आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/t...
त्याला पार अगदी हिरण्यकशपूची पण उपमा दिली आहे.
हे असे ट्रोलर तर पैशाला पासरी पडले आहेत पण या अशा अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या गटार कॉमेंटकडे दुर्लक्ष करता येऊ शकले असते. इतके महत्व देऊन त्याचा उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल आता.
यामुळे तर आता चर्चेला उधाण आले असून १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली तेव्हाही अमिताभ यांनी असेच वादग्रस्त उद्गार काढले होते अशी आठवण काहींनी सांगितली आहे.
Submitted by भरत. on 29 July,
ओके आशुचॅम्प
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 13:31 >>> सॉलिड कमेण्ट
बिग बी ना मायबोलीवर 6 महिने
बिग बी ना मायबोलीवर 6 महिने बोलवावे,
इकडे बाप, बापाचा बाप, जात, धर्म सगळ्या सगळ्याचा उद्धार करून मिळेल, त्याने त्यांना ट्रोलिंग ला तोंड देण्याची मानसिक ताकद येईल.
भरत
भरत
पण ही भाषा बिग बी सारख्या
पण ही भाषा बिग बी सारख्या व्यक्ती कडून अपेक्षित नव्हती>>>>+१.
जाऊ द्या हो. त्याला कुणी मर
जाऊ द्या हो. त्याला कुणी मर म्हटल्यावर तो हेच म्हणणार.
KBC मध्ये कॉम्युटरला
KBC मध्ये कॉम्युटरला कॉम्प्युटरजी म्हणणार्या बीग बींच्या तोंडी ही भाषा. करोनामुळे आणखी काय काय पहावं लागणार आहे काय माहित.
त्याला कुणी मर म्हटल्यावर तो
त्याला कुणी मर म्हटल्यावर तो हेच म्हणणार.>>> असं कसं. मायबोलीच्या राजकारणी धाग्यांवर चर्चा करत असता तर घराचा पत्ता शोधत येऊन डोक्यात दगड घातला असता या माणसाने.
राहून राहून तेच वाटतंय
राहून राहून तेच वाटतंय
त्यांना मायबोलीवर घ्यायला हवं होतं
इथल्या बोल बच्चन कडून चार गोष्टी शिकले असते
(No subject)
सेलिब्रिटीला करोना झाला तर
सेलिब्रिटीला करोना झाला तर वेगळा धागा का?
आणि
सेलिब्रिटी चिडला तर वेगळा धागा का?
>>>>
दोन्ही धाग्यांचा वेगळा होता
कोरोना धागा - उद्देश - अमिताभसाठी प्रार्थना करूया _/\_
बिग बी चिडले धागा - उद्देश - चला अमितजी चूकीचे वागले की बरोबर हे जज करूया. आणि मग चुकीचे वागले असतील तर त्यांना चार बोल सुनावूया.
मी वाचलेले नाही काहीच....
मी वाचलेले नाही काहीच.... किती वाजता लिहीलेय? कदाचित झोप आली म्हणून लेकाला सांगितले असेल रिप्लाय द्यायला. त्याने आधी ऐकलेले वेबसिरीजचे संवाद लिहीले असतील, मुलं काय ऐकलेलं बोलतात....
किंवा पुढच्या वेबसिरीजचे, तो पाठ करत असलेले संवाद लिहीले असतील चुकून.... आपण कसे पाठांतर एकदा लिहून बघतो....
पण ही भाषा बिग बी सारख्या व्यक्ती कडून अपेक्षित नव्हती >>>
हा धागाही आशुचँपकडून अपेक्षित नव्हता. मायबोलीचे टिवटिव करायचेय का. फारतर नानावटीतील बच्चनांवर आधीचे पोते आहे त्यात एका प्रतिसादाची भर टाकायची. या घटनेचे दखलमूल्य तेव्हढेच, माझ्या मते..... तुम्ही वैयक्तिक घेऊ नका.... कुणाचाही धागा असता तरीही मी हेच लिहीले असते किंवा दुर्लक्ष केले असते.
का बरे धागा माझ्याकडून
का बरे धागा माझ्याकडून अपेक्षित नसायला काय झालं?
मी यापूर्वीही चालू घडामोडी वर काढले आहेत धागे
एक अभिनेता ज्याला अनेक जण आदर्श वगैरे मानतात तो असा रस्त्यावरच्या गुंडासारखा तुला बाप माहिती नाही, माझी लोकं तुला खलास करतील वगैरे ब्लॉग लिहितो ही जर दखल घेण्यासारखी घटना नसेल तर मग फक्त मोदींनी थाळ्या वाजवून कोरोना घालवला याची दखल घ्यावी लागेल
वाचा वरती अजून आरत्या सुरूच
वाचा वरती अजून आरत्या सुरूच आहेत भक्तांच्या
निदान कोरोना मधून बरं होत
निदान कोरोना मधून बरं होत आल्यावर तरी असं बोलायला नव्हत पाहीजे!
पण हेच जर का शहारुख बोलला असता तर एवढी चर्चा भरवली असती का?
अमिताभ यांच म्हातारपण सुरू आहे म्हणून उगाच ट्रोलिंग चाललय त्यांवर...
"Submitted by बोकलत on 29
"Submitted by बोकलत on 29 July, 2020 - 07:48"---> मीम आवडला बोकलत भाऊ
शाहरुखचे भक्त आहेत इथे, ते
शाहरुखचे भक्त आहेत इथे, ते दिवसातून दहा वेळा जप करतात
तेच काढतील
ते शाखामृग शिंकला खोकला तरी धडकी भरून धागा काढतील
ठोक दो साले को
ठोक दो साले को
हे अगदी
गो ली मारो को सालों को च्या चालीवर वाचता येतं
तुला तुझा बाप माहीत नाही,
तुला तुझा बाप माहीत नाही, तुझं मॉब लिंचिंग होईल असं लिहिलं यावरही चुकीचे वागले की बरोबर हे जज करायला वाव आहे.
वा वा!
>>थोड्याच वेळात 'माफी, मी
>>थोड्याच वेळात 'माफी, मी नाही लिहिले, अकाउंट हॅक झाला होता वगैरे स्पष्टीकरण येईल बघा
+१. हेच होईल असं मलाही वाटतंय. असं खरंच झालेलं असूही शकेल कदाचित. मागे ऋषी कपूरच्या शेवटच्या दिवसांत त्याचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ पोस्ट केला गेला होता. इथेही त्यांचा फोन घेऊन कोणीतरी खोडसाळपणा केलेला असू शकतो. बाकी कम्प्यूटरजी वगैरे बद्दल म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टी किती स्क्रिप्टेड असतात हे सांगायला नको. खरा माणूस दिसत नाही आपल्याला. सगळे मुखवट्यामागे दडलेले चेहरे.
पण बिग बी अजून हॉस्पीट्लात का
पण बिग बी अजून हॉस्पीट्लात का बरे आहेत? दोन आठवडे होऊन गेले की! त्यांच्याकडे घरातील खोलीच काय आख्खं घरंच आहे क्वारंटाइन व्हायला.
स्वप्ना_राज पोस्ट >>> +१
काल रात्री वाचले हे- ती
काल रात्री वाचले हे- ती पोस्टसुद्धा खूप विस्कळित आहे - सुरूवात ऐश्वर्या व आराध्या बद्दल आणि नंतर त्या ट्रोल बद्दल. त्याने "You shall be weathering the swipe storm...." असे लिहीले आहे. त्यावरून माझा अंदाज आहे की त्याला "ऑनलाइन" संदर्भाने म्हणायचे असावे. पुढच्या एक दोन पोस्ट्स मधे आणखी कळेल.
प्रत्यक्षात त्याला याबद्दल काहीही वाटत असेल. पण त्याची ऑनलाइन/पब्लिक स्पीकिंग हिस्टरी पाहता तो इतके खुले आम कोणाला मारण्याबद्दल लिहीणार नाही. तसे असेल तर इतकी चीड आणण्याइतके काहीतरी नक्की झाले असेल. जेव्हा इंदिरा गांधी/राजीव गांधींपासून सर्वांशी त्याचे घनिष्ट संबंध होते, जेव्हा त्याला कोणीही टच करू शकले नसते, तेव्हाही तो कधी माज करत नव्हता. आता काही फुटकळ कारणावरून असे करेल याची शक्यता कमी आहे.
That said, त्याने खरोखरच रिअल लाइफ अर्थाने म्हंटले असेल तर त्याचे समर्थन नाहीच. मी फॅन आहे तो पडद्यावरच्या अमिताभचा. त्याने वैयक्तिक आयुष्यात चुका केल्या तर त्याला सपोर्ट नाही. हे वरचे जे लिहीले आहे ते अमिताभ माणूस म्हणून भारी आहे वगैरे अर्थाने नाही. पण त्याचे जाहीर वागणे हे सर्वांशी जुळवून घेत, कोणाला न दुखावता असेच सहसा असते. हे एकदम आउट ऑफ पॅटर्न आहे. त्यामुळे या मागे आणखी काहीतरी असणार.
बाफ काढल्या बद्दल धन्यवाद.
बाफ काढल्या बद्दल धन्यवाद. परवा ते वाचल्यावरच व्यक्त व्हायचे होते. पण तिथे नव्हे.
आमच्या ऑफिसातील एक मुलगी करोना होउन बरी होउन परत आली ती म्हणे आजारी लोक असे दिसतात आणि असे खोकतात की बघवत नाही तरी तिचा वॉर्ड कमी व सौम्य लक्षणे असलेल्या रोग्यांचा होता . पुढला वार्ड अधिक वाइट लक्षणे वाला होता. त्या पुढे आय सी यु व व्हेंटिलेटर. ह्या काकांचा आजार नक्की काय लेव्हलचा आहे त्याचे काहीच अपडेट बाहेर येत नाहीत. उगी च फिलॉ सॉफिकल ट्वीट नाहीत तर मग असे.
क्वारिंटाइन पिरी अड संपून दोघे एव्हानी घरी यायला हवे होते. सेलिब्रिटी म्हणाल तर टोम हँक्स व बायको ह्यांना अगदी मार्च एंड एप्रिल मध्ये करोना झाला व ते आता पूर्ण बरे होउन कामाला लागले आहेत.
आजारात डोके हलके होते. त्यात
आजारात डोके हलके होते. त्यात वृद्धावस्थेत चटकन राग, रडू वगैरे भावना उचंबळतात. एकटेपणा वाटू शकतो. दुर्लक्षित पडल्याची भावना होते. तेव्हा सहसा आपण एका कानाने ऐकतो व दुसर्याने कानाने सोडुन देतो. सेलेब्रिटी असल्याने ही क्षमा त्यांना नाही करु शकत लोक - असे दिसते आहे.
प्रसिद्धी ही दुधारी तलवारच असते. हेच खरे.
सेलेब्रिटी असल्याने ही क्षमा
सेलेब्रिटी असल्याने ही क्षमा त्यांना नाही करु शकत लोक - असे दिसते > जिनोसाइड किंवा माझी फॅन फॅमिली एक्स्ट्रमिनेशन फॅमिली आहे. कधीही मी त्यांना ठोको सालो को अशी ऑर्डर देउ शकतो हे वाक्य जरा डेंजर झोन मधील आहे अहो बाई. भारतातले इमोशनली चार्ज्ड वातावरन बघता असे हिंसेस उद्युक्त करणारे विधान शक्यतो करू नये. ट्रॉलिन्ग न पटल्यास डिग्निफाइड सायलेन्स मेंटेन करणे, थोडे दिवस डी अॅक्ती व्हेट करणे असे ही उपाय आहेत. त्यांची सर्व डिजिटल अकाउंट व पी आर बघायला पैसे देउन लोके ठेवलेलीच अस्तील .
>>>>हे वाक्य जरा डेंजर झोन
>>>>हे वाक्य जरा डेंजर झोन मधील आहे अहो बाई>>>> खरे आहे. हलक्या डोक्याचे तसेच विघ्नसंतोषी लोक, समाजविघातक कार्याकरता, खून आदि ...उद्युक्त होउ शकतात.
ते आहेच हो पण आता त्यांचे 90
ते आहेच हो पण आता त्यांचे 90 लाख चाहते आहेत
रोज शुभेच्छा, आशीर्वाद, प्रार्थना यांचा पाऊस पडत असणार
लोकं यज्ञ वगैरे पण करतात
तर अशा पॉझिटिव्ह गोष्टी ढिगाने समोर असताना एका कुठल्या तरी भेकड अनामिक व्यक्ती चे एक वाक्य इतके टोचावे?
ठिके टोचले तर राग येऊन चार शिव्या दिल्या असत्या मनात तरी ठीक
अक्खा ब्लॉग लिहायला घेतला, त्या भेकड व्यक्तीच्या लेव्हल ला जाऊन भाषा वापरली आणि सोशल।मिडीयावर टाकले यात नाही म्हणत तरी वेळ गेला असेल ना
याऐवजी बघा हे लोक माझ्या मरणाची अपेक्षा करत आहेत असे म्हणून स्क्रीनशॉट टाकला असता तर सगळं फॅन त्या अनामिक व्यक्तीवर तुटून पडला असता
स्वतः महानायकला चिखलात उतरण्याची गरजच नव्हती असे माझे वैयक्तिक मत
बच्चन असं काही करेल असं मुळीच
बच्चन असं काही करेल असं मुळीच वाटत नाही. तो प्रत्येक शब्द जपून वापरतो. आजवर वापरलाय. असा एका फडतूस विधानाने नाही घसरणार. कुछ गडबड है दया..
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan
@SrBachchan
Level 1:
T 3609 - संसार में गऊ बनने से काम नहीं चलता, जितना दबो, उतना ही दबाते हैं।
- प्रेमचंद
खूपच बिघडलंय.
सलग तीन ट्वीटना तोच नंबर दिलाय. आधी नंबर चुकला की ते सांगायचे, या ट्वीटचा बरोबर नंबर हा हा आहे म्हणून.
काय गडबड असेल तर येईलच लवकर
काय गडबड असेल तर येईलच लवकर स्पष्टीकरण
सोबत ड्रायव्हर, नोकर, स्वयंपाकी कोणी नव्हते का ज्यांनी मोबाईल हाताळला असे सांगता येईल?
फा ला अनुमोदन! फारच आउट ऑफ
फा ला अनुमोदन! फारच आउट ऑफ कॅरेक्टर वाटते आहे हे पोस्ट. कारण काहीही असले तरी हे ट्रोलीम्ग असे काय विशेष आहे? त्याने आयुष्यात याहून भरपूर अवघड उतार चढाव पाहिलेत की. कधी अशी रिअॅक्शन पाहिलेली नव्हती म्हणून आश्चर्य वाटले.
Pages