तुमचे आवडते शाहरुख चे सीन्स

Submitted by कटप्पा on 28 May, 2020 - 16:39

बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .

तुम्हाला आवडणारे चित्रपटातील शाहरुख चे प्रसंग कोणते आहेत . शाहरुख म्हणजे लाखो प्रतिसाद येण्याचा धोका आहेच. सुचेल तसे लिहत चला.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शाहरुख चा वन टू का फोर फार आवडतो .
>>>>
मलाही फार आवडतो.
दुर्दैवाने म्हणावे तसे बॉक्स ओप्फिस यश मिळाले नाही.

पण त्यापेक्षा जास्त आवडतो ते फिर भी दिल है हिंदुस्तानी. धमाल चित्रपट. पण बहुधा हृतिकच्या कहो ना प्यार है सोबत आला आणि हृतिकच्या क्रेझमुळे मागे पडला. नंतर हृतिक काही हवा झाली तसा पुढे आला नाही . आणि शाहरूख किंग खानच राहिला.

फौजी,सर्कस मधला शाहरुख मला प्रचंड आवडायचा. तेव्हा तर त्याचे नावही माहीत नव्हते.त्याअर्थाने फ्कत त्याच्या अभिनयासाठी आम्ही (मी व माझ्यासारखे इतर) ह्या सिरियल्स पाहिल्या. जेव्हा चित्रपट सृष्टीत आला तेव्हाही राजु बन गया जेंटलमनचा तो नवीन निश्चल सोबतचा केबिन मधल्या सीन मध्ये तोपर्यंत तरी तसाच नैसर्गिक अभिनय करत होता (टिपिकल स्टॅमरिंग स्टाईलमध्ये बोलणे. दॅट्स अ टिपिकल शाहरुख स्टाईल. अन्य कोणी करु शकणार नाही.). त्यानंतर पुढे कुठल्याही चित्रपटात तसा अभिनय परत दिसला नाही.

तसाच नैसर्गिक अभिनय करत होता (टिपिकल स्टॅमरिंग स्टाईलमध्ये बोलणे. दॅट्स अ टिपिकल शाहरुख स्टाईल. अन्य कोणी करु शकणार नाही.). त्यानंतर पुढे कुठल्याही चित्रपटात तसा अभिनय परत दिसला नाही.
>>>>>

चमत्कार
त्यात होते असे बेअरींग
कॅरेक्टरमध्ये सादगी दाखवणे कमालीचे अवघड असते. किंवा ती मुळातच असावी लागते.

माझा अत्यण्त आवडीचा शाहरूख चित्र्पट
समोर नासीरसारखा दिग्गज भुताच्या भावखाऊ कॅरेक्टरमध्ये असताना आपले नाणे ख्णखणीत वाजवणे एका नवख्या पोरासाठी ती कमाल होती. जसे कोवळ्या सचिनचे गुण ईंग्लंड ऑस्ट्रेलिया दौरयावर दिसले तसे म्हणू शकतो.

मी देवदास आणि दिल तो पागल नाही पाहत जास्त कारण माधुरीची पांचट ऍक्टिंग. अंजाम मात्र बघतो कारण शाहरुख ने बॅलन्स केलाय छान माधुरीला.

अंजाम हा माधुरीला मिळालेला एक स्त्रीप्रधान चित्रपट होता.. चमकायची संधी..
पण बिचारीचे बॅडलक खराब.. सोबत शाहरूख होता.. तिच्याशी तेच झाले जे डरमध्ये सनीशी झाले..
तरी नशीब ते चने के खेत मे गाणे तिला त्यात मिळाले.

दिल तो पागल है शाहरूखसाठी कितीही वेळा...
फारशी मसाला वा फाफटपसारा नसलेली तरीही अप्रतिम लव्हस्टोरी..

अवांतर - आज या धाग्याची चर्चा दुसरया धाग्यावर वाचली. उत्तमोत्तम प्रतिसादातच धाग्याचे यश दडले आहे. किमान हजार प्रतिसाद ईथे हवेत. शाहरूखचे कमाल सीन त्यापेक्षा जास्तच असतील.

तरी नशीब ते चने के खेत मे गाणे तिला त्यात मिळाले.

नाहीतर ते पण त्याने हिसकावुन स्वतः नाचले असते.

वाढवला हं एक प्रतिसाद

नाहीतर ते पण त्याने हिसकावुन स्वतः नाचले असते.
>>>>

शाहरूख हा रुढ अर्थाने डन्सर नाही. पण त्याची नाचाची समज ऊत्तम आहे. आणि एनर्जीबाबत तर प्रश्नच नाही. उत्साहाचा धबधबा आहे. हे तो आपल्या नाचात योग्य ओततो. शाहरूखच्या नाचावर एक वेगळा धागा निघेल. पण याच धाग्यात चर्चा करूया. तुम्हाला आवडलेले शाहरूखचे नाच ईथेच लिहूया

ऋ पेक्षा अथेना खुप मोठ्या फॅन आहेत शाखा च्या अस वाटल मला -> नाही हो..कम्पॅरिझन नाहिये..मला तो माझे शाळकरी वयातले पहिलेवहिले प्रेम म्हणून हळवा कोपरा आहे..पण मग तो तेव्हाचाच..आत्ताचा नाही Happy
आता आवडतो ते त्याच्या wittiness and sense of humor साठी.

दिवाना - ऐसी दीवानगी या गाण्यात शाहरुख चांगला नाचला आहे. पण समोर दिव्या असल्याने त्याचा नाच झाकोळला गेला आहे.

https://youtu.be/u6bk53x2Kno

कोई लडकी है जब वो हसती है..
एक नंबर डान्स तितकीच धमाल कोरीओग्राफी. अशी कोरीओग्राफी शाहरूखला बघूनच स्फुरते

https://youtu.be/PQmrmVs10X8

चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या...
ऐकायला जितके सुंदर गाणे आहे त्यापेक्षा अजरामर आहे शाहरूखचा ट्रेनवरचा डान्स.. हॅटस ऑफ ! बाईकवर उभे राहणारे आणि प्लेनला लटकून उडणारया हिरोंनाही गाण्यात असा स्टंट आजवर जमला नाही. आणि हे करून ईतके देखणे गाणे बनणे कमाल आहे.

https://youtu.be/rap8SoUIPaw

डान्स पे चान्स मारले - रब ने बना दि जोडी

सिच्युएशन अशी आहे की नाच न येणारया शाहरूखला अनुष्का डान्स शिकवतेय.
आणि त्यात चुकीचा डान्स करायची ॲक्टींग करतानाही गाण्याचे सौंदर्य खराब होऊ नये म्हणून अफलातून डान्स करणे आणि तरीही तो चुकीचा डान्स भासवणे ... हे खरेच अफाट आहे.

मै हू ना मध्ये शाहरूखला सारे स्टुडंटस डान्स शिकवतात ते आठवतेय का?
धमाल सीन आहे तो... पुन्हा पुन्हा बघावे.. पुन्हा पुन्हा शाहरूखच्या प्रेमात पडावे Happy

मला तो माझे शाळकरी वयातले पहिलेवहिले प्रेम म्हणून हळवा कोपरा आहे..पण मग तो तेव्हाचाच..आत्ताचा नाही Happy
आता आवडतो ते त्याच्या wittiness and sense of humor साठी.

+७८६.
सेम हिअर Happy

आधीच शाहरुख किती छान दिसायचा आता किती वाईट दिसतो वगैरे कमेंट्स कशाला. आपल्या सर्वाना तो देव वाटत असला तरी शेवटी तो माणूसच. वयानुसार चेहऱ्यात बदल होणारच.
आता चांगला दिसत नाही म्हणून त्याच्या जुन्या चित्रपटांचा पण तिरस्कार करणार का?

आता चांगला दिसत नाही म्हणून त्याच्या जुन्या चित्रपटांचा पण तिरस्कार करणार का?
>>>>
शाहरूख चांगला न दिसणे अशक्यच
अगदी गेल्या झिरो चित्रपटातही जब तक जहा मे सुबह शम हो गाण्यावरच्या शहरूखला नाचताना बघून मनात गुदगुल्या होतात.
सध्याचे त्याचे काही चित्रपट मात्र बंडल आहेत. पण हल्ली ओबरऑलच बंडल चित्रपट बनत आहेत. सोकॉलड आशय्घन चित्रपटांच्या नावावर काहीही कचरा विकला जात आहे.

रब ने बना दी जोडी चे आयुष्यात विशेष स्थान आहे.
गर्लफ्रेंडला / बायकोला पहिल्यांदा भेटलेलो एक मैत्रीण म्हणून तेव्हा हा चित्रपट पाहिला होता.

मला तर आधी ओळखायलाच आला नव्हता तो मिशीवाला शाहरुख. इतका मस्त मेकअप केला होता आणि संपूर्णपणे वेगळा बेयरिंग होता. दोन वेगळ्या व्यक्ती वाटत होते हेच त्याच्या अभिनयाचे यश आहे .

दोन वेगळ्या व्यक्ती वाटत होते हेच त्याच्या अभिनयाचे यश आहे .
>>>>>
असे रोल करायला ईतर कलाकार बॉडी बनवतात आणि ऊतरवतात... याने एकाच वेळी दोन्ही भुमिका साकारणे विशेष होते.

पण काही म्हणा, वेगवेगळ्या भुमिका करण्यात अमीर खानचा हात कोणी करु शकणार नाही. कोणतीही भुमिका द्या पठ्ठया सोनं करतो.
विषयांतराबद्दल क्षमस्व.

परदेस मधला लास्ट सीन खूप आवडतो. दिल तो पागल है बिलकुल नाही आवडत माधुरी मुळे किती थोराड दिसते.

Pages