चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. पण विक्रान्त स्वत: आत्महत्या करतो.>>> बाई तू अजून काही करू नकोस माझा मीच जातो म्हणून का? Proud

नन्ना कसला वकील, मूर्ख आहे नंबर एकचा. मागेही त्याच्या कंपनीत मूर्खासारखा गेला होता आणि लगेच पकडला गेला, आत्ताही फसवलं फसवलं म्हणून चकरा मारतोय पोलिसात. नीट बसून बोलतील आणि काही ठरवतील तर ते नाहीच. स्वातीच्या शेजारी राहून तोही माठ झालाय.
आस्ताद बहुतेक स्वातीचा वकील असेल, नाहीतरी पुणेरी श्रीधरला धडा शिकवायला पुणेरी वकीलच हवा Wink

पुरावा नाही म्हणून तक्रार नोंदवली नाही असे असते का? कोणत्या पोलीस चौकीत असे करतात? पुरावा शोधायचे काम त्यांचेच असते ना.

तसे असेल तर चांगले आहे नाहीतर परत फसवणूक झाली म्हणत रडायला नको. बघावे तेव्हा सुमन सारखी रडायची, अजुनही रडते. >>>>>> काही नाटक बिटक नव्हत. 'माझा विश्वास मला परत दे' म्हणत रडत होती. ती सुमन तर आता जास्तच 'बाळ, बाळ' करायला लागलीये. श्रीधर स्वातीला ' तुम्हाला सायकियाट्रिस्टची गरज आहे म्हणतो.' आधी स्वत:च्या बायकोला ने म्हणाव सायकियाट्रिस्टकडे.

नन्ना कसला वकील, मूर्ख आहे नंबर एकचा >>>>>> नैतर काय? आणि त्याने आणलेले पुरावे किती विक होते. मुमू काय, आणि ती शेजारीण काय.

हा नन्ना नक्की काय काम करतो? मागे म्हणाला होता की तो घोडयाच्या रेसची तिकिटे विकतो. आता तो वकील झालाय. Uhoh

आस्ताद बहुतेक स्वातीचा वकील असेल, >>>>>>> ती माधवी तिच्या नवर्याला भेटायला श्रीनगरला गेली. तो आर्मी मध्ये आहे. आस्ताद काळे तर नसेल ना तिचा नवरा?

बाई तू अजून काही करू नकोस माझा मीच जातो म्हणून का? >>>>>>>>> अगदी बरोबर. Lol

प्रिकॅप पाहिला. काय तरी भयानक शिजतय श्रीधरच्या मनात. स्वातीला किडनॅप केलय की काय त्याने? Uhoh

श्रीधर आणि सुमनने स्वातीला सगळ सान्गून टाकलय प्लॅनबाबतीत. स्वाती आत्महत्येचा प्रयत्न करते. नन्ना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आस्ताद काळेची एण्ट्री झालीये डॉक्टर म्हणून.

स्वाती जर गर्भवती झाली तर श्रीधरला ते मूल त्याचे आहे हे सिद्ध करावे लागेल. तसे केल्याने त्याने फसवल्याचेही सिद्ध होईल. पुढे स्वातीने मूलास जन्म दिला तरी ते मूल अंजनाला मिळू द्यायचे कि नाही ते स्वातीच्या हातात असेल. आता अंजना occasionally वेड्यासारखे वागते पण मूल मिळाले नाही तर ती ठार वेडी होऊ शकते. मग स्वातीला मार्ग मोकळा.

आता अंजना occasionally वेड्यासारखे वागते पण मूल मिळाले नाही तर ती ठार वेडी होऊ शकते. >>>>>>> अगदी अगदी चूक मुळात श्रीधरची आहे, त्याने तिच्या अपेक्षा वाढवायला नको होत्या. त्याने बाळाच वचनच दयायला नको होत तिला. बर, दत्तक घ्यायच तर तेही त्याला नकोय. त्याने एकाच वेळी तीन बायकान्ची आयुष्ये उद्ववस्त केली - सुमन, स्वाती आणि स्वातीची आई

मूल अंजनाला मिळू द्यायचे >>>>>>> हिच नक्की खर नाव काय आहे? सुमन की अन्जना? कारण श्रीधरने ते फक्त दोघेच घरात असताना तिला एकदा अन्जू म्हणून हाक मारली.

पण स्वातीला आता सगळे कळल्यावर ती ह्यांना मूल का देईल. हा आत्मविश्वास कुठून आला श्रीधरमध्ये. आत्या स्वातीला घराबाहेर हाकलून देते. स्वातीला जराही कायदा कळत नाही का.

नन्ना सध्या लव्हेबल काम करतोय. तो आस्ताद कित्ती बडबड करतो. मानबामधल्या रेवतीचा नवरा झालेला इथे आस्तादचा मोठा भाऊ आहे.

स्वातीला जराही कायदा कळत नाही का. >>>>>> ती घर त्यान्च्या नावावर करणार होती त्याच काय झाल? लग्न, सत्यनारायणची पुजा, पहिल्या बायकोचा रहस्यस्फोट ह्या सगळया धबडग्यात विसरुन गेली वाटत.

सध्या सगळ्यात जास्त भाव खाऊन जातोय तो संग्राम जगताप झालेला आस्ताद... मिना आत्यासोबत काय वागलाय..भारीच ऐक्टिंग केलिये ..आजच्या आणि कालच्या भागात... कदाचित पुणेरी असल्यामूळे त्याला तो आत्याला शालजोडीत धमकावणे जास्त चांगले जमले असेल:) पण छा गया

आस्तादला फक्तं बिबॉ मधे पाहिल होतं, पहिल्यांदा अ‍ॅक्टिंग करताना पाहिलं, छान आहे त्याचं कॅरॅक्टर आणि स्क्रीन प्रेझेन्स !
श्री, नन्ना , स्वाती, तिची आई या सगळ्या पकाउ लोकांमधे एकदम कोण्या स्टारची एंट्री झाल्याचा फिल आला.
मुळ नाटकातल्या भाच्या खोटे सारखं हे कॅरॅक्टर असेल असा अंदाज होता पण आस्ताद पूर्णपणे पॉझिटिव कॅरॅक्टर आहे चक्क!
मला ती पूर्णिमा रायकर झालेल्या बाईचं अ‍ॅक्टिंग पण आवडतं, त्रिभंग मधे छोटासा रोल होता तिला, बुलिंग करणार्या टिचरचा.
बाकी डंब स्वातीला काय एकदम ४ हिरो का Uhoh
श्री, नन्ना, आस्ताद आणि त्याचा भाऊ ?

आस्ताद असंभव मधे आवडला होता. तेव्हा खूपच यंग होता तो. एखादा एपिसोड बघावा की काय या मालिकेचा त्याच्यासाठी? Proud

मालिकेला मात्र माझा पास. श्रीधरला पसंत करण्याची स्वातीची मजबूरी काय आहे हेच समजलं नाहीये मला. आताच्या काळात कुमले घडताना दाखवायची असेल तर निदान आताच्या काळाशी सुसंगत आणि पटतील असे बदल पाहिजेत कथेत. एक-दोन एपिसोड पाहिले होते याचे त्यात तरी तसं काही वाटलं नाही.

एग्झॅक्ट्ली, आता रिलेट होत नाही ही फसवणूक , मुल पळवणे क्राइमच इतके प्रचंड लुपहोल्स असलेल प्लॅनिंग वगैरे !
ती हिरॉइन , तिची आई यांचं मुलीच्या लग्नासाठी इतकं डेस्परेट असणं सुद्धा !

एग्झॅक्ट्ली, आता रिलेट होत नाही ही फसवणूक , मुल पळवणे क्राइमच इतके प्रचंड लुपहोल्स असलेल प्लॅनिंग वगैरे !
ती हिरॉइन , तिची आई यांचं मुलीच्या लग्नासाठी इतकं डेस्परेट असणं सुद्धा ! >>> प्रचंड सहमत

मालिकेत श्रीमंत हिरो ची एन्ट्री झाली वाटतं एकदाची तारणहार म्हणून. ओरिजिनल कुमले सारखं कुठले हे दाखवायला...

आस्ताद काळे ज्या पध्दतीने आत्याला हाकलवतो, त्यावरून कुमले मधला भाच्या खोटे हाच अस मानून जायला हरकत नाही.
पण सुभाचा प्रेझेन्स अचानक इतका कमी कसा झाला आणि आश्चर्य म्हणजे जिथे सुभा असतो,तिथे सबकुछ तोच असतो, अस असताना काळेला एकदम महत्वाचा रोल,कळत नाही.की सुभाला मोठं प्रोजेक्ट मिळाल आहे,त्यात बिझी झाला आहे?

बाकी डंब स्वातीला काय एकदम ४ हिरो का >>> Lol ही कमेंट भारी आहे.

ही सिरीयल बघत नाही पण आस्ताद काळे acting सुपर्ब करतो. असंभव, अग्निहोत्र तसेच माझे मन तुझे झालेमध्ये पण काही दिवसांसाठी होता. तेव्हा ह्या सर्वांत अभिनय आवडला होता. मला तो बिग बॉसमध्ये मात्र अजिबात आवडला नव्हता.

संग्राम जगतापला काही कामं नसतात का. आज तर फक्त बँडेज बदलायचंय म्हणून गाडी घेऊन आला. स्वाती कॉलेजात असल्यापासून कशी बावळट (त्याच्या मते प्रामाणिक) होती ते तो भावाला सांगत होता. भाउही लगेच त्याला स्वातीच्या नावाने चिडवायला लागला लाईक सिरीयसली Uhoh स्वातीने कॉलेजात असताना मुलांकडे ढुंकून बघितले नाही म्हणून आता ती श्रीधरसोबत लग्न करायला उतावीळ झाली होती का. स्वातीचा पडेल चेहरा आणि ती रडकी सुमन बघून कंटाळा आला होता त्यात आस्ताद थोडा रिलीफ आहे.

स्वातीचा पडेल चेहरा आणि ती रडकी सुमन बघून कंटाळा आला होता त्यात आस्ताद थोडा रिलीफ आहे.>> अगदी अगदी...इवन श्रीधर काळे चा , आत्याचा पण कंटाळा आलाय आता..उगीच पाणी घालून घालून चोथा केलाय...

आस्ताद आवडला. तो आल्यापासुन जरा इन्टरेस्ट आलाय.

आधी कधी पाहीला नव्हता त्याला. बिबॉ मध्ये होता म्हणून मत फारस बर नव्हत Proud पण इथे काम चांगलं करतोय

स्वातीचा पडेल चेहरा आणि ती रडकी सुमन बघून कंटाळा आला होता त्यात आस्ताद थोडा रिलीफ आहे.>> अगदी अगदी...इवन श्रीधर काळे चा , आत्याचा पण कंटाळा आलाय आता >>> अगदी. ती सुमन तर दुखाने रडते अस वाटतच नाही. पोट दुखत म्हणून रडते अस वाटत.

आस्ताद काळे acting सुपर्ब करतो. >>>>>> _++++++११११११

सुभाचा प्रेझेन्स अचानक इतका कमी कसा झाला >>>>>>> सुभा अमोल पालेकरच नाटक करतोय अस वाचल होत. मार्चमध्ये येतय. त्याच्या तालमीमध्ये बिझी असेल.

आज सुमनने नवर्याची जागा घेतली व्हिलनगिरीच्या बाबतीत. नेहमीच रडगाण विसरुन कामाला लागली हे विशेष.

नको त्या चौकश्या करणारा कितीही तत पप करत असला तरी समोरच्याला कधीही संशय येत नाही हे विशेष. श्रीधर आणि सुमन कितीवेळा स्वातीपुढे बोलताना अडखळायचे पण तिलाच काय त्या माधवीलाही कधी संशय आला नाही.
स्वातीचं आयो फार विचित्र वाटतं ऐकायला. संग्रामला बहुतेक त्या विद्यार्थ्यांचा संशय आलाय. आता त्याला हाताशी धरून तो श्रीधरची माहिती काढेल.

सन्ग्रामच हाय क्लास स्टेटस आणि त्याचा स्वभाव बघता श्रीधरच त्याच्यापुढे काहीही चालणार नाही. ती आत्या सन्ग्रामने एवढया धमक्या देऊनही का घुटमळतेय टेम्भेवाडयात?

होना. मला वाटले होते आत्याचे प्रकरण संपले पण ती अजून पाहिजे तेव्हढी घाबरली नाही आहे.
आयोचा श्री चॅनल कधी पण चालू होतो. तिचा गजनी होत चालला आहे. जगताप दवाखाण्यात उपचार करावेत किंवा हातावर ‘श्रीधर काळे फसवा आहे’ असे तरी गोंदवावे.

हातावर गोंदवावे Proud संग्राम स्वातीला लग्न करशील का माझ्याशी असं विचारणार आहे ते झालं का. तूनळीवर बघितला मी काल विडिओ.

Pages