युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात नेमकं लेग पीसेस आहे असं वाटलं तर बोनलेस पाकीट आहे.>> होते चान्गली बोनलेसने , मी मागच्या विक मधे केली होती छान होते, सामीची रेसिपी नव्हती वापरली युट्युबर होती कोणती तरी, लेग पिस पेक्षा कमी वेळ लागतो चिकन शिजायला हे फक्त लक्षात असु दे

कुठे लिहू हे कळलं नाही म्हणून इथे लिहितेय .

कपडे धुताना एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय . तर तो कसा घालवता येईल याबद्दल टिप्स मिळतील का ?

एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय .>>>> घरी कशानेही जात नाही लॉन्ड्रीत द्यावा लागेल.तो सांगेल तुम्हाला की रंग जाईल किंवा फिका होईल.सध्या ते शक्य नसल्याने तसाच बाजूला ठेवा.

कपडे धुताना एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय . तर तो कसा घालवता येईल याबद्दल टिप्स मिळतील का ? >>>>> पूर्ण पांढरा कपडा असेल तर laundry मध्ये सुपर वंडर वॉश करून पहा. किंवा मग ते ब्लिच करतात. पण जर प्रिंटेड असेल किंवा रंगीत असेल तर ब्लिच शक्य नाही. रंग कितपत लागला आहे त्यावर अवलंबून आहे की एका वॉशमधे धुतला जाईल की 3-4 वेळा laundry मध्ये द्यावा लागेल.
पांढरा सोडून इतर रंगाचा कपडा असेल तर त्याला तिलांजली द्यावी लागेल किंवा मग डाय करून परत वापरता येईल. मी माझ्या स्काय ब्ल्यू स्कर्टला काळा डाय करून पुढे एक दीड वर्षे वापरला. ( पुण्यात डायसाठी दुकान - रवलीन दुपट्टा - क्लोव्हर सेंटर, मोलेदिना स्ट्रीट बाजूने आत गेल तर 4-5वं दुकान आहे. म्हातारे सरदार अंकल आहेत)

पिवळ्या रंगाचा चुडीदार आहे . पायाकडील बाजूला निळा रंग लागलाय.

मी नेटवर बेकिंग सोड्याने रंग घालवता येतो अस वाचलं . हे कोणी केलय का ?
शेवटचा पर्याय Laundry मध्ये देणे हाच आहे.

रंगीत कपड्यावरचा रंग कश्यानेही जात नाही
हळूहळू धुत फिका होतो
पांढरा शुभ्र कपडा असेल तर डागावर हारपिक/लायझोल ब्लिच/मेडिक्लोर लावून घासल्यास जातो
व्हॅनिश ची जाहिरात जितकी परिणामकारक आहे तितकं व्हॅनिश परिणामकारक नाही.

व्हॅनिश ची जाहिरात जितकी परिणामकारक आहे तितकं व्हॅनिश परिणामकारक नाही >>> अगदी खरं आहे.

माझ्या मैत्रिणीने पतंजलीच्या ऍक्टिव्ह चारकोल फेसवॉशने मुलाच्या शाळेच्या ड्रेसवरचा स्टबर्न डाग काढला अशी फेसबुक पोस्ट वाचली म्हणजे व्हॅनिश पेक्षा फेस
वॉश जास्त स्ट्रॉंग आहे की काय? Lol

हो तो फार जोरदार आहे.पुरुशांसाठी आहे पण घरातला पुरुष वापरत नाही वाया चाललाय म्हणून मी वापरला उन्हाळ्यात.एकदम खसखसून चेहरा घासल्याचा फील येतो.
प्रसंगी नेलपेंट रिमूव्हर ने पण डाग निघतात.पण महाग पडते.
शांतपणे सढळ हस्ते फक्त निळे हारपिक बादलीत 3-4 चमचे टाकून पांढरा कपडा भिजवल्यास जिद्दी से जिददी दाग जातो.पण कपड्याचे डी एन ए अशक्त होत जाते.कपडा दणकट असल्यास उपाय वापरावा.

अपडेट : व्हॅनिश आणि सर्फ एक्सेल। वापरून ८५ % रंग घालवण्यात यश मिळालेलं आहे. त्यामुळे बरं वाटतेय .
मेधावी : व्हॅनिशच्या आयडियासाठी आभार .
मीरा , देवकी : सध्यातरी लौंड्रिमध्ये देण शक्य होणार नाही . सगळं सुरळीत झालं की देईन . पण गरज वाटत नाहीये तशी .

मी सध्या आई बाबांकडे नागपूरला आहे, अगदी विरजणाची तंतोतंत पद्धत वापरून अमुल ताजा दूधाचं दही लावतोय. टपरवेअरच्या डब्यात तयार झालेल्या दह्याची वरती छान पांढरीशुभ्र कवडी असते, चवही सुरेख (मला आवडते तशीच गोडसर आंबट) असते. मात्र कवडीखाली पाणी जमलेले असते. दही खातांना पाणचट वाटते, जणु वाटीत ताकच चमच्याने खात आहोत असे वाटते. तुलनेने मुंबईला घट्ट दही लागते. तर माझे काय चुकत असावे ज्यामुळे दही पातळ लागत आहे? किंवा दही घट्ट व्हायला काही युक्ती सुचवा.

नागपूर ला जास्त गरमी असेल ना मुंबईच्या तुलनेत.
अशा वातावरणात लवकर दही लागते
जास्त वेळ विरजण्यासाठी फ्रिजच्या बाहेर ठेवले गेले आहे का ते बघा

आज नेहमीच्या दूधाचेच पण दही घट्ट लागले. एरवी नागपूर मुंबईपेक्षा उष्ण असले तरी सध्या रोज येणार्या पावसामुळे इकडे अगदी थंड वातावरण झाले आहे. कदाचीत त्यामुळे विरजणाला पुरेशी ऊब भेटत नसावी असे माझ्या ध्यानात आले. मग काल विरजणाचा डबा कणकीच्या डब्यात दाबून ठेवला आणि आज नेहमीप्रमाणे कवडीखाली पाणी सुटले नाही; तसेच बर्यापैकी घट्ट दही तयार झाले होते. सध्यातरी विरजण बदलायचीही गरज वाटत नाही.
BTW thanks!

पिकनिकसाठी लंच आणि स्नॅक्स काय घेऊन जाता येईल? खूप ऊन असेल. आणि आदल्या दिवशी किंवा पहाटे करावे लागेल. काय करावे सुचतच नाही. रवा इडली टिकेल का?

गोडा मसाला घालून मसालेभात, कांदा लसूण विरहित.. छान टिकतो.. पोटभरचं हि होईल. तसेच तिखटमिठयाच्या पुऱ्या..

थालीपीठ , भाकरी , तिखट पुरया , पीठले किंवा बेसन लावलेली कोरडी भाजी , भरली वांगी , दही भात , भजि - विकत चालतील

हा.. पुऱ्या. ते जमेल. पण जोडीला काहीतरी लागेल. उन्हात कोरडे वाटेल.
मसालेभात कसा करायचा?
धन्यवाद Happy

बेसन लावलेली भाजी टिकते? हे माहीत नव्हतं. मी समजते आहे की बेसन आणि बटाटा काहीच टिकणार नाही.
मोकळ्या डाळीचं पीठलं टिकेल का?

भोपळी मिरचीची कोरडी पीठ पेरून भाजी,मसालेभात,जीरा राईस आणि वेगळ्या डब्यात दही,सुक्या बटाटा काचऱ्या(पाणी न घालता), रोझ सरबत, पोळी,किंवा तिखट मीठ पुरी, मेथी पराठा, दशमी,दाणे लसूण चटणी हे चांगले ऑप्शन वाटतात,

इडली नको..कारण सोबत चटणी वगैरे नाही टिकणार.
पुऱ्या/मेथी पराठे, फ्लॉवर मटार भात, किंवा दूधभात कालवून त्यात किंचित दही घालणे..म्हणजे वेळेपर्यंत छान दहीभात तयार होईल, टोमॅटोची चटणी, सॉस, कांदा, काकडी, टॉमॅटो सलाड वेळेवर चिरणे, लोणचे, गोड काहीतरी लाडू, गुलाबजाम , शिरा..जे आदल्या दिवशी करून ठेवता येईल,
लिंबे, साखर, मीठ..सरबत करायला...... फरसाण, चुरमुरे, चकल्या असा कोरडा खाऊ तोंडी लावायला...
मस्त होईल.पिकनिक...:-)

अवांतर : लॉकडाऊनमध्ये पिकनिक हे वाचून एकाच वेळी आश्चर्य आणि असूया वाटली . पिकनिक आताच्या काळात लक्झरी आयटम झालाय . असो.
चिऊ , पिकनिकला शुभेच्छा . मजा करा

अरे व्वा. भरपूर पर्याय सुचविले. धन्यवाद सगळ्यांना. Happy
पुऱ्या / दशम्या, बटाटा काचऱ्या, शिरा, दाणे लसूण चटणी, कोरडी भेळ, सलाड तिथे चिरून हे करता येईल. रवा इडली मटार, गाजर, काजू घालून केली की सॉस किंवा कोरडी चटणी पुरते.

कूलर नेणे शक्य असेल तर पाण्याच्या किंवा ज्युस च्या बाटल्या फ्रीझ करायचा आणि त्या घालायच्या कूलर मधे. आइसपॅक किंवा बर्फ वापरण्यापेक्षा या बाटल्या डबल ड्युटी करतात. त्याबरोबर चटणी, दही, असे पदार्थ ठेवू शकता कूलरमधे.
स्वेल किंवा हायड्रोफ्लास्क टाइप वॉटरबॉटल्स असतील तर त्यापण भरून फ्रीजमधे ( फ्रीझर नाही) ठेवायच्या रात्रभर. दुपारपर्यंत पाणी मस्त गार रहातं त्यातलं.
मजा करा पिकनिकला

मेधा हि टीप एक्दम मस्त आहे ! प्रवासात कूलर कायम बर्फ़ानेच निम्मा भरून जातो आणि मग त्यात खुप काही ठेवता येत नाही . पाणी नाहीतर ज्युस च फ्रीझ केल्यामुळे बराच ऐवज मावेल कि आता !

Pages