Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थोडा दम खावा काय !
थोडा दम खावा काय !
उद्या भाप्रवे ११ ला देतो . एक परिच्छेद
ठीक.
ठीक.
एकदम वेगळेच शब्द सारे...
एकदम वेगळेच शब्द सारे...
वडस ऐकलाच नाही कधी; मंबरेज टाच मारण्याशी संबंधित होता, मी लगामाला जोडलेले टोचायचे बघितले...
छान होते, देवकी; देत जा असेच.
या खेळासाठी मी एक परिच्छेद
या खेळासाठी मी एक परिच्छेद निवडला आहे. हा मजकूर भ्रष्टाचारासंबंधी आहे. त्यातील काही शब्द पुसून तिथे कंसात अंक घातले आहेत. अंक = पुसलेल्या शब्दाची अक्षरसंख्या. उदा. (१), (३).
तुम्ही सर्व पुसलेले पूर्ण शब्द ओळखायचे. नंतर सर्व परिच्छेद अर्थपूर्ण झाला पाहिजे.
आपण ४ तास वेळ घेऊ. उत्तराची वेळ झाली की मगच आपापला परिच्छेद डकवा. असे करताना आधीचे प्रतिसाद वाचू नका !
सर्वात शेवटी मी मूळ परिच्छेद डकवेन. मग आपण तुलना करू. तुम्ही हुबेहूब बरोबर यावे अशी बिलकूल अपेक्षा नाही. उलट उत्तरांतील विविधतेची मजा लुटूयात !
………………………………………………………………..
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला एक पूर्वी वाचलेली (२) आठवते.
एका राजेशाहीत भ्रष्टाचार प्रचंड (५) असतो. तिथला नवा राजा तो नष्ट करण्याचा (३) करतो. तो एका नवीन कार्यक्षम प्रधानाची नेमणूक करतो. त्याला खूप अधिकार देतो आणि वर्षात इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे (३) सांगतो. प्रधान सूत्रे हाती घेताच सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना (२) देऊन नवीन अधिकारी नेमतो. कारभार सुरू होतो. सहा महिन्यात प्रधान राजाला सांगतो, “महाराज, आता उद्यापासून आपल्या येथे (४) व्हायची शक्यता संपली”. राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व (४) अधिकारी सापडले का?”
प्रधान (४) उत्तरतो, “नाही महाराज, नवे अधिकारी इतके (२) निघाले, की त्यांनी राज्याच्या (५) सर्व पैसा संपवून टाकला आहे. आता (४) पैसेच (३) नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार करणार तरी कसा?”
(७) काही लोक अगदी (६) बोलत असतात. पण भ्रष्टाचार कधी संपेल याचे खरे उत्तर वरील राजाच्या (७) आहे.
(४) अधिकारी ही भ्रष्टाचाराची एक बाजू आहे. परंतु (५) सज्जन समजला जाणारा (५) वर्ग सुद्धा, ‘लाच देणे यात काही (२) नाही, काम झाल्याशी (४)’, अशा (५) येऊन ठेपला आहे. (७) बडबड करणारे खूप असतात, परंतु पूर्णपणे (८) जगणारा सध्या एक तरी (३) असेल का ? नाही, असे मला (६) वाटते. भ्रष्टाचाराविरुद्ध एरवी (५) बोलणारे अनेक नामवंत त्यांच्या (५) कामाचा अंशतः मोबदला तरी (७) रोख रकमेत मागतात !
(५) चालणारा सज्जन मध्यमवर्गीय सुद्धा फर्निचर खरेदी करताना दुकानदाराला (५) विचारतो, “मग, मला (३) नको असेल तर किती पैसे कमी होतील ?”
हे सर्व पाहता मला असे वाटते, की (२) भ्रष्टाचार ही एक (६) राहील. भ्रष्टाचार किमान (५) आणणे ही मात्र आपल्या सर्वांची (५) आहे.
…………………………………………………
जे सोडवत असतील त्यांनी
जे सोडवत असतील त्यांनी उपस्थिती नोंदवावी
मी आहे
मी आहे
मी पण
मी पण
मी आहे खेळात
मी आहे खेळात
वा ! सर्वांचे स्वागत
वा !
सर्वांचे स्वागत
Mi pan..
Mi pan..
मी पण
मी पण
अजून १५ मिनिटांनंतर उत्तरे
अजून १५ मिनिटांनंतर उत्तरे लिहू शकता.
त्यानंतर उशीरा आल्यास आधीची न पाहता तुमची सादर करा.
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला एक पूर्वी वाचलेली गोष्ट / कथा आठवते.
एका राजेशाहीत भ्रष्टाचार प्रचंड पसरलेला असतो. तिथला नवा राजा तो नष्ट करण्याचा निर्धार करतो. तो एका नवीन कार्यक्षम प्रधानाची नेमणूक करतो. त्याला खूप अधिकार देतो आणि वर्षात इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे निक्षून सांगतो. प्रधान सूत्रे हाती घेताच सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना डच्चू देऊन नवीन अधिकारी नेमतो. कारभार सुरू होतो. सहा महिन्यात प्रधान राजाला सांगतो, “महाराज, आता उद्यापासून आपल्या येथे भ्रष्टाचार व्हायची शक्यता संपली”. राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व भ्रष्टाचारी अधिकारी सापडले का?”
प्रधान लगेचच उत्तरतो, “नाही महाराज, नवे अधिकारी इतके भ्रष्ट निघाले, की त्यांनी राज्याच्या तिजोरीतील सर्व पैसा संपवून टाकला आहे. आता तिजोरीत पैसेच शिल्लक नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार करणार तरी कसा?”
दूरदर्शनवर काही लोक अगदी मानभावीपणे / पोटतिडकीने बोलत असतात. पण भ्रष्टाचार कधी संपेल याचे खरे उत्तर वरील राजाच्या (७) आहे.
लाचखोर अधिकारी ही भ्रष्टाचाराची एक बाजू आहे. परंतु सर्वानुमते सज्जन समजला जाणारा उच्चमध्यम वर्ग सुद्धा, ‘लाच देणे यात काही गैर नाही, काम झाल्याशी मतलब ,अशा निर्णयाप्रत येऊन ठेपला आहे. भ्रष्टाचारविरोधी बडबड करणारे खूप असतात, परंतु पूर्णपणे भ्रष्टाचार विरहीत जगणारा सध्या एक तरी माणूस असेल का ? नाही, असे मला खात्रीशीरपणे वाटते. भ्रष्टाचाराविरुद्ध एरवी खरमरीत बोलणारे अनेक नामवंत त्यांच्या कार्यलयीन कामाचा अंशतः मोबदला तरी (७) रोख रकमेत मागतात !
नाकासमोर चालणारा सज्जन मध्यमवर्गीय सुद्धा फर्निचर खरेदी करताना दुकानदाराला सहजतेने विचारतो, “मग, मला पावती नको असेल तर किती पैसे कमी होतील ?”
हे सर्व पाहता मला असे वाटते, की शून्य भ्रष्टाचार ही एक (६) राहील. भ्रष्टाचार किमान नियंत्रणात आणणे ही मात्र आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
…………………………………………………
…………………………………………………
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला एक पूर्वी वाचलेली (गोष्ट/ कथा ) आठवते.
एका राजेशाहीत भ्रष्टाचार प्रचंड (फोफावलेला) असतो. तिथला नवा राजा तो नष्ट करण्याचा (प्रयत्न) करतो. तो एका नवीन कार्यक्षम प्रधानाची नेमणूक करतो. त्याला खूप अधिकार देतो आणि वर्षात इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे (निक्षून) सांगतो. प्रधान सूत्रे हाती घेताच सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना (रजा/दंड/शिक्षा) देऊन नवीन अधिकारी नेमतो. कारभार सुरू होतो. सहा महिन्यात प्रधान राजाला सांगतो, “महाराज, आता उद्यापासून आपल्या येथे (लाचखोरी/ भ्रष्टाचार) व्हायची शक्यता संपली”. राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व (लाचखोर/ भ्रष्टाचारी) अधिकारी सापडले का?”
प्रधान (नाराजीने) उत्तरतो, “नाही महाराज, नवे अधिकारी इतके (भ्रष्ट) निघाले, की त्यांनी राज्याच्या (खजिन्यातील) सर्व पैसा संपवून टाकला आहे. आता (तिजोरीत्/खजिन्यात) पैसेच (शिल्लक) नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार करणार तरी कसा?”
(सर्वसाधारणपणे)काही लोक अगदी (उलटसुलट) बोलत असतात. पण भ्रष्टाचार कधी संपेल याचे खरे उत्तर वरील राजाच्या (कार्यतत्परतेत) आहे.
(लाचखोर/भ्रष्टाचारी) अधिकारी ही भ्रष्टाचाराची एक बाजू आहे. परंतु (आतापर्यंत) सज्जन समजला जाणारा (सामान्यजन) वर्ग सुद्धा, ‘लाच देणे यात काही (गुन्हा) नाही, काम झाल्याशी (मतलब)’, अशा (मतापर्यंत) येऊन ठेपला आहे. (मोठमोठ्याने) बडबड करणारे खूप असतात, परंतु पूर्णपणे (८) जगणारा सध्या एक तरी (माणूस) असेल का ? नाही, असे मला (प्रामाणिकपणे) वाटते. भ्रष्टाचाराविरुद्ध एरवी (मोठमोठ्याने) बोलणारे अनेक नामवंत त्यांच्या (५) कामाचा अंशतः मोबदला तरी (७) रोख रकमेत मागतात !
(नाकासमोर) चालणारा सज्जन मध्यमवर्गीय सुद्धा फर्निचर खरेदी करताना दुकानदाराला ( बिनदिक्कत) विचारतो, “मग, मला (पावती) नको असेल तर किती पैसे कमी होतील ?”
हे सर्व पाहता मला असे वाटते, की (२) भ्रष्टाचार ही एक (कायमस्वरुपी) राहील. भ्रष्टाचार किमान (पातळीवर) आणणे ही मात्र आपल्या सर्वांची (जबाबदारी) आहे.
…………………………………………………
अश्विनी, देवकी
अश्विनी, देवकी
छान !
अजून येउद्यत पुढचे !
आता अजिबात बदलू नका.
विविधता बघूयात !
परंतु पूर्णपणे (८) जगणारा
परंतु पूर्णपणे (८) जगणारा सध्या एक तरी>>> याचेही उत्तर लिहिले होते,पण चुकून सर्व डिलीट झाल्याने परत टाईपताना हे राहिले.असो.
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला एक पूर्वी वाचलेली (गोष्ट) आठवते. एका राजेशाहीत भ्रष्टाचार प्रचंड (बोकाळलेला) असतो. तिथला नवा राजा तो नष्ट करण्याचा (प्रयत्न ) करतो. तो एका नवीन कार्यक्षम प्रधानाची नेमणूक करतो. त्याला खूप अधिकार देतो आणि वर्षात इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे (निक्षून)सांगतो. प्रधान सूत्रे हाती घेताच सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना (तंबी) देऊन नवीन अधिकारी नेमतो. कारभार सुरू होतो. सहा महिन्यात प्रधान राजाला सांगतो, “महाराज, आता उद्यापासून आपल्या येथे (भष्ट्राचार) व्हायची शक्यता संपली”. राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व (लाचखोर) अधिकारी सापडले का?”
प्रधान (खेदपूर्व) उत्तरतो, “नाही महाराज, नवे अधिकारी इतके (भष्ट्र) निघाले, की त्यांनी राज्याच्या ( खजिन्यातील ) सर्व पैसा संपवून टाकला आहे. आता (खजिन्यात) पैसेच (शिल्लक) नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार करणार तरी कसा?”
(७) काही लोक अगदी (कुजबुजत)बोलत असतात. पण भ्रष्टाचार कधी संपेल याचे खरे उत्तर वरील राजाच्या ( निर्णयप्रक्रियेत)आहे.
(४ भष्ट्राचारी)अधिकारी ही भ्रष्टाचाराची एक बाजू आहे. परंतु (५ मध्यमवर्गीय)सज्जन समजला जाणारा (सत्यवचनी)वर्ग सुद्धा, ‘लाच देणे यात काही (गैर)नाही, काम झाल्याशी (४ मतलब)अशा (५ निर्णयाप्रत) येऊन ठेपला आहे. (७ भष्ट्राचाराविरुध्द)बडबड करणारे खूप असतात, परंतु पूर्णपणे (८) जगणारा सध्या एक तरी (माणूस) असेल का ? नाही, असे मला (६ प्रामाणिकपणे) वाटते. भ्रष्टाचाराविरुद्ध एरवी (५ तावातावाने) बोलणारे अनेक नामवंत त्यांच्या (५ आमदानीत )कामाचा अंशतः मोबदला तरी (७ गैरव्यवहाराने)रोख रकमेत मागतात !
(५ साधासरळ) चालणारा सज्जन मध्यमवर्गीय सुद्धा फर्निचर खरेदी करताना दुकानदाराला (निर्लज्जपणे) विचारतो, “मग, मला (पावती) नको असेल तर किती पैसे कमी होतील ?”
हे सर्व पाहता मला असे वाटते, की (२) भ्रष्टाचार ही एक (६ समाजवाळवी) राहील. भ्रष्टाचार किमान (५ पातळीवर) आणणे ही मात्र आपल्या सर्वांची (५ जबाबदारी ) आहे.
छान !
छान !
आता मी २ तासानी येईन
तोपर्यंत बाकीचे येउद्यत
८ अक्षरी एकच शब्द आहे ना ...
८ अक्षरी एकच शब्द आहे ना ...
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला एक पूर्वी वाचलेली कथा / गोष्ट (२) आठवते.
एका राजेशाहीत भ्रष्टाचार प्रचंड फोफावलेला (५) असतो. तिथला नवा राजा तो नष्ट करण्याचा निश्चय / प्रयत्न (३) करतो. तो एका नवीन कार्यक्षम प्रधानाची नेमणूक करतो. त्याला खूप अधिकार देतो आणि वर्षात इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे निक्षून (३) सांगतो. प्रधान सूत्रे हाती घेताच सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना डच्चू (२) देऊन नवीन अधिकारी नेमतो. कारभार सुरू होतो. सहा महिन्यात प्रधान राजाला सांगतो, “महाराज, आता उद्यापासून आपल्या येथे भ्रष्टाचार (४) व्हायची शक्यता संपली”. राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व प्रामाणिक / कार्यक्षम (४) अधिकारी सापडले का?”
प्रधान उद्वेगाने / शरमून (४) उत्तरतो, “नाही महाराज, नवे अधिकारी इतके भ्रष्ट (२) निघाले, की त्यांनी राज्याच्या तिजोरीतील (५) सर्व पैसा संपवून टाकला आहे. आता तिजोरीत (४) पैसेच शिल्लक (३) नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार करणार तरी कसा?”
भ्रष्टाचाराबद्दल (७) काही लोक अगदी पोटतिडकीने / स्वप्नाळूपणाने (६) बोलत असतात. पण भ्रष्टाचार कधी संपेल याचे खरे उत्तर वरील राजाच्या अपेक्षाभंगामध्ये (७) आहे.
बेईमान (४) अधिकारी ही भ्रष्टाचाराची एक बाजू आहे. परंतु साधारणतः (५) सज्जन समजला जाणारा इमानदार / सदाचरणी (५) वर्ग सुद्धा, ‘लाच देणे यात काही गैर (२) नाही, काम झाल्याशी मतलब (४)’, अशा भूमिकेप्रत (५) येऊन ठेपला आहे.
भ्रष्टाचारविरोधी (७) बडबड करणारे खूप असतात, परंतु पूर्णपणे धुतल्यातांदळागत / नीतिनियमानुसार (८) जगणारा सध्या एक तरी इसम (३) असेल का ? नाही, असे मला अनुभवाअंती (६) वाटते. भ्रष्टाचाराविरुद्ध एरवी तावातावाने (५) बोलणारे अनेक नामवंत त्यांच्या व्यावसायिक (५) कामाचा अंशतः मोबदला तरी बिनदिक्कतपणे (७) रोख रकमेत मागतात !
नाकासमोर (५) चालणारा सज्जन मध्यमवर्गीय सुद्धा फर्निचर खरेदी करताना दुकानदाराला सहजपणे (५) विचारतो, “मग, मला पावती (३) नको असेल तर किती पैसे कमी होतील ?”
हे सर्व पाहता मला असे वाटते, की अल्प / थोडा (२) भ्रष्टाचार ही एक अपरिहार्यता / जीवनपद्धती (६) राहील. भ्रष्टाचार किमान पातळीवर (५) आणणे ही मात्र आपल्या सर्वांची जबाबदारी (५) आहे.
…………………………………………………
कारवी, किती सुरेख!तुमचा पॅरा
कारवी, किती सुरेख!तुमचा पॅरा वाचताना माझ्या चुका लक्षात आल्या.
राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व प्रामाणिक / कार्यक्षम (४) अधिकारी सापडले का?”
मस्त कारवी.
मस्त कारवी.
काही शब्द सर्वांना सारखेच (
सुंदर !पुणेकरांची वाट पाहू
सुंदर !पुणेकरांची वाट पाहू
मूळ परिच्छेद
मूळ परिच्छेद
भ्रष्टाचाराच्या संदर्भात मला एक वाचलेली (गोष्ट) आठवते. एका राजेशाही देशात भ्रष्टाचार प्रचंड (बोकाळलेला) असतो. तिथला राजा तो नष्ट करण्याचा (निर्धार) करतो. तो एका नवीन कार्यक्षम प्रधानाची नेमणूक करतो. त्याला खूप अधिकार देतो आणि वर्षात इथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे (निक्षून) सांगतो. प्रधान सूत्रे हाती घेताच सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना (डच्चू) देऊन नवीन अधिकारी नेमतो. कारभार सुरू होतो. सहा महिन्यात प्रधान राजाला सांगतो, “महाराज, आता उद्यापासून आपल्या येथे (भ्रष्टाचार) व्हायची शक्यता संपली”. राजा आनंदाने विचारतो, “खरेच, आपल्याला सर्व (प्रामाणिक) अधिकारी सापडले का?” प्रधान (उद्वेगाने) उत्तरतो, “नाही महाराज, नवे अधिकारी इतके भ्रष्ट निघाले, की त्यांनी राज्याच्या (तिजोरीतला) सर्व पैसा संपवून टाकला आहे. आता (तिजोरीत) पैसेच शिल्लक नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार करणार तरी कसा?”
(भ्रष्टाचाराबाबत) काही लोक अगदी (पोटतिडकीने) बोलत असतात. पण भ्रष्टाचार कधी संपेल याचे खरे उत्तर वरील राजाच्या (गोष्टीतल्याप्रमाणे) आहे.
(लाचखाऊ) अधिकारी ही भ्रष्टाचाराची एक बाजू आहे. परंतु (तथाकथित) सज्जन समजला जाणारा (पांढरपेशा) वर्ग सुद्धा, ‘लाच देणे यात काही (गैर) नाही, काम झाल्याची (मतलब)’, अशा (मनोवस्थेत) येऊन ठेपला आहे. (भ्रष्टाचाराविरुद्ध) बडबड करणारे खूप असतात, परंतु पूर्णपणे (भ्रष्टाचारविरहित) जगणारा सध्या एक तरी (माणूस) असेल का ? नाही, असे मला प्रामाणिकपणे वाटते. !
भ्रष्टाचाराविरुद्ध एरवी (तावातावाने) बोलणारे अनेक नामवंत त्यांच्या (व्यावसायिक) कामाचा अंशतः तरी मोबदला (धनादेशाऐवजी) रोख रकमेत मागतात !
(नाकासमोर) चालणारा सज्जन मध्यमवर्गीय सुद्धा फर्निचर खरेदी करताना दुकानदाराला (बिनदिक्कत) विचारतो, “मग, मला (पावती) नको असेल तर किती पैसे कमी होतील ?”
हे सर्व पाहता मला असे वाटते, की (शून्य) भ्रष्टाचार ही एक (कविकल्पनाच) राहील. भ्रष्टाचार किमान (पातळीवर) आणणे ही मात्र आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
मी आले आणि भ्रष्टाचारावर आळा
मी आले आणि भ्रष्टाचारावर आळा बसला
मस्त कोडे/परिच्छेद.
अस्मिता
अस्मिता

तुम्ही उत्तर न पाहता सोडवले असते तर ते अगदी नैतिक होईल !
पाहिले पण ... असु द्या...
पाहिले पण ... असु द्या... वेगवगळी वाचायला व नुसतं डोकवायला सुद्धा मजा येते.
वरील सर्वांचे सहभागाबद्दल
वरील सर्वांचे सहभागाबद्दल आभार.
छान सोडवलेत.
काही वेगळे सुसंगत शब्द आल्याने मजा आली
परिच्छेदाच्या २ खेळ प्रकारांमध्ये आजचा पूर्ण शब्द ओळखायचा प्रकार अधिक लोकप्रिय दिसतोय. तो रचतानाही सोपे जाते
काय वाटते तुम्हाला ?
सूचनांचे स्वागत !
मस्त. मी कामात अडकले त्यामुळे
मस्त. मी कामात अडकले त्यामुळे पूर्ण करू शकले नाही
Pages