मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
६ साखरभात.....? नाही.
६ साखरभात.....? नाही.
भात=बात=वार्ता
साखळीच्या भागात=साख > चांगला प्रयत्न पण या दिशेने नाही.
आवाज =खर
१. दिवसात कधी हिंदी गाणे
१. दिवसात कधी हिंदी गाणे म्हणा वस्ताद. (५):वाकबगार२. माकडाला होणारी गाय? (३):कपिला३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास मिळणारा खाऊ. (३)
४. त्या इंग्रजाभोवती इंग्रजाळलेली आई करते गुणगान. (३):महिमा५. योग्य वादन करी. (३) :वाजवी६. हा खाऊ मिळाल्यास अशी वार्ता सुरु होते की साखळीच्या भागात आवाज येतोय. (५): बाकरवडी७. चौघीही आधी सारखे प्रश्न विचारुन रुग्णांची सेवा करतात. (५) परिचारिका - पूर्ण स्पष्टीकरण अपेक्षीत
८. स्वतंत्र अपत्य. (३): संतत९. सूक्ष्मांशापुढे सूक्ष्मांश आल्यास येणारा बारीक ताप. (४)कणकण१०. वस्त्र कापा यजमानांनी नेसलेले. (४)पायजमा१०. वस्त्र कापा यजमानांनी
१०. वस्त्र कापा यजमानांनी नेसलेले. (४)
(पा) यजमा (न)
१०. वस्त्र कापा यजमानांनी
परिचारिका >> रि... रि = सारखे
६. हा खाऊ मिळाल्यास अशी
६. हा खाऊ मिळाल्यास अशी वार्ता सुरु होते की साखळीच्या भागात आवाज येतोय. (५) >>> बाक (रव) डी
कडी = साखळी
आवाज = रव
वार्ता >> रेवडी >> ? रवडी
मला पण एकदा बाकरवडी वाटलं
मला पण एकदा बाकरवडी वाटलं
पण
अशी वार्ता सुरु होते की .....हे काही जमेना
६.वरणभात= भात> बात
६.वरणभात= भात> बात
रवण> रांग,ओळ
रव>>आवाज
८. स्वतंत्र अपत्य. (३) >
८. स्वतंत्र अपत्य. (३) > स्वयंभू
भू = निर्माण झालेले
वार्ता - बातमी. तिची फक्त
वार्ता - बातमी. तिची फक्त सुरुवात - बा
६. हा खाऊ मिळाल्यास अशी
६. हा खाऊ मिळाल्यास अशी वार्ता सुरु होते की साखळीच्या भागात आवाज येतोय. (५) >>> बाक (रव) डी
कडी = साखळी
आवाज = रव
वार्ता >> रेवडी >> ? रवडी >>
बरोबर. वार्ता= बातमी, सुरु होते: बा (पहिले अक्षर)
बा + कडी मध्ये रव = बाक(रव)डी
८. स्वतंत्र अपत्य. (३) > स्वयंभू: चूक.
१०. पायजमा : बरोबर.
वस्त्र कापा यजमानांनी नेसलेले. (४) -- Telescopic
ओह वार्ता = बातमी
ओह वार्ता = बातमी
बातमीची सुरुवात =बा
हे फारच छान आहे
कैफ शब्दात दोन मात्रा आहेत
कैफ शब्दात दोन मात्रा आहेत
त्यातली एक मात्रा घेतली तर केफ
पण पुढे काही जमेना
८
८
अपत्य=बालक
बा luck =with luck
स्वतंत्र असणे हे नशीबच आहे ना ...कैच्याकै
८. स्वतंत्र अपत्य. (३) >
८. स्वतंत्र अपत्य. (३) > विमुक्ति
मुक्ति =अपत्याचे नाव
अर्थ स्वतंत्र
८. जरा कठीण आहे.
८. जरा कठीण आहे.
हे श्लेष कोडे आहे. म्हणजे दिलेल्या दोन्ही शब्दांना एकच समानार्थी शब्द आहे. मला त्या शब्दाचा दिलेल्या दोन शब्दांपैकी एकच अर्थ माहीत होता, दुसरा आजच कळला.
शब्दकोशात अपत्य साठी पर्यायी शब्द शोधा. शेवटला शब्द अकारांत असलेला.
मग त्या मिळालेल्या शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहिल्यास दुसरा अर्थही मिळेल.
निपज
निपज / उपज
नाही.
नाही.
या शब्दाचे स्वतंत्र आणि अपत्य हे दोन अर्थ आहेतच पण तिसराही अर्थ आहे जो सगळ्यांना माहीतच आहे. किंबहुना हा तिसरा अर्थच सगळ्यांना माहीत असतो. तेव्हा हे कोडे बदलून तिन्ही अर्थ घालून देतो. याने हे सोपे व्हावे अशी अपेक्षा आहे, उलट परिणाम होउ नये:
८. स्वतंत्र अपत्य यांचा सारखा लागलेला ओघ (३)
अनावश्यक शब्दास तिरपे केले आहे.
तिसर्या अर्थाने या शब्दाचा वापर सध्याच्या ऋतूत होतोच.
संतति / संतत
संतति / संतत
संतत
संतत
संतत बरोबर.
संतत बरोबर.
संतत, सतंत
संतत, सतंत
वि. स्वतंत्र; पृथक्; निराळा; अलग. 'म्हणोनि शुद्ध ज्ञान ते संतत ।' -दा ५.६.९. 'कोणी सुना कोणी लेकीं । कोणी एकी सतंता ।' -तुगा १५१. [सं. स्वतंत्र]
दाते शब्दकोश
३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास
३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास मिळणारा खाऊ. (३)
७. चौघीही आधी सारखे प्रश्न विचारुन रुग्णांची सेवा करतात. (५) परिचारिका - पूर्ण स्पष्टीकरण अपेक्षीत
चौघी - चारही - चारी
चौघी - चारही - चारी
आधी म्हणजे चौघी = चांदीच्या आधी
सारखे - समान - परी -परि
प्रश्न - का
रुग्णांची सेवा करणाऱ्या - परिचारिका
बरोबर भरत. चारी च्या आधी
बरोबर भरत. चारी च्या आधी परी- परि
कैफ = अंमल >>> मलई ?
कैफ = अंमल >>> मलई ?
पहिल्या दोन शब्दांचा एकत्र
पहिल्या दोन शब्दांचा एकत्र अर्थ घ्या की उत्तर मिळालेच म्हणुन समजा.
३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास
३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास मिळणारा खाऊ. (३)
कैफ आणणारी - मादक
मात्रा - ओ'ची
मोदक
(No subject)
छान होते !
छान होते !
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
एक सोपे देतो.
एक सोपे देतो.
खाली दिलेल्या अक्षरांत मिळून एका शब्दाचे ६ समानार्थी दडलेले आहेत.
कारकुन पुडी देशवरी हयात
ते ओळखा.
एक अक्षर फक्त एकदाच घ्या. सर्व ६ शब्द एकदम लिहा. तेव्हा उत्तर उघडच असेल !
Pages