दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरभंगा मधली ती मुलगी आठवतेय का? जी वडीलांना सायकलवर गावाला परत घेवून गेली.
तिचा रेप होऊन खून झाला मागच्या महिन्यात Sad
जीव तुटतो अशा वेळी, पण काय करणार!

कन्फर्म खऱ्या आरोपींचा तुरुंगात मारामारीत जीव जावा.त्यांना न्याय मिळण्यासाठी थांबण्याचा हक्क आणि लक्झरी मिळू नये.>>>
१००० वेळा सहमत . संताप, अगतिकता सगळं दाटून येतं वाचलं की.
विनिता , दरभंगा मधली मुलगी ज्योती पासवान ना. मला वाचल्यासारखं वाटतय की ती सुरक्षित आहे. पीडित मुलगी ज्योती कुमारी आहे. जे झालय ते वाईटच आहे.

ही घटना जेवढी चीड आणणारी आहे त्यापेक्षा गेली दोन आठवडे बहुतेक माध्यमांची शांतता, सरकार-प्रशासनाचा डिनायल मोड, महिला आयोग - दलित नेत्यांची अळीमिळी गुपचिळी जास्त चीड आणणारी आहे.
काल ती गेल्यावर मात्र या सर्वांना हळुहळू कंठ फुटला. आठवलेदिक मंडळीतर दलित चळवळीला लागलेले कलंक आहेत. दलित तरुण कोणत्या कारणाने असल्या लोकांच्या मागे उभा राहतो हे आजपर्यंत न उमगलेले कोडे आहे. यांनी दलित समाजासाठी एक काही चांगलं काम केलेलं माझ्या माहितीत नाही. काय ते दलित पँथरचे दिवस आणि काय आजची अवस्था ?
बाकी चिन्मयानन्द तर धडधडीत पुरावे असून बाहेर फिरतोय, कुलदीप सेंगरतर त्या पीडित कुटुंबाची वासलात लावूनच आत गेला. नीलगाय धडकून, गाडी पालटून गुन्हेगार मारायची हौसच आहे तर निदान या प्रकरणात तरी ती पद्धत वापरावी. पण तसे काही होणार नाही कारण यांच्यात तिथल्या तथाकथित सवर्णांच्या मतपेटीला हात लावायची हिम्मत नाही. तिथले राज्यपाल देतील का वेळ या पोरीच्या घरच्यांना ?

हैदराबाद एन्काऊंटर मुळे जरब बसलेली दिसत नाही तरी हाथरासा केस मधील आरोपींचा पण एन्काऊंटर केला जावा अशी.मनोमन इच्छा आहे .

एन्काऊंटर नाही, त्यांचे .... कापुन ईलाज न करता ऊपाशी सडायला लावायला हवे. त्या मुलीला किती यातना झाल्या असतील विचार करणे पण भयंकर आहे , मग त्या पाप्यान्ना ईतका सोपा मृत्यू का?

या असल्या नीच कृत्यातील आरोपी ना गुन्हा सिद्ध होई पर्यंत अक्षरशः पोसावे लागते . फाशी ची शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालय , सुप्रीम न्यायालय आणि राष्ट्रपती पर्यंत चेंडू सारखी टोलवाटोलवी सुरू होते ! तो पर्यंत आठ दहा वर्ष ते आरोपी जेल मध्ये आरामात जगत असतात . आणि त्या वेळी मात्र पीडित चे कुटुंब आणि पीडिता जिवंत असेल तर तीळ तीळ मरत असतात .
म्हणून असं वाटतं भारतीय न्यायव्यवस्था कुचकामी आणि अरबी देशातील कायदेच योग्य आहेत या हरामी लोकसाठी !!!

खरंय जिद्दु. 2 आठवडे हा मुद्दाच नव्हता हे भयानक आहे.
पीडित मुलीची जात, नाव सगळं बाहेर आलं. पण गुन्हेगार ठाकूर आहेत हेही लिहायची कोणाची हिंमत होत नाही इतकी दहशत आहे. तिथे सवर्ण, अप्पर कास्ट असे catch-all टर्म्स लिहीत आहेत.

मागच्या रविवारी जसवंतसिंह गेले. ८०-९० च्या दशकात केंद्रातील एक अतिशय अभ्यासू व वजनदार व्यक्तिमत्व. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी अत्यंत महत्वाची खाती त्यांनी दीर्घकाळ सांभाळली होती. त्यांच्या निधनाची एक छोटीशी बातमी पेपरला आली होती.

डीन जोन्स, जसवंत सिंह, आशालता वाबगावकर, आणि एस पी सुब्रमण्यम .... श्रध्दांजली. आशालता आणि एस पी एक युग गाजवलेले लोक.. आणि डीन क्रिकेटमध्ये. अतिशय दुःखद घटना.
त्यात आता पुष्पाताई भावे. त्यांच्यावर मेधा कुलकर्णींनी मुलाखत स्वरूपात लिहिलेलं 'लढे आणि तिढे ' वाचून होतंय तेव्हढ्यात त्यांच्या जाण्याची बातमी. आजारी होत्या, पण दुर्बल शरीर घेऊन का होईना बऱ्या झाल्या होत्या. अनेकदा पाहिलं, ऐकलं त्यांना. खूप हळहळ वाटली. श्रध्दांजली.

अविनाश खर्शीकर यांना श्रद्धांजली. अनेक सिनेमातून त्यांनी उत्तम भुमिका केल्या.

ओह्ह.
देखणा अभिनेता.
अनेक मराठी नाटकं.
वासूची सासू आणि अनेक जुन्या सिरियल आठवल्या.

अविनाश खर्शीकर...गुणी अभिनेता..
रामविलास पासवान- द्वेषाचं राजकारण न करता सर्वांच्या मनात जागा मिळवणारा अजातशत्रू नेता हरपला...
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली..

दोघांना श्रद्धांजली __/\__
मी आजच तुझे आहे तुजपाशी हे नाटक युट्यूबवर पाहिले ज्यात खर्शीकरांनी शामची भूमिका केली आहे! आणि आता ही बातमी Sad

थोडेसे अस्थानी वाटेल तरी लिहितो: जेपी आंदोलनातून पुढे आलेल्या नेतृत्वाची वयोपरत्वे अखेर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपातील जेटली/स्वराज, आता पासवान. इतर अनेक नेते ८०च्या आसपास आले आहेत, वृद्धापकाळाने त्यांचा प्रभाव /काम कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामागची पिढी ही मुख्यत्वेकरून स्वतंत्रता संग्रामातून पुढे आली होती.
यापुढची राजकीय फळी कुठल्या आंदोलनातून/चळवळीतून उभी राहील? २०१२चे रामलीला/आप/हजारे आंदोलन देशव्यापी पातळीला पोचले नाही मात्र त्यातून आपचा उदय झाला. ते सोडल्यास सध्या इतर कुठलीही मूस (क्रेडल) धगधगत नाहिये.

भाजपसाठी रामजन्मभूमी आंदोलन एक सोर्स असू शकेल ना. आता तेजस्वी सूर्य वगैरे नवीन पोरांना केरळ बंगाल ला जायला लावतात असं दिसतंय.
बाकीच्या पक्षाना काय! त्यांचे राजकुमार गादीवर बसणार.

Pages