तुमचे आवडते शाहरुख चे सीन्स

Submitted by कटप्पा on 28 May, 2020 - 16:39

बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .

तुम्हाला आवडणारे चित्रपटातील शाहरुख चे प्रसंग कोणते आहेत . शाहरुख म्हणजे लाखो प्रतिसाद येण्याचा धोका आहेच. सुचेल तसे लिहत चला.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बादशाह पिक्चरच भारी आहे.काहीही चंपाटपणा.प्रेम असलं की म्हणे आक्रोड खिडकीवर टाकल्यावर खिडकी फुटते(हे जुन्या गोलमाल मधल्या 'दहिवडा खाने को जी नही कर रहा मतलब तुमहे प्यार हो गया' लेव्हल चं लॉजिक आहे ☺️☺️)
मला बादशहा मध्ये ते लेले लेले बढाले बढाले आकाशवाणी होते ते सीन्स आवडतात.

चक दे आणि स्वदेस मध्ये शाहरुख खूपच आवडला. संयत अभिनय केला आहे अगदी. हिंदी शिनेमाच्या भाषेत भूमिकेवर 'हावी' न होता.

बादशाह पुर्ण चित्रपटच धमाल होता. कुठूनही बघा फुल्ल टाईमपास. शाहरूखने फुल्ल चित्रपटभर मस्त कॉमेडी बेअरींग पकडले आहे. जिम कॅरीच्या मास्क चित्रपटासारखे एक आचरट कॉमेडी गाणेसुद्धा आहे तेसुद्धा मस्त आहे. अमरीशपुरीची छप छप छप करून पप्पी घेतो ते सुद्धा बघायला मजा येते...

बिल्लु मधील सिनेमाच्या शेवटी शाहरुखचं भाषण आणि स्व. इरफान खान यांचे चेह-यावरचे एक्सप्रेशन्स
जबरदस्त. पाणी येतं राव डोळ्यात.

https://youtu.be/44ZX4wBqaQM

हा सीन जेव्हा लहानपणी पहिल्यांदा पाहिलेला तेव्हा खूप रडलेलो. ती पोरगी दोन वेळा नुसते मां बोलते तेव्हाच आपला बांध फुटतो. त्यानंतर शाहरूख जे बोलतो ते अगदी भिडते मनाला. त्याचे शेवटचे वाक्य... मां सबकुछ है, बस हमारे पास ही नही है. लेकिन हमारे पास पापा है. और वो भी काफी अच्छे है... बस्स तेव्हाच ठरवले होते कि आपणही मोठे झाल्यावर बाप बनू तेव्हा एका पोरीचेच बाप बनायचे आणि असेच बनायचे.. थॅंक्यू ॲण्ड लव्ह यू शाहरूख तू आम्हाला नुसते रोमान्सच नाही तर बापलेकीच्या नात्यातलाही गोडवा शिकवलास Happy

प्रत्यक्ष आयुष्यातही शाहरूख कौटुंबिक नाती जपणारा एक तितकाच प्रेमळ बाबा आहे. त्याच्या अभिनयात त्याचा हा गुण नेहमी उतरतो. त्यामुळे त्याचे असे सीन्स बघायला नेहमीच मजा येते !

शाहरुखचे मोजकेच चित्रपट प्रचंड आवडतात.. कारण एकच त्या भुमिकेत तो प्रामाणिक वाटतो.
1माय नेम इज खान,
2 स्वदेस,
3 डिअर जिंदगी,
4 चक दे इंडीया,
5 जब तक है जान,
6 वीर-जारा,
अजुनही काही मुवीज आहेत ते आठवले कि देते.

1माय नेम इज खान
>>>>
अप्रतिम चित्रपट.
मम्मा जेनी सोबतचे सारेच सीन अप्रतिम आहेत.

ऋन्मेष अगदी अगदी!

7 परदेस,
8 दिल से
9 जोश
10 चेन्नई express (कॉमेडीसाठी!)
11 हम तुम्हारे है सनम
12 पहेली

खरंच सांगते. मी आजवर शाहरुखचा डिडिएलजे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है हे तिन्ही मुवीज स्टार्ट टु एंड कधीच पाहु शकले नाही..
आणि वरचे 12 मुवीज मी कित्येकदा बघितलेत तरी माझ मन काहीकेल्या भरत नाही..

बादशाह पिक्चरच भारी आहे.काहीही चंपाटपणा.प्रेम असलं की म्हणे आक्रोड खिडकीवर टाकल्यावर खिडकी फुटते(हे जुन्या गोलमाल मधल्या 'दहिवडा खाने को जी नही कर रहा मतलब तुमहे प्यार हो गया' लेव्हल चं लॉजिक आहे ☺️☺️)
मला बादशहा मध्ये ते लेले लेले बढाले बढाले आकाशवाणी होते ते सीन्स आवडतात.

नवीन Submitted by mi_anu on 30 May, 2020 - 18:35
>>>>
दहीवडा सारखे अजून एक लॉजिक , चहा पिणारा \पिणारी अचानक कॉफी प्यायला लागणे. खखोदेजा.

हे चित्रपट मी कित्येक वेळा पाहिलेले चित्रपटात मोडतात...

डीडीएलजे १०-१२
कुछ कुछ होता है ८-१०
दिल तो पागल है ८-१०
कभी खुशी कभी गम १४-१६
कल हो ना हो ६-८
येस्स बॉस १०-१२
चक दे - १०-१२
मै हू ना ८-१०
बादशाह ६-७
चेन्नई एक्सप्रेस ५-६
माय नेम ईज खान ६-७
परदेस ८-१०
कभी हा कभी ना ६-७
चमत्कार ४-५
करन अर्जुन ६-७
डर ७-८
बाजीगर ७-८
स्वदेस - ६-७

चटचट आठवेल तसे पटपट लिहिले.
उद्या फुरसतीने सर्वच चित्रपटांची लिस्ट काढूया

कभी अलविदा का नाहीय यादीत ?
>>>>
तो मी दोन तीन वेळाच पाहिलाय.
चांगला चित्रपट आणि वन टाईम मस्ट वॉच असला तरी फारशी रिपीट वॅल्यू नाही त्याला..
तसेच बच्चन फॅमिलीने फार बोअर केलेय त्यात..

उलट आहे, अमिताभने शिजवून (पक्षी पकवून) खाल्लंय त्यात शाहरुखला. त्याच्या सेक्सी सॅमकरिता डीवीडी खूप वेळा पाहिली आणि अजुनही अनेकदा पाहणार आहे.

स्वदेस. हा एकच मूव्ही मनापासून आवडला याचा प्रत्येकच सीन आवडलाय. सुपर्ब. कारण यात तो मुळात शाहरूखच वाटत नाही. काहीतरी गंडलंय‌. इथे शाहरुख चे सीन लिहायचेत अन् मी मोहन भार्गव बद्दल लिहीलंय Lol .

अमिताभ ने खरंच पकवला आहे . कोणत्या अँगल ने तो sexy वाटतो ? म्हाताऱ्याने वय बघून कामे केली पाहिजेत .

मलाही शाहरुख खान खूप खूप आवडायचा. ऋ तुझ्या इतकाच कदाचित. Wink
रोमान्स करावा तर त्यानेच. बाकी लोकांचा रोमान्स म्हणजे पैसे घेऊन उपकार केल्यासारखं वाटायचे. उदा सुनिल शेट्टी Lol
त्याचा Anti hero पण आवडायचा. तो जी स्क्रीन वर ऊर्जा आणायचा , unmatchable होती. त्यामुळे रूढार्थाने देखणा नसूनही कमालीचा आकर्षक वाटायचा. दहा वर्षांपासून आवडत नाही पण , चेहरा पण क्रिपी वाटतोय बहुतेक बोटोक्स मुळे. He is working/acting but I am still missing him. तो भयंकर हुशारही वाटतो, अजूनही तो काही तरी वेगळे करू शकतो. स्वदेस सारखे वगैरे. केजो आणि चोप्रा इमेज मागे टाकावी त्याने. It is time to move forward!
आवडते सिन्स सगळेच emotional and romantic. पण दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे.
धन्यवाद कटप्पा !

मी बाझीगर ७२ वेळा मोजल्यानन्तर काउन्टीन्ग बन्द केले. DDLJ अगणित वेळा बघितला आहे. त्यातला गच्चीवरचा सीन प्र च न्ड आवडतो.
९०'s त्याचे बरेच मूव्हीज परत परत बघते..पण त्याचा लेटेस्ट मी एन्जोय केलेला पिक्चर- चेन्नई एक्स्प्रेस. त्यानन्तरचे फारसे बघितले/बघवले नाहीत.

मी बाझीगर ७२ वेळा मोजल्यानन्तर काउन्टीन्ग बन्द केले. DDLJ अगणित वेळा बघितला आहे.
>>>>
जोरदार टाळ्या

त्यातला गच्चीवरचा सीन प्र च न्ड आवडतो.
>>>>
गच्चीवरचा सीन, शेतातला आओ आओ फुर्र सीन, शेवटचा जा सिम्रन जा आणि ट्रेनचा सीन, त्या आधीचा बाबूजी ठिक कहते है संवाद, राज आणि त्याच्या पॉप्सचे सीन, अगर वो मुझ से प्यार करती है तो पलटेगी जरूर... एकेक आयकॉनिक सीन आहेत चित्रपटात ! यावितिरीक्त हलके फुलके हसवणारे रडवणारे कित्येक आहेत मोजदाद नाही...

माझा एक आवडता म्हणजे तो काजोलच्या आईची समजूत काढताना.. अब आप ही बताईये मांजी मेरा रास्ता सही या गलत.. लव्ह यू शाहरूख .. हेच ते खरे जिगरबाज प्रेम !

Pages