वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आता marriage contract बघायला सुरवात केलीये, पण मला एक बेसीक प्रश्न पडलाय त्या हिरो च्या आई साठी लिव्हर ट्रान्सप्लान्ट करायचय म्हणून लिव्हर डोनेट करू शकेल अशा मुलीशी ह्याला लग्न करायचय? मुळात असं लिव्हर दिल्यावर माणूस जगू शकतो का? आपल्याला एकच लिव्हर असतं ना किडनी दोनपैकी एक डोनेट करू शकतो पण लिव्हर कसं?

मुळात असं लिव्हर दिल्यावर माणूस जगू शकतो का <<<< करता येतं बहुतेक. पूर्ण नाही. थोडा भाग. ( ग्रेज मध्ये पाहीलेलं आठवतय ह्याबद्दलच्या केसेस ).
बाकी तो हिरो मला अजिबात नाही आवडला. सिरीज बरीये.

जिवंत माणसाच्या लिव्हर चा काही भाग डोनेट करतात.
(किंवा मग ब्रेन डेड केस मिळाल्यास पूर्ण)
तो परत वाढतो झाडा सारखा.
पण रिस्क असतातच.

तो परत वाढतो झाडा सारखा.>>>> अच्छा, थँक्यू अनु, धनश्री.

मला अजूनही क्रॅश लँडिंग चा हिरो हिरोईन आठवताएत, कारण हि माझी दुसरीच कोरियन सिरीयल ! आणि अत्ता दुसरा एपिसोड चालू आहे.

मला कंटाळा आला मॅरेज कॉन्ट्रॅक्ट चा, मलाही तो हिरो नाही आवडला, << हाय बाय ममा पहा. वेगळीच गोष्ट आहे. दोन्ही हिरॉईन्स गोड आहेत.

इथेच वाचून Kim's convinience (नेटफ्लिक्स ) बघायला सुरुवात केली.

खूपच आवडली आहे, रविवारी सुरुवात केली होती, आत्ता 4th season चालू आहे.

क्लास ओफ ८३.. बघितला.. मस्त आहे.. सगळ्यांची कामं मस्त झालीत.. माझी वर्गमैत्रिण (कल्पना महाजनि) चा मुलगा निनाद जाधवच्या भूमिकेत आहे..

Marriage contract बघितली मी पूर्ण. आणि खुप आवडली. इमोशनल आहे स्टोरी. ह्याचा दुसरा सिझन नाही आला का? मीच लिहीलं होतं कि मला कंटाळा आला मॅरेज कॉन्ट्रॅक्ट चा पण चारपाच एपिसोड नंतर हिरोही आवडायला लागला. हिरॉइन आणि ती छोटी मुलगी ह्यांच्या बॉंडिंग खुप छान, नंतर हिरोशी छोट्या मुलीचं बॉंडिंग छान दाखवलय. त्या हिरॉइन च्या सासूचं, मैत्रिणीचं कामही आवडलं. मांजरांची पिल्लं , छोटी मुलगी आणि हिरो ह्यांचे पण छान सीन आहेत. हिरोची आई आणि तिचा भाऊ ह्यांचे सीन सुध्दा खुप आवडले

सध्या Sony Liv वर Hercule Pioriot बघतेय. जुनी सीरीज आहे.
1930s च England , Pioriot चा accent , light humour आवडतयं .

डेव्हिड सुशे वाली ना?ती मस्तच आहे.पायरॉ करणे म्हणजे सोपे नाही.खूप बारकावे लक्षात ठेवावे लागतात.पण त्याने मस्त केलेय.

The Fall - season 1 आणि season 2 नेटफ्लिक्सवर पाहिली. फारच eerie आहे. मला psychological thrillers आवडतात, त्यामुळे binge watch केली आणि season 2 सम्पल्यावर कळलं की season 3 पण आहे. अर्धवट पाहून प्रचंड त्रास होतो. तर आता season 3 कुठे पाहू, कोणी सांगु शकेल का? मर्डरर माहीत असुनही पोलीस तपास पहायला इंटरेस्टिंग आहे.

FRINGE कसे काय बघू शकतात लोक्स ?

सगळ्या अ अनि अ कल्पना लिहून त्यावर सीरीज बनवलि अहे . कुठेहि लोजिक नावाची गोष्ट औषधाला नही

मीरा द फॉल चा 3 रा सीझन आलेला नाही बहुतेक . म्हणजे भारतातील नेटफ्लिक्सवर दिसत नाहीये

शाहिर , अ आणि अ आहे म्हणून बघतात फ्रिन्ज Lol Biggrin

मीरेने रेकमेंड केल्यामुळे virgin river बघितली नेटफ्लिक्स वर (इथे पान नं १३ वर आहे) छान आहे सिरीयल. पण एकच सिझन आहे का, शेवटच्या एपिसोड नंतर सेकंड सिझन कमिंग सून असं लिहीलेलं. कधी येइल Sad

हायॉल. हॉटस्टारवर 'आर्या' नाही बघितली का कोणी?
इथे वाचलं कि नाही आठवत नाही म्हणून मायबोलीची शोध सुविधा वापरुन पाहिली तर 'मोरोपंतांची आर्या' आणि आर्या या आयडीचे सगळे लिखाण + वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले प्रतिसाद दिसले. असो.

मी पहिला भाग पाहिला. वेगवान आणि रोचक वाटला. शेवट नक्की पुढे काय याची उत्सुकता ताणून धरणारा आहे. सुश आणि चंद्रचूड - दोघांनाही अनेक वर्षांनी पाहून बरे वाटले. चंद्रचूडला असा गबाळा लूक काय दिलाय असं वाटून गेलं. पण नंतर ते जस्टिफाय होतंय असं वाटलं.

मी पहीला भाग बघितला आर्याचा, पण माझ्याकडे hotstar vip नाहीये आणि घ्यावसं पण वाटत नाही. सध्या hotstar वर पहिला भाग आहे फक्त. अर्थात ते बरोबर आहे म्हणा.

कोणी डिटेल स्टोरी लिहिली तर वाचायला आवडेल मला, कारण मी बघणार नाहीये.

हायॉल. हॉटस्टारवर 'आर्या' नाही बघितली का कोणी? >>> बघितली ईकडे थोडी चर्चापण केली . ३१-३२ पानापासून आहे .

Parks and recreation संपवली. अतिशय सुंदर सिरीज. कोणी फॅन आहे का इथे?

Pages