चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संग्राम सारख्या पावरफुल माणसाला त्याच्या बायकोला अशी धमकी देऊन घाबरवणे हास्यास्पद आहे.... काहिही.. >>> + १२३४५६७८९

स्वाती प्रेग्नंट आहे हे डॉक्टर भावाने अजून जाहीर केलेले नाही. कदाचित तो अनिमिया आहे असेही म्हणेल . फालतू सस्पेन्स तयार करून हास्यास्पद रीतीने रहस्यभेद करण्याचे आता हसू झाले आहे. स्वातीचा बावळट पणा अजूनही गेलेला नाही. तो शेळपट सुधीर काळे संग्राम असताना आईला मारू शकेल काय. तू मारूनच दाखव असे खडसावायला पाहिजे होते. धक्का तंत्राच्या नावाखाली काहीही दाखवायला लागलेत . उदा प्रिया म्हणते थांब (नंतर उखाणा घेतल्याशिवाय लग्न नाही. ). नन्ना म्हणतो थांबा. ( मी असल्याशिवाय लग्न कसे करता) काहीतरीच बालीशपणा सुरू आहे. केवळ आस्ताद काळे मुळे बघवतेय मालिका.

इकडे श्रीधर स्वाती ला धमकी देतो जर तिने संग्राम ला काही सांगितल तर तो त्याच्या आईला मारुन टाकेल >>>>>> सन्ग्रामच्या नाही तिच्या आईला मारण्याची धमकी देत होता. इतका पावरफुल आहे का तो सन्ग्रामपुढे? आणि हि बावळट स्वाती इतक सगळ होऊन गप्प बसलीये, सरळ तिकडेच पितळ उघड पाडायच होत ना श्रीधरच सन्ग्रामपुढे.

स्वाती प्रेग्नंट आहे हे डॉक्टर भावाने अजून जाहीर केलेले नाही. >>>> काल सान्गितले त्याने प्रेगनन्सीबद्दल स्वातीला. आणि हि ते लगेचच सन्ग्रामपुढे बरळली. सरळ कुणाला न सान्गता परागच्या हॉस्पिटल मध्ये अ‍ॅबोर्शन करुन घ्यायच ना.

अ‍ॅबोर्शन करुन घ्यायच ना.>> असे आपल्याला वाटते. पण गर्भपात करणे पाप आहे, जे झाले त्यात बाळाचा काय दोष असे काही तिला वाटत असेल तर?
मग भले त्या बाळाचे आयुष्य कसे का असेना, त्याला जन्माला घालून त्याच्या पाखंडी बापाकडे त्याला द्यावे का? अन नाही दिले तर तो गप्प बसेल का? अन बसला तरी संग्राम त्याला जीव लावेल का? सगळ्याचा बाळावर काय परिणाम होईल? पुढे तो म्हटला कि मला माझ्या बाबांकडेच जायचे तर?...असे हे सगळे प्रश्न आपल्याला पडणार आहेत Happy

संग्रामने श्रीधर काळेचा एकही फोटो किंवा त्याला प्रत्यक्ष पाहिले नव्हते Uhoh

श्रीधरने बरोबर कोण संग्राम हे गुगलून पुढची चाल केली. आत्याने पण श्रीधरची माहिती काढली होती.

का मालिकेतल्या So called चांगल्या लोकांना दुसर्याची माहिती काढणे allowed नाहिये??

असे आपल्याला वाटते. पण गर्भपात करणे पाप आहे, जे झाले त्यात बाळाचा काय दोष असे काही तिला वाटत असेल तर?>>तेच तर.. या मालिके मधल्या नायिका एवढ्या सद गुणांचा पुतळा का दाखवतात.. real life मध्ये गपचुप सगळं निस्तरून येतील मुली.. आणि जेव्हा की श्रीधर आणि सुमन चा प्लान आधीच कळला होता..एखादी मुलगी emergency pills पासून घरगुती उपाय सगळे करुन बघेल.. मंद पणा

त्यात तो डॉक्टर भाऊ असं गार्डन मध्ये उभ्या उभ्या बोलतोय स्वाती ला की आता तू दोन जिवांची आहेस...जरा तरी गोपनीय ठेवाव..तिथे त्या वहिनी ने ऐकल..आणि आता बोभाटा..मग संग्राम म्हणणार हो माझच आहे मुल..

सन्ग्राम म्हणणार माझच आहे मूल. पुन्हा श्रीधर काळे भविश्यात म्हणणार माझेच मूल. मग आता डी एन ए टेस्ट होनार वगैरे . अजून हण्डाभर पाणी ओतायला वाव आहे . गाढव लेकाचे . बघणारे हो !!

मला आस्तादची भुमिका जबरी सकारात्मक वाटते आहे.
इतके छान वागणे सिरियलमध्ये दाखवत नाहीत आताशा!

अपेक्षेप्रमाणे संग्रामाने मुलाचे पितृत्व स्वीकारले तर ती बावळट आई उमा पुन्हा त्या श्रीधर काळेच्या नादी लागली आहे आणि त्याच्या मोबाइलवरून स्वातीला व्हिडीओ कॉल करत आहे तेही दात विचकीत . खरोखर ती मनोरुग्ण आहे . अतिशय बावळट पात्रांची मालिका पाहात आहोत . उमाने स्वातीची पुरती वाट लावायची ठरवले आहे . केवळ सशक्त अभिनयाच्या जोरावर बघवते आहे. मामा टोळी पूर्वीच्या बाळबोध नाटकातल्या खलनायक टोळी प्रमाणे वागत आहेत आणि अभिनयही नाटकी करीत आहे. दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरने प्राईम टाईम चा बट्ट्याबोळ केला आहे

मी तर ही मालिका बघायची सोडून दिली. त्यापेक्षा YouTubeवर सोनीवरची ‘असं माहेर नको गं बाई’ बघायला सुरू केली आहे. छान हलकी-फुलकी आहे.

मला आस्तादची भुमिका जबरी सकारात्मक वाटते आहे.
इतके छान वागणे सिरियलमध्ये दाखवत नाहीत आताशा! >>>>>>>> अगदी अगदी. तो पहिल्या रात्रीचा सिन छान दाखवलेला. कधी नव्हे ते आस्ताद आवडायला लागलाय एक्टिन्ग वाईज.

ती बावळट आई उमा पुन्हा त्या श्रीधर काळेच्या नादी लागली आहे आणि त्याच्या मोबाइलवरून स्वातीला व्हिडीओ कॉल करत आहे तेही दात विचकीत . >>>>> नैतर काय. विस्मरणाचा आजार कैच्याके दाखवलाय.

काल स्वातीने श्रीधरला थोबाडीत लगावली.>>> अरे वाह! बघायला पाहिजे.
पण ती संग्रामला सगळं सांगून का टाकत नाही? उगाच भीती वाटते, याचा फोन आला, त्याने बोलावले, ह्याला भेटायचे आहे अस दाखवत सांगणे लांबणीवर पडलेले दाखवतात. दोघे एकाच घरात राहतात, घरही काही एका खोलीचे नाही त्यामुळे खाजगीत बोलायला काहीच अडचण नाही, दिवसभर घराबाहेर गेला तरी रात्री घरातच राहतो ना. पटकन सांगून टाकायचे ना.

काल स्वातीने श्रीधरला थोबाडीत लगावली.>>> अरे वाह! बघायला पाहिजे.>>> काही बघायला जाऊ नका.. अशक्य पांचट पणा चालू झालाय... काल संग्राम च्या फैक्ट्री मध्ये काहितरी अवजड मशीन वरुन पडते..खरच पडते की श्रीधर पाडतो हे नाही समजल..पण ज्या रितीने अशक्यप्राय गोष्टी चालू आहेत त्या रितीने श्रीधर नेच हे केल असणार ...आणि मग तो संग्राम ला मागे खेचुन वाचवतो..आता संग्राम आणि त्याचे कुटुंबीय श्रीधर उर्फ श्रीरंग चे फैन आणि ऋणी झालेत..त्यात आज श्रीधर आपला राजिनामा सादर करतो..कारण देतो की घराच भाड थकलय आणि म्हणुन तो बायको सोबत गावी शिफ्ट होतोय.. आता उद्या च्या भागाची झलक दाखवली त्यात ग्रेट संग्राम श्रीधर ला सपत्निक आपल्या घरात घेउन येतो...हा श्रीधर चाच प्लान असणार जेणेकरून स्वाती आणि बाळाच्या जवळ राहात येणार... आत्ता या क्षणापासून या मालिकेला राम राम...अजुन पर्यंत सवय आणि काही कलाकारांची ऐक्टिंग म्हणुन बघत होते.

पण ती संग्रामला सगळं सांगून का टाकत नाही? उगाच भीती वाटते, याचा फोन आला, त्याने बोलावले, ह्याला भेटायचे आहे अस दाखवत सांगणे लांबणीवर पडलेले दाखवतात>>> कोणतीही मुलगी जिचा नवरा एवढा विचारी आणि समजुतदार आहे ती लगेच सांगेल..पण हे खरं आयुष्य नाही मालिका आहे...आणि त्याना अजून 9 10 महीने तरी ती चालवायची आहे...मग स्वाती ने आत्ता सांगितल तर मालिका संपणार नाही का.... Proud

सध्या तर सुबोध भावे ला सुध्हा बघवत नाही..दाढीचे वाढलेले खुंट.. कपडेपट पण बराच ओंगळ ... त्याची जेवढी ऐक्टिंग स्किल दाखवायची होती..स्वाती ला न ओळखणे... तिला भर रस्त्यात लोकांसमोर खोटं पाडणे वगैरे वगैरे जे नाटकामध्ये शेवटी येत..ते सगळ करुन झालय....आत्ता हे काही नविन वळण मला तरी झेपत नाही..रोज रोज नविन नविन टेंशन आपल्या डोक्याला...त्या पेक्षा नकोच ते

श्रीधर नाव का बदलतो आणि तो आधीपासून जगतापच्या कारखान्यात कामाला असतो की स्वातीचे लग्न झाल्यावर तिथे नोकरी शोधतो. त्याच्याच कारखान्यात आणि नेमकं तो जिथे आहे तिथेच त्याचदिवशी हाही हजर हे एवढे योगायोग असतात का. संग्राम स्वातीपेक्षाही माठ आहे का. कोणी कोणाला असं पटकन घरी राहायला बोलावतं का.
रच्याकने, कलर्स मराठी अवॉर्ड मध्ये सुभा खूप बारीक दिसतोय. मालिकेत तो एवढा बारीक दिसत नाही. ऋतुजा सुंदर दिसतेय सॅटिन साडीमध्ये.

स्वाती ने आत्ता सांगितल तर मालिका संपणार नाही का.... >>> होना. आपल्याला पटकन जो लॉजिकल उपाय सुचतो तो या लोकांना करायचाच नसतो. सतत चुका करत रहायचे आणि प्रेक्षकांना मनस्ताप द्यायचा.

त्यात ग्रेट संग्राम श्रीधर ला सपत्निक आपल्या घरात घेउन येतो..>>> मग घरभाडे द्यायचे ना, डबल पगार द्यायचा. काहीही दाखवतात.

सन्ग्राम एवढा बावळटपणा करेल अस वाटल नव्हत. एरवी तो मीनाआत्या, परागची बायको, प्रिया, मामा सगळयान्ना पुरुन उरतो. मात्र श्रीधरपुढे नान्गी टाकतो. ह्यला ह्याचा प्रोफेशनल बॅकग्राउण्ड चेक करता येत नाही का, अस कोणालाही कामावर ठेवता येत?

ऋतुजा सुंदर दिसतेय सॅटिन साडीमध्ये. >>>>>>> पण तो ब्लाउज हॉरिबल होता. प्रियाचे ड्रेसेस मस्त असतात. फॉर अ चेन्ज, आज पिवळा ड्रेस घालून आली होती. नाहीतर नेहमी गुलाबी शेडसमध्येच असते.

कुमले मध्ये सन्जय मोने ची खरी बायको (मूल न होणारी ) मोलकरीण म्हणून त्याच्याच घरात बाळला साम्भाळत वावरत असते. म्हणजे त्या वळणावर आता कथा आली. श्रीधरची बायको स्वातीच्या घरात राहायला आली. आता ती बाळाला साम्भाळणार. ती दोघे बाळ क्लेम करणार . मामाची गॅण्ग स्वातीच्या विरोधात उभी रहणार. कुमलेच्या शेवटाप्रमाणे बाळासह सण्ग्राम स्वातीचा स्वीकार करणार . श्रीधरला पोलिस नेणार वगैरे वगैरे. आता पाहणे बन्द .. आता स्वाती व तिच्या आइबरोबर सन्ग्राम देखील बावळट वाटू लागला आहे

स्वातीची आयो , प्रिया आणि कंपनीला कधीही श्रीधर विषयी सांगू शकते
बिचारी स्वाती...
वाड्यात एकटं ठेवावं तरी प्रॉब्लेम
सासरी घेऊन यावं तरी प्रॉब्लेम

श्रीधर नाव का बदलतो आणि तो आधीपासून जगतापच्या कारखान्यात कामाला असतो की स्वातीचे लग्न झाल्यावर तिथे नोकरी शोधतो. त्याच्याच कारखान्यात आणि नेमकं तो जिथे आहे तिथेच त्याचदिवशी हाही हजर हे एवढे योगायोग असतात का.>>> तो आधी तुषार फर्मा नावाच्या कंपनीत कामाला असतो... नंतर संग्राम च्या फैक्ट्री मध्ये सुपरवायझर म्हणून कामाला लागतो..तेही नाव बदलून...श्रीरंग का काय...हे एवढं सोप्प आहे का..? जिथे तुम्हाला सगळी कायदेशीर कागदपत्र सादर करावी लागतात... मागच्या कंपनी मध्ये जरा पण background check केला नाही की काय... सगळच अद्भुत..!! संग्राम श्रीधर सोबतच सुपरवायझ करायला गेलेला असतो

या सिरीयल मध्ये चहा पाणी आणणारे नोकर वगळता ,२० पेक्षा जास्त आय क्यू असलेले एक तरी पात्र आहे का हो ?

श्रीरन्ग दगडे म्हणे. आडनाव तरी चान्गल घ्यायच होत.

स्वातीने पुन्हा बावळटपणा केला. श्रीधर कायमचा गावी निघून गेला ( अस तिला वाटत) म्हणजे तिला कुठलीच भीती राहिली नव्हती. सो, रात्री सन्ग्रामचा हेड मसाज करताना ती श्रीधरबद्दल सगळ सान्गू शकली असती की.

आजच्या म टातल्या बातमीनुसार ही मालिका निरोप घेणार असून कुठलीशी एक नवीन मालिका सुरु होणार आहे.कारण टीआरपीच दिल आहे.
पण सुभाच्या या सिरियलला सुरुवातीपासूनच टीआरपी नव्हता जेवढा तुला पाहते रे ला होता.मग अचानक हे कारण कस काय?.
पण प्रेक्षकांना वाटल की जीव झाला संपत आहे पण नाही ,ती चालू राहणार आहे.
कुणी बघत का चंद्र आहे साक्षीला, मी बघण कधीच सोडल.
संपण्याच्या वाटेवर आहे का की गुंडाळतील?

गुंडाळतील असच वाटतंय
काल प्रिया भांग(होळी स्पेशल भाग असायलाच हवा)प्यायल्याचं नाटक करून स्वातीला तीचं संग्राम वर किती प्रेम आहे हे सांगते, स्वातीला धक्का बसतो
रंग खेळायला संग्राम श्रीधर ला आग्रह करतो तर तो चिडून सुमन कडे जातो
सुमन रडत असते कारण काही वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी तिच्या मामाने आणलेले लाडू खाऊन तिचा गर्भपात झालेला असतो,म्हणून ते हा सण सेलिब्रेट करत नसतात
श्रीधर तिला आश्वासन देतो की ह्या वर्षी आपलं बाळ स्वाती च्या पोटात सुखरुप असलं तरी पुढच्या होळीला तुझ्या कुशीत असेल

संग्राम श्रीरंग ला विश्वासातील माणूस म्हणून श्रीधर काळेचा फोटो पहायचा आहे त्याचा माग काढ म्हणून सांगतो
श्रीधर दुसऱ्याच कुणा माणसाचा फोटो श्रीधर चा आहे म्हणून संग्राम ला दाखवतो आणि खात्री करायला स्वाती मॅडम ला दाखवून घ्या ,म्हणतो
पण नेहमीचचं लपवालपवी झालीच पाहिजे,त्या नुसार संग्राम गुपचूप कपाटात ठेवतो envelop ज्यात तो फोटो असतो

संग्राम ला श्रीमंत आदर्श पती म्हणून आणला तेव्हाच मालिकेत काही बघण्यासारखं राहीलं नव्हतं. बरं झालं बंद होणारे ते

Pages