आणि बिग बी चिडले

Submitted by आशुचँप on 29 July, 2020 - 02:08

आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/t...

त्याला पार अगदी हिरण्यकशपूची पण उपमा दिली आहे.

हे असे ट्रोलर तर पैशाला पासरी पडले आहेत पण या अशा अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या गटार कॉमेंटकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते. इतके महत्व देऊन त्याचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल आता.

यामुळे तर आता चर्चेला उधाण आले असून १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली तेव्हाही अमिताभ यांनी असेच वादग्रस्त उद्गार काढले होते अशी आठवण काहींनी सांगितली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचकांची ????

स्वत:ला अनेकवचनी म्हणून घेतोस बेंबट्या??
तुला एकट्यालाच शंका आहे तर तसे म्हण ना,
थेट विचार ना घाबरतो कशाला लेका, लोकांच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवतो ?

मी अमिताभ सोबत आहे Lol
>>>>

त्यांचा मोबाईल ठेऊन द्या बरे, म्हाताऱ्या माणसाची अशी चेष्टा करू नये Happy

आय्सोलेशनमुळे बच्चन साहेब त्या बेनामी ट्विट नंतर स्नॅप झाले. बाकि काहि नाहि. पण त्यांच्या रिअ‍ॅक्शनच्या अर्थाचा अनर्थ झाला आहे, असं वाटतं. "ठोक दो साले को" याचा शब्दशः अर्थ ९ कोटि समर्थकांपैकि कोणितरी जाउन त्याचा गेम करावा असा नाहि. वेदरिंग द स्वाइप स्टॉर्म म्हणजे त्या बेनामी हँडलला आता बच्चन साहेबांच्या समर्थकांच्या ऑन्लाइन रॅथ/फ्लेम्स/झळीला तोंड द्यावं लागणार आहे. अर्थात, ट्विटरवरंच...

>>आणि extermination family चा अर्थ ??<<
तो हि त्या संदर्भातंच लावा. हे असे बेनामी ट्रोल्स कसे धारातिर्थी पडतात याची क्ल्पना माबोवरच्याच उदाहरणांवरुन तुम्हाला येइल...

सगळेच शाब्दिक घ्यायचं तर मग ती कमेंट पण घ्यायला पाहिजे
आपल्याकडे नाही का मर की मेल्या म्हणतो
पण खरोखरच मरावं असं थोडीच वाटत असतं
तशी ती कमेंट असेल तर?

>>सगळेच शाब्दिक घ्यायचं तर मग ती कमेंट पण घ्यायला पाहिजे<<
याबाबत सहमत. परंतु त्यांची मानसिक स्थिती त्यावेळेस काय होती, घरुन आलेलं जेवण बेचव, नावडती भाजी इ. होतं का, याची आपल्याला क्ल्पना नाहि. Happy त्यात भर एकटेपणाची. सो लेट्स असुम हि जस्ट स्नॅप्ड. शेवटि काय, तर सगळ्यांचे पाय मातीचेच असतात...

बच्चन साहेबांनी ऋन्मेऽऽष दादा चा आदर्श घेतला पाहिजे जो एवढं ट्रोलिंग होऊन सुद्धा किती संयमित पने वागतो

Submitted by @निलेश on 29 July, 2020 - 23:29
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी30 मिनिटे 26 सेकंद

>>

जोडा आता हे सुद्धा माझ्या खात्यात
लवकरच बच्चन साहेबांचा धागा हायजॅक केल्याचे पातक येऊ द्या माझ्या माथी Happy

फा ला अनुमोदन! फारच आउट ऑफ कॅरेक्टर वाटते आहे हे पोस्ट. कारण काहीही असले तरी हे ट्रोलीम्ग असे काय विशेष आहे? त्याने आयुष्यात याहून भरपूर अवघड उतार चढाव पाहिलेत की. कधी अशी रिअ‍ॅक्शन पाहिलेली नव्हती म्हणून आश्चर्य वाटले. >> +१

राज यांच्याशी सहमत

पण मला अजून वाटतंय की त्या ट्रोलर चा स्क्रीनशॉट टाकून भारी सिपंथी खेचता आली असती

आणि सिम्बा यांचा तर्कही खरा वाटतो
नव्या पिक्चर साठी कोण काय करेल
ते मागे ती सई ताम्हणकर होती तिनेही असाच काहीतरी स्टंट केला होता
बॉलिवूड मध्येही कोणीतरी मेलं म्हणून बातम्या आल्या आणि नंतर कळलं की तो प्रमोशन चा भाग होता
तसाच एखाद्या त्रासदायक फॅन वर येत असेल तर
किंवा ट्रोल 2.0 असा मुव्ही येत असेल तर?

तो अमितवने दिलेला ब्लॉग आहे ना बच्चनसाहेबांचा? त्यानंतर २-३ पोस्ट आल्यात की त्यांच्या. आणि एकात पुन्हा लिहीलंय, 'ठोकना तो है ही...' वगैरे वगैरे... म्हणजे या धाग्यातले वक्तव्य त्यांचेच आहे हे निश्चीत, नाहीतर एव्हाना त्यावर काहीतरी प्रतिसाद आला असता.
खरंच आश्चर्य वाटलं या भाषेबद्दल.
जे तसेच लिहितात नेहमी त्याबद्दल काही वाटेनासं होतं पण आयुष्यभर जनमानसातली प्रतिमा जपत आलेल्या, नेहमी लोकांसमोर तारतम्य वापरुन बोललेया व्यक्तीने असे लिहावे हे खूप आश्चर्यजनक आहे.

Man trolls Amitabh Bachchan, writes 'I hope you die with this COVID';
>>>>>>

कोणीतरी या माणसालाही चार शब्द सुनवा
सगळे अमिताभलाच का जज करत आहात?

उपचार/औषधे/चिडचिडेपणा/एकाकीपणा/मेंदूला ओ2 सॅच्युरेशन कमी झाल्याने कमी झालेला रक्तपुरवठा/सोडियम ची कमतरता/ट्रोलर्स ने अजून काहीतरी आपल्याला माहीत नसलेलं केलेलं कृत्य.
(प्रत्येकाचे चांगले वाईट दिवस असतात.कितीही विवेकी वगैरे माणूस असला तरी कधीतरी संयम सुटत असेलच.)
बाकी खरं खोटं कळेलच काही दिवसात.

कोणीतरी या माणसालाही चार शब्द सुनवा
>>>>

चार शब्द तुला सुनवण्याची गरज आहे बेंबट्या, कायमच कसे सिलेक्टिव्ह वाचतोस
आयुष्यात एकदा तरी पुर्ण पोस्ट, प्रतिसाद वाचण्याचे कष्ट घे की
कायम फक्त सोयीस्कर तेवढे वाचतोस

आशुचॅम्प मी तुम्हाला नाही पण एकूणच या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांना बोलत आहेत
आणि माफ करा आपणही धाग्याचे नाव बिग बी का चिडले करत त्यांच्यावरच फोकस ठेवलाय.
पण त्यांना चिडवणारा मात्र बॅकफूटला गेलाय. त्याच्यावर मारा की फोकस. शीर्षकातही घ्या त्याला. की बिग बींचे नाव तुम्हाला धाग्याचा टीआरपी वाढवायला हवेय शीर्षकात.

एखादा फेमस माणूस चिखलात उतरून डुकराशी मारामरी करत असेल तर आपण फोकस कुणावर करुया

त्या फेमस माणसावर का त्या डुकरावर
तुला काय वाटतं?
नाव का लपवत असतील लोक? खरे नाव द्यायला का बरे लाजतात, आपली ओळख का देत नाहीत?

अनामिक भेकड व्यक्तीला इतके महत्व देऊ म्हणतोस
>>>>>

टिका करणे म्हणजे महत्व देणे??

चोराला महत्व का द्यायचे म्हणून सोडायचे आणि सन्याशी कधी चुकतोय आणि आम्ही त्याला कधी आडे हात घेतोय याची वाट बघायचे
वाह रे अल्लारखा ! अजब तेरी कुदरत अजब तेरा न्याय !!!

अजून नक्की कुठल्या शब्दात टीका करून हवीय ते स्पष्ट सांगावे, मागणीप्रमाणे शिव्या दिल्या जातील.

गिऱ्हाहिकांचा संतोष हीच आमची पावती
कृपया ऑर्डर आगावू नोंदवावी
ऐनवेळी येऊन राडा घालू नये
दुकान दुपारी १ ते ४ बंद असेल,
शटर खटखट वाजवू नये, अपमान केला जाईल

त्या फेमस माणसावर का त्या डुकरावर
तुला काय वाटतं?

>>>

(वराह अवराताची क्षमा मागून, कोणत्याही प्राणीमात्राला कमी लेखू नये, पण आपण डुकराचा हिणकस उल्लेख केलाच आहे तर ते उदाहरण नाईलाजाने घेतो. यावर मी स्वतंत्र धागा काढेनच)

मी तर डुकराला पहिली गोळी घातली असती !

फेमस माणसाला चार शब्द सुनावून कदाचित मला प्रसिद्धी मिळाली असती. पण अशी कोणावर टिका केलेली प्रसिद्धी मला नको.

यावर मी स्वतंत्र धागा काढेनच>>>>

धडकी भरवणाऱ्या धमक्या देऊ नयेत सारख्या

सारखा सारखा तुच काय, बाकीच्यांना पण काढू दे धागा

जरा बाकीची पण कामं कर, पसारा आवर थोडा

मी तर डुकराला पहिली गोळी घातली असती !

>>>>>

हेच ते बिग बी म्हणत आहेत, त्यांचे सो कॉल्ड फॅन्स जे थेट गोळी घालायला जातील. तुझ्यासारख्या बिनडोक भक्तगणांमुळेच ही भाषा आहे. आदर्श मानायचे आणि समाजविघातक कृत्ये करायची त्याच्या इशाऱ्यावर.

सुधरा रे, जगात अन्यही आदर्श आहेत

ऋन्मेष, त्या माणसाचे तर चुकले आहेच. पण त्याला उत्तर द्यायची 'अशी' भाषा बच्चन साहेबांकडुन अपेक्षित नव्हती म्हणुन सगळे याबद्दल बोलत आहेत.
कदाचित मी-अनु म्हणते आहे तसे, सध्या जगात परिस्थितीच अशी आहे भल्याभल्यांचा तोल सुटु शकेल तसाच त्यांचाही तोल सुटला असेल.

Pages