भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह एकदम हँडसम आहे एलॉन

ओडीन ने काही त्रास नाही दिला प्रवासात
आम्हाला तीच काळजी होती, कारण आमच्याकडे कार नाहीये
घरचे सगळे आणि ओडीन मिळून सहा जण म्हणून इनोव्हा ठरवली
त्यांना गाडीतून पेट न्यायचं आहे याची कल्पना दिली
आयुष्यात पहिल्यांदाच तो कार मध्ये बसला खाली दोन जुन्या चादरी अंथरल्या आणि त्यावर बसला
नंतर मग तिथून बाहेरील गंमत दिसत नव्हती म्हणून मांडीवर चढून बसला
बराच वेळ गेल्यावर मग उतरवला
पॉटी आली की कुई कुई करून सांगायचा मग गाडी थांबवून फिरवून आणलं की झालं
Chew stick घेतल्या होत्या ती एक चावत बसला बराच वेळ
येतानाची तर कार अजून मस्त होती
त्यांनी मागच्या सीट फोल्ड केल्या आणि मोठी जागा त्याला दिली मग काय छान लोळून झोपून आला
ओकी करेल असं वाटलेलं पण जायच्या आधी आणि प्रवासात फक्त पाणी दिलं बाकी फूड काही नाही त्यामुळे सुखाचा झाला

खुप लकी आहात कि तो शांत बसतो गाडीत . आमचा म्हणजे सतत भुंकतो . खिडकी उघडली कि बाहेरच्या लोकांवर भुंकतो . आणि ह्याचा आवाज आणि जबडा बघून two wheeler वाले घाबरतात .
जवळच्या टेकडीवर जाण्यासाठी मी मागच्या सीटवर साखळी बांधून घेतली आहे , म्हणजे किमान तो पुढच्या सीट वर तरी येत नाही

मस्त किस्से आहेत या धाग्यावर. आम्ही लहानपणापासून माऊ-भुभूंच्या संगतीत वाढलो. एकदा तर घरात १२ मांजरी होत्या. तीन मदर कॅट्स आणि त्यांची तीन-तीन बाळं. मला स्वतःला प्राण्यांची प्रचंड आवड आहे आणि इतर कुणी प्राणीप्रेमी भेटले तर त्यांना 'सात खून मांफ' Happy पर्सनॅलिटी टेस्ट आहे माझ्यासाठी ती. त्यामुळे इथले किस्से आणि फोटो बघायला मजा येते आहे.

@मृणाल १ , अमा ही वर दिलेली समीर कुलकर्णी यांची कथा एका श्वानद्वेष्ट्याचे झालेले धर्मांतर आहे. अप्रतिम व वास्तव गोष्ट असल्याने मी ती जपून ठेवली आहे. कुत्रा हा आदिमानवापासून आपला सहजीवी मित्र आहे. मला सदिच्छेला उत्तर म्हणून आलेली एका श्वानद्वेष्ट्याची द्वेषयुक्त वर दिलेली प्रतिक्रिया मी काही मानसशास्त्राच्या अभ्यासकांना मानसशास्त्रीय नोंद म्हणून पाठवली आहे. भयाचे रुपांतर पुढे द्वेषात होते. द्वेषात तारतम्य हरवले जाते.

समीर कुलकर्णी यांचा अनुभव मधील लेख>>>>

आईग कसलं जबरा लिहिलं आहे
मला वाचताना रडूच येत होतं
विशेषतः पहिल्यांदा हिना ला हातात घेतल्यावरचा प्रसंग आणि नंतर त्या पिल्लाचा
जॉनी आणि मित्राचा पण किस्सा भारी आहे
फार अप्रतिम

धन्यवाद घाटपांडे सर इथे शेअर केल्याबद्दल

समीर कुलकर्णी यांचा अनुभव मधील लेख>>>>
धन्यवाद घाटपांडे सर इथे शेअर केल्याबद्दल

माझाही प्रवास असाच काहीसा झाला आहे. द्वेष मारावेसे वाटणे असं कधी वाटले नव्हते पण तितक्या जवळ पण मी कधी गेले नव्हते .
पण एका टप्यावर असं वाटले कि मुलांना एखादी गोष्ट इतकी मनापासून हवी आहे आणि आपण केवळ वयाने , मानाने मोठे, आपले म्हणणे मुले ऐकतात म्हणून आपण त्यांच्यावर एखादी गोष्ट लादणे किती योग्य .
आणि तेही आपल्याला त्या गोष्टीचा काहीही अनुभव नसताना . ज्या क्षणी मनाला हे जाणवले त्या क्षणी मी कुत्रा घरी आणण्याच्या प्रोसेस मध्ये सहभागी झाले . तरी पण माझ्या मनात प्रेम नव्हतेच. पण हे पिल्लू घरी आणल,, तरीपण मी थोडीशी अलिप्तच होते.
घरी आणल्यानन्तर ८-१० दिवसातच ह्याला दवाखान्यात घेऊन जायचे होते. वाटले कि छोटेसे पिल्लू बसेल मागच्या सीट वर , पण गाडीत ठेवताना त्याला एकट्याला मागच्या सीट बसवावेसे वाटले नाही . मग तो पुढच्या सीटवर आला. गाडी सुरु केली तसा घाबरून माझ्या मांडीत यायला लागला . मग मात्र मी मुलीला गाडीत त्याला सांभाळायला बोलावले . मग आम्ही दोघी दवाखान्यात गेलो. तिथे काही आजारी कुत्री होती , ते बघून मी म्हंटले कि मी याला गाडीतच घेऊन बसते उगाच इन्फेकशन ची भीती नको . नंबर आल्यावर आत घेऊन गेले. व्हॅक्सिन देऊन झाले. शेजारी एक ब्राऊन रंगाच्या कुत्र्यावर उपचार चालले होते . मी विचारले के काय झाले आहे तर त्याच्या मालकाने सांगितले की रस्त्यावरच्या कुत्र्याबरोबरच्या भांडणात तो जखमी झालाय आणि जखम गंभीर आहे. त्याक्षणी मी हातातल्या एलोन ला मी कवटाळून घेतले.
आज मागे वळून बघताना वाटते कि हाच माझ्या धर्मांतराचा क्षण होता
आता मला पण कुत्र्याला कुत्रा म्हणवत नाही .

माबोवरचा हा बेस्ट धागा आहे. परत परत वाचवा असा. सगळ्या पोस्ट आणि मुख्यतः सगळ्या बाळांचे फोटोज खुप आवडले. मजा येते आहे वाचायला.

माझ्याकडे या वर्षी दिवाळी सेलिब्रेशन नव्हतं, त्यामुळे डॉग्ज साठी दिवाळी फराळ ऑर्डर केला नव्हता. मागची दोन वर्षे मात्र एका डॉग restauranteur कडून *डॉग स्पेशल दिवाळी फराळाचे बॉक्सेस विकत घेऊन माझ्या बाळाच्या मित्र मैत्रिणींना वाटले होते. सगळ्या नखरेल फसी डॉग्जनी सुद्धा आवडीने फस्त केले होते. कोणाला नंबर हवा असेल तरच शेअर करते ( कारण उगीच जाहिरात वाटायला नको Happy )

* फराळाचे पदार्थ डॉग्जसाठी योग्य डाएटचा विचार करून बनवलेले असतात. नो गहू, नो साखर, नो ऑइल असणारे - भोपळा, गाजर, चिकन असे घटक वापरून आणि डॉग्ज मंडळींना आवडेल असे फ्लेवर्स वापरून यम्मी बनवलेले असतात. मी अजूनही मोबाईलवरून फोटो अपलोड करू शकत नाहीए, नाही तर मागच्या वर्षीचा फराळाचा फोटो दाखवला असता. करंजी, चकली, लाडू, शंकरपाळे आणि अजून काही पाचवा पदार्थ होता. दिसायला हुबेहूब आपल्या फराळाचे पदार्थ वाटतील असेच होते. त्याच्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबांना फार मजा वाटली. डॉग्ज आईस्क्रीम आणि वाढदिवसाचे केक्स पण डाएटचा पूर्ण विचार करून बनवलेले असतात. पुण्यातील मराठी माणुस आहे, पण नुकतेच स्वतःच्या (4) कुत्र्यांना भरपूर जागा मिळावी म्हणून गोव्याला स्थलांतर केले आहे. आता आम्हा पुण्याच्या ग्राहकांना कुरियरने हवे ते पदार्थ पाठवतात.

नुकतेच स्वतःच्या (4) कुत्र्यांना भरपूर जागा मिळावी म्हणून गोव्याला स्थलांतर केले आहे. >>>> ग्रेट!

फारच मस्त धागा. एके ठिकाणी बूड स्थिर झाल्यावर मलाही आता कुत्रा पुन्हा आयुष्यात आणायचा आहे

https://www.maayboli.com/node/1633
ही आमच्या भुभुची गोष्ट. इथल्या बर्‍याच जणांनी वाचली आहे, ज्यांनी नाही त्यांच्यासाठी पुन्हा देतो आहे रिक्शा.

आशुचँप यांनी ते धागे नुकतेच वर आणलेले दिसत आहेत. धन्यवाद .

काय अहो वाचून रडलो च्यामारी
तो विहिरीचा प्रसंग वाचून अक्षरशः काळजात कालवाकालव झाली
काय झाली असेल तुमची अवस्था

ओड्या लहान असताना त्याचा बारका अपघात झाला होता तेव्हा माझी काय अवस्था झालेली
रस्त्यातून चालताना अचानक तो रस्त्याच्या बाजूला गेला
लीश होता पण बाजूने जाणाऱ्या मोटरसायकलचा धक्का बसला
पायाला चांगलीच जखम झाली
तो मोटरसायकलावला पण पडला
मी अक्षरशः ओड्याला छातीजवळ उचलून घरी धावत सुटलो
त्याची जखम धुतली, हळद लावली
इतकं दुखत होत की ते बघूनच कसतरी होत होत
व्हेट ला कॉल केला तर म्हणले पाय टेकवतोय का तो
हो म्हणल्यावर म्हणाले मग फार चिंता करू नका
फ्रॅक्चर नसणारे तरी वाटलं तर घेऊन या
जखम खोल होती, हाडापर्यंत गेलेली
पण नशिबाने हाड मोडलं नव्हतं, मग त्याला जखम भरून काढायला क्रीम आणि स्प्रे दिला
तो स्प्रे खूप झोंबयचा, अक्षरशः शॉक लागल्यासारखा पाय झटकायचा नंतर तर स्प्रे दिसला की पळून जायला बघायचा
क्रीम चाटु नये म्हणून ते मझल आणलं पण ते लावल्यावर इतक्या करुण नजरेने बघायचा
त्याला वाटायचं की ही त्याला शिक्षा दिली आहे
मग तो जवळ ठेऊन अलगद मांडीवर पाय ठेऊन सांगायचं प्रयत्न करायचा की तो सॉरी आहे
त्यावेळी काय वाटायचं ते सांगता येत नाही
डोळे अक्षरशः पाझरायचे त्याला सांगताना की बाबा रे हे तुला बरं वाटावं म्हणून आणि तू क्रीम चाटु नयेस म्हणून लावलं आहे ही तुझी शिक्षा नाहीये
पण एक अक्षर बोलू शकायचो नाही तो तसाच मग मांडीवर डोकं ठेऊन झोपायचा
त्याची जखम बरी होईपर्यंत चे उपचार मलाच जास्त टॉर्चर करत होते

2020-09ख-26 16.36.50.jpg

आमचा स्नोई. .
दुपारी 1 ते 4 Happy

लाॅक डाउन खूप खूप सुसह्य झालाय स्नोईमुळे.
मुलांच्या मित्रमंडळीत पण फेमस आहेत स्नोईबुवा. .

ओडीन, माऊई, फुंतरु, रेनकोट बाळ , चिकू, एलोन, स्नोई, मंकी, सॅमी… सगळे भुभु , माऊ , छान आणि गोड !

@अनुश्री आमच्यापण भुभु बाळाचे नाव चिकू (Brindle lab mix puppy )

खूप मस्त किस्से. मला वाचून एकदम भरभरून आले. अरे ही तर माझ्याच बिरादरीतील भुभु आणि माऊप्रेमी जनता Happy

Pages