चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

मोदीजी पाकिस्तानला 4 कोटी कोविड डोस देणार म्हणे

100 रु ने गुणले तर 400 कोटी होतात.

ते 55 कोटी , गोडसेवाले कुठे गेले ?

<< मोदीजी पाकिस्तानला 4 कोटी कोविड डोस देणार म्हणे

100 रु ने गुणले तर 400 कोटी होतात.

ते 55 कोटी , गोडसेवाले कुठे गेले ? >>

------- आपल्या मोदींना तुम्ही साधे सुधे समजलात का... ब्यापारी दिमाग है.
लसींचे मोफत चाचण्या होणार... आणि मग लसीमागे ५००-६०० रुपयांना भारतियांना विकणार. पैसे देणार्‍यांचा आणि न देणार्‍यांचा अशा सर्वांचाच फायदा.

गमतीचा भाग सोडला तर शक्य असेल, आवाक्यात असेल तर अशा मदती करायला काही हरकत नाही. पण भारतातल्या १३५ कोटी जनते कडे आधी लक्ष द्या.... त्यांना पण वैज्ञानिक चाचणी पुर्ण केलेल्या लसी द्या. रामदेवबाबा बनावटीचे कोरोनिल नको.

https://www.businesstoday.in/sectors/pharma/patanjali-baba-ramdev-bal-kr...

२०२१ साल आहे. जमाना बदलला आहे. भोपाळच्या प्रज्ञा ठाकूर मंत्राचे पठण करुन शाप देते... आता गोळ्यांची अवशक्ताच नाही.

मागे नै का म. गांधींच्या कापडी पुतळ्याला ढिचकॅव .. ढिचकॅव ... ढिचकॅव करून त्यातून रक्तासारखे लाल द्रव बाहेर आल्यावर आनंदाने चित्कारले होते , तसा आनंद मंत्र शापाने मिळत नाही. त्यामुळे गोळ्या मस्ट .

इतक्यात काही नवे अ‍ॅप ( अर्थात चायनाचे ) बंद करायला सांगितले का?

अनेकांनी आधी अ‍ॅपस डिलीट केली होती मग मोदींचे वर गेलेले दोन्ही हात खाली आले, लालबुंद डोळे पण कमी लाल झाले त्यामुळे परत reinstall केले गेले.

वाणिज्य मंत्रालय म्हणते चीन सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे... २०२० मधे तर चीन या देशाने अमिरिकेचे अव्वल स्थान (trade partner) पण घेतले. ड्रॅगन परत आलाय...
https://www.bloomberg.com/news/articles/2021-02-22/china-returns-as-top-...

एक चांगली गोष्ट म्हणजे व्यावहारातली तफावत ( आयात निर्यात मधला फरक) कमी होते आहे.

Pages