आणि बिग बी चिडले

Submitted by आशुचँप on 29 July, 2020 - 02:08

आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/t...

त्याला पार अगदी हिरण्यकशपूची पण उपमा दिली आहे.

हे असे ट्रोलर तर पैशाला पासरी पडले आहेत पण या अशा अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या गटार कॉमेंटकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते. इतके महत्व देऊन त्याचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल आता.

यामुळे तर आता चर्चेला उधाण आले असून १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली तेव्हाही अमिताभ यांनी असेच वादग्रस्त उद्गार काढले होते अशी आठवण काहींनी सांगितली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आजारपण आणि एकंदर एकटेपण यामुळे बराच स्ट्रेस असेल.कधीकधी ट्रोलर्स खूप मर्यादे बाहेर जात असतील.कमेंट काय आणि कोणाबद्दल होती त्यावर अवलंबून.
नेहमी बहुधा या लोकांचे मीडिया मॅनेजर्स अश्या कमेंट्स ना उत्तर देत असतील.आता करोना आणि हॉस्पिटल मुळे स्वतः द्यावी लागत असणार उत्तरे.
थोड्याच वेळात 'माफी, मी नाही लिहिले, अकाउंट हॅक झाला होता वगैरे स्पष्टीकरण येईल बघा ☺️☺️

हो नक्कीच, हेच येईल उत्तर

कमेंट अगदीच वाईट होती त्यामुळे चिडणे स्वाभाविक आहे पण अशा कमेंट तर नेहमीच येत असतील ना

नेहमी आणि आता मध्ये बराच फरक आहे ना.
आजारपण, आयसोलेशन गरीब श्रीमंत सेलेब्रिटी आम जनता प्रत्येकाला एकाच लेव्हलवर आणून ठेवते.

धागा ललितलेखनातून हलवता येईल का?
उगाच त्यावरून लोकांनी आक्षेप घेत एका चांगल्या धाग्याचा चुराडा व्हायला नको.

हो तेही आहेच
पण इतका तोल जाऊन पार ब्लॉग वगैरे लिहिण्याएव्हढे महत्व द्यायची गरज नव्हती असे वाटले
म्हणजे हे ते सुप्रसिद्ध डुक्कर आणि चिखल उदाहरण झाले

हा बाफ ललितलेखनात का काढलाय आशुचॅम्प ? चालू घडामोडीत हलवता येईल

>>>>

तिथेच काढायचा होता पण मला तिथे नवीन लेखन चा पर्यायच सापडला नाही
कुणीतरी मदत करा

मूळ कमेंट काय होती हे समजेल का?>>>>

नेहमीच इतके सिलेकिव्ह कसे जमते तुला वाचायला
अक्खी लिंक दिलीय वरती ती वाचायचं किमान कष्ट घे की राव

आजारपण आणि एकंदर एकटेपण यामुळे बराच स्ट्रेस असेल.कधीकधी ट्रोलर्स खूप मर्यादे बाहेर जात असतील.कमेंट काय आणि कोणाबद्दल होती त्यावर अवलंबून.
नेहमी बहुधा या लोकांचे मीडिया मॅनेजर्स अश्या कमेंट्स ना उत्तर देत असतील.आता करोना आणि हॉस्पिटल मुळे स्वतः द्यावी लागत असणार उत्तरे.
थोड्याच वेळात 'माफी, मी नाही लिहिले, अकाउंट हॅक झाला होता वगैरे स्पष्टीकरण येईल बघा >>>पूर्ण अनुमोदन.
ज्याला उत्तर दिले आहे, ती कमेंट अत्यंत खालच्या पातळीची होती. आणि अर्थातच, निनावी.
डे वन पासून फार खालच्या लेवलचे विनोद केले गेले त्याच्या आजारपणाबाबत. शिवाय, त्याच्या फेबु पेजवर पण काहीजण खूप वाईट भाषेत कमेंट करत होते. त्यामुळे पेशन्स संपला असेल.
आजारपणामुळे आलेला स्ट्रेसही याला कारणीभूत असेल. खरंतर या काळात त्यांनी सोमिपासून दूरच राहायला हवे होते.

सुपर्रस्टार सुद्धा असतात माणसेच हे लक्षात घ्यायला हवे
ती कॉमेंट केवळ निमित्त असावे. गेले काही दिवस जे चालू आहे त्याचा एकंदरीत राग अखेर बाहेर निघाला असे झाले असावे.

विचार करा पुर्ण फॅमिलीला कोरोना झालेल्या माणसाची स्थिती कशी असेल?

म्हणून मी त्या दिवशीही म्हणालेलो, की या स्थितीत लोकं रेखा वगैरे वरून विनोद कसे करू शकतात?
आपल्या ओळखीच्या कुटुंबात असे झाले तर कोणी करेल का? नक्कीच नाही.. मग सेलेब्रेटी आहे तर आपल्याला हा हक्क कोणी दिला..

कधीतरी तोल ढासळणारच अमितभचा
डुक्कर आणि चिखल म्हणाल तर ईथे डुक्कर एक नाही हजार असतील तर कधीतरी चाबूक हातात घ्यायची गरज भासू शकतेच.
अन्यथा समोरची सेलिब्रेटी चिखलात उतरणारच नाही तर आपण कितीही डुक्करगिरी करा असा चुकीचा संदेशही नको ना जायला?

बाकी अमिताभला कोरोना झाला तर त्यात काय एवढे म्हणनारे लोकं आता मात्र अमिताभच्या या कृत्याला महत्व देण्याची शक्यता आहे. कारण यात त्याच्यावर आगपाखड करायला मिळतेय.
मनुष्यस्वभाव Happy

सेलिब्रिटी, त्यांचं होणारं ट्रोलिंग , कोविडमुळे एकटेपणा, मानसिक संतुलन, सेलिब्रिटींचं क्वचित तोल सुटून वागणं यावर चार जनरल ओळी टाका.

हवंतर शाहरुखने मागे वानखेडेवर काहीतरी केलं होतं, त्याबद्दल खरडा. झाला ललितलेख.

बिग बीने असं वागावं यांचं मात्र आश्चर्य वाटलं.

खरंतर या काळात त्यांनी सोमिपासून दूरच राहायला हवे होते>>>
अगदि हेच मनात आले

आणि सुपरस्टार माणसे असतात हे त्यांनी चुका केल्यावरच कसे स्पष्टीकरण येते
त्या आधी ती माणसे नसतात का?
म्हणजे अवाच्या सव्वा भाव देऊन, पार आदर्श, दैवत म्हणून डोक्यावर बसवून नाचायचे आणि चूक केली की माणूसच आहे चूक होऊ शकते म्हणून पांघरूण घालायचे

He has used absolutely atrocious language. And what does he mean by large fan family can become extermination family?!

He is also comfortably tweeting every day which is quite surprising

अमा - तेच तर
फटकारायचे होते तर व्यवस्थित खडवसावता आले असते
पण ही भाषा बिग बी सारख्या व्यक्ती कडून अपेक्षित नव्हती
ही तर थेट खुनाची धमकी झाली
आणि फॅन्स करतील मर्डर त्यांच्यासाठी
फॅन्स आहेत का भाड्यावर पोसलेले गुंड आहेत?

Below the thok do sale ko instructions is a full paragraph of the choicest bad words in HIndi. Which makes us wonder whether he is sick and weak or just relaxing. Or is this his normal way of speaking in private. Very abusive.

Unbelievable!!!
https://srbachchan.tumblr.com/
>>>>>
.. they write to tell me ..’

“I hope you die with this Covid ..”

Hey Mr Anonymous .. you do not even write your Father’s name ,.. because you do not know who Fathered you .. there are only two things that can happen .. either I shall die or either I shall live .. if I die you wont get to write your diatribe anymore, by weathering your remark on a celebrity name .. pity .. for , the reason of your writing to be noticed was, because you took a swipe at Amitabh Bachchan .. that shall no longer exist .. !!

.. if by God’s grace I live and survive you shall have to be ‘weathering’ the ‘swipe’ storm , not just from me , but on a very conservative level, from 90+ million followers .. I have yet to tell them to .. but if I survive I shall .. and let me tell you they are a force incensed .. they traverse the entire World .. from the West to the East from the North to the South .. and they are not just the Ef of this page .. that extended family shall in the flash of an eye become ‘extermination family’ .. !!!!

.. all I shall say to them is .. ‘ठोक दो साले को ‘

मारीच, अहिरावन , महिषासुर, असुर , उपनाम हो तुम ; हमारा यज्ञ प्रारम्भ होते ही, तुम राक्षसों की तरह तड़पोगे , जान लो इतना की अब तुम ही केवल समाज की आवाज़ ना हो ; चरित्र हीन, अविश्वासी , श्रद्धा हीन , लीचड़ तुम हो ; जलो गलो पिघलो , बेशर्म , बेहया , निर्लज्ज, समाज कलंकी …
May you burn in your own stew !!
>>>>>
लवकर बरे व्हा!

बिग बींना करोना झाला म्हणजे आपल्यालाही होऊ शकतो हे कळतं.
बिग बी चिडले म्हणजे आपणही चिडू शकतो हे कळू शकतं.
मानवमामा.

भरत Happy
धडकी भरवणारे बोलता तुम्ही एकदम

बिग बी चे ड्युआयडी नसावेत का? चिडल्यावर वेगळ्या लॉगिन ने यायला विसरले असावेत का?

लवकर बरे व्हा!>> त्यापेक्षा कुणा अनामिकाची कमेंट अधिक योग्य होती असं वाटतं आता. भरत यांनी विवेक शब्दाबद्दल दिलेली पोस्टची लिंक देखील फार चपखल आहे.

Pages