शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनव>>> कणव ना? की कनवचा दुसराही अर्थ आहे?

कनव / कन्हव = विनवणी
कणव = दया

तुमचा एखादा वेगळा असल्यास जरूर लिहा.

वरतान >>> वरताणचा अपभ्रंश धरूयात ?

नेहमीच्या ४ कोशात नाही मिळाला.
संदर्भ जरूर द्या !

तरवा.... भाताचे तरवे ऐकले होते.

डवर

३. तवर
४. तवार

६. तरड

८. नरड

११. ताडक
१२. तातड
. तावड
१४. ताकड

१६. वडवा

१८. कडत
१९. कडव
यांचे अर्थ सांगाल का?

देवकी,
आधी इथे बघून घेता का ?
https://bruhadkosh.org/
तिथे नसल्यास नंतर भर घालता येईल

कडत =
सोंगटी
आपले कढत वेगळे !

गूढ शब्दकोडी:
नेहमीप्रमाणे स्पष्टिकरणासहीत उत्तरे द्यावीत.

१. दिवसात कधी हिंदी गाणे म्हणा वस्ताद. (५)
२. माकडाला होणारी गाय? (३)
३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास मिळणारा खाऊ. (३)
४. त्या इंग्रजाभोवती इंग्रजाळलेली आई करते गुणगान. (३)
५. योग्य वादन करी. (३)
६. हा खाऊ मिळाल्यास अशी वार्ता सुरु होते की साखळीच्या भागात आवाज येतोय. (५)
७. चौघीही आधी सारखे प्रश्न विचारुन रुग्णांची सेवा करतात. (५)
८. स्वतंत्र अपत्य. (३)
९. सूक्ष्मांशापुढे सूक्ष्मांश आल्यास येणारा बारीक ताप. (४)
१०. वस्त्र कापा यजमानांनी नेसलेले. (४)

७. चौघीही आधी सारखे प्रश्न विचारुन रुग्णांची सेवा करतात. (५) >>परिचारिका (चारी =चौघी , सारखे प्रश्न >> का ?)

९. सूक्ष्मांशापुढे सूक्ष्मांश आल्यास येणारा बारीक ताप. (४) >>>
कण कण (सूक्ष्मांशापुढे सूक्ष्मांsh)

बरोबर, छान.
७ . चे पूर्ण स्पष्टीकरण अपेक्षीत. चारी का चे आले,

१. दिवसात कधी हिंदी गाणे म्हणा वस्ताद. (५) >> वा कब (कधी) गार ( वार =दिवस )

* परिचारिका (परि =परंतु , तरीपण )

वा(कब गा)र बरोबर.
७. अजून कुणी स्पष्टीकरण देइल का बघु, नाहीतर शेवटी देइन.

३. कैफ आणणारी मात्रा घेतल्यास मिळणारा खाऊ. (३) >> थंडाई ? ( = भांग )
किंवा
मिठाई ?
....................
परिचारिका
रिचा = नित्य / सारखे ?

३. ५. चूक.

रिचा = नित्य / सारखे ? : नाही.

५. वाजवी: बरोबर

४ महिमा
ममा =इंग्रजाळलेली आई
तो= he , त्या इंग्रजाभोवती

६ साखरभात.....?
भात=बात=वार्ता
साखळीच्या भागात=साख
आवाज =खर

Pages