मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
पु व
पु व
काया देह कुडी शरीर तन
छान होतं.
वपु म्हणजे शरीर?
वपु म्हणजे शरीर >> होय.
वपु म्हणजे शरीर >> होय.
छान !
धन्यवाद
भरत, कारवी, साद, इतर नवसदस्य
भरत, कारवी, साद, इतर नवसदस्य - कोडे द्या कुणीतरी
दिलेल्या अक्षरांमधून एका
दिलेल्या अक्षरांमधून एका साहित्यिकाच्या चार साहित्यकृती ओळखा. यांची अक्षर संख्या अशी आहे :
१ पाच अक्षरी, २ सहा अक्षरी व एक ७ अक्षरी.
त्यानंतर ते साहित्यिक पण ओळखा.
त व नु वा पा
भा अ दे गा भं
स दी अ र्थ था
पि ग वा ष्टी
मृ का चां भ ग
चांगदेव पासष्टी
चांगदेव पासष्टी
बरोबर. आता पुढचे सोपे
बरोबर.
आता पुढचे सोपे
भावार्थदीपिका नंतर पुढील दोन
भावार्थदीपिका नंतर पुढील दोन साहित्यकृतींची नीट अक्षरे लागत नाहीयेत.
त ऐवजी ता हवे का?
आणि दुसरा वा बरोबर आहे का?
त ऐवजी ता
आणि वा ऐवजी व असेल असे गृहीत धरून:
अमृतानुभव आणि अभंगगाथा.
संत ज्ञानेश्वर.
मानव, छान.
मानव, छान.
खरे नाव अनुभवामृत आहे असे तर्कतीर्थांच्या लेखात वाचले होते.
अच्छा! मग अक्षरे बरोबर आहेत.
अच्छा! मग अक्षरे बरोबर आहेत.
अरे वा, मानव, छान सोडवलेत .
अरे वा, मानव,
छान सोडवलेत .
एक वाक्प्रचार ओळखा.
एक वाक्प्रचार ओळखा.
सूत्रे:
१. त्याच्यामध्ये तीन शब्द आहेत.
२. एकाच अक्षराच्या बाराखडीतील चार रूपे आहेत.
३. अन्य एक अक्षर दोनदा आले आहे.
४. तो माणसाच्या गुणधर्माशी संबंधित आहे
अजून हिंट द्या.
अजून हिंट द्या.
माणसाचे वर्तन न बदलण्याबाबत.
माणसाचे वर्तन न बदलण्याबाबत. वनस्पतीशी तुलना
म्हणजे कोडगेपणा किंवा
म्हणजे कोडगेपणा किंवा निर्लज्जपणा ?
साद, हो. त्याच धर्तीवर
साद,
हो. त्याच धर्तीवर
त्याच्यामध्ये तीन शब्द आहेत.>
त्याच्यामध्ये तीन शब्द आहेत.>>>
त्यातील एक अंक आहे.
आता ?
लाजाळूचे झाड ? असं काही
लाजाळूचे झाड ? असं काही
नाही.
नाही.
वनस्पतीच्या एका भागावरून तुलना.
पळसाला पाने तीन
पळसाला पाने तीन
भरत, नाही.
भरत, नाही.
हे पाहा :
२. एकाच अक्षराच्या बाराखडीतील चार रूपे आहेत.
................
विशिष्ट वनस्पती नाही. झाडाचा एक भाग
वाक्प्रचार झाडाच्या मुळावरून
वाक्प्रचार झाडाच्या मुळावरून आलेला आहे.
आता एक तास वाट पाहून उत्तर जाहीर करतो.
सोळा मुळे सुळसुळीत
सोळा मुळे सुळसुळीत
= कितीही कान उघाडणी केली तरी एखादा माणूस त्याचे वर्तन बदलत नाही, तेव्हा असे म्हणतात.
छान आहे. पण याची
छान आहे. पण याची व्युत्पत्ती काय असावी ?
१६ हा आकडा कसा आलाय
१६ हा आकडा कसा आलाय त्याबद्दल कल्पना नाही.
थोडक्यात, झाडाच्या सोळा मुळापैकी एकातूनही पाणी शोषले न जाणे
>>>>
उपदेशाचा कुठलाच परिणाम न होणे.
चार अक्षरी शब्द. पूजेच्या
चार अक्षरी शब्द. पूजेच्या उपकरणापैकी एक. लिहिण्यात थोडीशी चूक झाली तर पूजेऐवजी धुणे धुवायला वापरावे लागेल.
निरांजन ?
निरांजन ?
धुपाटणे
धूपदाणी ?
धूपदाणी ?
धूपाटणे / धोपटणे ?
धूपाटणे / धोपटणे ?
धूपाटणे / धोपटणे ?
धूपाटणे / धोपटणे ?
करेक्ट ! तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं. या म्हणीमागे एक गमतीशीर गोष्ट आहे.
पुढचा शब्द,
उर्दू वाटणारा हा शब्द चक्क मराठी आहे, एक प्रकारचा कीटक.
मच्छर.
मच्छर.
Pages