युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता-प्रीति >> हे तर सोप्प झाल मग अशी भाजी होत असेल तर !!
पुर्यांचं हि बघते, बीट शिजवून बारीक करून त्यातच कणिक भिजवायला लागेल ...
आता पुढच्या वीक मध्ये नक्की करून बघेन एकेक बीटाचे पदार्थ , करेन तसे तसे इथे सांगते
फ्रीझर ला टाकलेला बीट एकदम दगड झाला आहे तो ही वापरून बघेन next week
कारण ४-५ days बीट बाहेर ठेवला ना कि मऊ पडतो Sad

shubhadap>> मिरच्या चं फोडणीच्या मिरच्या करा म्हणजे तेच लोणचं .. मी परवाच घातलंय खूप भारी लागतं !!
हिरव्या मिरच्या अश्या वाळवून पूड करता येते हे नव्हतं सुचलं .. आता करून बघेन .. कारण इथल्या इंडियन शॉप ला खरेदीला जायचं म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा .. आपल्याला हवं ते सगळं मिळालय असं क्वचित होतं .. मस्त आयडिया

पुर्यांचं हि बघते, बीट शिजवून बारीक करून त्यातच कणिक भिजवायला लागेल . >>> बीटाचा रस काढावा लागेल मिक्सरवर. मी कधीच केल्या नाहीयेत, करतात हे माहितेय म्हणून उगा आपलं सांगितलं Lol

बीट घालून खोबऱ्याच्या वड्या, थालीपीठ, कटलेट, हलवा हे प्रकार केलेत मात्र. हलवा फक्त बीटाचा नाही, गाजर आणि दुधीपण मिक्स केलेले त्यात.

पुर्यांचं हि बघते, बीट शिजवून बारीक करून त्यातच कणिक भिजवायला लागेल . >>> बीटाचा रस काढावा लागेल मिक्सरवर >>>> हो मिक्सर वर रस काढावा लागतो. मी पुऱ्या नाही केल्या कधी पण चपाती करते नेहमी. मुले ही पिंक चपाती म्हणून आवडीने खातात.
कधी कधी त्याच बिटात दोन मिरच्या, ओवा, आलं लसूण घालून वाटून रस काढायचा आणि कणिक भिजवायची. बीट पराठा मस्त लागतो. अजुन लाड करायचे असतील तर एक चीज स्लाइस घालायची पराठ्यात.

मी बरेचदा बीट उकडून, सालं काढून, किसून मग छोट्या झिपलॉक किंवा ड्ब्यांमधे फ्रीज करते. बीटाचं दही घालून भरीत, कांदा-बीट कोशिंबीर, वड्या, हलवा, खीर, कटलेट, सूप इ. कशातही वापरायला अगदी सोपे जाते.

नवऱ्याने लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळात बाहेर जेवणं व पार्सल आणणं बंद झाल्यामुळे उत्साहाने/नाईलाजाने नॉन व्हेज स्वयंपाक केला. त्यासाठी फिश करी मसाला, तंदुरी चिकन, कढई चिकन मसाल्याचे वेगवेगळे खोके घरी आणले(एव्हरेस्ट, बादशाह वगैरे). आता तो काही ते वापरत नाही. (आता आम्ही परत बाहेरून ऑर्डर करतो, नेबरहुडमध्ये फूड ट्रक पण येतात इत्यादी).

तर या मसाल्यांचा व्हेज जेवणात उपयोग करता येतो का?

नॉनव्हेज चे मसाले मात्र व्हेज असतात आणि ते वापरून केलेल्या भाज्या/ ग्रेव्ह्या नेहेमीच्या व्हेज ग्रेव्ही पेक्षा जास्त चविष्ट होतात.

सनव- तुम्ही तंदूरी चिकनचा मसाला वापरून तंदूरी काॅलिफ्लावर बनवू शकता. सध्या फारच फेमस झाली आहे हि रेसिपी.

याहुन सोपा उपाय आहे. दुर्लक्ष!
मग ते मागे मागे पडत जातील खणात. मग एक दीड वर्षांनी एक्सपायरी झाली (तोवर घर बदललं तर आधीच) काढून टाकायचे. टाकताना कंपोस्ट बिन मध्ये टाकायचे आणि खोका रिसायकल. मग वाईटही कमी वाटतं. Proud

सर्वांचे धन्यवाद. पनीर, बटाटा इत्यादीसोबत वापरून बघते.

दुर्लक्ष करण्याचा/फेकून देण्याचा उपाय तर नेहमी अग्रक्रमाने असतोच पण सध्या जरा minimalism, अपरिग्रह, check-your-privilege वगैरे डोक्यात आहे. आपण किती चंगळवादी आहोत हेच डोक्यात येतं फ्रीज किंवा pantry उघडल्यावर.

You can donate to any nearby gurudwara . They will use it up in a day in veg curries.

गुरुद्वारा मध्ये उघडलेली पाकीट घेणार नाहित.
मसाले टिकतात बरेच दिवस. बॉक्संमध्ये न ठेवता़ काचेच्या घट्ट बरणीत ठेवले तर रहातील आणि़ खप पण होईल. पनीर, बटाटे़ , कॅप्सीकम वगैरे ग्रील केले तर संपेल.

नॉनव्हेजसाठीचे मसाले वापरून ...
दुधीची कोफ्ता करी
कांदा बटाटा रस्सा
सुरणाची ताकातली भाजी
लाल भोपळ्याची बाकर भाजी
पाटवड्यांचा रस्सा
पनीर बुर्जी
सिमला मिर्ची-कांदा-टोमॅटो स्टर फ्राय भाजी
अंडा करी
उकडलेल्या अंड्याची बुर्जी

हे पदार्थ बेस्ट लागतात.

मी तर व्हेज मसाले वापरून नॉन व्हेज अन नॉन व्हेज मसाले वापरून व्हेज सर्रास करते. जे आहे ते वापरायचे. चवीतही फरक पडत नाही

बीट उकडून त्याची पेस्ट करायची आणि त्यातच पीठ घालून भिजवायचं पुऱ्यांचं.
किसून रस काढलात तर चोथा टाकून द्यावा लागेल आणि वाया जाईल.

बीट संपवण्याचा सगळ्यात सोपा उपाय - साधी कोशिंबीर. बाकी त्यात काही घालून यील्ड जास्त होतं आणि मूळ बीट संपायला वेळ लागेल.
बीट सोलून किसून त्यात अगदी थोडं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि वरून जिरं हिरव्या मिरचीची फोडणी. बास. २ मध्यम मोठ्या बीटाची कोशिंबीर २-३ लोकांना पुरते. बीट संपवायचेत म्हणून आदळाआपट, धाकदपटशा इ. प्रयोग हक्काच्या नगांवर जोरदार करावेत आणि जास्त खायला लावायचं हाकानाका Wink

हो, ही अशी कोशिंबीर फार मस्त होते बिटाची. गाजराची करतो तशीच. साखर नाही घालायची मात्र. मोहरीची फोडणी पण चालते.

योकु कोशिंबीर रेसिपी मस्त आहे. करून बघेन.
अजून एक उपाय म्हणजे सरळ बीटचा उकडून किंवा न उकडता ज्यूस काढून सर्वाना प्यायला लावा रोज प्रत्येकी एक ग्लास. बीट संपेल आणि सर्वांचं हिमोग्लोबिन एकदम टकाटक!

(डोक्याकडून घास रेसिपी)
बीट चा उकडून रस काढून गाळून तो अव्होकाडो ऑइल आणि कोकम तेल किंवा शिआ बटर बरोबर डबल बॉयलर भांड्यात उकळल्यास भरपूर प्रमाणात नैसर्गिक लीप ग्लॉस तयार होईल.हॅश टॅग 'आता बसा महागाच्या वस्तू घेत नि तेलकट भांडी धुत.निमूटपणे बीट उकडून कचाकचा खाऊन टाकायचा हे नको असेल तर'☺️☺️

बीटाची कोशिंबीर योकुसारखीच पण दही घालून करते. वरती फोडणी हिरव्या मिरचीची. शेंगदाणा कुट नको असल तर नाही घातल तरी छान लागते.
बीट, लिंबाचा रस आणि अ‍ॅपल असा ज्युस अत्यंत मस्त लागतो.

अनु Lol अगं बीट आवर म्हणेल ती अशाने.

बीट सोलून किसून त्यात अगदी थोडं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि वरून जिरं हिरव्या मिरचीची फोडणी. >>> ही मस्त टेस्टी होते. फक्त साखर मात्र नाही घालत, आमच्याकडचे बीट छान गोड असते. नुसते तिखट मीठ आणि दाण्याचे कुट घालून पण झटपट कोशिंबीर होते, थोडं दहीपण छान लागते.

सीमा, नुसत्या दह्यातली मलाही आवडते, रंगही सुरेख येतो.

कच्चे बीट सोलून त्याच्या मँडोलिन स्लाइसरने पातळ चकत्या करायच्या. काकडीच्या पण तशाच चकत्या करायच्या . प्लॅटरवर आलटून पालटून गोल मांडायच्या. त्यावर कुठलेही एक कॉबिनेशन टॉपिंग घालायचे. अ‍ॅपेटायझर + सॅलड कोर्स एकात होऊन जाईल

१. चाटमसाला, लिंबाचा रस, थोडे कोशर सॉल्ट , बारीक चिरलेली कोथिंबीर
२. गोट चीझ , पंपकिन सीड्स
३. सावर क्रीम + डिल
४. फेटा चीझ, डिल + ओरेगानो
५. व्हिप्ड क्रीम चीझ + आवडीचे हर्ब्ज्स
५. फार लाड करायचे असतील तर स्मोकड साल्मन डिप

मी केरळला गेले होते तेव्हा खाल्लेली बिट कोशिंबीर-

बिट बारीक भोकाच्या किसणीवर किसून घ्यायचा. जाड किस अजिबात नको. मिक्सरवर 1 चमचा खोबरे+2 पाने कढीपत्ता+अर्धी हिरवी मिरची सरबरीत, अजिबात पाणी न घालता वाटून घेऊन किसलेल्या बिटमध्ये टाकायचे. दोन्ही एकत्र करून त्यात दोन तीन चमचे पाणचट नसलेले घट्ट दही टाकायचे, चवीपुरते मीठ टाकून ढवळायचे. अप्रतिम कोशिंबीर तयार.

वर कोणी आधीच लिहिली असल्यास दुर्लक्षित करा.

आता तो काही ते वापरत नाही. (आता आम्ही परत बाहेरून ऑर्डर करतो, नेबरहुडमध्ये फूड ट्रक पण येतात इत्यादी).

तर या मसाल्यांचा व्हेज जेवणात उपयोग करता येतो का?>>>

पण हे जेवण करणार कोण? आता परत बाहेरून मागवायला लागलात असे लिहिलेत की.

Pages