तुमचे आवडते शाहरुख चे सीन्स

Submitted by कटप्पा on 28 May, 2020 - 16:39

बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .

तुम्हाला आवडणारे चित्रपटातील शाहरुख चे प्रसंग कोणते आहेत . शाहरुख म्हणजे लाखो प्रतिसाद येण्याचा धोका आहेच. सुचेल तसे लिहत चला.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रघुपती राघव राजाराम भजनाचे बॅकग्राऊंड
हातात बॅग घेऊन अंगाखाण्द्यावर झुलवत एका सुंदर पुलावरून धावणारा शाहरूख
काजोलशी ऊप्स.. अंजलीशी नजराञर होताच त्यांचे कावरेबावरे लूक, साडीशी चाळे, एकमेकांच्या नाकावर मारलेल्या पण सवय नसल्याने हुकलेल्या टिचक्या..
आहाहा .. सारेच अप्रतिम
बॉलीवूडच्या ईतिहासात आजवर ईतका देखणा सीन दुसरा झाला नसेल Happy

मागे माझाच एक धागा होता
वाह क्या सीन है टाईप्स
त्यात सुरुवातीलाच या सीनचा उल्लेख सापडेल.

विषय निघालाच आहे तर तो धागाही वर आणतो.

वीरू ती एंट्री खरंच भारी आहे. खरं तर हिरोईन ची अशी एंट्री करतात पण ddlj मध्ये मेरे ख्वाबो मे जो आये गाण्यात जबरदस्त एंट्री आहे शाहरुख ची.
Ddlj आला मी तिसरीत होतो . केबल वर पाहिला होता.

डीडीएलजे आला तेव्हा अकरावीत होतो. एका मित्राने तर शाहरुखने एका सीन मध्ये घातलेल्या टी शर्ट सारखा टी शर्ट पण विकत घेतला होता.

माझा शाहरुखचा सर्वात आवडता रोमँटिक सीन म्हणजे दिल तो पागल हैं मधला......
जेव्हा तो माधुरीला तिचे कडे देताना 'और पास' 'और पास' म्हणत जवळ आणतो व नंतरचा kiss on the neck.

https://www.youtube.com/watch?v=jhccNo6CzKw

शाहरुख माझा फारसा आवडता नसला तरी माझ्या मते हा सीन हिंदी सिनेमातील एक उत्कृष्ट sensuous सीन म्हणता येईल. हा बघताना अजूनही अंगावर काटा येतो. इथेच शाहरुखला रोमान्सचा किंग का म्हणतात ते पटते.

दुसरा शाहरुखचा आवडता सीन म्हणजे चक दे इंडिया मधला शेवटची फायनल जिंकल्यावरची शाहरुखची reaction ! परत goosbumps !

नेहमी पडणारा प्रश्न .... अशासारखा रोल शाहरुख परत का करत नाही ? किंवा कोणी त्याला का देत नाही?

शाहरुख ची सिरीयस ऍक्टिंग बघायचं म्हणता आणि स्वदेश , डियर जिंदगी , फॅन , झिरो सारखे चित्रपट बघायला जात नाही तुम्ही नंतर आणि फ्लॉप करता.

कभी हां कभी ना मध्ये शेवटी पडलेली अंगठी क्रिस आना ला लग्नासाठी देतो आणि उदास होऊन बसलेला असतो आणि पांढरी पिवळी सुंदर मिडी घालून प्रसन्न जुही चावला येते तो सीन.
(सीन परत पाहिला.करेक्शन: अंगठी क्रिस ला सापडते.जुही चावलाची मस्त पांढरी गुलाबी फ्लोरल मिडी आहे.पांढरी पिवळी मिडी बहुधा जादू 'तेरी नजर गण्यातली.)

झिरो हा चित्रपटपूर्णपणे, प्रचंड गंडलेला आणि संतापजनक असला तरी एकदोन सीन्स जमलेत. एक सुरूवातीलाच शाहरुख वरच्या मजल्याच्या गच्चीवरून नोटा खाली टाकतो आणि खाली त्याच्या वडिलांनी सहज कशाला तरी हात बाहेर काढलेला असतो आणि त्यांच्या हातात त्या नोटा पडायला लागतात Lol
स्वदेसमधला गायत्री जोशीला 'बघायला' पाहुणे आलेले असतात तो, वसुली करायला केलेला प्रवास असे एकूण बरेच सीन्स छान आहेत.
येस बॉसमधला जुहीबरोबरचा हॉटेल रूममधला. टीव्हीवर लागलेल्या पिक्चरचं गंमत म्हणून डबिंग करतात तो.

शाहरुख ला डुप्लिकेट अमिताभ म्हणतात
तसा कटप्पा हा डुप्लिकेट अभिषेक म्हणायचा का
च्यायला एक शाखाभक्त काय कमी होता की दोघे दोघे उगवलेत

सिनेमा :क खु क ग
आवडता सीन : sharukh ची entry chopper मधून

ती काळी बॅग, chopper जया भादुरी सगळेच छान आहेत

Dear जिंदगी हा कोणा एका अभिनेत्याचा नाहीये, तो दिग्दर्शकाचा सिनेमा आहे
आलिया ने तो व्यवस्थित शिस्तीत खाल्लाय हेही खरं

आश्चर्याची बाब म्हणजे ह्या picture मध्ये शाखा डोक्यात गेला नाही

दुसरा शाहरुखचा आवडता सीन म्हणजे चक दे इंडिया मधला शेवटची फायनल जिंकल्यावरची शाहरुखची reaction ! परत goosbumps ! >> +११

आवडता सीन : sharukh ची entry chopper मधून
>>>>>
बेस्ट एव्हर बॉलीवूड हिरो एंट्री
माझे बालपणीचे स्वप्न. मी डॉकयार्ड, भायखळा किंवा मुंबई सेंट्रल स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून ऊतरावे आणि खांद्यावर बॅग झुलवत घरी धावत यावे. आईने दरवाजा उघडावा आणि तिच्या हातात गरमागरम चहाचा कप... आणि मी म्हणावे. हे मां, हर बार मेरे आने से पहलेही तुम्हे कैसे पता चल जाता है... लव्ह यू शाहरूख.. तू आम्हाला नुसता गर्लफ्रेंड सोबतचा रोमान्सच नाही तर आईमुलाच्या नात्यातही अशी गोड स्वप्ने बघायला शिकवलेस... Happy

स्वदेस मध्ये मिनरल वॉटर पिणारा शाहरुख जेंव्हा ट्रेन स्टेशन वर थांबते तेंव्हा कुल्हड मधले पाणी पितो तिकडे जबरदस्त एक्सप्रेशन्स आहेत.....

स्वदेस मध्ये मिनरल वॉटर पिणारा शाहरुख जेंव्हा ट्रेन स्टेशन वर थांबते तेंव्हा कुल्हड मधले पाणी पितो तिकडे जबरदस्त एक्सप्रेशन्स आहेत.....

हो कुल्हड्चे एक्सप्रेशन्स नां...सहीच आहेत.

च्यायला एक शाखाभक्त काय कमी होता की दोघे दोघे उगवलेत
>>>__>> नाय नो नेवर . इकडे भरपूर किंग खान भक्त आहेत .
नव्वद च्या दशकात शाळेत गेलेल्या प्रत्येकाला शाहरुख आवडतोच .

गुड्डू, राम जाने, चाहत, इंग्लिश बाबू देशी मेम, अशा अनेक चित्रपटातील अनेक scencs, अभिनय कसा करू नये हे शिकवण्यासाठी उत्तम आहेत

राम जाने आणि चाहत? आर यू डुईंग मजाक मस्करी? दोन्हीत मस्त बेअरींग पकडलेले त्याने. राम जानेच्या शाहरूख स्टाईलने बोलायची लाट आलेली आमच्याईथे.. आणि चाहतमध्ये अनुपम खेर सोबत काय धमाल ट्युनिंग जमलेली त्याची. डॅडी कूल कूल कूल.. मेरा बेटा फूल फूल फूल.. धमाल गाणे.. आजही गातो मी.. शेव्टच्या सीनला तर नसरुद्दीनला झाकोळून टाकलेला पुर्ण त्याने... और मार.. नही लगता.. नही लगता..मस्त सीन आहे तो.. राम जाने मध्ये सुद्धा बंदूक नही फेकना था रे चिवट्या.. अस बोलून त्या पोलिसालाच मारतो तो मस्त सीन आहे.
चाहतमध्ये पूजा भट्ट सोबतचे सुरुवातीचे सीनही मस्त आहे... फ्रेश लव्हस्टोरी..

जेंव्हा ट्रेन स्टेशन वर थांबते तेंव्हा कुल्हड मधले पाणी पितो तिकडे जबरदस्त एक्सप्रेशन्स आहेत.....
>>>>
पुर्ण प्रवासाचा सीनच क्लास आहे. ज्याला तो सीन भिडला नाही त्याला स्वदेशच कळला नाही.. ना ग्रामीण भारताच्या समस्या कधी कळणार..

.मला त्यातला गावात वीज आणायचा सीनही आवडतो.. स्पेशली लास्टला शाहरूखला शाहरूख्गिरी करायला लावत पाईपात अडकलेला गाळ काढायचा सीन आहे त्यातली शाहरूखची बॉडी लॅंगवेज नेहमीप्रमाणेच कमाल आहे... आणि बॅकग्राऊंड म्युजिकही धमाल आहे

स्वदेशमधील शाहरूख आणि गायत्री जोशीचे सीनही मजेशीर आहेत. हि ईज ॲक्चुअली किंग ऑफ रोमान्स. सामान्य माणसाला रुचणारा हवाहवासा वाटणारा काहीही असभ्य अश्लील अश्लाघ्य न वाटणारा रोमान्स तो ज्या पद्धतीने जमवतो त्याला तोड नाही.. हॅटस ऑफ!!

अमिताभ आणि शाहरूख तुलनेचे विषय आणून धागा भरकटवण्यापेक्षा दोघांचे मोहोब्बतेमधील सीन आठवा.. निव्वळ त्यांच्यासाठी ईतर तीन लव्ह्स्टोर्या सहन करत पुन्हा पुन्हा बघतो मी तो चित्रपट.. मोहोब्बत की ताकद तो आपने अभी देखी ही नही नारायण शंकर..... जहा से मै देख रहा हू वहासे एक पचपन साल का बुढा बाप अपने बीस सालके बेटी के फूल्चढे तस्वीर के नीचे खडा है.. आप तब भी हारे थे.. आप आज भी हारे है

बहोत बडा कलेजा लगता है सर सच को सुनने के लिये....
....
मान का मर्यादा का विश्वास का पूजा का प्यार का...
अगर गंगा कि हिफाजत करना प्यार है तो है.. प्यार है.. है..

हा पुर्ण डायलॉगच कसला जबरया म्हटलाय...
कित्येकदा बघा जराही बोअर होत नाही हा सीन...
आणि सीन तरी काय.. वन मॅन शो आहे शाहरूखच्या संवांदांचा.. आणि हे शहरूखच करू जाणे

Pages