चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ते ढोमे चा नाच रे मोरा न परसाकडे (हा खास त्या आईचा शब्द) त्याला चैतन्य गृह म्हणण्याचा सीन मस्त होता.. आई चा रोल करणार्या ऐक्ट्रेसचे काय नाव आहे?

चैतन्य गृह होतं का ते, शब्द कळला नाही आणि त्यामुळे विनोदही समजला नाही.
सुभा मोबाईल वापरत नाही असं चुकून बोलून जातो बहुतेक आणि मग ते कंटिन्यू करायला पाहिजे म्हणून तिच्यासमोर मोबाईल घेऊन जात नाही. मनोहर विषयी काय कळलं स्वातीला, कालचा भाग नाही बघितला मी. ती शेवटी नवनाथशी लग्न करेल सगळी फसवणूक वगैरे झाल्यावर असं वाटतंय.

सगळच किती गुढ आहे या मालिकेमध्ये. अगदी संगीत जरी कानावर पडलं तरी गुढ वाटत. >>>>>>> पण ह्याच टायटल सॉन्ग ओके वाटल मला तरी. तुपारेच गाण कितीतरी पटीने हॉन्टिन्ग होत.

सुभा मोबाईल वापरत नाही असं चुकून बोलून जातो >>>>>>>>> चुकून नाही. ' आपण कित्ती साधे सरळ आहोत. मोबाईल सुद्दा वापरत नाही. उगाच त्या 'यन्त्राचा अतिहव्यास नको.' अस स्वतला आदर्शवादी दाखवून तिला इम्प्रेस करायच असत त्याला.

बाकी ह्यच्यात हिरोईन ' अरे ला कारे करणारी' आहे. पण सगळयाच डेलिसोपच्या नायिका लग्नाआधी अश्याच असतात. लग्नाआधी त्यान्ना वाघीण दाखवतात, लग्नानन्तर मात्र त्यान्ची शेळी होते.

पण ह्याच टायटल सॉन्ग ओके वाटल मला तरी. तुपारेच गाण कितीतरी पटीने हॉन्टिन्ग होत. >> टायटल सॉन्ग ऐकले नाही मी अजून . पण सुबोधचा एकंदरीत वावर गुढ वाटतो मला. ( हेमावैम)
तुपारेच टायटल सॉन्ग हॉन्टिन्ग पण छान होतं.

चैतन्य गृह होतं का ते, शब्द कळला नाही आणि त्यामुळे विनोदही समजला नाही.>> हो...तो टॉयलेट ला चैतन्य गृह म्हणतो.. आवडला नविन शब्द Lol

सुभा ला त्याचा मित्र जो आधी बघायला आलेला असतो ..मनोहर तो ओळखत असतो ना... आजच्या काळात कशीही ,कुठून ही माहिती मिळते.. मग लग्ना नंतर कशी फसवणूक झालेली दाखवणार ते logically दाखवलं पाहिजे.. लग्नात एवढे फोटो,विडियो काढलेले असणार..

पण सुबोधचा एकंदरीत वावर गुढ वाटतो मला. >> पण त्याने बेरकी आणि मुली समोर अगदीच शेळपट असल्याचा अभिनय मस्त केलाय.. त्याचे केस सुध्हा मेंदी ने रंगवलेत...म्हणजे तो जास्त वयाचा आहे... हे दिसायला.. मेंदीचा केशरी रंग पांढर्या केसांवर.... black die नाही दिला....

मेंदी नाही नोटीस केली. सुभाने अभिनय छान केलाय. मनोहरचं माहिती नाही पण स्वाती एकोणतीस वर्षाची आहे, त्यात तिची अट आहे की पुण्याचाच मुलगा हवा. सुभा अतीच नेभळट वाटतो, अविश्वसनीय भोळा वाटतो तो, स्वातीला विश्वास बसतो आणि ती काही त्याचा खोलात जाऊन तपास करेल असेही वाटत नाही. स्वातीच्या आईने आणि नवनाथनेही छान अभिनय केलाय. ती मुमु वयाच्या मानाने अतीच आगाऊ वाटते.

फेवी स्टिक?? हे काय आहे?? >>> अर्रर्र sorry. म्हणजे फेवी स्टिक आहे घरात पण tv साठी amazon फायरस्टिक आहे. आता एडीट पण नाही करता येणार.

माहिती असलेली स्टोरी असूनही बघायला फार कंटाळा नाहीए येत. हाताळणी छान वाटते आहे.
अभिनय आणि पार्श्वसंगीत फार लाऊड नाहीए हे बरं आहे. त्या वधूवरसूचक बाई ही चांगल काम करताएत.

कथानक खूप पटापट पुढे सरकत आहे.... लग्न ठरलं सुध्हा. >>>>>>> हो ना, म्हटल स्वातीची आई ' श्रीधर बिजवर आहे' म्हणून लग्नाला नाही म्हणत होती. तर आता 'यह शादी नही हो सकती, लम्बी जुदाई, त्याग इ. इ. अस नेहमीच रडगाण दाखवतायत की काय.

माहिती असलेली स्टोरी असूनही बघायला फार कंटाळा नाहीए येत. हाताळणी छान वाटते आहे.
अभिनय आणि पार्श्वसंगीत फार लाऊड नाहीए हे बरं आहे. त्या वधूवरसूचक बाई ही चांगल काम करताएत. >>++++++१११११११

काय आहे स्टोरी?
थोडक्यात सांगाल का
मला आता बोअर व्हायला लागली आहे शिरेल यापेक्षा मातीचा रंग वाली बरी

ती स्वाती मठ्ठ आहे का
म्हणजे वधुवर सुचकवाली इतके चांगले सगळे चौकशी करतीये तर ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यागत वाटली.
खरी कथा आहे असे वाचून वाईट वाटले, स्वातीसारखे आंधळे पणाने प्रेमात पडून स्वतःच मूर्ख व्हायचे म्हणून फसतात मुली

म्हणजे वधुवर सुचकवाली इतके चांगले सगळे चौकशी करतीये तर ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यागत वाटली. >>> अगदी

पण सध्याच्या (सोमि) च्या काळात ही फसवणूक कशी दखवणार आहेत काय माहीत.

पण सध्याच्या (सोमि) च्या काळात ही फसवणूक कशी दखवणार आहेत काय माहीत.<< exactly... आधिच्या काळी कोणा ला माहिती न देता किंवा लोकांशी अजिबात संपर्क न ठेवता गपचुप आपला कार्यभाग साधून पोबारा करता येण जास्त कठिण नसाव.. पण श्रीधर ला लोक ओळखत असतील... पण असं म्हणे पर्यंत कुठे ना कुठे असे अनेक मुलीना फ़सवून लग्न केल्याचे किस्से,बातम्या आज ही वाचायला मिळतातच.. भाबडी आशा फसवते..

काय आहे स्टोरी?>> कुसुम मनोहर लेले नाटकातील स्टोरी..सत्य घटनेवर आधारित कथानक असावं हा अंदाज आहे..अजून पुर्ण स्पष्ट नाही झालय.. त्या जोडप्याला मुल होत नसते..म्हणुन फ़सवून दुसर लग्न करुन त्या स्त्री ला मुल झाल्यावर घराबाहेर काढतो .की तुझा काहिच संबंध नाही..कारण तिच घरात कुठे च,कागदोपत्री नाव नसत.. तिच नाव हे जुन्या बायकोच च नाव ठेवतो..so मुल ही जुन्या बायकोच्या च नावाने असतं

पण यात तर बायको च नाव पौर्णिमा होत आणि स्वातीच नाव नंतर सुमन ठेवणार आहे असे सांगितले आहे आणि मुळात फसवयचे आहे तर आधी लग्न झालंय असं सांगितलेलं का दाखवत आहेत

पौर्णिमा खोटं नाव असेल, खरं नाव सुमनच असेल. त्याच्या बायकोचा नंबर पण लागत नव्हता ना. सोमवारपासून बघितली नाहीये. तो पहिल्या लग्नाचा वाटत नाही आणि शिवाय तो मनोहर बरोबर आला होता ना, मनोहरला माहित असेल त्याचं लग्न झालंय ते. मनोहरला विचारायला हरकत नव्हती काळेबद्दल पण त्या बिचाऱ्या मनोहरला बोलूच दिलं नाही यांनी. बाकी मनोहर लिव इन वाला अजिबात वाटत नव्हता.

शिवाय तो मनोहर बरोबर आला होता ना, मनोहरला माहित असेल त्याचं लग्न झालंय ते<<उद्या च्या भागाची झलक दाखवली त्यात स्वाती आणि श्रीधर फिरत असताना मनोहर प्रकट होतो..आणि तिला म्हणतो लग्नासाठी मुले बघायची नाटकं कशाला केलीत जर लफडे(वि बा सं) च करायचे होते तर..आता तो श्रीधर च्या लग्ना बाबतीत सांगतो की नाही ते उद्या कळेल..

बाकी मनोहर लिव इन वाला अजिबात वाटत नव्हता.<< Lol खरच..बिचारा खूप साधा वाटत होता... अगदी स्वातिला पण अहो जाहो करत होता... तो लिव ईन आणि मारहाण करणारा हे अती झाल... स्वातीला लिव ईन वाला नको पण घटस्फ़ोट होऊ घातलेला चालतो... मन माती खातं त्या पुढे बद्धी काम नाही करत हेच खर

नवनाथ रेसकोर्सवर तिकिटं विकतो हे ऐकून धक्का बसला, म्हणजे अशी पण नोकरी असते हे माहित नव्हतं म्हणून. आजचा भाग बघायचा म्हणून voot लावलं तर उद्याचा भाग पण टाकला होता साधारण नऊ वाजता. पैसे भरावे लागतात ही मालिका बघायला voot वर. स्वाती अगदीच उतावीळ झालीये लग्न करायला, बहुतेक रूपावर भाळली त्याच्या.

आज ढोमे चा नंनोबा आवडला...एकदम संयत अभिनय केला त्याने >>>>>>>> अगदी अगदी. ह्याआधी त्याला संयत भूमिकेत पाहिल नव्हत.

आज नवीन प्रोमो बघितला, स्वाती अचानक काळेला लग्नासाठी नकार देतेय. अस मध्येच अचानक काय झाल हिला? लग्नासाठी उतावीळ होती ना ही? मेबी आईच्या विस्मरणाच्या आजारामुळे असेल.

मुळात फसवयचे आहे तर आधी लग्न झालंय असं सांगितलेलं का दाखवत आहेत >>>>>>> कुमले नाटकातही असच दाखवल होत, मनोहरच डिवोर्स झालेला नसतो तरीही कुसूम त्याच्याशी लग्न करते.

स्वातीला लिव ईन वाला नको पण घटस्फ़ोट होऊ घातलेला चालतो. >>> लिव ईन प्रकरण नंतर बाहेरून कळतं हा प्रोब्लेम असतो

कालच्या भागात स्वाती ची आई हरवली होती ती नवनाथ ला भेटली... सांगते की रस्ता चुकले आणि मग बस स्टॉप वर बसून राहिले आणि म्हणते... मला माहीत होत स्वाती नक्की येणार मला शोधायला.. हे ऐकुन नवनाथ खिन्न होऊन म्हणतो की नंनोबा ने शोधलं आणि उदास होऊन आपल्या घरी जातो... नवनाथ/ ढोमे चा अभिनय छान होत चालला आहे...आधी जो त्याला पुणेरी विनोद वीर दाखवत होते त्या पेक्षा आताचा विचारी बरा वाटतो आहे... bdw मध्यमवयीन श्रीरंग चा पोरकट romance नाही आवडत आहे... फ़्लाइंग किस ला उन्चू (उडते चुंबन) काय.. डेट वर गेल्यावर लाडिक बोलणं काय..(प्रेमाला वयाच बन्धन नसतं पण वयोपरात्वे प्रेम व्यक्त करण्याची रित बदलते)ते ही माहीत असतना की तो हे सहेतूक करतो आहे..

Pages