शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी
होय, पण ४ अर्थ व एकच शब्द हे जुळले पाहिजे ना !
बांबूपेक्षा भरीवचा विचार करा

तुतारी
कारागीर का वापरतील तुतारी !!

छान,
आता
४. वाजवता पण येते. >>> तुतारीसारखें एक वाद्य.
हे झाले.
बाकी ३ शोधा.

४ पैकीच एक मूळ शब्द आहे. त्याचेच हे विविध अर्थ आहेत !

एका शब्दाचे ४ वेगळे अर्थ आहेत. या प्रत्येक अर्थाची शोधसूत्रे खाली दिलीत. त्यावरून संबंधित शब्द आणि त्याचे अर्थही ओळखा.

1. चांगलेच टोकदार आहे
2. कारागीराकडे असते
3. खायलाही चालते
4. वाजवता पण येते.******* तुतारी

३. तुती ?
नाही, हा खायचा प्रकार फळ नाही.

सोनार ? >>> नाही.

एका शब्दाचे ४ वेगळे अर्थ आहेत. या प्रत्येक अर्थाची शोधसूत्रे खाली दिलीत. त्यावरून संबंधित शब्द आणि त्याचे अर्थही ओळखा.

1. चांगलेच टोकदार आहे
2. कारागीराकडे असते
3. खायलाही चालते
4. वाजवता पण येते >>>>>> सळई / सळी??

३. आरी?

आरी?
नाही
3 हा पदार्थ कच्चा पचणार नाही

मानव,
त्या दिशेने कारागीर पूर्ण चुकतोय.

तुंबडी
टिमकी
कारागीर जुळत नाहीये

तुंबडी
टिमकी >>> नाही.

कारागीर >>>हा सध्या शक्यतो शहरात दिसत नाही !

पुंगी?
(गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली!)
ही गारुड्याकडे असते. आणि अलीकडे गारुडी शहरात फारसा दिसत नाही. आणि गारुडी हा कारागीर असू शकतो!

भर :

1. चांगलेच टोकदार आहे >>>> अंगाला टोचले तर खरंच वेदनादायक.

2. कारागीराकडे असते >>> कारागीर १२ गाव कामगारांपैकी एक.

3. खायलाही चालते >>> कच्चे पचणार नाही.

Bamboo shoots? बासरी?
नाही.
एक गैरसमज होतोय. प्रत्येक सूत्रावरून वेगळा अर्थ काढा.
“४ वाजविता येते” याचे उत्तर तुतारीसम वाद्य हे आधी झालेलेच आहे.

Pages