ण दिवस लाईट नसते आणि अधेमधे पण तास दोन तास जात असते.

आम्ही चार पाच महिन्यांपर्यन्त वापरले आहेत. दोन तीन तास लाईट गेल्याने काही होणार नाही. दिवसभर नसेल तर काही कल्पना नाही.

चांगल्या प्रतीचे मटार आणून ब्लांच करून अर्ध्या किलोच्या पॅक्स मध्ये ठेवले तर सोयीचं पडतं हा अनुभव आहे. पण ते इतक्या पटापट संपतात की कितीही केले तरी वर्षभर नक्कीच पुरत नाहीत. फ्रीजर मध्ये बाकी सामानालाही जागा हवी ना! आम्ही ५ किलोचे केले होते. जेमतेम ६ महिने पुरले. मुळात मटार आवडीचे असल्यानी आणि आहेतच आता फ्रीज केलेले असं असल्यानी सगळीकडेच वापरल्या जातात. Wink

फ्राय पावडर वापरण्यापेक्षा सरळ थोडं मीठ घातलं तळणीच्या तेलात तर तोच इफेक्ट साधतो. आणि मीठच असल्यानी अपाय इ. शंका कुशंका काहीही राहात नाही.

Manavnni दिलेल्या link मध्ये थोडा बदल करून मटार प्रिझर्व करते. 1 मिनिट गरम पाण्यात उकळून बाकी सेम प्रोसेस आणि पिशवीत भरायाच्या आधी सुती कपड्यावर कोरडे करून घेते.

मी 10 kg मटार आणुन (बोपदेव घाट, इथे जगातले बेस्ट मटार मिळतात) 3-4 पिशव्या बनवुन फ्रिजर मध्ये ठेवते. फ्रीज भलाssss मोठा आहे त्यामुळे चालून जातं. 5-6 महिने पुरतात. यात थोडे मैत्रिणीला किंवा जाऊ यांनाही वेळोवेळी दिले जातात, नाही तर 7-8 महिने पुरतील. मी ब्लाँच करत नाही. मला आवडत नाही. मला बाजारात मिळणारे फ्रोजन मटार कधी आवडले नाहीत. थॉ केल्यावर फार बंडल होतात, जसे ब्लाँच न केलेले आपले ताजे मटार होत नाहीत.

Blanch मराठीत टाइप करताना भलताच उच्चार दिसतो. बरेच शब्द मराठीत नीट टाइप होतच नाहीत.

आम्ही यावर्षी मार्च मधे मटारच्या बिया पेरल्या होत्या. जून- जुलै मधे भरपूर शेंगा यायला लागल्या. त्यावेळेस जवळपास २ किलो दाणे नुसतेच छोट्या झिपलॉक बॅगांमधे भरले आणि फ्रीझरमधे ठेवलेत. गरज लागेल तसे त्यातले काढून वापरतोय. ऑगस्ट मधे एकदा ५ दिवस वीज नव्हती . तेंव्हा जनरेटर लावून दिवसातून ८-९ तास फ्रीज चालू ठेवत होतो. फ्रोझन गोष्टी कुठल्याही खराब झाल्या नाहीत.
पुढच्या वर्षी अजून जास्त मटार लावणार आणि फ्रीझ करणार

फ्रोजन मटार मी कधी आणले नाहीत.. त्यामुळे सीझनमध्येच खायला मिळतात..यावेळी म्हटलं स्टोर करून ठेवावे..
मीरा तुम्ही ब्लांच करत नाही मग डायरेक्ट स्टोर करता कि सोलून ?

हो हो अर्थात सोलुनच. Lol
बाप रे ! न सोललेले 10 kg मटार ठेवायला walk in रेफ्रिजरेटर लागेल. हॉटेलसारखा, भला मोठा.

आणि 5 मिनिटं बाहेर काढले की हाताने हवे तेवढे तोडून घ्यायचे (कारण एकमेकांना चिकटलेले ढेकळासारखे असतात Proud ). निघतात सहज.

टीप - पोळ्यावाल्या मावशीला दोन दिवस पोळ्याना सुट्टी द्यायची (त्या दोन दिवसात आपणच डोसा आणि पास्ता बनवायचा) आणि त्यांच्याकडुन त्या दोन दिवसात 10kg मटार सोलुन घ्यायचे. समोर प्राईम किंवा नेफ्लिवर मराठी सिनेमा लावायचा आणि त्यांची विशेष टिप्पणी ऐकत दोघींनी मटार सोलायचे. त्यांच्या बरोबर सिनेमा पाहणं फार एंटरटेनिंग असतं. अर्थात तुमच्या मावशींच्या अपॉइंटमेंट लेटर वर t&c काय आहेत त्यावर हे अवलंबुन आहे.

मी पण मटार पहिले ३-४ दिवस सोलायला आणि प्रवासाच वेळ ज्या काळात बाहेर असतात त्या वेळी सामन्य तापनात त्यानंतर हवाबंद झिपर मध्ये ठेउन नंतर ४-६ महिने वापरले आहेत.
वापरताना १ मिनिट गरम पाण्यात टाकुन घेतो.

मीरा, तुम्ही मटार सोलून तसेच फ्रीजर मध्ये ठेवता ,त्या matarna एक वेगळा वास येत नाहीं का? कोणे एके वर्षी मी मटार तसेच ठेवले होते फ्रीजमध्ये.म्हणजे पिशव्यात घालून ठेवले होते.पण एक भयंकर वास यायला लागला. शेवटी सर्व फेकून दिले. आता ब्लांच करूनच स्टोअर करते.

Pages