आणि बिग बी चिडले

Submitted by आशुचँप on 29 July, 2020 - 02:08

आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/t...

त्याला पार अगदी हिरण्यकशपूची पण उपमा दिली आहे.

हे असे ट्रोलर तर पैशाला पासरी पडले आहेत पण या अशा अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या गटार कॉमेंटकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते. इतके महत्व देऊन त्याचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल आता.

यामुळे तर आता चर्चेला उधाण आले असून १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली तेव्हाही अमिताभ यांनी असेच वादग्रस्त उद्गार काढले होते अशी आठवण काहींनी सांगितली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही लोक म्हणतात तसेच जाहीरातीसाठी असेल हे सगळे.
‘ठोक दो साले को’ अशी टॅग लाईन असेल नव्या सिनेमाची.

प्रोमोज सुद्धा तो नेहमीच खुलेआम करतो. स्वतःच्याच नव्हे, तर सहकार्‍यांच्या चित्रपटांचेही. अनेकदा मराठी चित्रपटांचेही प्रमोशन बघितले आहे त्याच्या फेबु पेजवर. आत्ता कशाला करेल असे मधेच. त्यात त्याला असले नाटक करायला लागेल इतका कोणता मोठा चित्रपट येउ घातला आहे असेही नाही.

त्यामुळे "स्नॅप्ड" हे एकच कारण लॉजिकल वाटते.

https://tmblr.co/ZwrX5vYi8beV0i00
>>ठोकना तो निश्चित है

वो साँप वाली कहानी तो याद होगी ।

एक सपेरे का पालतू साँप , मालिक की सुरक्षा के लिए वहीं पास में बैठा रहता था । जो भी उधर से गुज़रे साँप उसे काट लेता था । लोगों ने complain किया की ये तो बहुत ख़तरनाक मामला है , सपेरे को यहाँ से हटा देना चाहिए । जब सपेरे ने ये सुना तो उसको लगा की अगर यहाँ से हटा दिया गया तो उसका धंदा बंद हो जाएगा । उसने साँप को बुलाया , और कहा चुप चाप बैठे रहना काटना मत किसी को ,नहीं तो निकाल दिए जाएँगे । साँप ने यही मालिक की बात की , चुप चाप बैठा रहा । अब जो भी वहाँ से गजरे , ये देख करके की साँप तो कुछ कर नहीं रहा , उसे डंडे से मारने लगे । साँप जान बचाने के लिए भागा वहाँ से , और पहुँच गया मालिक के पास । मालिक ने अपने साँप की दुर्दशा देख कर बहुत नाराज़ हुआ । क्यूँ मार खाई तूने , उसने साँप तो फटकारा । साँप ने उत्तर दिया , मालिक आप ही ने तो कहा था की चुप चाप बैठे रहो , काटो मत , सो मैं चुप चाप बैठा रहा और क्यूँकि आपने काटने से मना किया था , मार खाता रहा , और अब मेरा ये हॉल लोगों ने कर दिया है

मालिक ने साँप को दो झापड़ मारे और डाँटते हुए कहा :

अबे साले, काटने से माना किया था , फुफकारने से थोड़ी ना !!

समझ ने वाले समझ गए होंगे ।।

And for those that are Hindi challenged, may the Hindi pundits of our Ef please translate or explain the story, its meaning and its reason for being narrated ..

good night
>>> स्नॅप्ड वाटत नाही. पहिल्या पोस्टचा हिंदी मधला पार्ट रागाच्या भरात लिहुन मग सारवासारव असं माझं तरी मत बनलंय.
अर्थात ते ही ठीकच आहे. देर आए दुरुस्त आए. Happy

ऋन्मेष, त्या माणसाचे तर चुकले आहेच. पण त्याला उत्तर द्यायची 'अशी' भाषा बच्चन साहेबांकडुन अपेक्षित नव्हती म्हणुन सगळे याबद्दल बोलत आहेत.
>>>>>>>

हो नक्कीच, अमिताभने असे काही म्ह्टले नसेल तर आनंदच आहे. मलाही त्याच्याकडून अशी अपेक्षा नाहीये. अगदीच ऑड वाटत आहे.
बाकी मी अमिताभ चुक्याच म्हणणारे सारे प्रतिसाद एकाच तागडीत मोजत नाहीये. मला देखील हे खरे असेल तर तो चुकलाच म्हणून पुढे जायला आवडेल.
पण आपल्यातल्च काही जण चुकलाच ईतके म्हणून पुढे जात नाहीत. अश्यांचा एक मानवी स्वभाव दाखवत आहे,
एखाद्या आदर्श कॅटेगरीत मोडणार्‍या पण आपल्या विशेष लाडक्या नसणार्‍या व्यक्तीमत्वाकडून चूक झाल्यास आपण कसे तलवार घेऊन त्याच्यावर धावून जातो. कुठेतरी अश्यावेळी आपण आतमध्ये सुखावत असतो की अरे आला हा पण आपल्याच लेव्हलला. एखाद्यात जितके गुण असतात त्याची तितकेच तीव्रतेने एक चूक शोधत त्याचे थेट अधपतन करायला आपण संधी शोधत असतो. त्यामुळे तीच एक पकडून आपण उगाळत बसतो Happy

मी मुद्दाम त्या माणसावर टिका करा असे म्हणालो. ते लोकांना याचीच आठवण करून द्यायला की आपल्याला त्या माणसावर टिका करण्यात वा ती लाऊन धरण्यात रस नाही कारण तो प्रसिद्ध नाही, आपल्या ओळखीचाही नाही.
तर अमिताभबाबत आपण हार्श ईतक्यासाठीच तर नाही ना होत आहोत की तो प्रसिद्ध आहे.

अमिताभ हे फार मोठे उदाहरण झाले
माबोवरील कित्येक प्रसिद्ध लेखकांबाबतही हे मी बघितले आहे की कुठे त्यांची एक चूक होताच, वा कुठे ते एका पॉईंटमध्ये सापडताच, कुठे त्यांच्या धाग्यावर प्रतिसाद त्यांच्या विरोधात पेटले आहे हे बघताच काही जण वाहत्या गंगेत हात धुवायला नुसते तुटून पडतात.

>>>>माबोवरील कित्येक प्रसिद्ध लेखकांबाबतही हे मी बघितले आहे की कुठे त्यांची एक चूक होताच, वा कुठे ते एका पॉईंटमध्ये सापडताच, कुठे त्यांच्या धाग्यावर प्रतिसाद त्यांच्या विरोधात पेटले आहे हे बघताच काही जण वाहत्या गंगेत हात धुवायला नुसते तुटून पडतात>>>>>

Mabo हे चुकीचे उदाहरण आहे, इकडे लेखक स्वतः हजर असतो रिऍक्शन वाचायला आणि त्याला प्रतिसाद द्यायला,
माबो वर सगळ्यात बेस्ट पॉलिसीम्हणजे चूक झाली असेल तर सॉरी म्हणून पुढे जाणे, किंवा आपले या मुदयद्यावर मतभेद आहेत असे म्हनून पुढे त्या मुद्यावर मौन बाळगणे.

आता कोणी लेखकू पेटला आणि माझी चूक नाहीच आहे असे हिरीरीने पटवू लागला की विरुद्ध पार्टी पण तितक्याच हिरीरीने उतरते.

Wait.... हे सगळे मी रुन्मेष ला का सांगतो आहे ??

@ सिंबा
मी प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तीबद्दल वाटणार्‍या असूयेतून होणार्‍या टिकेबद्दल बोलतोय
आणि असूया ही ईन्फॅक्ट जवळच्या परीघातल्या लोकांबद्दल जास्त वाटते
त्यामुळे माबोवर वा एकूणच मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध लेखकांना अश्या टीकेच्या कटू प्रसंगाला सामोरे जायचे प्रमाण जास्त आहे.

अ‍ॅग्री ओल्ड मॅन चा राग उतरला का? ताप कसा आहे? काही काँप्लि केशन नाहीत ना.
सुन बाई घरी परतल्या. परत भावुक ट्वीट करणे चालू झाले आहे. एकदम ट्डोपा झाले.

रस्त्याच्यांकडेला चिखलाचे डबके आहे त्यात एक वराह अवतार (डुक्कर म्हणले तर निबा ला राग येतो) डुंबत आहे, येणाऱ्या जाणाऱ्यावर चिखल उडवत आहे, लोकं त्याला टाळून लांबून जात आहेत
अशात एक आजोबा बरेच प्रसिद्ध, सो कॉल्ड आदर्श वगैरे जात असताना त्यांच्या अंगावर पण वराह चिखल उडवतो
आजोबाचा तोल जातो आणि ते एकदम चिखलात उतरतात आणि वराहाला म्हणतात थांब मी माणसं बोलावून तुला पोर्क करतो, तू नीच आहेस, हिरण्यकश्यपू आहेस, तुला तर बाप पण माहिती नाही तुझा

आता आजूबाजूच्या लोकांना कळत नाही यांना अचानक कसे काय झाले मग ते समजावू लागतात आजोबांना अहो असे त्या वराहाच्या पातळीवर उतरू नका, तो वराह पहा एन्जॉय करतोय

पण तितक्यात तिथून एक अजून बोलघेवडे व्यक्तिमत्त्व येते, यांना नैतिकतेचा अपार पुळका आहे ते म्हणते सगळे जण त्या आजोबांना का बोलताय, ते प्रसिद्ध आहेत म्हणून? त्या वराहाला कोणी बोलत नाही जे चिखल उडवताय, सगळे जळताय त्यांच्या प्रसिद्धीवर
आणा रे माझी बंदूक, याला आता गोळीच घालतो
मग प्राणीमित्र संघटना येते आणि व्यक्तिमत्वाविरुद्ध तक्रार दाखल करते
आजोबा अजूनही चिखलात कपड्यांची वाट लावून तसेच संतापाने थरथरत उभे आणि विचार करत आहेत हे उपटसुंभ कोण Happy

हे भारी होते Lol

फक्त प्रॉब्लेम असा आहे की आजोबांना चिखलातून बाहेर न काढता काही येणारे जाणारे आणखी चिखल कसा त्यांच्या अंगावर उडवता येईल, चिखलात माखलेल्या आजोबांना कसे चिडवता येईल हे बघत आहे. आजोबांचे फोटो काढून सोशलसाईटवर फिरवत आहे. ते चिखलाचे डबके डुक्कर आजोबा हा साराच प्रसंग गावभर करून मीठमसाला लाऊन चघळत आहेत.

उपटसुंभाला प्रॉब्लेम त्या काहींचा आणि त्यांच्या अश्या कृत्याचा आहे Happy

अमिताभ यांवर टीका होत असलेल्या सगळ्या कॉमेंट्स मधून एकच त्रिकालाबाधित सत्य समोर येत...

यह महान दृश्य है,
चल रहा मनुष्य है,
अश्रु श्वेत रक्त से,
लथपथ लथपथ लथपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

तो अनामिक प्रतिसादक कोण? हे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले हितसंबंध असणार्‍या महानायकाबाबत इतके खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग झाल्यावर आयपी अ‍ॅड्रेस वगैरे ट्रेस करुन किती मिनिटांत शोधून काढता येईल?

असे असतानाही अमिताभच्या मृत्यूची अपेक्षा करण्याचा विचार ऑनलाईन करण्याचा धोका कोण कशाला उगाच पत्करेल?

आणि मुख्य म्हणजे इतके सगळे घडूनही सायबर पोलिसांकडून एकही स्टेटमेंट नाही की आम्ही त्या अनामिकाला शोधलेय / शोधतोय / लवकरच शोधू म्हणून.

दोन ओळींच्या प्रतिसादाच्या प्रत्युत्तरादाखल दोनशे ओळींचा ब्लॉग?

ट्रोलर कोण आहे? त्याला दोन ओळी खरडायला किती वेळ लागला? त्याच्या तितक्या वेळेची किंमत किती? अमिताभना दोनशे ओळींचा ब्लॉग खरडायला किती वेळ लागला? त्यांच्या या वेळेची किंमत किती?

या वेळेची किंमत वसूल होण्याची खात्री असल्याशिवाय अमिताभ हा उपद्व्याप करणार नाहीत.

https://www.loksatta.com/manoranjan-news/irrfan-khans-son-babil-khan-don...
हा देखील यातलाच प्रकार दिसतोय.

<>>>>>>

ईरफानच्या मृत्युनंतरही तो केवळ खान आहे म्हणून तिरसट पोस्ट टाकणारे पाहिलेत.
का नाही चिडवे त्याच्या पोराने?
कोणाला आव्बडेल कोणीही येऊन आपल्या देशभक्तीवर संशय घेतलेले

आजोबा अजूनही चिखलात कपड्यांची वाट लावून तसेच संतापाने थरथरत उभे आणि विचार करत आहेत हे उपटसुंभ कोण>> Lol
तरी बरं इथे असा कोणी उपटसुंभ नाही.

अभिनेता किंवा प्रसिद्ध व्यक्ती च्या खासगी आयुष्यात सामान्य लोक का रस घेतात हा एक गूढ प्रश्न आहे.
स्वतःच्या आयुष्यात असंख्य संकट असतात तरी प्रसिद्ध व्यक्ती ची माहिती अपडेट ठेवणे.
त्यांना काही भासमय संकट आले की ह्यांनी दुःख करून घेणे .
त्यांना फक्त बघण्यासाठी धडपड ने .
ही नक्की काय मनोवृत्ती आहे.

अमितभच्या ट्विटरवर लोक त्याला सुशान्त सिंग राजपूत आणि बॉलीवूडमधलं नेपोटिझम, सो कॉल्ड दडपशाही यांच्याबद्दल आवाज उठवायला सांगताहेत.
घोडा घास से दुश्मनी करेगा?

Pages