चंद्र आहे साक्षीला

Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00

कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात

Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंतर चप्पल घालून बाहेर जात होती तर मला वाटलं संग्रामची माफी मागायला जातेय, उद्धटपणे बोलली म्हणून तर कसचं काय. पण तो तिचा पाठलाग करत असल्यासारखा मंदिरातही पोहोचला. नना परत गायब झालाय. श्रीधर असा काय बोलत असतो मी आहे ना तुला वगैरे.

उद्याच्या भागात, शेजारीण माधवी , स्वाती-संग्राम च्या लग्नाची गोड बातमी स्वाती च्या आईला सांगणार आहे..
फारच घाई करताहेत की काय सिरीयल गुंडाळायची.?

श्रीधर सुमन चा हेतू कळल्यावर सुद्धा जर स्वाती प्रेग्नेंट राहिली तर तिच्या सारखी तिच.. माझं मुल माझं मुल असा जप करत प्रेग्नेन्सी ठेवेलही... bdw title song,title चा कथानकाशी कसा संबंध आहे??

स्वाती संग्रामला हो म्हणाली का. दुपारी एक वाजता बघायचे मी पण आता एक वाजता सुंदरा दाखवतात, हे किती वाजता रिपीट लावतात काही माहिती नाही. सकाळी साडे दहाला गडबड असते कामाची, तेव्हाही दाखवतात की तीही वेळ बदलली काय माहित.
श्रीधरच्या फसवणूकीला फक्त चंद्र साक्षीदार आहे असा शीर्षक गीताचा अर्थ आहे असं मला वाटतं. चंद्र काही कुठे साक्ष द्यायला जाऊ शकत नाही त्यामुळे श्रीधर सहिसलामत सुटणार.

श्रीधरच्या फसवणूकीला फक्त चंद्र साक्षीदार आहे असा शीर्षक गीताचा अर्थ आहे असं मला वाटतं. चंद्र काही कुठे साक्ष द्यायला जाऊ शकत नाही त्यामुळे श्रीधर सहिसलामत सुटणार>> हम्म... बरोबर बोललात

हो ना.. काय बकवास ... मला वाटत दिग्दर्शकाला ही आता काय दाखवायच कळत नाहीये..सुबोध भावे तर गायबच झालाय... पुर्ण गोष्टच बदलली.. आता काय आस्ताद काळे ची पुर्ण फैमिली च काय
. त्यात खाष्ट वहिनी, तिचे त्यांच्याच घरी राहणारे संधी साधू वाटणारे वडिल, london वरुन त्यांची येणारी दूसरी मुलगी.म्हणजे वहिनी च्या मनात असणार आपल्या बहिणी चे लग्न आस्ताद सोबत व्हावे... फुल टू ड्रामा करुन टाकला आहे... एक च serial जरा आशा लावुन बघत होते..ती ही बकवास करुन टाकणार असं दिसतय

अगदी,कालचा एपी फारच बकवास
सगळं फार नाटकी वाटत होतं.. कुठे नेवून ठेवलिय गोष्ट..? असं पूर्ण अर्धा तास वाटत होतं

आता टिपिकल मूव्ह येणार.. त्या लंडन च्या प्रिया ला आस्ताद शी लग्न करायचं असणार .. मग मामा, प्रिया आणि वाहिनी तिघे मिळून .. स्वाती विरुद्ध कट कारस्थान करणार..

मधेच कधीतरी सुबोध भावे ला वेळ असेल तर.. तो मधेच येऊन स्वातीला धमकी देऊन जाईल.. सगळयांचे आपले बरे चाललय वेळेनुसार स्टोरी आणि रोल ऍडजस्ट करायचे..

कुमले कथेचे तीन तेरा वाजवले का. मूळ ट्रॅकचे काय झाले. श्रीधरला तिच्याकडून मूल हवे होते त्याचे काय झाले पुढे.

ऑप्शन मिळेल या सिरियलला कारण झीम म्हणे मार्च महिन्यात दर आठवड्याला एक सिरियल आणणार आहे अस रविवारच्या लोकसत्तेत आल होत.सुरुवात केतकरांच्या शशांकच्या मालिकेने होत आहे ज्यामध्ये तो ग्रे शेडमध्ये आहे.
मग नंतर बहुतेक अग्गबाईचा नंबर लागेल,म्हणजे 8.30ला नवीन मालिका येईल.

ऑप्शन मिळेल या सिरियलला कारण झीम म्हणे मार्च महिन्यात दर आठवड्याला एक सिरियल आणणार आहे>> zee च्या serial वर तर अजिबात भरवसा राहिलेला नाही...तेच तेच प्रेम, लग्न, सासू,सून यात अडकलेल्या मालिका विथ तगडी starcast

श्रीधर सुमन ला सतत माझ्यावर विश्वास आहे ना,मी तुला बाळ देईन, म्हणत असतो.. कसे ते त्यालाच माहीत.!
स्वाती प्रेग्नंट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी 'श्री' , ट्यूशन ला म्हणून एक मुलगा पाठवतो,तर ती सुमन भर चौकात त्याच्याशी बोलत उभी राहते.. मग काय, वाड्यातली 'मुमु' (विवाह मंडळ वाल्या बाईची मुलगी) ते पाहते अन सांगते स्वातीला.. बिचाऱ्या श्री चा तोही रस्ता बंद झाला

स्वामीनी मधल्या आनंदीबाई आल्या लंडन हुन प्रिया म्हणून.. ड्रेस तेवढा मॉडर्न,बोलण्यात तो ऍटिट्युड आजच्या भागात तरी नव्हता

आस्ताद आला म्हणून १-२ एपिसोड्स बरे वाटके पण अर्ररर.. कुठे तो भाच्या खोटे आणि कुठे हा संग्राम !
अगदीच टिपिकल वळण, मुल पळवण्याच्या क्राइमस्टोरीचा आत्माच हरवलाय, आस्ताद आला तो त्याचं पकाऊ कुटुंब घेऊन !
स्वातीचं जीवन आता सासरचा छळ टाइप होणार.. श्रीच्या मुलाला स्वतःचं नाव देणारा आस्ताद त्यागमूर्ति, टिपिकल खाष्ट वहिनी , बावळट हलक्या कानाची सासू, लुबाडणारा शकुनी मामा, मामाची अजुन एक मुलगी जिचा डोळा आस्तादवर, बायकोच्या कटक्टीने वैतागलेला मोठा दिर असे १८ व्या शतकातलं कुटुंब !
आय गिव्हप ऑलरेडी !

zee च्या serial वर तर अजिबात भरवसा राहिलेला नाही >>> अगदीच.

त्यातल्या त्यात सुर नवाची जाहिरात बघुन जरा बरे वाटले Happy

पुढच्या भागात म्हणून , आस्ताद च्या घरातील एकसष्टी पार्टिला आलेली स्वाती एकदम विंचू चावल्यासारखि मी येते म्हणत निघून येते आणि आयो उर्फ उमाला डोक्यावर परिणाम झाल्यासारखी ओरडत अगं तिथं मला श्री दिसला असे पळत येऊन सांगते. म्हणजे आता नवीन लांबवलेली काहीतरी भानगड ..

स्वातीच्या आईला मानसोपचारतज्ञांकडे का घेउन जात नाहीत?? सतत डोळे वटारुन वटारुन सगळं विसरत असते

मग चांगले आणी वेगवेगळे ड्रेसेस कसे घालते ती. अन् पुजेतही छान पैठणी नेसली होती जी तुळशी विवाहाच्या दिवशीही नेसली होती तिने

सुरवातीच्या काही भागात दाखवलं होता संवाद,माय-लेकीतला डॉक्टर वगैरे चा,आई म्हणते नको पैसे खर्च करू माझ्या म्हातारीवर,तुझ्या लग्नासाठी ठेवायला हवेत
ती स्वाती पगार झाला की तिच्या वडिलांच्या आजारपणात कुठूनसे पैसे घेतलेले असतात त्यांचे दर महिन्याला फेडत असते, tv फ़ंड म्हणून जमा करत असते नवीन tv आईला घेऊन देण्यासाठी, पण मध्येच श्रीधर मोबाईल वापरत नाही म्हटल्यावर त्या पैश्याने त्याला मोबाईल घेऊन देते.

सोनी मराठीवर एक नवीन मालिका चालू होत आहे त्यातली लीड शशांक केतकरची बहीण आहे.तिने याआधी काही भारतीय फिल्म्समध्ये काम केलेल आहे.प्रोमो मध्ये प्रॉमिसिंग वाटली खरी.आता प्रत्यक्ष मालिका सुरू झाल्यावर कळेल.

Pages