भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निगेटिव्ह environment चा भूभू वर परिणाम होतो का? कारण मागे आम्ही ज्या घरी राहत असू तिथे काही तरी वाईट होता काय ते सांगू शकणार नाही तिथे फुंतरू ची अवस्था फार वाईट झाली होती. फोटो सुद्धा काढले आहेत त्याचे... मी सहसा ते बघताच नाही इतका केविलवाणा दिसतोय तो त्यात. 

smiley-confused013.gif

>>>>निगेटिव्ह environment चा भूभू वर परिणाम होतो का? >>>> १०० काय १०१% घरातल्या सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांचा भूभ्यांवरती परिणाम होतो.

घरात आम्ही 3 असतो, मुलगा आता एक कुत्रा आण म्हणतोय, घरात कुणालाही कुत्रं सांभाळण्याचा अनुभव नाही , in fact दोन्ही घरात कुत्रा नाही, नवरा आणि मी अजून विरोधात आहोत, कुत्रं संभाळण्याविषयी मार्ग दर्शन करा ,प्लीज,
आजी आजोबा वयोमानानुसार प्रवास करू शकत नसल्याने आणि मुलगा एकटाच आहे, भाऊ बहीण नाहीत, त्याचा एकटे पणा जाईल का ?आजून एक घरी सर्वजण शाकाहारी आहेत ,अंडे देखील खात नाही, त्यामुळे अवघड जाईल असे वाटते, प्लीज मार्गदर्शन करा

तुमचे मिस्टर आणि तुम्ही दोघेही विरोधात असाल तर आणू नका
एकतरी व्यक्ती असली पाहिजे की जी सगळं मनापासून करेल
लहान बाळं असतात भुभु आणि माऊ म्हणजे
त्यांचा हट्टीपणा, आजारपण, ओकी आणि शु शी सगळं करावं लागतं आणि आवड नसताना करावं लागलं तर ते त्रासदायक ठरू शकतं

आणि थोडा वेळ सांभाळून पाहू असं काही नसतं
अमा यांनी त्यांच्या धाग्यावर एकदम परफेक्त लिहलं।आहे
पाळीव प्राणी घरी आणणे हे लग्न करणे किंवा मूल जन्माला घालण्याच्या लेव्हल हा डिसीजन आहे
तुम्हाला त्यांची जितकी सवय होते त्यापेक्षाही कैक पटींनी ते तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही त्यांना सोडून दिलं तर तो मानसिक आघात त्यांच्यासाठी खूप जास्त असतो

एक ऑप्शन म्हणजे फ्रेन्ड्स किंवा कुणाच्या तरी डॉगीला वीकेन्ड पुरते आणून बघू शकता तुम्हाला कितपत आवडेल , जमेल की कसे ते.
अर्थात तुम्ही शाकाहारी आणि ते मांसाहारी म्हटल्यावर तो फुड चा प्रश्न सोडवावाच लागेल.

आईग्गं कसले गोड फर बॉल्स आहेत. एकदम पोस्टर किटीज. मला ते लहान मुलांचे कुंडीतले चेहेरा सुर्यफुल वाले फोटो आठवले.

फुंतरू पण क्यूट.!

आराम करणारी आमची जोडगोळी Happy

IMG-5914.JPG

परवा गावाला गेले तेव्हा स्वी टीला बरेच महिन्यांनी केनेल मध्ये ठेवले. आजिबात धड राहिली नाही. सोमवारी आल्या आल्या तिला घेउन आले. मग दिवस भर दंगा व खादाडी चालू आहे. आमच्या इथे एक सिंधी बाई मस्तपैकी नॉनव्हेज व दाल पकवान पॅटिस आणते. काल पापड पण तिने गळ्यात घातले. त्यातले पकवान स्वीटीला फार आव डते ते कडा म कुडुम खाल्ले.

ब्राउनी, राणी, काजळ( ह्याच्या डोळ्याभोवती बरोब्बर काजळ घातल्या वाणी काळ्या रे घा आहेत. आणि ह्यांची लाजरी बहीण हर णी हे आमचे स्ट्रे डॉग मित्र ( बिल्डिंगच्या बाहे रचे शेजारच्या बिझनेस पार्कात राहणारे) हे सकाळच्या वॉकला भेट तात. भयंकर दंगा करून एक एक घास पेडिग्री खातात. ह्याचा बाबा पण येतो व दादागिरी करून पेडिग्री खाउन टाकतो.

दुसृया साइडला बिल्डिंगच्या बेसमेंटात काळ्या म्हातारा कुत्रा व सात आठ मांजरे आहेत. हे पण पेडिग्री फॅन आहेत. आता वॉकला चाललो.

मस्त आहेत जोडी माऊ पण
ब्लॅककॅट नी टाकलेले मांजर प्रचंड आश्चर्याने बघते आहे.
अमा तुमच्या स्वीटीचाही फोटो टाका.

मस्त धागा आणि अनुभव. फोटो तर एकसे बढकर एक.

>> घरात आम्ही 3 असतो, मुलगा आता एक कुत्रा आण म्हणतोय, घरात कुणालाही कुत्रं सांभाळण्याचा अनुभव नाही
>> Submitted by अश्विनि दिक्षित on 24 November, 2020 - 22:01

>> लहान बाळं असतात भुभु आणि माऊ म्हणजे त्यांचा हट्टीपणा, आजारपण, ओकी आणि शु शी सगळं करावं लागतं आणि आवड नसताना करावं लागलं तर ते त्रासदायक ठरू शकतं
>> Submitted by आशुचँप on 24 November, 2020 - 22:29

सहमत आहे. विशेषतः त्यांची शी शू ची सवयच त्रासदायक ठरू शकते. योग्य त्या ठिकाणी करण्याची सवय लागेल ह्या आशेवर किंवा तसे कुणीतरी तसे सांगते म्हणून आपण आणतो. पण सर्व बाळे जशी सारखी नसतात तसे सर्वच भूभू बाळांना सवय लागेलच असे नाही. ते स्वत: घरात एखादी जागा निवडतात आणि तिथे करतात (शक्यतो बाथरूम टॉयलेट जवळच असते हि जागा पण तसे नक्की नाही सांगता येत). त्यांना सवय लावणे हे आव्हान असते.

मागे निरु यांच्या एका धाग्यात लिहून गेलो खरा, कि लहानपणी एकदा भूभू पाळण्याचा अनुभव घेतला आणि त्याच्या जाण्यामुळे जे काही झाले ते पाहता परत भूभू पाळेन असे वाटत नाही.

आणि योगायोग असा कि त्यानंतर महिनाभरात का काय चिरंजीवानी भूभू चे पिलू आणण्याचा आग्रह जो धरला त्यापुढे माझा काही फार टिकाव लागला नाही Happy आधीच कोको नावाची मांजरी आहे, पण ती येऊन जाऊन असायची. मांजराना घरात कोंडले जाणे पसंत नसते. त्यामुळे या बाईसाहेब बरेचदा बाहेर सोसायटीतच कबुतरांच्या मागे वगैरे उंडारत असतात. आता आणले हे भूभू (इंडियन स्पिट्झ). भारी गोड आहे. आणि चिरंजीवानी त्याचे नामकरण स्नोई असे केले आहे.

स्नोई आता मोठा झालाय. पण हा काही महिन्यापूर्वीचा फोटो. स्नोई आणि कोको. हे म्हणजे अमेरिका आणि नॉर्थ कोरिया असे वाटते मला Lol

अमेरिका आणि नॉर्थ कोरिया अध्यक्षांचे शिखर परिषदेसाठी आगमन:
IMG_20200716_133727.jpg

.
शांतता करारावर सह्या करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे Happy
IMG_20200801_101115.jpg

Too cute. My dog for some reason is sleeping in the bottom shelf of book case. Over newspapers. She feels cosy there.

वा वा नविन मेंब्रं सगळी मस्त दिसतयात. एल्सा, स्नोई आणि किम जोंग उन Lol
योग्य त्या ठिकाणी करण्याची सवय लागेल ह्या आशेवर किंवा तसे कुणीतरी तसे सांगते >>> सवय नक्की लागते पण आपण लावली तरच. आपोआप नाही लागत. डॉग्ज ना रुटीन आवडतं. ठरलेल्या वेळी बाहेर नेले की सवय होते त्यांना ही. कंटाळा करून चालत नाही, ऊन, पाऊस, थंडी असलीतरी. पण नव्या पॅरन्ट्स ना जरा त्रासाचा भाग म्हणजे लहान असताना ( पहिले २-३ महिने) अगदी दीड दोन तासांनी सू करतात. त्याप्रमाणे तेवढ्या वेळा न्यावे लागते. पण हळू हळू समजते की घरात हे करणे इज नॉट ओके.
माउई सुरुवातीला अगदी लहान असताना घरात वरच्या मजल्यावर त्याला जाऊ देत नव्हतो आम्ही.खालच्या मजल्यावर कन्टेन्ड ठवले, आणि दर वेळी शी सू ला बाहेर नेताना दरवाजाला घुंगरांची दोरी टांगली आहे ती वाजवून मग न्यायचो. काही दिवसांत त्याला समज्ले की घंटी वाजली की बाहेर. मग स्वतःच बाहेर जायचे असले की घंटी वाजवायला लागला. पहिल्यांदा वाजवली तेव्हा आम्हाला फारच भारी वाटले होते Happy
2020-11-25.jpg

Pages