
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
छान अनुभव.
छान अनुभव.
छान वाटले वाचून.
छान वाटले वाचून.
(No subject)
सर्व किस्से भारी आहेत.. पेट
सर्व किस्से भारी आहेत.. पेट बर्ड्स चे किस्से चालतील का इथे
एकदा दिवेआगरला गेलो होतो
एकदा दिवेआगरला गेलो होतो तेव्हा एक भुभ्या चालला होता त्याला शिट्टी मारुन बोलावल. त्यानंतर त्याने मला जाम सोडल नाही. मी समुद्रात गेलो तर तो समुद्रात. बाहेर आल्यावर माझ्यासोबत जन्मोजन्मीचा मित्र असल्या सारखा पकडून ठेवले. मज्जा आली.
Special diwali treats are
Special diwali treats are available for puppers on bigbasket.com. mix of lamb mince and veggies. I got two packs. One I gave her on Diwali day. Another saved
मस्त वागला ओडिन.त्यालाही मजा
मस्त वागला ओडिन.त्यालाही मजा आली.आणि दुसरेही उगीच घाबरून ओव्हर रिऍक्ट झाले नाहीत हे छान.
आम्ही सध्या भुभु आणायची
आम्ही सध्या भुभु आणायची मानसिक तयारी करत आहोत. आमच्या दोघांच्याही घरी कधीच कुठल्याही प्रकारचं पेट नव्हतं. त्यामुळे कसं जमेल असं वाटयत. बघू.
फोटोत काय फक्कड स्माईल आहे
फोटोत काय फक्कड स्माईल आहे भूभूच्या चेहेऱ्यावर.
कुलाबा किल्ल्यावर बोटीने
कुलाबा किल्ल्यावर बोटीने जाताना पसरलेलं तोंडभर हसू
लै खुश झालेला गडी
लै खुश झालेला गडी....
लै खुश झालेला गडी....
मस्त किस्से.
दिसतोयं तो आनंद
माउई , फुंतरू व इतर दोस्त मंडळीही भलतीच गोंडस आहे.
गोडुली आहेत सगळी बाळं!
गोडुली आहेत सगळी बाळं!
ओडीनचा निरागस आनंद पोहोचला.
भू भू आणि माऊच्या गोष्टी फारच
भू भू आणि माऊच्या गोष्टी फारच छान आहेत. मला फार आवडल्या. माझ्याजवळही अशा घडलेल्या गोष्टी आहेत, फक्त रस्त्यावरील.
हे फारच हृद्य आहे म्हणून इथे
हे फारच हृद्य आहे म्हणून इथे द्यावंसं वाटलं. रूढार्थाने गोड नाहीए.
https://www.facebook.com/groups/icrockerszzz/permalink/3893043090724141
वा वा ओडिन ची दिवाळी भारीच
वा वा ओडिन ची दिवाळी भारीच मस्त झालेली दिसतेय! गोड फोटोज! सॉल्लिड हॅपी बॉय दिसतोय.
तेही मधोमाध जाऊन बसतो एकदम. सोफ्यावर कुणी पोज करत असतील तर उडी मारून सोफ्याच्या पाठीवर बसतो अन लोकांच्या मधे ग्रुप फोटोला तोंड घालतो बरोब्बर 
आम्ही दिवाळीला इंडियन कपडे घातले तर माउई ला वेगळेच वाटत होते सगळे नेहमीपेक्षा वेगळे पाहून. सगळ्यांचे फुस फुस करून वास घेऊन झाले, अंगावर उड्या मारून झाल्या. तसे यावेळी मोठ्या पार्ट्या वगैरे झाल्याच नाहीत पण एक फॅमिली अॅट अ टाइम असे दोन एक्सटेन्डेड फॅमिलीज आल्या होत्या. पण एरवीच्या खेळाऐवजी सगळे आपापल्या कपड्यांना जपत होते ते त्याला आवडले नाही
आता फोटो काढणे हा प्रकार समजायला लागला आहे बहुतेक. फोटो साठी पोज करणे म्हणजे काही स्पेशल अटेन्शन मिळते हे कळले आहे त्यामुळे प्रत्येक फोटोमधे याला जायचे असते
आम्हाला वाटले फटाक्यांना घाबरेल. इथे तसेही बाँब वगैरे टाइप मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना परवानगी नाही. वेगवेगळ्या प्रकारचे भुईनळे असतात पण त्यातले काही लवंगी फटाक्याइतपत आवाज करतात. मुले आणि बाबा फटाके उडवताना मी माऊई ला मांडीवर घेऊन खुर्ची वर बसले पोर्च मधे. अजिबात घाबरला नाही मग.
गोडुले आहेत सर्व भुभु.
गोडुले आहेत सर्व भुभु.
आशू
आशू
काय मस्त आहे रे ओडीन आणि तुझा हा धागा ही.
धागा आणि प्रतिसाद वाचून मला नुसरत साहेबांचे गाणे आठवतेय.
आपसे मिल के हम कुछ बदल से गये शेर सुनने लगे गुनगुनाने लगे
पेहेले मशहूर थी अपनी संजीदगी अब तो जब देखिये मुस्कुराने लगे.
हर्पेन , प्रतिसाद आवडला.
हर्पेन , प्रतिसाद आवडला.
वाह झकास
वाह झकास
मस्त लिहाल आहेस रे
माऊई चा फोटोचा किस्सा भारी आहे

ते आहेच फोटोजनीक बाळ
नव्या कपड्यांचा प्रसंग पण भारी
आता दिवाळी निमित्त।बायको ने मला डोक्याला आणि दाढीला मेंदी लावली
ती बघितल्यावर ओडीन भुंकायला लागला एकदम
मी म्हणलं अरे मीच आहे
आवाज ओळखीचा आल्यावर थांबला पण ती मेंदी धुवून येईपर्यंत अजिबात जवळ आला नाही
लांबूनच संशयाने बघत होता
काय गोंडस बाळ आहे ओडीन. ट्रीप
काय गोंडस बाळ आहे ओडीन. ट्रीप एंजॉय केली की मस्त.
तुम्ही आमच्यापर्यंत छान शब्दात पोचवता त्यामुळे तो अजूनच निरागस, गोंड्स वाटतो.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
सगळ्यांची बाळं एकदम क्युट
अनुश्री - तुमचं चिकू बाळ लैच गोंडस
लॅब्राडुडल आहे का?
मीरा यांच्या बिगल बाळाचा किस्सा तर लैच जबरा
कहर आहे हा रेनकोट घालून बसण्याचा प्रकार
लै हसलो ते वाचून
प्रकाश घाटपांडे - ही भटकी भुभु खरंच खूप मस्त असतात
आम्ही ट्रेक ला गेलो की हमखास एक ना एक भुभु भेटत आणि ते पूर्णवेळ साथ करतं
आम्हालाच असे नाही खूप ट्रेकर लोकांचे अनुभव आहेत
गावातली भुभु त्यांना पूर्णवेळ सोबत करतात
इतकं की त्यांना सोडून घरी येताना जीवावर येतं
पराग - खूप मस्त निर्णय
पराग - खूप मस्त निर्णय
काही प्रश्न पडले तर जरूर विचारा
अमा यांचा भुभु संगोपनाचा अनुभव दांडगा आहे
बाकीचे पण जमतील तसे संगतीलच
पहिल्यांदाच घेणार आहात तर शक्यतो फॅमिली डॉग घ्या
त्यांना जास्त ट्रेन करावं लागतं नाही
आणि लवकर घरात रुळतात
गोल्डन रित्रीव्हर, लाब्राडोर आणि जर्मन शेफर्ड
पण यांना मोठी जागा, रोजचे फिरायला आणि व्यायाम लागतो
बिगल पण छान आहे पण ते लै भुंकून घर डोक्यावर घेतात
अस वाचलेलं, प्रत्यक्ष अनुभव नाही
मैत्रेयी यांचा काय अनुभव आहे हे त्या सांगतील
परवा माझ्या भाच्याकडे
परवा माझ्या भाच्याकडे असलेल्या ऒलिव्ह नावाच्य बिगल भुभीला भेटलो होतो. मस्त खेळली. वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध असल्यासारखी.. भुभुलोकांची जे बाळभुभु असतात ना त्यांच्या डोळ्यात ते लहान असे पर्यंत एक तिरळेपणा असतो. तोच त्यांच्या निरागसतेचे प्रतिक असते.
1992 सालातील गोष्ट आहे.आम्ही
1992 सालातील गोष्ट आहे.आम्ही हनिमूनला जाताना बायकोच्या घरातील रोल कॅमेरा घेउन गेलो. त्यावेळी डिजिटल कॅमेरे नव्हते. कॅमेरावर ४ हा आकडा होता.म्हट्ल हरकत नाही. तीन फोटो वाया गेले असे समजू. तेवढ्यासाठी नवीन रोल कशाला घ्या. तिकडे अनेक फोटो काढले. तेथील एक भुभु आमच्या सोबत इमानदारीत रखवाली करत आला.पुढे पुढे असायचा. आम्ही जवळ आल्याची खात्री झाली की लगेच वाटाड्या म्हणून चालायला लागायचा. चक्क ऎस्कॊर्टिंग करत होता. त्याचा एक सुंदर फोटो काढला. पुण्यात आल्यावर कॅमेरा घेउन स्टुडिओत गेलो व फोटो डेवलपिंग ला टाकायचे आहेत असे सांगून त्याला कॅमेरा दिला. त्याने रोल काढण्यासाठी माझ्यासमोरच उघडला तर तो म्हट्ला आत रोलच नाही. मग त्याला म्हटले की मग फोटो काढल्यावर नंबर कसा पुढे पुढे सरकत होता.तो म्हटला त्याचा रोल असण्याशी संबंध नाही क्लिक केला कि एक नंबर पुढे सरकतो असे म्हणुन त्याने प्रात्यक्षिक दाखवले. भुभुचा फोटो आला नाही याचे फार वाईट वाटले.
आणि हनिमून चे फोटो?ते न
आणि हनिमून च्या फिरण्याचे, बागेतले, डोंगराकडे बोट दाखवून काहीतरी दाखवतानाचे फोटो?ते न आल्याबद्दल जन्मभर ऐकावे लागते.भुभू बिचारा समजून घेईल
अनु
अनु

प्रकाशना प्रकाशचित्रानेच दगा
प्रकाशना प्रकाशचित्रानेच दगा दिला
वाईट वाटले फोटो नाही आले त्याबद्दल.
कितीगोड किस्से आहेत सगळ्यांचे
कितीगोड किस्से आहेत सगळ्यांचे
@ आशुचँप - धमाल केलेली दिसतीये ओडीनने . तुम्ही घेऊन कसे गेलात त्याला. गाडीत शांत बसतो का ? आम्ही मागच्या वर्षी पुण्याहून लोणावळ्याला जाताना जीव काढला होता आमच्या एलोन ने
त्यामुळे त्याला समुद्रावर घेऊन जायचे स्वप्न कधी पुरे होणार देव जाणे
आज आमचे पिल्लू ३ वर्षाचे पुर्ण झाले
(No subject)
मी आयुष्यभर कुत्र्यांना भयंकर
मी आयुष्यभर कुत्र्यांना भयंकर घाबरून असलेली बाई होते. मुलांबरोबर आणि नवर्याबरोबर कित्येक वर्षे "नो डॉग इन माय हाउस " चा लढा दिला आणि एप्रिल मधे काय मनात आले आणि भुभू आणायला परवानगी दिली. झाले! माउई आल्यानंतर मला १८० अंश बदलायला ४ दिवस सुद्धा लागले नाहीत Happy आता मी त्याला अगदी ओवर द टॉप लाडोबा करून ठेवले आहे असे घरचे लोक तक्रार करत असतात. - मैत्रेयी ह्या प्रत्येक शब्दाला मम
Pages