तुमचे आवडते शाहरुख चे सीन्स

Submitted by कटप्पा on 28 May, 2020 - 16:39

बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .

तुम्हाला आवडणारे चित्रपटातील शाहरुख चे प्रसंग कोणते आहेत . शाहरुख म्हणजे लाखो प्रतिसाद येण्याचा धोका आहेच. सुचेल तसे लिहत चला.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल तो पागल है बिलकुल नाही आवडत माधुरी मुळे किती थोराड दिसते. -> मला आवडतो पण माधुरी मुळे मूड जातो..आतातर तिचे सीन्स पळवून पिक्चर पूर्ण करते. करिष्मा आणि त्याची केमिस्ट्री जास्त चान्गली होती...हि बया कशाला कडमडली असे कायम वाटते..हेहे

अवान्तर- तो रोल काजोलला ऑफर झाला होता असे कुठल्यातरी मुलाखतीत बघितले..मग आवडले असते ते कॅरॅक्टर (शाखा-काजोल जोडीची फॅन)

आज जागतिक सायकल दिन - शाहरुखच्या मैं हू ना चा उल्लेख केलाच पाहिजे. सायकल रिक्षा चालवून त्यावर जे स्टंट्स केले होते शाहरुख ने. फक्त एका सिन साठी डमी वापरला बाकी सर्व स्वतः केले होते. इतकी एनर्जी खरंच कुठून आणतो हा माणूस .

>>त्याचा "शाह रुख पिळगावकर" होतो कि काय असं वाटु लागलं आहे<< Lol
ऋन्म्या, ये तेरे लिये. जा तुभी क्या याद करेगा...

स्पाइक ली च्या "इन्साइड मॅन" या बॅंक रॉबरी, थ्रिलरच्या स्टार्टिंग आणि एंड क्रेडिट्स मधे "छैया छैया" हे गाणं बॅग्राउंडला वाजवलेलं आहे. आता यात कांट्रिब्युशन शारुखचं कि रेहेमानचं हे तुम्ही ठरवा... Wink

त्याचे श्रेय शाहरुख लाच. ते रहमान चे गाणे आहे कोणालाही माहित नसेल कारण शाहरुख नाचला कि ते गाणे शाहरूखचेच होते.
उदाहरण म्हणजे दिल तो पागल है दिल दिवाना है गाणे खरे तर अक्षय चे - पण एका छोट्याश्या कडव्यात शाहरुख नाचून जातो ते आजपर्यंत शाहरुख चेच गाणे म्हणून ओळखले जाते.
अक्षय ला स्वतलाही आठवत नसेल त्याचे गाणे आहे ते.

{{{ ते रहमान चे गाणे आहे कोणालाही माहित नसेल}}}

कटप्पा,

रेहमानला ऑस्कर मिळाले आहे. त्याची मोझार्टशी तूलना होत असते.

स्वदेसमधला चेक्सचे शर्ट घातलेला शाहरुखचा लूक माझा आवडता आहे .>> अगदी अगदी आणि ये तारा वो तारा वरचा त्याचा तो साधा आणि नैसर्गिक डान्स ....

स्वदेसमधला चेक्सचे शर्ट घातलेला शाहरुखचा लूक माझा आवडता आहे .>> अगदी अगदी आणि ये तारा वो तारा वरचा त्याचा तो साधा आणि नैसर्गिक डान्स ...>>>> + ११११

स्वदेस कितीही वेळा पाहू शकते, फक्त शाखासाठी. त्यात तो धोती घालतानाचा सीन असो, मातीच्या पेल्यातून पाणी पितांनाचा, गीता बघायला आलेल्या मुलाला नकार देते त्यानंतरचं याचं आनंदी होणं, ती त्याला प्रेम व्यक्त करते तो सीन, सुरवातीला शाळेतलं 'मै चालता हूं ' , सगळेच सीन्स कमाल जमलेत.

बाकी ऋ ने लिहीलेला कुछ कुछ होता है चा ते समर कॅम्पत पुन्हा भेटतात तो सीन तर खुपच आवडता आहे. हा मुव्हीच आवडता आहे.

मला तर चलते चलते पण आवडलेला, तिला पटवायला मनापासून प्रयत्न करणारा, नवरा म्हणून प्रेम करणारा, मधेच गृहीत धरणारा, पझेसिव्ह होणारा, चिडणारा, माफी मागणारा, पसारा करणारा Lol , शाहरुख आवडला त्यात.
याच्या बरोबर उलट, जरी कथा सेम असली थोडीफार तरी तो 'हम तुम्हारे है सनम' , अजिबात च बोर आहे.

च्रप्स सर, धागा तुम्ही वर काढला आहे इतके सांगून खाली बसतो.
दंडुकेवाल्या ताई माझ्या आयडीच्या मागे लागतील नाहीतर.

कोण ?

सर, धागा तुम्ही वर काढला आहे हे त्या ताईंना सांगायचे आहे. ताई कोण आहेत हे तुम्हाला नाही सांगायचे. Proud
त्या सरांच्या चाहत्या आहेत. तुम्ही उपसर असल्याने तुम्हाला काही धोका नाही.

असे कसे... कळले पाहिजे म्हणजे आम्ही सगळे सावध राहू... आयडी उडण्याचा धोका सर्वानाच असतो इथे... कोई सेफ नही...
जनहितासाठी तुम्हाला बोलले पाहिजे...

सर, तुम्हीच ऋन्मेष आहात हे पण जनहितासाठी कळायला हवे Lol
पण तुमचे धागेच नाहीत वर काढायला. Lol

मुख्य आयडीचा मुख्य ड्युआयडी, त्याचे उपग्रह.
साधा माणुस, सूज्ञ माणूस, अर्चना, टीना, कटप्पा, च्रप्स
जनहितार्थ प्रसारीत - आज्ञेवरून

सर विषय असा होता. हा धागा तुम्ही वर काढला आहे. ताईंना वाटेल मी काढला आहे.
सध्या सरांनी माझ्याशी कट्टी घेतल्याने त्यांची भूमिका तुम्ही बजावत आहात. पण धागा तुम्ही वर काढला आहे हे ताईंच्या नजरेतून सुटू नये म्हणून तुम्हीही एकदा सांगा कि धागा तुम्हीच वर काढला आहे. म्हणजे आयडी उडणार नाही.

पण तुमचे धागेच नाहीत वर काढायला.
>> आहेत की ... चेक करा...

सर, तुम्हीच ऋन्मेष आहात हे पण जनहितासाठी कळायला हवे
>>> हे आधीच माहित आहे की जनतेला...

सर, धागा वर काढला होता ते पण क्लिअर करा कि.
>> अरे त्यात क्लियर काय करा.. इथे दिसतंय कि मी धागा वर काढला होता ते... काय तेच तेच बोलताय Happy

Pages