चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती प्रेमाला आसुसलेली असते म्हणून कदाचित तिला श्रीधरचं अति गोड बोलणं संशायस्पद वाटत नाही. परत कविता वगैरे वाचतो तर त्या अर्थाने तिच्या टाईपचा असतो.
काल श्रीधर पोलीस स्टेशनचं नाव काढल्यावर चिडला तर मला वाटलं त्यानेच स्वातीच्या आईला लपवून ठेवलेले की काय. तो नवनाथ सांगतो की मी शोधलं आणि उदास होऊन निघून जातो त्याचा अर्थ काय. कदाचित श्रीधरचं तिथे येणं त्याला पसंत नसावं.
स्वाती पहिल्या बायकोबद्दल काहीच तपास करत नाही, ती मुमु तिचा प्रोफाइल शोधत असते आणि ही बया नेलपेंट लावून त्याला भेटायला जाते. डिक्रि मिळायच्या आधी पहिली बायको नंबर बदलते आणि याला सांगत नाही यात तिला काहीच संशयास्पद वाटत नाही.

प्रेमाला वयाच बन्धन नसतं पण वयोपरात्वे प्रेम व्यक्त करण्याची रित बदलते)ते ही माहीत असतना की तो हे सहेतूक करतो आहे.. >> सहेतुकच करत असावा.
त्याचं स्वाती वर प्रेम नसतंच ना मुळी?

श्रीधर स्वातीला त्याच्या बहिणीला भेटायला घेऊन जातो ती नक्की त्याची बहिणचं असते ना? >>> हे कधी दाखवलं?

मोबाईल का ठेवत नाही याचे कारण आज कळले, तिच्याशी संपर्क झाल्याचा कुठलाही पुरावा त्याला ठेवायचा नाही. तिच्याशी तिच्याच सिम कार्ड वरून बोलला तरी कॉल रेकॉर्डिंग होईलच ना की कॉल रेकॉर्ड होत नाहीत? फक्त घेतलेले आणि केलेले नंबर मिळतात पोलिसांना. बहिणीच्या कुटुंबाबद्दल काय सांगितले त्याने, घर बदलायचं आहे तिला एव्हडंच का अजून काही.

स्पृहा आहे असं youtube वर पण बघितलं मी कुठेतरी.

कु म ले त खरी बायको बाळाला सांभाळायला, घरकाम करायला असते असं दाखवलं आहे ना. मग तिची एन्ट्री नंतर असेल. मी नाटक नाही बघितलं पण पूर्वी दूरदर्शनवर नवीन नाटकाचे shots दाखवायचे, ते बघितले होते. सिरीयल पण नाही बघत.

ती नक्षत्रा मेढेकर आहे बहिण झालेली. स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' मध्ये सानिका झाली होती. श्रीधरने खोटी बहिण उभी केलेली असते. नवीन प्रोमोमध्ये दाखवलय हे.

हो का. ती अभिनय चांगला करेल. ती आधी ई tv वर युगंधरा वरून सिरीयल होती त्यात होती, तेव्हा एक दोन भाग बघीतलेले, तिचा अभिनय आवडलेला, विकास पाटील हिरो होता. ती सिरीयल लवकर संपली आणि नंतर दोघांना स्टार प्रवाहची सिरीयल मिळाली, त्यात नक्षत्रा व्हिलन होती, अगदी उलट रोल पण तिथेही तिने नायिकेपेक्षा छान अभिनय केलेला. गोठ बघताना लेक माझी लाडकीचा शेवटचा काही मिनिटांचा भाग बघायचे (का ही गोठ नंतर होती, तसं असेल तर सुरुवात बघायचे, आठवत नाहीये आता) . मग गोठ सोडली बघायची मग हि ही सोडली, ती नायिका बोअर होती लेक ची.

आज श्री ने बहीण म्हणून बायकोलाच उभे केले होते ना? >>>>> हो. पण पटल नाही हे. बायकोला सख्खी बहिण म्हणून उभी करणे विचित्र वाटल. सख्खया बहिण भावाच्या नात्याचा अपमान आहे हा. निदान आत्येबहीण तरी दाखवायची ना तिला. किव्वा तिला पौर्णिमा म्हणून तरी दाखवायची.

पण नक्षत्रा 'आई होण्यासाठी आसुसलेली सुमन' वाटत नाही कुठल्याही एन्गलने. श्रीधर ज्याप्रकारे आतापर्यन्त तिच्याशी बोलत होता (जेव्हा तिचा चेहरा दाखवत नव्हते. ) त्यावरुन ती ' डिप्रेस्ड' वाटत होती. तिचा वावर गुढ वाटत होता. इथे स्पृहा जोशीच हवी होती. 'देवा' आणि ' विकी वेलिन्गकर' चित्रपटाच्या प्रोमोजमध्ये ती बर्यापैकी गुढ वाटत होती. ती हा रोल चान्गला करु शकली असती. नक्षत्रा मात्र टिपिकल डेलि सोप व्हॅम्प करेल. एण्ट्रीलाच तिने झलक दाखवली बन्दुक दाखवून.

तसही खर्या सुमनची एण्ट्री उशिरा व्ह्याला हवी होती. सस्पेन्स टिकवायला हवा होता लग्नापर्यन्त.

आधी ई tv वर युगंधरा वरून सिरीयल होती त्यात होती, तेव्हा एक दोन भाग बघीतलेले, तिचा अभिनय आवडलेला >>>>>>>> मीसुद्दा बघितलीय हि सिरियल. छान सिरियल होती. लेक माझी लाडकीही बघितली. पण नन्तर कण्टाळा आला, सोडून दिली.

ओहह स्पृहा नाहीच का, नक्षत्राच सुमन का.

दोन्ही नायिका खूप लहान वाटत असतील, सु भा पुढे.

स्वाती फार नाही पण सुमन फारच लहान वाटते श्रीधरपुढे. त्याची लहान बहीण म्हणूनही लहानच वाटते अगदीच पंधरा वर्षांनी झालेली. सगळ्यांना सगळी गोष्ट माहितीये हे गृहीत धरूनच गोष्ट उलगडताहेत. नाटक बघितलत आता मालिका बघा असा अविर्भाव आहे. ती कोण नवीन चुलत बहीण आलीये, अति होतंय आता. एवढं करूनही स्वाती लग्न करेलच, नाहीतर गोष्ट कशी पुढे जाणार. ती चुलत बहीण आणि नवनाथ फक्त तो चांगला माणूस नाही एवढच सांगतात, नक्की काय खटकतंय किंवा ह्या ह्या गोष्टी तपासून बघ असं स्पष्ट का नाही सांगत.

स्वाती फार नाही पण सुमन फारच लहान वाटते श्रीधरपुढे.>> actually .. मध्यमवयीन हवी होती कोणी..casting चुकलय इथे..बहिण वाटायला आणि तिचा नवरा दुबई ला असतो हे सिद्ध करण्यासाठी स्वाती आल्यावर लगेच त्याचा विडियो कॉल ही येतो..

मी रोज थोडीफार बघते,fb वर मधेच2 3 मिनिटे दाखवतात तितकीच, पण आज पूर्ण पाहिलं
मला वाटतंय यामध्ये शेवट कुमले सारखा करणार नाहीत उलट स्वातीला आधीच अंदाज आल्यामुळे ती ऐनवेळी वेगळी वागली असं काहीतरी दाखवतील,तसं नसेल तर मात्र संत्र अगदी सोलून ठेवलं आहे आधीच असं होईल

मला वाटतंय यामध्ये शेवट कुमले सारखा करणार नाहीत उलट स्वातीला आधीच अंदाज आल्यामुळे ती ऐनवेळी वेगळी वागली असं काहीतरी दाखवतील>>> +१ आणि आताच्या काळात तिचे मूल तिचे नाही असे सिद्ध करणे अवघड आहे.
तसा तो किती लोकांना थापा मारायला विकत घेणार, किती लोकांना गप्प रहायचे पैसे देणार? त्यापेका IVF किंवा सरोगसी स्वस्त पडेल त्याला.
तुळशीच्या लग्नात तिथले सगळे लोक त्याला बघतील म्हणून तो तिच्याच घरात लपून राहतो. पण वाड्याच्या एकाच दारातून ये-जा करतो, तिची वाट बघत समोरच्याच पारावर बसून असतो, रोज घरी येतो हे सगळ्यांना दिसत असणारच ना.

तसं नसेल तर मात्र संत्र अगदी सोलून ठेवलं आहे आधीच असं होईल>>> हो आणि सुभाला (सगळं त्यालाच करायचं असतं) मी किती छान (ओव्हर) ॲक्टींग करतो ते मिरवायला मिळेल.

मला अस वाटतय की श्रीधर पस्तिशीचा दाखवला असेल, सुमन १० वर्षाने लहान म्हणजे २५ शी. स्वाती तिशीची दाखवलीये.

आताच्या काळात तिचे मूल तिचे नाही असे सिद्ध करणे अवघड आहे. >>>>> डिएनए पेपर्स खोटे ठरवणे हा नेहमीचा ड्रामा असेलच.

कुमलेमध्ये सुकन्याची फसवणूक होते तेव्हा ती वेडी होते असे दाखवलेय. सिरियलमध्ये मला खरी सुमनच वेडी वाटते.

स्वाती गेल्यावर सुमन त्याला मिठी मारून रडत असते तेव्हा तिच्या डोळ्यात पाण्याचं टिपूसंही नसतं. सुभा स्वातीचा नवरा म्हणून मुद्दाम ओव्हर करतोय. दोन वेगळे नवरे अधोरेखित करायला.

ती सुमन सारखी रडत असते. स्वाती घरी आली कि हिचा चेहरा पडतो, जरा जवळ बसली कि ही लागते ढसाढसा रडायला. लग्न तरी होऊ देणारे का ती?
कसं होणार बाळ?

श्रीधर आणि सुमनच्या चेहऱ्यावरचे भाव एवढ्या पटापट बदलतात, ते एकमेकांना खाणाखुणा करतात, नाराजी तर त्यांना लपवताच येत नाही, हे सगळं फक्त आपल्याला दिसतं का, स्वातीला काहीच दिसत नाही Uhoh लग्नाच्या वादिवसालाही श्रीधर सुमनसाठी दोन्ही हात पसरतो तर तिकडे कानाडोळा करून स्वाती त्याला चिकटते. श्रीधरला स्वाती बावळट वाटते ती याचसाठी. आता ती आत्या किती दिवस राहणार, पाणी ओतायची सुरुवात झालेली आहे.

ती सुमन सारखी रडत असते. स्वाती घरी आली कि हिचा चेहरा पडतो, जरा जवळ बसली कि ही लागते ढसाढसा रडायला. लग्न तरी होऊ देणारे का ती? >>>>>> नैतर काय. तिलाच बाळ हवय ना, मग भोग आता.

श्रीधरला स्वाती बावळट वाटते ती याचसाठी. >>>>>> काही बावळट बिवळट नाहीये ती. बरीच बोल्ड आहे. श्रीधर स्वत:ला तिच्यासमोर बावळट दाखवतो, त्यामुळे तिच त्याचा हात धरते प्रत्येकवेळी. त्यादिवशी मोनोपॉली खेळताना टेबलाखालून त्याचा उजवा हात पकडून ठेवला. काल माधवीला लागेलस बोलली ती.

आता ती आत्या किती दिवस राहणार, पाणी ओतायची सुरुवात झालेली आहे. >>>>>> हो ना. आता ती कायमची राहणार आहे म्हणे. स्वत:च्या मुलाशी- सुनेशी भाण्डून आलीये.

तो किर्तनाचा सिन छान होता.

सुभाला वेळ आहे तोपर्यंत खेचतील, एकदा का त्याला दुसरं काम मिळालं की चार दिवसात गुंडाळतील.
ढोमे तर कधीचाच गायब झालाय.

हो ना.. आपल्या सोयीनुसार कथा विस्तार चालू आहे... ती पोर्णिमा झालेली अभिनेत्री चांगल काम करते... मुळातच पुणेरी असणार.. Lol
श्रीधर आणि सुमन ची दुखभरी दास्तान सांगून त्याला अँटी हीरो बनवला आहे..म्हणजे सध्या सहानभूति श्रीधर सुमन ला मिळतेय...

Pages