वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंदिश बँडीट संगीतातलं काही न कळणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे. अगदी वरवरचं आहे सगळं. बाकी काही बघण्यासारखे नसेल आणि वेळ जात नसेल तर बघता येईल एवढी चांगली मात्र आहे (production quality चांगली आहे).

नाही...चांगली आहे की बंदिश bandit...सगळ्यांचा छान अभिनय, विशेषत्वाने Atul kulkarni, मोहिनी, देवेन.....
शंकर महादेवन ने गायलेली सुंदर गाणी, उत्कृष्ट सेट्स, कपडेलत्ते.....थोडी आपल्या 'कट्यार'... chi आठवण होते ...
आता नायिका अगदीच उथळ वाटते..पण ती तशीच अभिप्रेत आहे...
त्यांची chemistry मात्र अजिबात जुळत नाही व त्यांचे प्रेम बेगडी वाटत राहते.....

लिअ‍ॅन तो तुटलेल्या माळेतला मणी का गिळते ?
Submitted by अंजली_१२ on 10 August, 2020 - 14:37>> काय माहीत. तिला डोरोथीकडून काय चूक झाली होती ते नुकतेच कळलेले असते, त्या रागात तिने तसे केले असेल.
या मालिकेत असे बरेच प्रश्न पडतात. एव्हढेसे खाऊन उरलेले ॲामलेट तो फ्रिझरमधे का ठेवतो, फॅमिली रेसिपीच्या नावाने तो सगळ्यांना जे काही खायला बनवतो ते का?, लिॲन फक्त शाॅनलाच का शिक्षा करते?

पग्या- एक नोटिस केलेच असशील - मॉम, डॅड,साठी कोरियन शब्द - अम्मा अप्पा, हे ऐकून फार आश्चर्य वाटते. तसेच अनोळखी मोठी माणसं किंवा मित्राच्या आई बाबांना अंकल/ आंटी ( अज्जुमा/ अजुशी) बनवायची कॉन्सेप्ट त्यांच्यात पण आहे हेही मजेशीर वाटले!>>>>> मैत्रेयी, तो उच्चार खरंतर ओम्मा/ओप्पा असा आहे. तसंच अजुम्मा आणि आजोशी.

नेफ्लिवर 'डेसिग्नेटेड सर्व्हायवर' बघायला सुरूवात केली. सुरूवातच कॅपिटॉल बिल्डींगमध्ये प्रेसिडेंटच्या भाषणाने होते. आणि तेवढ्यात स्फोट होतो. काहीही कळायच्या आत ते भाषण जो बघत असतो (हाऊसिंग व अर्बन डेवलपमेंटचा सेक्रेटरी), त्याला घाईने बोहल्यावर उभं करावं तसं प्रेसिडेंट (डेसिग्नेटेड सर्व्हायवर) पदाची शपथही देतात. इथून एकेक नाट्याची सुरूवात होते.

Wow I’m surprised , बंदिश बँडिट्स कोणालाच आवडली नाही , really ?
मला प्रचंड आवडली, (याचा अर्थ मी संगिततले काही न कळणारी प्रेक्षक असणार Wink ) पण स्टोरी, कलाकारांचा अभिनय ,लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी आणि अर्थातच संगीत उत्तम आहे !
कट्यारची आठवण येते बरेचदा, अधेमधे हम दिल दे चुके सनम आणि सिक्रेट सुपरस्टार सुध्दा आठवला पण एकदम बिंजवॉच मटेरिअल आहे !
नासिरुद्दिन शाह, अतुल कुलकर्णी आहेतच बाप माणसं पण नवीन हिरो, हिरोचा काका, आई - वडिल, हिरो आणि हिरॉइनचे सेक्रेटरी सगळ्यांनी मस्त काम केलय. हिरॉइन नाही आवडली .
जावेद अलीची ठुमरी, शंकर महादेवनचं ‘विरह’ गाणी फार मस्त आहेत.

Btw , सेलिंग सनसेट कोण बघतय ?
मज्जा आहे Happy

नेफ्लिवर 'डेसिग्नेटेड सर्व्हायवर' बघायला सुरूवात केली. <<< वेगळाच विषय आहे. ३ सीजन तरी चांगले आहेत. पुढे कंटाळवाणी होते.

घाईने बोहल्यावर उभं करावं तसं प्रेसिडेंट (डेसिग्नेटेड सर्व्हायवर) पदाची शपथही देतात. <<< बिचार्याला शुन्यातून सुरुवात करावी लागते.

बंदीश बॅन्डीटमधल्या अनेक बंदिशी अत्यंत कणसूर/बेसूरही आहेत. सतत दाताखाली कचकच आल्यासारखं वाटत रहातं. शास्त्रीय संगीताच्या नावाखाली काहीही दाखवलं आहे.

>>बंदीश बॅन्डीट गंडलिये. रागसंगीत म्हणजे डायरेक्ट द्रुत बंदीश अशी कल्पना असावी. इकडून ह्याची की लगेच तिकडून त्याची. रामायणात बाण सोडतात तशी मारामारी. आदपाव कपड्यातली हिराॅईन. अति गुळगुळीत हिरो. ओम-फस् झालीये.>>> अगदी अगदी आणि त्यात कहर म्हणजे हिरो अन हिरोइन एकाच लॉक अप मध्ये रात्र काढतात..... अतुल कुलकर्णी फेसबुकवर सॉलिड प्रमोट करायचा प्रयत्न करतो,,,, जणू ते विरह गीत आल्टिमेट आहे.... त्याचा अभिनय ठीक आहे पण खूपच हवाबाजी चालली आहे.... प्रीमॅरिटल सेक्स आणि अश्लील शब्दांचा भडैमार पाह वत आणि ऐकवत नाही ... तिरस्करणीय

बंदीश बॅन्डीट
आता वेबसीरिज आवडली की नाही हा प्रश्न फारसा उरत नाही कारण लॉकडाऊन, घरी बसायच्या काळात काही ना काही पहावे लागतेच आहे
सेक्रेड गेम्स की बंदीश बॅन्डीट तर नक्कीच बंदीश बॅन्डीट - इतकीच तुलना फार तर करता येईल
मनापासून एखादी कलाकृती आवडण्याचा काळ मला वाटते हिंदीपुरता संपलेला आहे.
वेब मिडियावर हिंदीत आता इथून पुढे काय आवडू शकेल?
एखादा अभिनय
एखादे गाणे
एखादा प्रसंग
असे एखादेच काही.

कोणी पाहिली का ??? कशी वाटली?? मला प्रचंड आवडली। >>>
मी पाहिली आणि मलाही अतिशय आवडली. मी या वेबसिरीजबद्दल आधी लिहिलं आहे. इथेच किंवा मग 'इंग्रजी पुस्तक / चित्रपट / वेबसिरीज' असा धागा आहे तिथे लिहिलं असावं.

बंदिश बँडिट्स संपवली पाहून. सुरुवातीला चांगली प्रॉमिसिंग वाटली, कदाचित नीट हँडल केला असता तर विषयात पोटेन्शियल पण होते. अ‍ॅक्टर्स पण चांगले, व्हिजुअल्स वर वगैरे भरपूर पैसा खर्च केला असावा. पण कथेचं काय? अगदी उथळ, वरवरचे हाताळून कथेची एकूण फारच माती केलेली आहे. हास्यास्पद म्हणावे अशी.
उदा. सुरुवातीला भासवलेय की नसिरुद्दिन शाह चे पात्र हे संगीत क्षेत्रातले दिग्गज वगैरे आहे, त्याने स्वतःचे घराणे स्थापन केलेय इ. त्याचा वारसा पुढे देण्याकरता तो १ पिढी स्किप करून नातवाला तो द्यायच्या विचारात. आणि तो नातू इतकी वर्षे मेहनत करतो, ते काय ते प्रायश्चित्त वगैरे प्रकार करतो, नंतर मात्र अचानक आजोबांनी अबोला धरल्यावर इतका मह्त्त्वाचा संगीत सम्राट कार्यक्रम काही दिवसांवर आल्यावर त्याची आई त्याला शिकवायला लागते ( तीही २५ वर्षात एकदाही न गायलेली बाई ) तेव्हा अगदीच बिगारीत असल्यासारखे ताल समजण्यासाठी भाजी काप, धुणी धू असले काय शिकवते? म्हणजे तोवर त्याची इतकीही ताला सुराची तयारी नसते? अतुल कुलकर्णी तर त्याच्याहून अनुभवी असतो ना? मग तो ही तोंडात काडी ठेवून प्रॅक्टीस वगैरे काय करत असतो? नुस्ता रियाज करतोय इतके दाखवायचे ना!
शिवाय तो बहुचर्चित संगीत सम्राट कार्यक्रम ही एकूण गल्लीतल्या लेवल चा "मिनिट टु विन इट" टाइप एक मिनिटात कोण जास्त आलाप घेऊन दाखवतो या लेवल ला उतरतो शेवटी. Lol तयारी म्हणजे १ श्वासात तुला ७ घेता येतात का मग तो २४ घेतो अशी चढाओढ?
शेवटी ते ये क्लासिकल म्यूझिक का इंडियन आयडॉल है म्हणणे , कोण ते उपटसुंभ जजेस येऊन कमेन्ट्स देणे, तेही हा राग वर्सेस तो राग किंवा हा रस वर्सेस तो रस अशी अ‍ॅपल टू ऑरेन्जेस तुलना! रिएलिटी टिव्ही सारखा अनाउन्सर , त्याने त्याच लेवल च्या कमेन्ट्स क्लासिकल गायनानंतर देणे ( क्या बात! आप सोला मात्राके बाद सम पर आ गये! Lol ) वगौरे मी शेवटी विनोदी कार्यक्रम म्हणून पाहिले . अगदीच उथळ आणि हास्यास्पद. ती तमन्ना हे कॅरेक्टर आणि ती कोण अ‍ॅक्ट्रेस हे दोन्ही काहीच्या काही उथळ.
व्हिज्युअल्स, अ‍ॅक्टर्स वगैरे साठी इतके बजेट असताना कथेवर जराही काम का केलं नाही / करावेसे वाटले नाही कुणास ठाऊक!

मैत्रेयी +१
इतके सगळे चांगले कलाकार, संगीतकार, गायक (पं. अजय चक्रवर्ती) असे असूनही अगदीच average मालिका झाली आहे. शास्त्रीय संगीत तर वरून कोथिंबीर भुरभुरावी इतपतच मर्यादित आहे. एकदा बघता येते if you can gloss over the major shortcomings.

Fringe ही प्राईम सिरीज कोण बघतेय का ?
हो . माझी एकदा बघून झालीये पाच वर्षापूर्वी . आता परत बघतोय प्राइमवर ....

मैत्रेयी, तू भारी लिहिलंयस. Lol

मराठी, हिंदी सिरीयली बघणं सोडून दिलंय. तरी हल्ली हल्ली ती समांतर सिरीज आणि सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन पाहिला. बाकी काही बघवतच नाही. कौटुंबिक जिव्हा़ळ्याचे विषय तर बोअरच होतात.

मंदार कात्रे , मी नुकतीच बघायला घेतली आहे . स्युडो सायन्स , थरार , अतिप्रगत टेक्नॉलॉजीच प्लस कथेचं सादरीकरण सगळंच भारी आहे .

https://youtu.be/f55qg5aL29Q

FBI agent Olivia Dunham (Anna Torv) and the FRINGE team started off investigating a dark, international conspiracy that featured an enormously powerful technology corporation, a long-running dispute over secret paranormal research, and an honest-to-goodness mad scientist, Dr. Walter Bishop (John Noble). As they dug deeper, Bishop's craziest ideas turned out be true, revealing that the plot stretched all the way into a parallel universe. The resolution of that plot has long-lasting impact on all of the characters. Also along for the ride is Dr. Bishop's son, Peter (Joshua Jackson), who's equal parts genius and rogue and has some major secrets of his own.

मीरा , तू एमीच्या बाफवर लिहिले असशील बहुतेक . तिचाही एक बाफ होता.>>>>नाही ह्याच धाग्यावर आहे पान नं ३१

Pages