दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिलानी अपार्टमेंट, भिवंडी तसेच त्याआधीच्या सर्वांसाठीच फार वाईट वाटतं Sad , श्रद्धांजली.

आशालता वाबगावकर अगदी परिचयाचा चेहेरा, सतत लहानपणापासून tv वर वगैरे पण बघितलेला, घरातल्याच एक वाटायच्या, अतिशय हसतमुख व्यक्तीमत्व. मलाही त्यांचं गर्द सभोवती रानसाजणी, तू तर चाफेकळी प्रचंड आवडायचं, तेच आठवलं पहिलं . फार वाईट बातमी Sad श्रद्धांजली.

>> अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा...
>> Submitted by राज on 22 September, 2020 - 22:20

हे त्यांचं गाणं माहित नव्हतं. मला वाटले "पराधीन आहे जगती" मधल्या या ओळी आहेत कि काय.
पण नाही. आत्ता ऐकले. खूप खोल अर्थ आहे...
https://www.youtube.com/watch?v=55j5ekkg0xY

आशालताजी वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली... _/\_

डीन जोन्स! Sad
ऑसी माजी क्रिकेटर आयपीएल समलोचक! हृदय विकाराने मुंबईत निधन!!

अर्र,
एसपी बालासुब्रमण्यं गेले.
Sad

Oh sp Sad

ओह Sad
लाइफ सपोर्ट वर आहेत सकाळीच वाचलं होतं.

आशालताताई, डिन जोन्स व एस पी यांना श्रद्धांजली. काय लिहावे तेच कळत नाही एका मागोमाग एक हिरे हरपतायत. Sad

डिन् जोन्स ,एसपी बालसुब्रमन्यम ,आशालता वाबगावकर यांना श्रद्धांजली.

हाथरस घटना... नीचपणा अमर्याद आहे काही माणसांत Sad

न्याय व्यवस्था बदलण्याची गरज, कायदे कठोरपणे राबवण्याची गरज वगैरे वगैरे सगळे अनंत वेळा चावून झाले आहे आजवर.

मागच्या वर्षी हैदराबादच्या प्रकरणात पोलिसांनी जसा न्याय केला तो यांच्या बाबतीतसुद्धा करायची मागणी झाली तर नवल वाटू नये.

पोलिसांनी त्या मुलीच्या कुटुंबाला कोंडून ठेवून भर रात्री तिचे प्रेत जाळले. चांगला न्याय चाललाय.
उत्तर प्रदेश मध्ये आरोपींना नेणार्‍या पोलिसी गाड्या उलटून त्यातला आरोपी तेवढा मरणे हा पॅटर्न होऊ घातलाय. अशी आणखी एक घटना या आठवड्यात झाली.

उत्तरप्रदेशमधील घटना वाचली.जीव हळहळला त्या मुलीसाठी. आधीच त्या नीच कृत्याचा ट्रामा , नंतर मेल्यावरही शरीराचे धिंडवडे. Sad

तिच्या आत्म्याला शांती लाभो

भीतीदायक आहे सर्व.स्त्री देहाला खेळणं किंवा सुडाचं हत्यार म्हणून वापरण्याचा हा अमानुष ट्रेंड कधीतरी बंद व्हावा.
कन्फर्म खऱ्या आरोपींचा तुरुंगात मारामारीत जीव जावा.त्यांना न्याय मिळण्यासाठी थांबण्याचा हक्क आणि लक्झरी मिळू नये.

कन्फर्म खऱ्या आरोपींचा तुरुंगात मारामारीत जीव जावा.त्यांना न्याय मिळण्यासाठी थांबण्याचा हक्क आणि लक्झरी मिळू नये.>>>
१००० वेळा सहमत

कन्फर्म खऱ्या आरोपींचा तुरुंगात मारामारीत जीव जावा.त्यांना न्याय मिळण्यासाठी थांबण्याचा हक्क आणि लक्झरी मिळू नये.>>>
१००० वेळा सहमत

अंगार दाटला डोळ्यात अगदी
समजत नाहीये काय करू

Pages