चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

लगेच सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे शक्य होणार नाही. कदाचित अगदी १००% बहिष्कारही शक्य होणार नाही. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करायला सुरुवात केली तर हरकत नसावी. ज्यांना असा बहिष्कार घालणे चुकीचे अथवा हास्यास्पद वाटत आहे त्यांनी अधिक प्रमाणात चिनी वस्तू खरेदी कराव्यात.

आपली भावना, आपली कृती.

बरीच चिनी ऍप, चिनी वस्तू बघत होते आणि त्या माझ्याकडे आधीपासूनच नाहीत(एकंदर ऍप वापरायच्या आळशी पणातून) हे पाहून बरं वाटलं
फोन चिनी आहे तो मला मोठ्या स्क्रीन मुळे लिहायला आणि व्हिडीओ ला लागतो.तो पुढची 3 वर्षं बदलेन असं वाटत नाही.

काही जण फारच पराभुत मानसिकतेमध्ये जगत असतात.
चीनी राक्षसाचा प्राण व्यापार नावाच्या पोपटात आहे हे माहित असुनही त्या पोपटाचे पीसही आपण उपटु शकत नाही हेच सांगण्यात धन्यता मानत असतात.

Admin ना सांगून चीनी संकेतस्थळाबद्दलचे मायबोलीवरचे धागे उडवण्यापासून सुरुवात करावी

माझ्या समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट उदा:
सॅमसंगची स्क्रिन, एच-पीचा (इंटेल) कंप्युटर्, ऑफिस टेबल, चेअर, माऊस, कीबोर्ड, टायकॉडरोगा पेन्सिल्स (नाव अमेरिकन, मेड इन चायना), पिक्सल फोन(तैवान.... वन चाय्ना पॉलिसी???), अगदी चहाचा कप, प्र-त्ये-क इलेक्टॉनिक कंपोनंट, खुर्चीच्या खालचं कार्पेट.... अगदी यच्चयावत गोष्टी मेड इन चायना आहेत.
परवा आयकियात मेड इन इंडीया कंटेनर दिसले. ते आणले एक - दोन. Happy

इंडीव्हिज्युअल पातळीवर आपल्याला रुचेल पटेल ते करावे. यावर डाऊन-अप अप्रोच शिक्षण आणि जागृती साठी महत्त्वाचा आहे, पण परिणामकारक अजिबात नाही. त्यासाठी लोकल बनावटीचे गुणवत्ता आणि किंमत्तीशी तडजोड न करता बनवलेले आल्टरनेटिव्ह तयार होण्यासाठी सरकारी दृष्टीकोन आणि आडमुठेपणा न दाखवत केलेली मदत हवी आहे. किम्मत मॅच करण्यासाठी भरघोस करसवलती, स्टॅटेजिक करारमदार, आयातीवर स्टॅटेजिक निर्बंध, ते ही आंतरराष्टीय कराराच्या चौकटीत राहून, कामगार कायदे, जागेची तरतूद, वीज, रस्ते इ. सतत आणि सतत चालू ठेवणे याशिवाय गत्यंतर नाही. आपण अमेरिका नाही. भारताची बाजारपेठ मोठी आहे, पण ती मॉनेटाईझ करणं फार्फार जिकिरीचं आहे, त्यातुन फायदा नगण्य होतो ही आंतरराष्ट्रीय तक्रार आहे. त्यामुळे दबावगट तयार करायला भारताला त्रास पडतो. जास्त उद्योगधंदे भारतात आले तर जीडीपी वाढणे, जीवनमान उंचावणे आणि भरभराट होणे हे होऊ शकेल. ते करायची विंडो सरत आलेली आहे.
फेसबुकवर फोटो टाकून संपणारा विषय नाही. काही दशके काम केलं तर बदल घडेल.

Screenshot_2020-06-23-07-31-47-143_com.android.chrome.png some one shared this on what's app.

When a colonised country rejects goods from the coloniser, it's called a boycott.

When a government encourages citizens to stop buying Chinese goods without banning their import, it's called a distraction.

@anishgawande·

Senior executives with leading Chinese brands, retail chains and ecommerce marketplaces said it has been business as usual for Chinese brands. Four leading cellphone and electronics retail chains said consumer sentiments towards Chinese brands have not changed since they are perceived to be of good quality and value for money.
https://m.economictimes.com/tech/hardware/chinese-phones-continue-to-rin...

रेव्यु, पुढच्या पानावर धागाकर्तीचाच एक प्रतिसाद आहे, त्यात म्हटलंय

"व्हिडिओ. त्यामागे तिची मेहनत, तिच्या क्रू ची मेहनत आहेच. आणि हे व्हिडिओ बनवण्यामागे तिला आर्थिक फायदाही आहेच. त्यामुळे ते कमर्शियल असतीलही. असोत बापडे."

मला आठवतय आम्ही लहान असताना काही लोक मातृ भाषेतुन शिक्षण कसे योग्य,जास्त चांगले,भारी असते असे भाषण देत. ते देताना जपान आणि तत्सम देशांचे दाखले. गम्मत म्हणजे ह्यांची मुले नातवंडे मात्र सेंट व्हिंसेंट, सेंट लॉयला , सेंट मेरी ,अशा शाळेत सापडत. मला आता कळतय ,त्यांना अ‍ॅडमिशनच्या वेळेस स्पर्धा नको असायची म्हणुन तो सगळा खटाटोप असायचा.
हे बॅन चायना हे अशाच दुट्टपी लोकांच्या डोक्यातुन निघालेले पिल्लु आहे.

रेवा२,
१. मातृभाषेतुन शिक्षण घेतलेले सर्व विद्यार्थी आयुष्यात केवळ - मातृभाषेतुन शिक्षण घेतले - या एका व एकाच मुद्यामुळे कमी पडले - याचा काही शास्त्रीय डेटा / पुरावा तुमच्याकडे आहे का?
२. तुमच्या लहाणपणी तुम्हाला भेटलेल्या एखाद्या व्यक्तीने (तुमच्या दृष्टीने) केलेली चुक, ही आज दुस-या भलत्याच विषयाला चुक/बरोबर ठरवण्याची चाचणी कशी काय होऊ शकते?
३. एखाद्या दुटप्पी व्यक्तीने किंवा समुहाने एखादा मुद्दा मांडला तर तो केवळ त्यांनी मांडला या एका मुद्यवरुन बाद ठरतो का? की इतरांनी तो मुद्द पडताळून शास्त्रीय पद्धतीने खोटा निघाल्यासच त्याला खोटा म्हणावे?

अमितव, सुरेख लिहिलयस. ह्या फेफरवाल्याचं आनि आपलं मत बराबर जमतं. >>> +१

जर सध्या "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा मार्ग" मोड आहेच तर हे आमचे दोन शब्दः रशियाला शह देण्याच्या नादात १९७१ साली निक्सन व किसिंजर जोडीने हे चीनचे भूत उभे केले व ते आता शेजारी देशांपासून ते अमेरिकेपर्यंत सर्वांच्याच डोक्यावर बसले आहे. लोकशाही नसलेल्या, फ्री प्रेस नसलेल्या कोणत्याही देशाकडे जगाच्या आर्थिक नाड्या असणे धोक्याचे आहे. तो प्रभाव कमी करण्याची प्रचंड गरज आहे. पण अमित ने लिहीले ते तसे हे काही वर्षे लागतील करायला. त्याकरता ठाम आणि दूरदर्शी सरकारी धोरण आवश्यक आहे. सुरूवात तेथून होईल. आजचे जे निर्णय असतील त्याचा फायदा ४-५ वर्षेतरी दिसणार नाही. जनरल पब्लिकला त्यातले काहीही कळणार नाही पण इतिहास तुम्हाला नंतर क्रेडिट देइल - याची तयारी ठेवावी लागेल. (अर्थान मनमोहन सिंगांनी याबाबतीत बरेच प्रयत्न करून सुद्धा त्यांचा केवळ "मौनीबाबा" च्या वर उल्लेख होत नाही. त्यामुळे जपानशी व्यापारी संबंधांचे श्रेय वगैरे तर सोडूनच द्या)

आज अमेरिकेची सौदी तेलाची गरज खूप कमी आहे. पण ही अवस्था यायला बरीच वर्षे गेली.

रेवा, स्वत:ची मुलं इंग्रजी माध्यमात शिकवून बंद पडणाऱ्या मराठी शाळांमधील गळा काढणारे लोक आहेत पाहण्यात.
गरिबांच्या मुलांसाठी त्यांना मराठी माध्यमाच्या शाळा टाकायला हव्या असतात.

आता EWS मुलांसाठी शाळांत जागा राखीव ठेवल्यावर त्यालाही विरोध करतात.

१. मातृभाषेतुन शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आयुष्यात केवळ - मातृभाषेतुन शिक्षण घेतले - या एका व एकाच मुद्यामुळे कमी पडले नाहीत - याचा काही शास्त्रीय डेटा / पुरावा तुमच्याकडे आहे का?
२. तुमच्या लहाणपणी तुम्हाला भेटलेल्या एखाद्या व्यक्तीने (तुमच्या दृष्टीने) केलेली चुक, ही आज दुस-या भलत्याच विषयाला चुक/बरोबर ठरवण्याची चाचणी कशी काय होऊ शकते?--कारण दोन्हीचा पुरस्कार करणारे अनेक लोक माझ्या बघण्यात एक सारखेच आहेत.
३. एखाद्या दुटप्पी व्यक्तीने किंवा समुहाने एखादा मुद्दा मांडला तर तो केवळ त्यांनी मांडला या एका मुद्यवरुन बाद ठरतो का? की इतरांनी तो मुद्द पडताळून शास्त्रीय पद्धतीने खोटा निघाल्यासच त्याला खोटा म्हणावे?-तो मुद्दा खोटा नसता तर एव्हाना चीनमधुन आयात बंदी झालीच असती. सरकार तर म्हणतय आम्ही अ‍ॅपसुध्दा अनईनस्टॉल करा असे कुठेही म्हंटले नाहिये.

Sad
माननीय रेवा२ जी, "क्लेम" तुम्ही केलाय. तेव्हा तुम्ही पुरावे / उत्तर द्या. मी इथे कोणताही क्लेम केलेला नाही.

मला वाटते रेवा 2 यांचा दावा असा होता की आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळाप्रवेशासाठी गर्दी आणि स्पर्धेला तोंड दयावे लागू नये म्हणून काही लोक मातृभाषेतून शिक्षण कसे योग्य, भारी, चांगले असते असे भाषण देत.

रेवांना जनरलायझेशन करुन 'विशिष्ट' लोकांना फटके मारण्यात इंटरेस्ट आहे हे मला ही दिसतं आहे. मराठी शाळा चांगल्या म्हणणारे चायना माल बॅन करा म्हणत आहेत असा बादरायण संबंध लावुन काय साधतात कोण जाणे.
माझ्या पाहण्यात मराठी शाळा चांगल्या म्हणणार्‍यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळांत घातलेलंच मी बघितलं आहे.

सामान्य लोक व राजे ह्यांना भिन्न नियम असतात

वाटीभर दुधात माशी पडली तर सगळे दूध ओतून देतात,

मोठ्या पातेलभर दुधात माशी पडली तर डावाने थोडे दूध व माशी फेकून देतात , उरलेले वापरतात

लोकांनी मोबाईल , खेळणी फोडली तरी मोदी पेटीएम सोडणार नाहीत आणि शहा बीसीसीआय मधली चायना पार्टनर्शीप मोडणार नाहीत

लगेच सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे शक्य होणार नाही. कदाचित अगदी १००% बहिष्कारही शक्य होणार नाही. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करायला सुरुवात केली तर हरकत नसावी.

>>> मामींच्या या वाक्याशी सहमत. बहिष्कार म्हंटले की पहिले तो फोन चायनीज आहे सांगायची गरज नाही. एकही चायनीज वस्तू वापरणार नाही अशी वेळ यायला बरीच वर्षे जातील. पण भारताशी काड्या केल्या तर धंद्यावर परिणाम होतो हे चीनला कळले तर काही वाईट नाही. ते ही चार लोकांनी ४-५ चायनीज वस्तू घेणे बंद करून होत नाही हे ही माहीत आहे. पण कोठेतरी सुरूवात व्हायला हवी.

एकच प्रॉब्लेम आहे ज्याचे उत्तर मला माहीत नाही - चीन वर व्हायचा तेव्हा परिणाम होईल. पण पहिला परिणाम भारतातीलच या गोष्टी विकणार्‍यांवर होईल - अनेकांचा पोटापाण्याचा उद्योग यावर अवलंबून आहे. राष्ट्रहित वगैरे वाल्या प्रत्येक ग्रॅण्ड स्कीम चा पहिला फटका हातावर पोट असलेल्यांना बसतो हे ही बरोबर नाही Happy म्हणूनच दूरगामी सरकारी धोरण हे सर्वात आधी हवे यात.

Pages