भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मलाही आवडलं
पण म्हणलं फक्त ओड्या पुरता नको राहू दे धागा
माऊई आणि तिरामीसु पासून सगळ्यांचे किस्से येऊ देत

FB_IMG_1605116183511.jpg

ये उन दिनो की बात है..

कोरोनापूर्व काळात ऑफिसच्या वाटेवर हे नुकतीच जन्मलेले काळे पांढरे झुबके दोन तीन दिवसांपासून दिसले होते. पहिल्या दिवशी धडपडत तर दुसऱ्या दिवशी मस्त मजेत खेळत होते.तेव्हा हवेत गारवा असल्याने आज मुटकुळ करून झोपलेले. उचलून घ्यायचा मोह झाला पण मध्येच त्यांच्या मातोश्रीनी एन्ट्री घेतल्याने धाडस केलं नाही . कसले क्यूट आहेत पण !

धन्यवाद देवकी , आशुचँप.
पण बरं झाले सर्वसमावेशक धागा केला. माऊ लव्हर्स व भुभु लव्हर्स एकत्रच Happy
जाई मुटकुळं फोटो व मनि गोड.

अरे वा बरं झालं धागा वेगळा काढला.
maui.jpgहे आमचे माउई बुवा! किंग ऑफ द हाउस पोझ, एक हॅपी फेस आणि शेवटचा क्लासिक गिल्टी फेस Happy
माउई ७ महिन्याचा आहे. मी आयुष्यभर कुत्र्यांना भयंकर घाबरून असलेली बाई होते. मुलांबरोबर आणि नवर्‍याबरोबर कित्येक वर्षे "नो डॉग इन माय हाउस " चा लढा दिला आणि एप्रिल मधे काय मनात आले आणि भुभू आणायला परवानगी दिली. झाले! माउई आल्यानंतर मला १८० अंश बदलायला ४ दिवस सुद्धा लागले नाहीत Happy आता मी त्याला अगदी ओवर द टॉप लाडोबा करून ठेवले आहे असे घरचे लोक तक्रार करत असतात.

>>>>>>>>>आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.>>>> हाहाहा आय कॅन अंडरस्टँड. माजरांना कोपच्यात घेउ नये, फार हल्ला करतात.

मस्त धागा! फारच गोड आहे माऊई आणि ओडीन.

आम्ही कॅट पॅरेंट्स. आधी मी पण मैत्रेयी तुझ्यासारखा 'नो पेट' चा लढा दिला बरीच वर्ष. पण मुलीच्या हट्टापुढे काय चाललं नाही. १ नाही तर २ माऊ आल्या घरात आणि आधी कद्धी कोणत्याही प्राण्याला हात न लावलेली मी त्यांना मांडीत घेऊन बसायला लागले. कसा लळा लागतो कळत नाही. लोकं म्हणतात कुत्रे जास्त छान, तुमचं ऐकतात, जीव लावतात वगैरे. पण माझ्या बोक्याने पण तितकाच जीव लावला आहे. सकाळी उठायच्या वेळी बरोबर दाराशी येणे, आवाज करणे, बाथरूममधे असेन तर दाराच्या फटीतून पंजा घालत राहतो Proud आणि सकाळची पहिली नजरभेट झाली की लोळायला लागतो पायाशी, डोकं घासतो, मग त्याला बेली रब वगैरे सोपस्कार करायचे. मजा येते.

एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते >>>>>>>>>>> हाहा आशूचँप आमची दुसरी मांजर सॅमी पण अशीच आहे. टिव्हीवर किंवा मोबाईल वर पक्ष्यांचे विडीओ दाखवतो कधी कधी तर मागे जाऊन बघते ती पण आहे का खरंच पक्षी Lol

अरे हा माऊई कसला गुंड्या आहे
मी कधी भेटलो तर उचलूनच घेऊन जाईन
खूपच क्युट
नो वंडर तुमचा विरोध चार दिवसात मावळला
हॅपी फेस तर लैच गोजिरवाणा दिसतोय

जाई यांनी टाकलेली भुभु चे लोकरी गुंडे आणि उन्ह खात बसलेली माऊ पण क्युट आहे

अंजली - मलाही आहे अनुभव, आम्ही तीन माऊ ची पिल्ले सांभाळली होती
त्यांची आई अगदी दूध पित्या काळात मेली
त्यामुळे त्यानी मलाच आई बनवून टाकलं होतं
मांजरांना असाही फार अंगाशी करायला आवडतं
ते खुशाल मांडीवर येऊन बसतात
भुभु एकदम नाही करत, ते आधी कल बघतात

किती गोडुला आहे ओडीन.
माझ्या लेकाला माऊ खूप आवडते. आज सकाळीच खाली प्ले एरिया मध्ये खेळायला पाठवले. तर खेळायचे सोडून आमच्या सोसायटीतील माऊ जिंजर च्या मागे मागे फिरुन आला.

सारे भुभु से अच्छा...... भुभु हमारा| तो तो भुभु आला की त्याचे नाव गाळलेल्या जागी टाकायच. फक्त या भुभुच त्या भुभुला कळू द्यायच नाही. अशी ट्रिक मी वापरतो.

फुंतरु
नाव नाही आवडलं पण भुभू एकदम हँडसम आहे.त्यांच्यातला ह्रितिक रोशन असेल.

भारीये
अल्फा मेल वाटतोय
आजूबाजूच्या भुभु वर दादागिरी करतो का?

मी अनु
फुंतरू म्हणजे फुलपाखरू असे ऐकले होते
हँडसम म्हणजे काही विचारू नका

आशुचॅप
कसली दादागिरी करतो हा अगदी शेपूट आतं असतं कोणी जोरदार भुंकलं कि
आणि jजर सिलेंडर ची गाडी गेली बाजूनी तर विचारूच नका
तसा आम्ही बजरंग दल वाले आहोत
नो friendship नो nothing एल्स

माउईची मायक्रो मॅनेजमेन्ट!
कॉल्स वगैरे नसले तर दुपारी वगैरे मी आरामात सोफ्यावर बसून काम करत असते. तर हा असा डोक्यावर चढून नाहीतर साईड ला बसून माझे काम मॉनिटर करतो Happy
micromanager.jpg

हायला चेहऱ्यावर भाव तर असले आहेत की
थांब तुझी हाडं मोडतो आता Happy

याला बघूनच लोकं लांब थांबत असतील

बजरंग दल वाला कन्सेप्ट हहपूवा:)
आमच्या कडे एकदम उलट आहे
मेल फिमेल कोणीही असो
त्याना आधी मातीत लोळवायलाच पाहिजे आणि मग सुरू
शेवटी फटके देऊन देऊन बाजूला काढावा लागतं
व्हेट ला पण विचारून झालं ते म्हणाले दीड वर्षांनंतर होईल शांत आता एकदम स्ट्रॉंग ड्राइव्ह असतो
म्हणलं अजून त्याला सहा सात महिने आहेत बाकी

Pages