Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Microwave oven convection and
Microwave oven convection and grill.. याबद्दल कुठे चर्चा आहे? लिंक द्याल का? >>>> यूट्यूबवर असंख्य डेमो व्हिडीओज आहेत. मी युट्युबवर पाहून, परवाच पहिल्यांदा लादी पाव बेक केला, अगदी विकत सारखा फ्लफी झाला नाही पण 90% जमला. जबरदस्ती न करता सगळ्यांनी गुपचूप खाल्ला, म्हणजे एडीबल होता.
इथली बिडाच्या तव्यावरची चर्चा
इथली बिडाच्या तव्यावरची चर्चा वाचून मलाही खूप मोह झाला तवा घ्यायचा. असेही नवऱ्याला घावणे आवडतात पण माझे नीट होतच नाहीत प्रत्येकवेळी तुटतात म्हणून आता बिडाचा तवा शोधतेय. Amazon वर ८०० रुपयांपासून सरुवात आहे११ इंचाचे ते ही प्रीसिझनिंग केलेले. ठाणे मार्केट मध्ये पण बघितला साधारण ४५०-५०० किंमत आहे पण ते अगदी पांढरे आणि खरखरीत आहेत त्याला सिझनींग करायला जेव्हढ तेल आणि कांदा जाईल त्यामानाने अमेझॉन वरचा परवडेल असे वाटतेय.
दोन माणसांसाठी(ज्येष्ठ नागरिक
दोन माणसांसाठी(ज्येष्ठ नागरिक) गॅस गिझर उपयुक्त आणि वापरण्यास सोपा की इलेक्ट्रिक गिझर? कोणत्या ब्रँडचा घ्यावा? साधारण किंमत किती असते?
एक्स्ट्रा सिलेंडर अव्हेलेबल
एक्स्ट्रा सिलेंडर अव्हेलेबल असेल आणि बदलणं सोपं पडत असेल तर गॅस गिझर.
इलेक्ट्रिक जनरली स्टोरेज आणि इंन्स्टंट अश्या दोन्ही प्रकारांत येतात. अर्थात वीज वापर सुध्दा वाढतो.
मोस्टली इंन्स्टंट ३/५ लिटर मध्ये असतात आणि ३००० - ४००० वॉटस पॉवर असते.
स्टोरेज प्रकारात १० लि - २५ लि स्टोरेज ची सोय आणि २/२.५ हजार वॉट्स अशी पॉवर असते.
ब्रँड मध्ये ए ओ स्मिथ चांगला आहे (गेले ३ वर्षे रोज वापरतो आहोत) अन नेहेमीचे ब्रँडस ही आहेत बजाज, क्रॉम्प्टन इ.
शक्यतो नव्या फ्लॅट्स मध्ये इलेक्ट्रिक गिझर ची सोय सोपी पडते (कारण फक्त फिटच करायला लागतो).
गॅस गिझर ला शक्यतो काही सोय करून घ्यायला लागते (मेन गिझर फिट करायची जागा, व्हेंटीलेशन, सिलेंडर ठेवायची जागा, वेगळी पाईप लाईन इ)
योग्य वायूविजन होण्याची सोय
योग्य वायूविजन होण्याची सोय नसेल तर गॅस गीझर टाळाच.
माझ्या इमारतीमधील एका तरूण मुलीचं नुकतंच निधन झालं गॅस गीझरमुळे.
घाबरवत नाहीये. पण तुम्ही ज्येष्ठ नागरीकांचा उल्लेख केलात त्यामुळे जास्त काळजी घेणं चांगलं.
कोणत्या ब्रँडचा घ्यावा?
कोणत्या ब्रँडचा घ्यावा? साधारण किंमत किती असते?
ओ तै इलेक्ट्रिकच घ्या. माझ्यकडे असलेले दोन्ही रॅकोल्ड चे आहेत. ३ लि. इंस्टंट २०१२ पासुन वापरतोय काहीही प्रॉब्लेम नाही.
रॅकोल्ड, उषा, हॅवेल्स इ.
दोन माणसांसाठीच हवा तर गॅस
दोन माणसांसाठीच हवा तर गॅस गिझर टाळा. किंमत 5,000 च्या आसपास पडते, सिलेंडर लावा काढायची खटपट करावी लागते आणि योग्य वायुविजन नसेल किंवा असले तरी चुकून बाथरूमची खिडकी घट्ट बंद राहिली तर कार्बन monoxide बाथरूममध्ये कोंडून अंघोळ करताना नकळत मृत्यू होऊ शकतो. दोन माणसांच्या गिझरचे अगदी डोक्यावरून जाणारे बिल येत नाही, गिझर 1000-1500 पर्यंत मिळतो आणि एकदा लावला की नो खिटखिट...
दगडी खलबत्ता कसा रुळवतात?
दगडी खलबत्ता कसा रुळवतात?
खलबत्ता कधी केला नाही पण रगडा
खलबत्ता कधी केला नाही पण रगडा नवा असताना किंवा नव्याने टाकी घालून घेतल्यावर भिजवलेली उडदाची डाळ वाटून ते पीठ टाकून देत असत आमच्याकडे .
Stahl च्या स्टिल कढया कोणी
Stahl च्या स्टिल कढया कोणी वापरत आहे का?रोजच्या वापरासाठी कशा आहेत?
मंजुडी नवीन धागा काढा ना आता.
मंजुडी नवीन धागा काढा ना आता. खूप शोधावे लागते.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/59101 या धाग्यावर चला
मेधा खलबत्त्याचा दगड
मेधा खलबत्त्याचा दगड पाट्यासारखाच दिसतोय. हा उपाय करून बघते.
बिर्याणी / मूगडाळ
बिर्याणी / मूगडाळ खिचडीसारख्या मोठ्या प्रमाणावर होणार्या भाताच्या प्रकारांसाठी तुम्ही कुठली भांडी वापरता? लोखंडी कढई चालेल का? लोखंडी काढईत केलं तर लगेच काढून ठेवावं लागेल ना?
मी किचन विषयातील तज्ञ नाही,
मी किचन विषयातील तज्ञ नाही, पण बिर्याणीमध्ये दही आणि टोमॅटो असतो त्यामुळे लोखंडी कढईत शिजवुन चालणार नाही असं मला वाटतं. आम्ही जिथुन बिर्याणी ऑर्डर करतो ते अतिशय जड स्टीलच्या भांड्यात, ज्याला कॉपर बॉटम आहे, अशा भांड्यात शिजवतात. खुप मोठं भांडं असलं तरी शेप क्युट असतो. तपेलीसारखा. शिवाय कढईत बिर्याणी केली तर सील करायला (दम बिर्याणीसाठी) अवघड जाईल.
खिचडी तर आम्ही कुकरमध्ये शिजवतो. कमी लोकांसाठी चिंटुमींटु कुकर, जास्त लोक असतील तर मोठा फ्युच्युरा कुकर.
या धाग्यावर २००० पेक्षा
या धाग्यावर २००० पेक्षा जास्ती पोस्ट्स आहेत. नवा धागा उघडलेला आहे मॅगी यांनी.
पुढली चर्चा तिथेच करा
https://www.maayboli.com/node/59101
२०१४ पर्यंतच्या पोस्टस
२०१४ पर्यंतच्या पोस्टस पाहिल्या. आता बाजारात फरक पडला असल्याने पुढच्या स्कीप करून विचारतोय.
घरगुती कणीक मळणीचे मशीन कुणी वापरले आहे का ?
तीन / चार / पाच माणसांसाठी ( वेगवेगळी)
कुठले घ्यावे ?
मला चांगला रिव्हर्स ऑसमॉसिस
मला चांगला रिव्हर्स ऑसमॉसिस वाला वॉटर फिल्टर हवा आहे. तुम्ही लोक कोणता वापरता? मी घरी कॉर्पोरेशन च्या नळाला जोडून घेणार आहे.
सध्या युरेका फोर्ब्स् चा आहे घरी, पण तो जुना झाला आहे. ऑट ऑफ वॉरंटी आहे. म्हणून नवा घ्यायचा आहे.
Amazon surf करतांना आज
Amazon surf करतांना आज cooking machine दिसले, मला रोज रोज cooking चा खूप कंटाळा येतो, कोणी वापरून बघीतले आहे का हे machine??
दिव्या हे लोक शार्क टॅंक
दिव्या हे लोक शार्क टॅंक इंडिया मध्ये आले होते मागे.
जमल्यास तो एपिसोड बघा.
त्यात यांनी लाईव्ह डेमो दिला होता.
आणि सर्व शार्क नी या उपकरणातील प्रॅक्टिकल तृटी दाखवून दिल्या होत्या.
टू स्टार्ट विथ.. चांगला गाईडन्स मिळेल.
Thanks पियू, बघते
Thanks पियू, बघते
Pages