युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोधक तेल कधी आणले..

खोबरेल तेलाच्या पाउच वर बघा ..best before ३ months लिहिलेले असते..

खजूर,नारळ व ओला नारळ घालून सगळ्या कुटुंबानी खा व स्वस्थ रहा!
आज मी अवियव केलं त्याला वरूनखोबर्लतेलाचीच फोडणी दिली ओरीज्नल रेसिपीत कच्चं घालतात. चांगली झाली भाजी. आमचा एक नैसर्गिक उत्पादनाचा ग्रुप आहे तिथून लाकडी घाण्यावरचंच असतं. मी पहिल्यांदाच वापरलं चांगलं लागतं.

अळीव छोट्या कुंड्यांमध्ये लावून त्याची पानं सॅलडमध्ये, कोशिंबिरीवर घालून खाऊ शकता. अळीव लाडवांमध्ये नारळ, गूळ एवढं असतं की डाएटची ऐशी-तैशी.

मंजूताई.. अवियल मस्तच लागते..केरळमध्ये खोबरेल तेलच वापरतात फोडणीसाठी. अगदी फिश घश्शी वे मस्तच असते.. खोबरेल तेलातली..

शोधक घाण्याचे तेल उत्तम असते.. त्याचा सुवास खूप येतो..म्हणून जिथे एक चमचा वापरात असाल तिथे १/२ चमचा वापरा. पण घाण्याची तेलाची शेल्फ लाइफ फार कमी असते..

२००० पार .
कृपया नवा धागा काढावा.

श्रवु, अळिवाला फार ऊन लागत नाही. उजेडाच्या ठिकाणी ठेवलत तरी चालेल. मोड आणि कोवळी पानं येतीलच. 4/6 पानं आली कि खाऊन टाकायचं.

@मंजूताई @श्रवु् @झंपी

खूप धन्यवाद ! packaging date कडे एवढे लक्ष दिले नव्हते , आता फ्रेश बघून आणतो आणि प्रयत्न करतो

अळीव वजन कमी करायला बहुतेक वापरत नाहीत,

आळशी बी वजन कमी करायला वापरतात,

हळीव गरोदर बायका, मुले , आजारी ( उदा पाय मोडून पडलेले Proud ) असे लोक खातात , म्हणून त्यात भरपूर दूध तूप गूळ इ घालतात

मेरा शक सही निकला.... वड्या मऊ झाल्या

येस! मायक्रोव्हेव मधे आटवा, ३०-३० सेकन्द अस करत होईल, प्रत्येक वेळेस सगळ मिक्स करायला विसरु नका.>>>>>>>>>> येस्स धन्यवाद हीच युक्ती वापरली.

अंजली. या वड्या अश्श्याच असतात हे अस्त्र नाही वापरलं? Wink>>>>>>>>>>> हा हा वापरून पाहिलं पण कामी नाही आलं. कंडेन्स मिल्कवर आळ घातला की ते घातल्यामुळे चिकट झाल्या वड्या Wink पण कोणी त्याला हात लावेना मग मावे ला शरण जावे लागले.

कधी ती खुटखुटीत वडी जमेल देव जाणे!
माझे हात शिवशिवतात त्यात काहीतरी अ‍ॅडिशनल घालायला मग कधी मँगो पल्प घाल, कधी कंडेन्स मिल्क घाल, दुध, क्रीम घाल.. आता पुढ्च्या वेळि हे सगळे मोह टाळून फक्त साखर घालण्यात येईल. Proud

अमा अहो. मुंबईत कुठे दिवाळीतला किल्ला.. पण मी कल्पनेतच किल्ला आणि ती गडावरची हिरवळ बघितली.. खूप सुंदर वाटले.. मग ते कौतुक संपल्यानंतर आभा आणि सिंड्रेला यांनी सागितल्याप्रमाणे tya पाने सलाड व सूप मध्ये वापरली. त्या सलाड चे फोटो आपल्या खाऊगल्लीइमध्ये टाकले.. healthy flex leafy soup with salad ..

मी थोडेसे अळीव काढून बाजूला ठेवले पेरणीसाठी..पण ते डायरेक्ट कुंडीत टाकू कि काही वेगळी प्रोसेस आहे..एक कुंडी तयारच आहे माझ्याकडे.. त्यामध्ये धने..पुदिना असे काही लावायचा प्रयत्न करते..सध्या त्याच्यात ब्राह्मी आहे..

सब्जा बियांचे पाश्च्यात्य व्हर्जन म्हणजे चिआ सीड्स. गुणधर्म तेच आहेत.
फक्त चिआ सीड्स मेक्सिकन आहे आणि सब्जा बी आपल्याकडचे.
(गूगलबाबाकडून मिळालेले ज्ञान ). माझी बहीण चिआ सीड्स पाण्यात भिजवून खाते. डायजेशन प्रॉब्लेम साठी चांगले आहे.
मीही सब्जा बी पाण्यात टाकून घेण्याचा प्रयत्न केला पण फारच गिळगिळीत लागायला लागलं सो नाही घेतल्या गेलं फार.
सब्जा बियांचे वेट लॉस, cholestrol control, पोटाच्या तक्रारी साठी ई. अनेक फायदे आहेत.

इथे अमेरीकेत Indian Store मधे मिळनारा चांगला गुळाचा brand कोणता आहे? मी २-३ ट्राय केले पण चांगला नाही निघाला.

अळीवाची पाने दिसतात सुंदर पण तिखट लागतात.

खोबरेल तेलाला खोबर्याचाच वास येतो. डोक्याला जे तेल लावतो तसाच वास येतो, वेगळा येत असेल तर प्रॉब्लेम आहे. खोब्रेल तेल आता कोणी जेवणात वापरत नसल्यामुळे नवे वापरायला सुरवात केली तर घरच्या काही नाकाळ मेम्बरांना वास येऊ शकतो Happy Happy

मी दोन तीन तेले ठेवलीत व रोज वेगवेगळे वापरते. तक्रार आली की हा पदार्थ असाच असतो म्हणायचे. अजून जोरदार तक्रार आली की या माझ्यासोबत किचनमध्ये असे आमंत्रण द्यायचे.

नेहमीपेक्षा जवळ जवळ दुप्पट पुरण घडलं आहे... का, कुणी, कसं काही विचारू नका!

त्यात इथे कडक लॉकडाऊन सुरू असल्याने कोणी येणार नाही किंवा कुणाला नेऊन देता येणार नाही! 5 किमीच्या परिघात जे मित्र आहेत त्यांना देता येईल (त्यांच्या ड्राईव्ह वे मध्ये ठेवून). तरी उरेलच. तर प्रश्न असा आहे की पुरण किती दिवस फ्रीझरला टाकले तर?

माझे तरी, दोन महिने टीकलेले.
पुर्ण गार करून काचेच्या डब्यात भरून, वरून सील पेपर लावून ठेवला.
दोन किलोची डाळ ओतली गेली चुकून.

मी फ्रिज मध्ये जास्तीचा करून ठेवते 10 दिवस चांगला टिकतं. फ्रिजर मध्ये अजून टिकेल जास्त दिवस.

ठेवण्या पूर्वी चांगला परतून room temperature ला आल्यावर ठेवा. शक्यतो डबा वापरा

Pages