शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी

Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08

गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.

काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पुण्यात झालेल्या 'तोत्तोचानची पंचविशी' कार्यक्रमात चेतना गोसावी प्रबोधिनीबद्दल खुप भरभरून बोलल्या. >>> कधी आणि कुठे होता हा कर्यक्रम. आवडले असते यायला.

>>किती सुरेख लिहलयसं गं, लक्की यू! फाॅर्मिंग इयर्समधे ईतके छान संस्कार, अनुभव आणि आयुष्य समृद्ध करणारी शाळा तुम्हाला लाभली.>> +१

>>सध्या शाळेची परीस्थिती कशी आहे? म्हणजे शिक्षणचा दर्जा अजूनही तसाच आहे का? एथे कुणाची मुल आहेत का तिथे सध्या? प्रवेश परिक्षेचा फॉरमॉट काय असतो? म्हणजे त्यासाठि कशी तयारी करुन घेता येईल? मला ५वी साठि प्रवेश घ्यायचा आहे.

Wow.
Loved all ur posts Jidnyasa.
I was not in pune , so dnyayprabodhini was never an option - but felt a bit jealous too. Lol

ज्ञान प्रबोधिनी मध्ये एडमिशन हवी असेल तर आई वडिलांना भगवद गीता येणे आवश्यक आहे असे ऐकलेले एका मैत्रिणी कडून..खरे आहे का हे..?

आत्ता कुणाची मुला पाचावी - सहावीत आहेत का? त्याची टेस्त कशि घेतली गेली? >>

या वर्षी प्रवेश परीक्षे च्या २ फेर्या होणार होत्या.
त्यातली पहिली फेरी फेब्रुवारी महिन्यात झाली.
दुसरी फेरी १५ मार्च ला होणार होती पण अचानक कोरोना मुळे ती रद्द करावी लागली.
त्यामुळे पहिल्या फेरीमधील गुणांच्या आधारे अंतीम यादी तयार केली गेली.
गेल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली आहे.
आजपासुन ऑन लाईन पद्धतीने शाळा सुरु झालेली आहे.

गेले अनेक महिने ही चर्चा मी अनेक वेळा वाचुन काढली होती. Happy
मुलीच्या निमित्ताने आता ज्ञानप्रबोधिनी चा भाग होता येणार आहे याचा मनापासुन आनंद आहे आणि उत्सुकता पण आहे.
प्रवेश परीक्षा घेण्यापासुन ते पहिली यादी, दुसरी यादी आणि मग संपुर्ण प्रवेश प्रक्रिया पुर्ण होइपर्यन्त शाळेचे वेगळेपण जाणवले आहे.
सध्याचे प्राचार्य मिलिंद सर यांनी आणि बाकी सर्व प्रबोधिनी च्या शिक्षक आणि इतर कार्यालयीन सहकार्यांनी आमचे आणि बाकी पालकांचे सगळे प्रश्ण अतिशय शांतपणे आणी सहजपणे सोडवले.
पुढील अनुभव जसे येतिल तसे इथे सांगत जाईनच Happy

प्रवेश परीक्षेमधे कशा प्रकारच प्रश्ण विचारत्तत? >>
@स्मिता, इथे संपुर्ण प्रवेशप्रक्रिया थोडक्यात लिहाल का?? >>

दोन्ही ची उत्तरे एकत्र द्यायचा प्रयत्न करते.
यावेळी परीक्षेच्या २ फेर्‍या होणार होत्या. दोन्ही फेर्‍या लेखी स्वरुपाच्या होत्या. प्रबोधिनी मधे मुलखती होतात असे मी ऐकले होते पण आम्हाला मिळालेल्या सुचनांमधे मुलाखतींचा उल्लेख नव्हता. पूर्वी मुलाखती असायच्या असे वाचल्यासारखे वाटते आहे.

परीक्षेला बसण्यासाठी ५०० रुपये भरुन अप्लिकेशन फॉर्म भरुन घेतला गेला.
साधारण फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात शाळेच्या वेबसाईट वर सगळी माहिती व्यवस्थित मिळाली होती.
(https://www.prashala.jnanaprabodhini.org)
परीक्षेसाठी एकाच दिवशी ३ स्लॉट होते आपल्याला हवा तो स्लॉट घेउ शकतो.
साधारण २ तास परीक्षा झाली.
त्याचे स्वरुप साधारण असे होते.
Entrance Exam - First round : The test consists of a battery of psychological tests. The test lasts for 2 hours. All tests being psychological tests, there is no need of any preparation. The test administrator gives instructions before starting the test. The child should appear for the test in a tension free state of mind.

मुलांना परीक्षेला सोडल्यावर पालकांसाठी प्रबोधीनी बद्दल माहिती देण्यासाठी महेन्द्राभाई सेठीया यांनी एक सेशन घेतले. तिथे प्रबोधीनीच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली.ते स्वतः प्रबोधिनी ची विद्यार्थी आहेत आणी सध्या प्रबोधिनी साठीच काम करतात असे कळले.अतिशय सुन्दर ओघवत्या भाषेत प्रबोधिनी बद्दलचे बरेच समज गैरसमज त्यांनी दूर केले Happy

या पहिल्या फेरीत सुमारे १३०० मुले होती असे महेन्द्राभाई सेठीया यांनी सांगितले.
त्यातुन १४२ मुलांची दुसर्या फेरी साठी निवड झाली होती.
दुसरी फेरी पण पहिल्या फेरी प्रमाणेच असणार होती.
कोरोनामुळे असलेला लॉकडाउन संपला की दुसरी फेरी घेणार असे शाळेतर्फे सांगण्यात आले होते मात्र लॉकडाउन वाढत चालल्यामुळे या परीस्थितीत दुसरी फेरी रद्द करण्यात आली.
पहिल्या फेरीच्या गुणांच्या आधारे ४० मुले आणी ४० मुली ( तसेच ८ मुलांची प्रतिक्षा यादी ) अशी अंतीम यादी प्रशालेच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली.

त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रीया पुर्ण करण्यात आली.

हार्दिक अभिनंदन स्मिता. आता पुढील अनु भव पण लिहा. मी गरवारेत शिकल्याने प्रबो धिनी बद्दल कुतुहल आहे.

हार्दिक अभिनंदन स्मिता.
आता पुढील अनु भव पण लिहा. +१

मी रेणुका स्वरुप ची विद्यार्थीनी.. Happy
ज्ञानप्रबोधिनी बद्दल मनात कायमच क्युरीओसिटी वाटते..

मी प्रबोधिनी शाळेत नव्हते. पण छात्र प्रबोधन, युवती विभाग, प्रचिती, शिबीरं, गणपती मिरवणुक, व्याख्याने अशा अनेक सुंदर आठवणी आहेत.आत्ता कोरोना काळात प्रबोधिनीची online सत्रं/कार्यक्रम छान चालू आहेत.

मी माझ्या मुलासाथी अर्ज भरला आहे. बघुया काय होते ते. गेल्या वर्शि कोणी प्रवेश घेतलाय का? प्रवेश प्रक्रियेमध्ये काय विचारतात हे माहिती असेल तर क्रुपया सान्गा. पsychological test असते हे माहितेय. पण कोणत्या प्रकारचे प्रश्ण असतात ह्याची महिती पाहिजे होती.

दीपाकुल,

कोणत्या प्रकारचे प्रश्ण असतात हे मुलांना सुद्धा बाहेर आल्यावर आठवत नाही Happy ... असे मला माझ्या मुलीने सांगितले होते. Wink
एकच प्रश्ण तिला सांगता आला :
देवळात गेल्यावर तुम्हाला काय दिसते ?
१. देव २. पायर्‍या ३. घंटा ४. छत

तर सांगायचा मुद्दा हा की, अजिबात कोणतीही तयारी न करता जौ दे तुमच्या मुलाला... त्याला ते वातावरण अनुभवुदेत...उगीच त्याला परीक्षेची भीती नको वाटायला...
मस्त मज्जा करत पाठवा.. शुभेच्छा...

हे फारच सामान्यीकरण होतं आहे. एखाद्याला किंवा एखादीला नसेल आठवत, पण म्हणून सगळ्यांनाच आठवत नाही असं कसं म्हणता येईल? सांगायचे नसतील तर तसं मोकळेपणाने सांगावं.

साधारण शिष्यवृत्तीला विचारतात तसले प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीसारखे (आय क्यू, analytical वगैरे चाचण्या) काही पूर्वी असत म्हणे. आता माहीत नाही. ते कसेही असले तरी त्यासाठी मुद्दाम अभ्यास करावा अशा प्रकारचे ते नाहीत. किंबहुना अशी काही तयारी करूनही निवड होईल याची शाश्वती नाही. पाल्याला बिनधास्त, कुठल्याही दडपणाखाली न येता जायला सांगा. त्याबाबतीत वरील विचारांशी सहमत.

हे फारच सामान्यीकरण होतं आहे. एखाद्याला किंवा एखादीला नसेल आठवत, पण म्हणून सगळ्यांनाच आठवत नाही असं कसं म्हणता येईल? सांगायचे नसतील तर तसं मोकळेपणाने सांगावं. >>
न सांगण्यासारखं काय आहे त्यात हपा ? न सांगुन माझा काहीच फायदा नाहिये यात. Happy
माझ्या मुलीला जे आठवत होतं तेवढंच मी सांगितलं..
४थी तल्या मुलांना उगीच जास्त खोदुन खोदुन "काय प्रश्ण होते सांग ग... कसले होते सांग ग " असं विचारतं बसणं मला तरी बरं वाटलं नाही म्हणुन मी ते तिथेच सोडुन दिलं.. यापेक्षा जास्त प्रश्ण आठवले असते तर नक्कीच शेअर केलं असतं...

सामान्यीकरण केले वगैरे आरोप या धाग्यासाठी तरी सोडुन द्याल का प्लीज ?
बाकी शाळेत जाउन जरी विचारलं की काय तयारी करावी तरी "काहीही करु नका" असेच उत्तर मिळेल याची खात्री आहे .

<<<हे फारच सामान्यीकरण होतं आहे. एखाद्याला किंवा एखादीला नसेल आठवत, पण म्हणून सगळ्यांनाच आठवत नाही असं कसं म्हणता येईल? सांगायचे नसतील तर तसं मोकळेपणाने सांगावं.>>>

जेवढे आठवलं ते लिहिलय की त्यांनी.

एक त्रयस्थ वाचक म्हणून सुद्धा पटला नाही हा प्रतिसादाचा सूर...

प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रश्न कशाला विचारतात? आणि तसंही देणगी उकळूनच प्रवेश देतात ना शाळेत?
सरळ सांगायचं की शिकण्यासाठीच पाठवतोय ना शाळेत, प्रश्नाचे उत्तर माहीत असते तर कशाला पाठवलं असतं शाळेत?
मुळात पालकांनी हट्ट सोडला पाहिजे की अमुक शाळेतच शिकले पाहिजे. घराजवळच सोईस्कर शाळेत टाकणे उत्तम.

आणि तसंही देणगी उकळूनच प्रवेश देतात ना शाळेत? >> उपाशी बोका, थोडे विस्ताराने सांगाल का या विषयी? तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का की केवळ ऐकीव माहिती आहे? या विधानाची विश्वासार्हता किती?

Pages