खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा आता करून दाखवायचे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 October, 2020 - 05:05

दसर्‍याला नवीन घरातल्या नवीन देव्हार्‍यात नवीन देवांची स्थापना केली. गुरुजीही यंदा कोरोनामुळे नवीनच बोलावले. बायकापोरे नवीन कपडे घालून तयार होते. मी मात्र आजारी असल्याने जुनेच कपडे घातले होते.

गुरुजी आले. नमस्कार चमत्कार झाले. फारसे आदरातिथ्य करायची संधी न देता थेट कामाला लागले. ताट ताम्हाणात देव मांडले. आसन अंथरले. तीर्थ हळद कु़ंकू फुले सारे जागच्या जागी ठेऊन आम्हाला म्हटले चला या पूजा करून घेऊया. मला कल्पनाच नव्हती की असे पूजेलाही बसावे लागेल. अन्यथा आजारी असताना मी स्वत: न बसता आईवडिलांना बसवले असते. पण काही कळायच्या आधी पूजा सुरूही झाली होती.

मग प्रत्येक देवाचा अभिषेक, आधी पाण्याने, मग दूधाने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने, मग हारफुले हळदकुंकू, सोबत मंत्रपठण, ते आपणही त्या गुरुजींच्या मागोमाग उच्चारायचे. दमछाक सुरू झाली. थोड्या वेळाने घश्यातून आवाज फुटायचा बंद झाला, कसे बसे पुटपुटू लागलो, देवाचा अभिषेक करताना चमचा उचलणेही ईतके जड वाटू लागले की अर्धाच भरू लागलो. तो देखील देवापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा सांडू लागला. देवाचा दिवा विझू नये म्हणून फॅनचा स्पीड मंदावला असल्याने आधीच आजारी असलेल्या मला उष्माघाताचाही भारी त्रास होऊ लागला. अगरबत्तीचा धूरही नकोसा वाटू लागला. गुरुजी काय बोलत होते ते डोक्यात शिरायचे बंद झाले. मग काहीतरी भलतेच करायचो, मग पुन्हा चूक सुधारून बरोबर करायचे, रिवर्कही वाढू लागले, आणि या सर्वात माझी अर्धांगिनी, माझी धर्मपत्नी,, माझी सहचारीणी, माझी कायद्याने असलेली आयुष्याभराची जोडीदार माझी बायको मात्र नुसते माझ्या हाताला हात लाऊन मनातल्या मनात मम म्हणत होती आणि गाल्यातल्या गालात हसत होती.

अखेर हि शिक्षा एकदाची संपली. आणि फायनल आरती सुरू झाली. ताम्हाणात कापूर टाकून भटजींनी दिवा पेटवला पण तोपर्यंत माझा दिवा मात्र विझला होता. मोठ्या कष्टाने ते आरतीचे ताट उचलले. बायकोने पुन्हा नावापुरते माझ्या हाताला हात लावला. आणि आरती सुरू झाली. मी कसेबसे ताट फिरवू लागलो. जसजशी आरती पुढे सरकत होती तसे माझा हात छातीच्या पुढे जातच नव्हता. जणू मी स्वतःचीच आरती ओवाळतोय असे वाटत होते. ते बघून अखेरीस बायको चिडली. तसे मी सुद्धा ते आरतीचे हात सॉरी ताट तिच्या हातात ठेवले आणि म्हटले आता तूच फिरव, ममगिरी मी करतो. मग ती आरती करू लागली आणि मी दाखवण्यापुरते तिच्या हाताला हात लावला. एकवार गुरूजींकडे पाहिले त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तरीही एकदा विचारून कन्फर्म केले. तसे ते म्हणाले,
बंधू, देवाला सगळे समान !

बस्स त्याच क्षणाला ठरवले आता यापुढे घरातील सर्व पूजा अर्चा जिथे उगाच पुरुषाला पुढे ढकलले जाते तिथे बायकोला पुढे करायचे आणि आपण फक्त मम म्हणायचे. खूप झाल्या स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा
आता करून दाखवायचे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< काही व्यवसाय "पिंक कॉलर" म्हणवले जातात उदा: नर्सिंग. तिथे पुरूष यायला हवे. नाहीतर "पिंक कॉलर" व्यवसाय अल्प उत्पन्न रहातात. >>

Milton Friedman - Case against Equal Pay for Equal Work

Professor Friedman explains how support for "equal pay for equal work" helps promote sexism.

मुर्खांची लक्षणे

https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0...

श्रीराम ॥
ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥
तुज नमूं वेदमाते । । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २॥
वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३॥
येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४॥
पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
साअवध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५॥
आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परि कांहीं येक तत्पर । होऊन ऐका ॥ ६॥
जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७॥
जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी ।
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८॥
सांडून सर्वही गोत । स्त्रीआधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९॥
परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १०॥
समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११॥
आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२॥
अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३॥
आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४॥
बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन| करी, तो येक मूर्ख ॥ १५॥
मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न ।
सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६॥
धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष मानी, तो येक मूर्ख ॥ १७॥
घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे ।
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८॥
आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९॥
नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २०॥
येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१॥
औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ।
संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३॥
आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४॥
सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५॥
विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६॥
देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ॥ २७॥
घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८॥
नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९॥
स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३०॥
तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१॥
विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२॥
लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३॥
उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४॥
दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५॥
वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६॥
क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७॥
जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८॥
आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९॥
पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा ।
विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४०॥
जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१॥
पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२॥
दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३॥
देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४॥
परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख ।
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५॥
आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६॥
तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७॥
पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८॥
होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड ।
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९॥
वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५०॥
तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे ।
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१॥
हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२॥
समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३॥
सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४॥
संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५॥
अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६॥
समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७॥
बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८॥
अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९॥
घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६०॥
आपुलें अर्थ दुसर्यापासीं । आणी दुसर्याचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१॥
अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥
दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३॥
उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४॥
स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५॥
परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६॥
कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७॥
लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी ।
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८॥
आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९॥
अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥
आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१॥
ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चीत्त देउनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२॥
लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती ।
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्षमा केलें पाहिजे ॥ ७३॥
उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १॥

जय जय रघुविर समर्थ|

<< काही व्यवसाय "पिंक कॉलर" म्हणवले जातात उदा: नर्सिंग. तिथे पुरूष यायला हवे. नाहीतर "पिंक कॉलर" व्यवसाय अल्प उत्पन्न रहातात. >>
नर्सिंग्मधे देखील पुरुषांना स्त्रीयांपेक्षा जास्त पगार मिळतो ना?

मला पिंक कॉलर जॉब्ज मधे पुरुषांचे प्रमाण वाढावे असे वाटते त्याचे कारण पैशाशी निगडीत नाही. तर ते जो वेगळेपणा आणतील त्याचा सर्वांनाच फायदा होईल. वेगळ्या पद्धतीने केलेला विचार/अनुभव विश्व, समजून घेण्याची वेगळी पद्धत/ विविध भावना हाताळणे यातून सगळ्यांचेच आयुष्य समृद्ध करणारे काहीतरी मिळेल.

बुद्धिबळ या खेळात स्त्री आणि पुरुष खेळाडूंची क्षमता वेगवेगळी आहे याला सर्वमान्यता आहे. फिडे चे स्त्री / पुरुषांसाठी ची titles देखील वेगळी आहेत. एकदम टॉप च्या खेळाडूंमध्ये देखील एक - दोन सन्माननीय अपवाद वगळता सर्व पुरुष च आहेत. हा खेळ फिजिकली strenuous नाही. यात जायला काही विशेष काही अडथळे नाहीत, तरी असं का असावं बरं ?

स्वाती२, ते संधीच्या अनुषंगाने लिहीले आहे. सुटे वाचाल तर संगती लागणार नाही. पुरूषांना नर्सिंग सारख्या पिंक कॉलर व्यवसायात येण्यास एक प्रमुख अडचण ब्लू कॉलर जॉब्सच्या तुलनेत तिथे मिळणारे अल्प उत्पन्न आहे. (इतरही अडचणी आहेत, पण इथे एक मांडली आहे). पुरूष व्यवसायात हवे असतील तर "पिंक कॉलर" सेवेचा दर वाढवणे गरजेचे आहे. पुरूष पिंक कॉलर व्यवसायात हवी असण्याची डिव्हर्सिटीशी निगडीत तुम्ही मांडलेली कारणे बरोबर आहेत. पण परत मूळात डिव्हर्सिटी/इक्वल ऑपॉर्च्युनिटी का हवी तर त्याने एकूणच व्यवसायाची भरभराट होते.

समजले सीमंतीनी.
मी एक बघितले आहे बरेच पुरुष (मुलगे) इएमटी म्हणून काम करायला उत्सुक असतात, पण नर्सिंग सुचवले की चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह येतं. याला कारण सोशल कंडीशनिंग असावे का? म्हणजे पोलीस, फायरफाईटर आणि इएमटी असे एका ग्रूप मधे धरत असल्याने ?

वरच्या लिंक वाचल्यात तर त्याच्या कारणांचा थोडा फार उहापोह आहे. तसंच ओपन बरोबर वेगळी स्पर्धा का याची ही कारणे दिली आहेत.

>>जी कामाची वाटणी झालीय त्यात आपण स्वयंपाकाचे काम जे वर्षानुवर्षे आपल्या समाजात बायकांचे समजले जातेय ते पुन्हा आपल्या बायकोवरच टाकतोय हा विचार मनात शिवलाही नाही पाहिजे. ते तुमच्या डोक्यातही नाही पाहिजे. की आपण स्त्री पुरुष समानता राखायला काही करत आहोत.
घर दोघांचे आहे, जबाबदारी दोघांची आहे, जमेल तशी वाटून घेतली, ईतकेच डोक्यात हवे.>>
यातला जमेल तशी हा शब्द अगदीच विस्कळीत आहे.
स्वयंपाकाचे काम पुन्हा बायकोवरच टाकतोय हा विचार मनात येत नसेल तर मी त्याला असंवेदनशील म्हणेन. हा विचार घरात स्त्री-पुरुष समानता राखायला म्हणून नाही तर वेळेप्रसंगी आपल्या जोडीदारचा आधार होण्यासाठी आपण कमी पडू का या दृष्टीने यायला हवा. रोजच्या कामाची वाटणी काटेकोर नाही होवू शकत पण वेळ पडली तर तू माझ्यावर या कामासाठी निर्धास्त विसंबू शकतेस्/शकतोस हे चित्र फार आधार देणारे असते. घरातून मिळणारे आधाराचे जाळे जितके बळकट तेवढे स्त्रीचे समानतेसाठी बाहेर लढणे सुकर होते. मग ती स्त्री तुमची आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल किंवा लेक असेल.

दिवसाची २-३ मिल्स असे वर्षभर, त्यात पथ्यपाणी ते सणावाराचे जेवण अशी मोठी रेंज येते आणि काही झाले तरी भुकेच्या वेळेला जेवण तयार असावे ही अपेक्षा असते. ही घरच्या स्वयंपाकाची जबाबदारी असलेल्या स्त्रीच्या बाबतीत आज मिटिंग उशीरापर्यंत चालेल/ सकाळी खूप लवकर आहे पासून दोन दिवस अंगात कणकण आहे पर्यंत काहीही उद्भवू शकते. अशावेळी स्वयंपाकाची जबाबदारी सहजतेने घरातील दुसर्‍या व्यक्तीने उचलून/विभागून घेवून आश्वस्त करणे महत्वाचे. ही दुसरी व्यक्ती पुन्हा सासू/आई/मुलगी अशी स्त्रीवर्गातीलच असेल आणि घरातील पुरुष मंडळी मला जमत नाही म्हणून हात झटकणार असतील तर मग समानतेच्या नुसत्याच गप्पा.

२-३ दिवस कॉन्फर्न्सला बाहेरगावी जायचे तर या काळात घरच्यांच्या जेवणाची काय सोय म्हणून स्त्रीला काळजी करावी लागणार असेल, योग्य ती तरतूद करावी लागणार असेल आणि बरोबरीचा पुरुष सहकार्‍याला कसलाच विचार करायची गरज पडत नसेल तर ते चित्र काय सांगते?
लॉकडाउनच्या काळात स्वयंपाक्/पोळ्या करणार्‍या मावशी येणार नाहीत म्हणून एकहाती स्वयंपाक करुन वर घरुन ऑफिसचे काम अशी कसरत बर्‍याच स्त्रीयांना करावी लागली. ही कसरत करायची वेळ आली हे चित्रच पुरेसे बोलके आहे.

हा एक संदर्भ लगेच सापडला - https://en.chessbase.com/post/explaining-male-predominance-in-chess
हे याचे conclusion:
"Males on average may have some innate advantages in developing chess skill due to previous differing evolutionary pressures on the sexes. Females may have greater talent on average in other domains, however. If the male predominance in chess was due just to social factors it should have greatly lessened or disappeared by now. Indeed, some researchers now recognize that many psychological sex differences are due to complex interactions between nature and nurture.

This conclusion is unpalatable to many but it is best to acknowledge how the world actually is."

चिन्मय_१, इन्टरेस्टिंग पोस्ट.
उबो - मिल्टन फ्रीडमन ची क्लिपही इण्टरेस्टिंग आहे. Unintended effect चे उदाहरण दिसते. काही वर्षांपूर्वी असे होत असावे. पण आता फेडरल कायदे आहेत. किमान ते जेथे एन्फोर्स होतात तेथेतरी हा प्रॉब्लेम नसावा.

स्वाती२ व साधारण त्यांच्यासारखीच मते असलेले अनेक आयडी चांगले लिहीत आहेत. पण ही सगळी टेप दोनच आठवड्यांपूर्वी "बाईचे घर" का अशाच नावाच्या त्या बाफवर वाजवून झाली तरी विरोधात तेच मुद्दे परत आले आहेत इथे. त्यामुळे चिन्मय_१ यांनी दिलेली लिन्क पटली/न पटली तरी किमान वेगळा प्रश्न विचारते.

चिन्मय - साधारण सारखे उदाहरण म्हणून अमेरिकेतील स्पेलिंग बी चे घेउ. गेली अनेक वर्षे भारतीय लोक त्यात चमकत आहेत. इन फॅक्ट मागच्या वर्षी ८ पैकी ७ विजेते भारतीय वंशाचे होते. यातून भारतीयांना फेवरेबल व यात फारसे न दिसणार्‍या वांशिक गटांना अनफेवरेबल निष्कर्ष थेट काढता येइल का? त्याबाबत याच वरच्या लिन्क मधली कॉमेन्ट मला चपखल वाटते:

"... and no, they are not born great. They are made great through a culture that instills a drive for achievement and mastery of the English language"

त्याचप्रमाणे - बेस्ट शेफ च्या स्पर्धांमधे जर सलग रीतीने पुरूष शेफ जिंकत गेले, तर "स्वयंपाक हे बायकांचे काम आहे" हा इतकी वर्षे असलेला समज चुकीचा होईल का? - तो समज चुकीचा आहे हे मी समजतो पण ते या वरच्यामुळे नाही. वन डे क्रिकेट मधे सचिनच्याही आधी महिला क्रिकेटर ने द्विशतक मारले होते. मग इतकी वर्षे आपण चुकीच्या जेंडरच्या गेम्स बघत बसलो का? Happy टेनिस मधे टॉप लेव्हलला आफ्रिकन वंशाचे लोक कमी संख्येने आहेत (स्टॅटिस्टिकली कमी. सेरेना/व्हीनस आहेत हे माहीत आहे) , बास्केटबॉल मधे जास्त आहेत. मला कल्पना आहे की मी जरा ताणत आहे Happy पण माझा मुद्दा हा आहे की एखाद्या स्पेशलाइज्ड स्पर्धेतील यश "स्त्री व पुरूषांना समान संधी व हक्क असावेत" याबद्दल फारसे काही सांगू शकणार नाही. त्याची कारणे हा समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे, वरच्या इतर उदाहरणांप्रमाणेच. मला स्वतःला वाटते की त्याचे कारण संधी, नर्चर व आवड याचे मिश्रण आहे, पण हा एक केवळ अंदाज.

अजून एक काउन्टरपॉइण्ट म्हणजे केवळ एकदम टॉपला किती आहेत हा सॅम्पल साइज बघण्याऐवजी सर्वसाधारणपणे "चांगले" खेळाडू जे आहेत त्यात किती टक्के आहेत असा सॅम्पल साइज घेउन बघितले तर कदाचित फार फरक दिसणार नाही. पण त्यातही वरचे नर्चर लॉजिक आहेच.

नैसर्गिकरीत्या महिला व पुरूष यात मूळ जीवशास्त्रीय फरक सोडला तर इतर काही फरक आहे की नाही हे सिद्ध करणे फार अवघड आहे - विशेषतः क्षमतेमधे/कौशल्यामधे. त्या केस मधे तो आहेच हे रेटत राहण्यापेक्षा अनेक क्षेत्रात सहज दिसणार्‍या डेटावरून तो नाही हे गृहीत धरून दोघांनाही समान संधी व हक्क असणे हेच बरोबर नाही का?

मिल्टन फ्रीडमन ची क्लिपही इण्टरेस्टिंग आहे. आता पुरूषी म्हणवल्या जाणार्‍या अनेक नोकर्‍यात यांत्रिकीकरणामुळे नोकर कपात होत आहे तसेच स्त्रिया शिरकाव करत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. तेव्हा आता पुरूषांनी "आम्हाला कमी पगारात नोकरी करू द्यावी" म्हणून सरकार दरबारी द्यायचा असेल तर लढा द्यावा (आग्रह नाही, फक्त शक्यता लिहीत आहे).

बहुतेक स्त्रियांना नोकरी करताना पाळणाघर, सुरक्षित वाहने, घरकामास मदतनीस इ ओव्हरहेड्स सांभाळावे लागतात. तेव्हा कमी पगारात नोकरी करतो म्हणणे हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने अचूक असले तरी व्यावहारिक दृष्ट्या न जमणारे आहे.

वन डे क्रिकेट मधे सचिनच्याही आधी महिला क्रिकेटर ने द्विशतक मारले होते. मग इतकी वर्षे आपण चुकीच्या जेंडरच्या गेम्स बघत बसलो का? Happy
>>>>>>
याचे उत्तर सोपे आहे आणि ते तुलाही माहीत आहे फा.. नक्कीच नाही. कारण बेलिंडाने ते द्विशतक महिलांविरुद्धच मारलेले. एकत्र खेळलेल्या सामन्यात ते आले नसते.

माझ्यामते स्त्री पुरुष यांच्या शारीरीक क्षमतेतील फरक आणि स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून संपुर्ण हक्क मिळणे या दोन्ही संपुर्णतः भिन्न गोष्टी आहेत.
यांची ईथे सरमिसळ होतेय.
बहुधा तो फरक मान्य केला तर स्त्रियांना समान वागणूक मिळायला अडचण येईल. ते कारण पुढे करून ती नाकारली जाईल हि भिती यामागे असावी.

फारएन्ड, बुध्दीबळा च्या केस मध्ये दोन फरक आहेत.
१. चेस रेटिंग: हे खेळाडू ची playing strength दर्शवते. In absolute terms. So, regardless of opposition, performance level can be assessed objectively.
२. हे रेटिंग पूर्ण career मधल्या परफॉर्मन्स वर अवलंबून आहे. सो, यात आणि एक मॅच मधले द्विशतक किंवा एक स्पर्धेतली चांगली कामगिरी (स्पेलिंग बी) यामध्ये खूप फरक आहे.
तळटीप: इतर अनेक क्षेत्रांमध्ये असमानता आहे व ती गेली पाहिजे याला सहमत.

चिन्मय रेटिंग बरोबर असले तरी वुमन ग्रँडमास्टर ही पुरुष ग्रँडमास्टर किंवा ओपन ग्रँडमास्टर च्या दोन स्टेज अलीकडे आहे
वुमन ग्रँड मास्टर ला आधी ओपन/मेन इंटरनॅशनल मास्टर व्हावे लागते आणि मग मेन ग्रँडमास्टर
अर्थात त्या साठी त्यांना जास्तीचा प्रवास नसतो
वुमन फिडे मास्टर,मग वुमन इंटरनॅशनल मग वुमन ग्रँड मग ओपन इंटरनॅशनल आणि मग ओपन ग्रँडमास्टर
त्या साठी कसलीही अट किंवा नियम नाहीत
रेटिंग वाढवा आणि टायटल मिळवा
मग स्त्री पुरुष कोणीही असा
त्यांनतर मग सुपर ग्रँडमास्टर

I think it is just a matter of time and exposure for both chess and cricket. Rather most sports. There are no inherent barriers. It's just the probability that increases with increasing number of players over the years. Queen of Katwe was a chance discovery! God knows if our queen of Katwe is probably roaming the lanes of Dharavi at this moment!

I think it is just a matter of time and exposure for both chess and cricket. >> अनुमोदन.
असे एकच स्पोर्ट्स्/फील्ड घेऊन पॉईंट आऊट करायचे 'बघा ईथे स्त्रिया पुरुषांच्या किती मागे आहेत' त्यातून फारसे काहीच प्रुव होत नाही.
प्रश्न स्त्रिया पुरूषांची काँपिटिशन लाऊन कोण जिंकते ते बघणे नसून... जे काम पुरूष करू शकतात ते स्त्रियाही तितक्याच सफाईने आणि ईफेक्टिवली करू शकतात की नाही हा आहे...हायेस्ट कंपिटिटि लेवल वर ऊन्नीस बीस फरकाने बहुतांश ठिकाणी पुरूष जिंकणार काही ठिकाणी अपवादाने स्त्रिया.
शारिर्रिक क्षमतेचा कस लागणार्‍या मॅराथॉनचेच ऊदाहरण देतो.
पूर्वी म्हण्जे १९८४ पर्यंत ऑलिंपिक मध्ये स्त्रियांना मॅरॉथॉन पळू दिली जात नसे, त्यांच्यासाठी सर्वात लांब पल्ल्याची रेस १५०० मीटर्सची होती. स्त्रियांची ह्यापेक्षा जास्त अंतर धावण्याची शारिरिक क्षमता नाही असे कारण पुढे करण्यात आले. मोठ्या रेसेस मध्ये स्त्रिया अतिश्रमाने बेशुद्ध पडत हे दाखवण्यात आले. (स्त्रिया बेशुद्ध पडत हे खरे होते पण त्यामागचे कारण होते स्त्रियांना सरावासाठी ट्रॅक आणि साधनांच्या ऊपल्ब्धतेपासून पासून ड्रेसकोड पर्यंत अनेक बंधने होती).
आज स्त्रिया आणि पुरूषांच्या वर्ल्ड रेकॉर्ड मॅराथॉन टायमिंग मध्ये फक्त १३ मिनिटांचा फरक आहे.

स्त्रियांना पुरूषांबरोबर कंपीट करायला आणि त्यांना हरवायला कदाचित अजून ४ शतके लागतीलही मुद्दा स्त्री आणि पुरूषांना समान फॅसिलिटी समान संधी ऊपलब्ध असण्याबद्दलचा आहे.. त्या असल्यास स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने जबाबदारी नक्कीच पार पाडू शकतील.
स्त्रिया ईराक अफगाणच्या फ्रंट्लाईनवर लढत आहेत...स्पेस मिशनवर जात आहेत.. ऑईल रिफायनरीसरख्या शारिरिक क्षमतेचा कस लागणार्‍या क्षेत्रात, ऊत्तर ध्रुवावरच्या एक्स्पिडिशनमध्ये, कित्येक देशांच्या आणि युएन, आयएमएफ, फेडर्ल रिझर्व अशा संस्थांच्या सर्वोच्य स्थानांवर विराजमान आहेत मान आहेत आणि मायबोलीचे सो-कॉल्ड नरपुंगव आरतीच्या ताटावरून स्त्रियांची क्षमता जोखत आहेत. Lol

अमेरीकेतही मुलींना आणि स्त्रीयांना खेळासाठी सुविधा आणि संधी यांची वानवाच होती. Title IX आल्यानंतर परीस्थिती हळूहळू बदलत गेली.

वरती धावण्याचे उदाहरण आले आहे त्यासंदर्भातः
बॉर्न टू रन या ख्रिस मॅकडूगलच्या पुस्तकातील माहितीनुसार हा फरक फिजिओलॉजिकल आहे. १००मीटरच्या पुरुष स्त्री विक्रमातील टक्केवारी तफावत, मॅराथॉन अंतराच्या विक्रमातील तफावत व अल्ट्रामॅराथॉन अंतराच्या विक्रमातील तफावर पाहता अंतर वाढत जाते तसे स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने येऊ लागतात व सुपर अल्ट्रामध्ये पुढे जातात.
याचे कारण सामाजिक उत्क्रांतीमध्ये दडले आहे असे मॅकडुगलचे म्हणणे आहे. पुरुष शिकारीला बाहेर पडत ज्यात ते कमी अंतर अधिक वेगाने धावत (असे अनेक टप्प्यात). बायका त्यांच्या मुलांना/अर्भकांना घेऊन अधिक अंतर धीम्या वेगाने पण सातत्य राखत शिकार झाली आहे तेथे पोहोचत अशी त्याची थेअरी आहे.
ती चूक का बरोबर याबाबत मला अधिक माहिती नाही.

पण या धाग्यावर जिथे नजीकच्या काळातील सामाजिक असमतोलासंदर्भात व त्यामुळे होणार्‍या कामाच्या विभाजणीबद्दल चर्चा चालू आहे तिथे या उदहरणाने ती डिरेल होईल असे मला वाटते.

सर्व च प्राण्या मध्ये नर आणि मादी ह्यांच्या शारीरिक क्षमतेत फरक आहे.
माणूस पण एक प्राणी च आहे तो काही वेगळा नाही.
काही प्राण्यांची उदाहरणे.
गाय आणि बैल
सिंह आणि सिंहीण.
मोर आणि लांडोर.
म्हैस आणि रेडा.
कोंबडा आणि कोंबडी
शेळी आणि बोकड
मांजर आणि बोका.
अशा बऱ्याच प्राण्यात नर हा शारीरिक takati मध्ये मादी पेक्षा वरचड असतो.
दिसण्यात नर हा रुबाबदार असतो मादी पेक्षा .
मोर आणि लांडोर चे रुप बघा.
सिंह आणि सिंहीण चे रुप बघा.
ही काहीच उदाहरणे दिली आहेत.

>> ती डिरेल होईल असे मला वाटते.>> नाही डिरेल होणार.
मानवी देह हे अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे. इतक्या मोठ्या कालखंडात नेचर आणि नर्चर यातून जे काही घडले आणि आताही घडत आहे ते सर्वच उमगणे कठीण. स्त्री असो किंवा पुरुष शक्य तितके नर्चर करणे आपल्या हातात आहे.

Hemant just to set the fact right. Every species male has a special plumage or some showy body part because he has to win the competition for mating. there are very few matable ladies in heat at any given time. So he needs to do that special dance to win her attention. And access to mate her. Birds also collect
Decorative stones make pretty nests dance etc to get this special right. Males also do equal amount of egg care and feeding young chicks. Rape culture is not there. In humans also tall well dressed and groomed man with expensive clothes and accessories wins more girlfriends even though he may be a nightmare as a partner. Males need that extra power to keep other males at bay. And impregnate the available females. Study the violent behaviour of sea lions.

नवीन Submitted by Hemant 33 on 6 November, 2020 - 10:06 >> अहो तुमच्या पौरुषत्वाला ज्या सिंहाची ऊपमा दिली जाते ते नुसते बसून खातात. Lol सिंहिणी शिकारी पासून मुले वाढवण्यापर्यंत त्यांना शिकार शिकवण्यापर्यंत सगळी कामे करतात. स्वार्थी सिंह जेव्हा आपल्याच मुलांच्या जीवावर ऊठतो तेव्हा त्याला मारून टाकायलाही सिंहीणी मागे पुढे पहात नाहीत. वाघीणीही आपला वंश टिकवण्यासाठी एकट्याने मेहनत घेतात. हत्तींमध्येही मॅट्रिआर्ची असते.

बाकी बोक्याची ऊपमा शोभते पुरुषांना. Lol

चिन्मय - चेस रेटिंग चा पॉइण्ट - नोटेड.

एकाच स्पर्धेतील कामगिरीबद्दल - स्पेलिंग बी चे उदाहरण समांतर आहे असे अजूनही मला वाटते. कारण ते उदाहरण जरी एकाच स्पर्धेचे असले तरी गेल्या १०-१२ वर्षांत सातत्याने भारतीय वंशाची मुले टॉप वर आहेत त्यात. त्यामानाने इंग्लिश ओरिजिनची मुले मागे आहेत.

अशा बऱ्याच प्राण्यात नर हा शारीरिक takati मध्ये मादी पेक्षा वरचड असतो. >>> आणि इतर अनेक अशा प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्यात मादी ही नरापेक्षा मोठी व ताकदवान असते. त्यामुळे अशा अ‍ॅनेक्डोटल संदर्भाने काहीच सिद्ध होत नाही.

मी लहानपणी जेथे वाढलो त्याभागात एका स्पेसिफिक जमातीच्या बायका दगड फोडताना, घमेलेभर चांगले जड दगड डोक्यावरून लांब लांब अंतरे वाहून नेताना पाहिल्या आहेत. इतर काही अगदी "आजी" टाइप स्त्रिया डोंगरावर चढून लाकुडफाटा गोळा करून तो डोक्यावरून घरी घेउन येताना पाहिल्या आहेत. अनेक ठिकाणी पाच पाच किमी चालत जाउन पाणी घेउन येतात. घराला ज्याची गरज आहे अशी वाट्टेल ती अंगमेहनत स्त्रिया करतात.

१००% ताकद व कौशल्ये समान असण्याची मुळातच गरज नाही. तशी ती गोर्‍या, काळ्या व भारतीय वंशाच्या व्यक्तींमधे सुद्धा समान असण्याची गरज नाही. सध्याच्या काळातील बहुतांश कामे करू शकतील अशी क्षमता समान आहे इतके पुरेसे आहे, समान हक्क व संधी करता. बाकी सगळे अ‍ॅकेडेमिक.

सध्याच्या काळातील बहुतांश कामे करू शकतील अशी क्षमता समान आहे इतके पुरेसे आहे, समान हक्क व संधी करता.
>>>>>

मुळात समान हक्क आणि संधी देण्यासाठी दोन व्यक्तींमधील क्षमता समान असण्याची काही एक गरज नाही.

आपण तीच तर चर्चा करतोय.
अशी कोणती क्षेत्र आहेत तिथे फक्त पुरुषांना प्रवेश आहे स्त्री ला नाही.
अशी कोणती सेवा क्षेत्र आहेत ती फक्त पुरुषानं सेवा देतात स्त्री ला देत नाहीत(गरजेच्या सेवा मेडिकल,सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स,Etc)
असे कोणते कोर्स आहेत ते फक्त पुरुष साठी आहेत स्त्री साठी नाहीत.
कुठे स्त्री ला सामान संधी नाही हे तरी सांगा.
फक्त स्त्री ल समान संधी नाही एवढे एक वाक्य बोलले नी झाले.
उदाहरण तरी ध्या.

Pages