दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजली
ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तीमत्व

TV9 चे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं अवघ्या 42 व्या वर्षी करोनामुळे निधन. दुःख, संताप, हतबलता.

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते प्रा. गोविंद स्वरूप यांचं आज निधन झालं. नुकतीच त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते NCRA (राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र) मध्ये नियमितपणे येत होते.
भारतातल्या विज्ञान विश्वात एक नवीन युग सुरू करणाऱ्या या शास्त्रज्ञाला विनम्र श्रध्दांजली _/\_

जय प्रकाश रेड्डी

IMG_20200908_111634_0.jpg

आदित्य पौडवालचे वाचून खूप वाईट वाटले. शंकर महादेवनच्या ट्विटनुसार गेली काही वर्षे तो कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रासलेला होता. पण तरीही असा अपमृत्यु चटका लावून जातो. अनुराधा पौडवालवर आकाशच कोसळल्यासारखे झाले. देव हा आघात सोसायचे बळ देवो तिला व तिच्या मुलीला.

आशू

यूएस सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीश रूथ गिन्सबर्ग यांचे 87व्या वर्षी निधन. ट्रम्प यांच्या प्रेसिडेन्सीचे 45 दिवस राहिले असताना आणि सिनेट पण रिपब्लिकनाच्या हाती असताना नवीन न्यायाधीश प्रस्थपित करण्याच्या हालचालींना वेग येणार. जर नवीन न्यायाधीश कंझर्वेटीव आला तर सुप्रीम कोर्टात पुढील काही दशके 6-3 किंवा किमान 5-4 बहुमताने कंझर्वेतीव अजेंडा राबवला जाईल.
निधन व सुप्रीम कोर्टाचे हे कंझर्वेतीव पारडे जड होणे या दोन्ही दुर्दैवी व दुःखद घटना आहेत.

आशालता वाबगावकर... खूपच धक्कादायक
कोरोना ची लागण झाल्या मुळे ( माझी आई काळूबाई च्या सेट वर लागण)

अरे बापरे गेल्या Sad

काल अ‍ॅडमिट असल्याचे वाचले होते. श्रध्दांजली __/\__

आशालता वाबगावकर यांना श्रद्धांजली.
त्यांचे पुढील गाणे खरच अजरामरच -

गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी
ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर
रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला
तू वनराणी दिसे भुवनी या तुझिया रूपा तुला
अर्धस्मित तव मंद मोहनी पसरे गालावरी
भुलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी

ओह
भिवंडी दुर्घटनेत गेलेलयाना श्रद्धांजली
आशालता करोना मुळे ऍडमिट असे वाचले होत्या.गेल्या का? Sad
लहानपणी देखणी बायको दुसऱ्याची नाटकात प्रत्यक्ष पाहिले होते.

आशालता बावगावकर ह्या वयातही फार सुंदर गायच्या.
आवाज अगदी खणखणीत..
कुठल्यातरी रिऍलिटी शो मध्ये गेस्ट जज म्हणून आल्या होत्या तेव्हा त्यांच गाणं ऐकतच रहावस वाटाल होतं.
गर्द सभोती हे त्यांचं खासच..
मुळात त्या इतक्या तडकाफडकी गेल्या हे स्वीकारायला फार जड जातंय..

Pages