भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मै, तुमचं बॅकयार्ड फेन्स्ड आहे. त्याच्याकरता दाराला ओपनिंग करता येईल म्हणजे तो हवं तेव्हा ये जा करेल.

अरे भारी आहे कसला माऊई
आम्ही पण ही घंटी ची आयडिया करून बघतो
मी त्याचा व्हीडिओ पण पहिला
सध्या तरी तो दारापाशी जाऊन कुई कुई आवाज करतो की आम्हाला कळतं पॉटी आलीय
पण तो डॅम्बिस झालाय त्याला बाहेर खेळायला जायचं असेल तरी आवाज करतो, आणि मग दरवाजा उघडून दिला की उनाडक्या करत फिरतो
दोन तीन वेळेला असं झाल्यावर मग मी दम भरलाय पॉटी केल्याशिवाय आलास तर बघ मग उगाच समाधानासाठी चार शिंतोडे उडवून येतो

एल्सा, स्नोई, कोको मस्त!
माऊई आणि घंटी हे फारच भारी!
आमच्या शेजार्‍याचा भूभू फार लबाड आहे. त्याला चालायचे नसते. आई सोबत असेल तर चुपचाप फिरतो, बाबा एकटा असला की साईडवॉकवर फतकल मारुन शेवटी स्वारी कडेवर Happy

हो माउई पण नॉटी आहे भरपूर. कधी बाहेर (बॅकयार्ड मधे) नुसतेच उनाडायला जायचे म्हणून घंटी वाजवतो. कधी घंटी वाजवून बाहेर जातो आणि नुसताच ऊन खात किंवा चिमण्या खारी बघत पॅटिओ चेअर वर बसून रहातो! तेवढा चालूपणा नाइलाजाने चालवून घेतो आम्ही. Happy

मी सध्या ब्रिडर्सच्या वेबसाईट बघतो आहे. काही वेबसाईट्सवर 'पपी विल हॅव मायकोचिप्स' असं म्हटलय ! हे नॉर्मल आहे का? म्हणजे इथे पपीजमध्ये मायक्रो चिप असते ??

हो मायक्रोचिप इन्जेक्ट करतात पेट्स हरवले चोरले वगैरे तर ट्रॅक करण्यासाठी. ऐकल्यावर वाटते तशी मोठी चिप वगैरे नसुन बारीक कणभर आकाराची असते. ती खांद्याजवळ लूज स्किन च्या भागात इन्जेक्ट करतात दॅट्स इट.

Both my dogs have micro chips. Some kennels demand it when you keep the dog with them. It is useful when the dog is lost. Heaven forbid. Costs around 5k per chip in india. You need to make a note if the chip number and keep in a safe place like the dogs medical file or in a safety locker along with your jewelry passport etc.

माऊई आणि घंटी हे फारच भारी......+१.
मायक्रोचिप - आमच्या एलोन मध्ये पण इंजेक्ट केलेली आहे . डॉग्स ची कुठलीतरी असोशिएशन आहे त्यांच्याकडे आपल्या डॉग चे रेजिस्ट्रेशन केलेले असते त्याच्याकडून आली होती . त्यात आपले आणि डॉग चे डिटेल्स असतात

इथे कोणी GPS ट्रॅकर इन्सर्ट केलेला आहे का

खूप गोड आहेत इथले सगळे फोटो आणि एकेकाच्या गंमती वाचायला मजा आली.
मायक्रोचिपवरून आठवले आमच्या घरमालकाला त्याच्या बोक्याला सिंगापूरहुन तैवानमधल्या घरी न्यायचे होते तेव्हा हे करणं आवश्यक असल्याचे त्याला सांगितले. हा पेटसचा पासपोर्टच जणू.

हो ना इतके क्यूट बाळ पाहून मला सुद्धा एखादं बाळ घरी आणावं वाटतं आहे. पण काहीच अनुभव नसल्याने सुरवात माऊ पासून करावी असं वाटतंय.. दिपाली तुम्ही मला पर्शियन कॅट बद्दल आणि त्यांच्या maintance बद्दल थोड सांगू शकाल का..means त्यांच्या शी सू च्या सवयी झोपणे आणि खाणे इत्यादी

(मला या धाग्यावर विरस करायचा नाहीये, ओडिन मलाही आवडतो.फक्त एक वेगळी बाजू सांगतेय)
पण आशु, ज्यांना कुत्र्याची भीती वाटते त्यांना कुत्रे आपल्या चेहऱ्यावर ती भीती ओळखून उगीच चावायला येतील असंही वाटत असतं Happy 'अहो आमचा कुत्रा चावत नाही, तुम्ही बिनधास्त जा' हे कुत्रे पालकांचं आणि 'अहो हे तुम्हाला माहितीय की तो चावत नाही, त्याला माहिती आहे का?' हे कुत्रे द्वेष्ट्या लोकांचं टिपिकल वाक्य असतं.अंगणाला गेट असेल तर बाईंची भीती मूर्खपणाची आहे असे म्हणता येईल.

मला मान्य आहे पण तो अक्षरशः दुसऱ्या टोकाला होता
>>
त्या बाईंपासुन दुस-या टोकाचे अंतर किती होते?
जर त्याने नैसर्गीक प्राणी प्रवृत्तीला अनुसरुन झेप घेतली असती तर किती मायक्रोसेकंडमधे तो त्या बाईंपर्यंत पोहोचला असता?
त्यांनी फक्त एक सावधानता बाळगुन तुम्हाला सुचीत केले. तुम्ही फक्त, हो माझे लक्ष आहे त्याच्यावर (आणि म्हणुन) तो काही करणार नाही याची मी खात्री देतो अशा अर्थाचे बोलला असतात, तर त्यांनाही सुरक्षीत वाटले असते.

पण आता आमच्या अंगणात पण त्याला बांधून ठेवायचं का तर रस्त्यावरून जाणाऱ्या एका बाईला भीती वाटते म्हणून हे फारच झालं
>>
संरक्षक भिंत व गेट नसेल, तर तुमच्या अनुपस्थितीत बांधुन ठेवायला हवे.

आणि भीती अनुभवाने जाते हे प्रत्यक्ष पाहिलं आहे
आमच्या शेजारी काकू आहेत त्या प्रचंड घाबरतात भुभुला
आणि ओडीन आल्यापासून त्या तो बांधला आहे नीट याची खात्री केल्याशिवाय घरी पाऊल टाकत नाहीत
त्यांची एक दीड दोन वर्षांची नात आहे ती येते अधून मधून त्यांच्याकडे
तिला ओडीन जाम आवडतो, ड म्हणता येत नाही ती ओलिन म्हणते बोबदकांडा
तिला त्याला हात लावायचा असायचा पण काकू भीतीने म्हणयाच्या नको जवळ जाऊ तो चावेल
मग ही पण ऐकून घाबरायला लागली
मी म्हणलं असं नका करू, तिला उलट भीती वाटणार नाही असं करू
मग त्यांच्या परवानगी ने आणि विश्वासात घेऊन ओड्याला पक्का बांधून तिला हात लावायला लावला
त्याला काय माया केलेली आवडतेच
मग तिची हळूहळू भीती कमी होत गेली, आता म्हणजे येताना आजीकडून खाऊ घेऊन येते आणि ओल्या ओल्या हे घे खाऊ म्हणून चारते
त्याला बस खाली म्हणते की तो पाय पसरून बसतो
नातीच्या आग्रहाने काकूंची पण भीती कमी झाली आणि शेवटी त्यानी एकदाच ओझरता स्पर्श करून पाहिला
मग आता काही करत नाही म्हणल्यावर सवय झाली
आता तो मोकळा असला तरी येऊन बसतात, तो जवळ आला तर ए जा तिकडे जाऊन बस म्हणतात
काही अपवादात्मक भुभु सोडले तर बहुतांश प्रेमळ असतात आणि त्यांना हडतुड करणारे लोकं आणि प्रेम करणारे लगेच कळतात
आणि कोणापासून अंतर राखायला पाहिजे हेही
प्रश्न आपल्या मानसिकेतचा आहे

सहमत आहे दोन्ही बाजूंशी. मालक म्हणून आपल्याला श्वानप्रेम असते व त्याविषयी आत्मविश्वास सुद्धा असतो. हे जसे खरे तसेच भीती वाटून काही लोक पॅनिक होऊ शकतात. त्यामुळे ते ओरडतात. त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही. काहींना फोबिया सुद्धा असू शकतो. किंवा पूर्वीचा कटू अनुभव इत्यादी.

आता: तू क्यूँ बीच में जज्ज बन रहा है?

कारण मी दोन्ही बाजू तितक्याच प्रभावीपणे अनुभवल्या आहेत Lol

नवीन Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 20:49
>>
रोजच्या ओळखीतला शेजा-यंचा कुत्रा व रस्त्यात जाताना अचानक दिसलेला कुत्रा , जो आपल्याला ओळखत नाही व तो किती प्रेमळ/चावणारा आहे हे आपल्याला माहिती नाही, अशावेळेला तिथे उपस्थित असलेल्या कुत्रा मालकाला साधे सावधानता घेण्याबद्दल सुचीतही करु नये का?
माणसाची सुरक्षीत वाटण्याची व प्रत्यक्ष सुरक्षीत असण्याची गरज जास्त महत्वाची आहे.

सुपर डॉग नाहीये तो
इतक्या वेगात झेप घ्यायला
मुळात तो झेप वगैरे असले प्रकार करत नाही
>>
हे तुम्हाला माहिती आहे.
कुत्र्याला माहिती आहे.
इथे सांगितले म्हणुन मला माहिती आहे.
पण त्या बाईंना कुठे माहिती होते? त्यांनी फक्त तुम्हाला सुचीत केले होते?

आमच्या अनुपस्थितीत तो बाहेर नसतोच
त्याला आम्ही बाहेर असलो तरच मोकळा सोडतो तेही अंगणात
पॉटी करायला बाहेर जातो तेव्हाही मी किंवा मुलगा सोबत जातो लक्ष ठेवायला
आणि ओडीन नो म्हणल्यासवर तो आहे तिथे थांबून परत येतो
>>
त्या बांईना भिती का वाटली व त्यांचा सुरक्षीत राहण्याचा हक्क याच्याशी या गोष्टींचा काहीही संबंध नाही.

हा प्रकार रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी नाही झालेला. आम्ही आमच्या अंगणात खेळत होतो,
>>
being near to your home does not give you right to leave your animal in a way which will jeopardize feeling safe and actual safety of people.
आपण सार्वजनी ठिकाणी असु, तरच नैसर्गीक उर्मीला साजेसा रानटीपणा करायचा असतो असे काही कुत्र्यांच्या डिएनए मधे लिहिलेले असते का?
त्याला कसे कळणार हा फरक? त्या बाईंना कसे माहित असणार, की घरी असल्यामुळे अ‍ॅटॅक करायचा नाही हे त्या कुत्र्याला माहिती आहे?

ही एक लांबलचक छोटी ग्ली आहे. जिथे रस्त्याच्या आणि त्याच्या मधे मी कायम उभा असतो. मला झुंकांडी देऊन तो रस्त्यावर पळू शकत नाही इतकी ती अरुंद आहे.
>>
तुम्हाला झुकांडी देऊन नाही पळू शकत, पण तसा प्रयत्न तर करू शकतो ना?
तो काय करू शकतो किंवा नाही या पेक्षा तुम्ही त्याला ज्या समाजात ठेवले आहे त्या समाजातील माणसांना वाटणारी सुरक्षीतता जास्त महत्वाची आहे. त्यांनी फक्त सुचना केली होती, त्याला घेऊन जा वगैरे सांगीतले नव्हते

आशुचॅंप आपल्याला भीतीचे मानसशास्त्र नीट समजावून घ्यावे लागेल. तिथे बुद्धीवादी तर्कशास्त्र कामाला येत नाही. अस्तित्वात नसलेल्या भुभुची कल्पनेने अस्तित्व साकारुन देखील भय मेंदुत तयार होते.आपल्याला जिथे जायचे आहे त्यांच्याकडे कुत्रा असेल तर कल्पनेने देखील भीती वाटते काही लोकांना.

सुचीत करणे आणि आदेश देणे यातला फरक मला सुदैवाने कळतो
>>
तुमचा मुद्दा कुत्र्याबद्दल आहे की त्या कशा उद्धट बोलल्या याबद्दल आहे?

त्या बाईंचा आवेश असा होत की जणू आम्ही त्याला साखळी बांधली नाहीये म्हणजे तो आता कचाकचा येऊन चावणारच.
>>
what is wrong in this? she has every right to imagine possible threats to her safety from others, including animals and humans and take precaution as per those instinct feelings.
are you saying similar things with pet dogs have never happened in the history of mankind? in the recorded history?

आणि पुन्हा एकदा पोस्ट वाचा. तो पूर्णपणे बॉल खेळण्यात मग्न होता. तो वरसुद्धा बघत नव्हता त्या बाईकडे.
>>
is this dog trained to not follow his basic natural animal instinct while playing? can you guarantee it?
will a veterinarian doctor or WHO equivalent guarantee it on paper?

पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना भीती वाटते आणि नीट सांगतात त्यांच्यावर उगाच टाफरायला मला वेड लागलं नाहीये.
>>
म्हणजेच हे सगळे त्या बाई उद्धट बोलल्या याबद्दल आहे, तुमच्या कुत्र्याबद्दल नाही.

Pages