आणि बिग बी चिडले

Submitted by आशुचँप on 29 July, 2020 - 02:08

आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/t...

त्याला पार अगदी हिरण्यकशपूची पण उपमा दिली आहे.

हे असे ट्रोलर तर पैशाला पासरी पडले आहेत पण या अशा अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या गटार कॉमेंटकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते. इतके महत्व देऊन त्याचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल आता.

यामुळे तर आता चर्चेला उधाण आले असून १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली तेव्हाही अमिताभ यांनी असेच वादग्रस्त उद्गार काढले होते अशी आठवण काहींनी सांगितली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख वाचला. खूपच हास्यास्पद लेख. हास्यास्पद यासाठी की जी लिंक दिली आहे त्यात बच्चन बोलतोय माझे 90 मिलियन फॅन्स आहेत. 90 मिलियन म्हणजे 9 कोटी होतात पण हा गोंडस आशुचाम्प किती गोंधळून गेलाय बघा मुख्य लेखात बोलतोय 90 कोटी फॅन्स आणि एका कमेंटमध्ये बोलतोय 90 लाख फॅन्स (
माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील
, ते आहेच हो पण आता त्यांचे 90 लाख चाहते आहेत ) काय रे नक्की किती फॅन्स आहेत 90 लाख, 9 कोटी की 90 कोटी? एकतर याला शाळेत गणित शिकवलं नसावं किंवा हा कॉपी करून पास झालाय. Rofl Rofl Rofl

आले आले स्ट्रेंजर राव आले
चला धाग्याला शोभा आली
होऊन जाऊ दे आता कलगीतुरा

चल रे हो सुरू निब्या Happy

गंमत आहे तिकडे निब्बा ला फटके देतो म्हणलं तर राग इकडे
बरंय अर्थात, या धाग्याची टीआरपी वाढतीय तर

माझा फुल्ल सपोर्ट रे तुला
आणि नेहमीसारखी काहीतरी भन्नाट (भास्कर नव्हे) येऊ दे
गेल्या वेळी लैच मिळमिळीत बोलत होतास, भेंडीची भाजी खाऊन आल्यासारखा

आता तरी मजा येऊ दे

मला तरी अज्जिब्बातच ही कमेंट बच्चन ची वाटत नाही. बच्चन अस विस्कळीत कधीच लिहिणार नाही अगदी झोपेत सुद्धा अस आपलं त्याचा लिहिण्याचा पॅटर्न बघता वाटत. शिव्यासुद्धा अगदी शुद्ध इंग्लिश/हिंदी मध्ये देईल. असं आपल मला वाटत.

सविस्तर कॉमेंट आता वाचली.
एकूणच मलाही आता ही बच्चन यांची कॉमेंट वाटत नाहीये.
पण सध्या मिडीयाने बच्चन यांना कोरोना झाला या न्यूजला जे महत्व दिलेय त्यामुळे अनेकांना हे रुचले नाहीये.
खरे तर यात मिडीयाची चुकी म्हणू शकतो.
पण यू नो, हुमायून नेचर
त्या लोकांना आता बच्चन साहेबांचा राग आलाय
अश्याच एकाचा हा खोडसाळपणा दिसतोय.

अश्याच एकाचा हा खोडसाळपणा दिसतोय.>>>>>

बच्चन यांच्या व्यक्तिगत ब्लॉग वर लिहीले आहे बेंबट्या
आता यात मिडीयाची काय चुकी ते सांगणार का
का फावल्या वेळात तिथल्या लोकांनी आजोबा झोपले आहेत हे बघून हळूच त्यांचा मोबाईल पळवला आणि त्यावर ब्लॉग लिहीला ???

जा बाळा उत्तर शोध नन्तर आपण चर्चा करू

अरे बेंबट्या दिलंस ना तु उत्तर वरती, उत्तर मिळाल्यावरही गुगल करायला मी काय स्ट्रेंजर आहे का निब्बा आहे का शाखा आहे?

का फावल्या वेळात तिथल्या लोकांनी आजोबा झोपले आहेत हे बघून हळूच त्यांचा मोबाईल पळवला आणि त्यावर ब्लॉग लिहीला ???
>>>>>
मोबाईल पळवायची गरज नाही.
हॅकींग वॅकींग जमणे पुरेसे ठरावे

हॅकींग वॅकींग जमणे पुरेसे ठरावे>>>>>

आख्खा ब्लॉग????
त्यापेक्षा मोबाईल पळवल्याची कथा जास्त पटण्यासारखी आहे Happy

चमत्कार पे चमत्कार किये अपने तो. 1 मिलियन म्हणजे किती हे माहीत नाही. Rofl तुमच्या गणिताच्या सरांना माहीत नाही ना तुम्ही इथे लिहिता ते. आघात होईल हो त्यांच्या थकलेल्या नाजूक हृदयावर.

ICE >>>>

मला एकच माहीती आहे, तो मी ग्लासात टाकतो दारूसोबत Happy

आघात होईल हो त्यांच्या थकलेल्या नाजूक हृदयावर.>>>>

वारले ते मागेच, माझं गणित बघून
आता काय करावं बरं

तु बराच माहीतगार दिसतोस, अज्ञानी मधला नी पहिला का दुसरा हे पण तुला नक्की माहीती असणार Happy

चांगलय, टाकत रहा पोस्ट, मला मज्जा येतीय

हॅकींग वॅकींग जमणे पुरेसे ठरावे>>>>>

आख्खा ब्लॉग????

>>>
मला काही कल्पना नाही याची
अख्खा ब्लॉग अर्धा ब्लॉग असे तुकड्यात हॅक करता येते का हे सुद्धा माहीत नाही
फक्त एक अंदाज
हरिवंशराय यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन अशी भाषा वापरणार नाही

माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी एकदा शाहरूख नवीन असताना त्याला मिडीयामध्ये वाद टाळायला कसे वागावे, काय बोलावे याचे सल्ले दिलेले.
फार जुनी गोष्ट आहे जेव्हा शाहरूखवर दिलीपकुमार यांचा अभिनय केल्याचे आरोप व्हायचे आणि तो भडकायचा.
तसे त्याचा एक डायलॉगही तेव्हा गाजलेला.. बाकी सब अच्छे है.. पर मै इनसे थोडा बेटर हू.. आय अ‍ॅम द बेस्ट

असो, एकूणच या माणसाला माहीत आहे चारचौघात आणि मिडिया समाजमाद्यमात कसे बोलावे..

माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी एकदा शाहरूख नवीन असताना त्याला मिडीयामध्ये वाद टाळायला कसे वागावे, काय बोलावे याचे सल्ले दिलेले
>>>> हो आणि त्या एआयबीच्या मुलाखतीत पण एक भारी किस्सा सांगितलेला त्याने. त्याला अमिताभ यांनी स्टेजवर जाण्यापूर्वी काय करावे याचा सल्ला दिलेला तो. सिरियसली मला ती मुलाखत आवडते. बाकी शाखा अजिबात आवडत नसला तरी. दिलखुलास बोललाय.

हरिवंशराय यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन अशी भाषा वापरणार नाही
>>>

हो ना, आश्चर्य त्याचेच वाटत आहे की कसे काय असे

Pages