NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण.

Submitted by सखा on 27 May, 2020 - 17:41

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.
खरं म्हणजे परदेशात जाणं आणि तिथेच स्थायिक होण हे एक फार मोठं डिसिजन असत आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दुसऱ्याच्या या खासगी जीवनात नाक खुपसायची सवय असल्यामुळे आपल्याकडे त्याची चर्चा होतेच. बहुतेक वेळा टाकल आईबापाला इथं आणि तिकडे मस्त मजा मारत आहेत असे एक करूण चित्र उभे केले जाते. माझ्या मते ते फार स्टरियोटाइप आहे.
नव्या पिढीचे पालक अत्यंत जागरूक आहेत आपल्या मुलांच्या पंखात बळ देणारे पालक हे जा जग जिंकून दाखवा ती धमक आम्ही तुला दिली आहे असे म्हणणारे आहेत. आता तुम्ही अर्जुन आणि कृष्णाचे पराक्रम वाचत मोठे झालात की कुठल्या दुसऱ्या रड्या गोष्टी यावर तुमचा विचारांचा पिंड आहे. सत्या नादेला, सुंदर पिचाई याच्या आई-वडिलांनी जर भोकाड पसरले असतं तर आज जे भारतीय अभिमानाने त्याच्याकडे बघतात ते होऊ शकलं नसत.
माझ्या माहितीतल्या एकेकाळी अमेरिकेला प्रचंड शिव्या घालणाऱ्या अनेक लोकांची मुले आज अमेरिकेत शिकत आहेत आणि आज आग पाखड करणाऱ्यांची मुलं उद्या तिथे जाऊन चमकतील, चमकू दया की त्यांना.
पैसे पण पाठवतात ते भारतात इकॉनोमी ला मदत करतातच. हुशार आणि धाडसी लोक आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणारच.
तुमच्यात धमक असेल तर तुम्ही पण जगाच्या पाठीवर कुठेही लाथ मारेल तिथे पाणी काढेल म्हणा. सच्चा भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरीही तो भारतावर प्रेम करतोच.
संपूर्णपणे नव्या जगात जाऊन शून्यातून स्वतःला पुन्हा एकदा उभं करणं, प्रुव्ह करणे, स्वत्व सापडत जाण यात एक झिंग आहे, मस्ती आहे, रग आहे!
We humans are explorers at the core so don't stop, explore!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख गंडला आहे असं वाटतंय. आमचा पाहुणचार, शिकागोतली लोकं करतात तो पाहुणचार, कर्तुत्व, ओबामा, नडेला, पिचाई वगैरे सगळी भेळ..

शिकागो सारख्या ठिकाणी जिथे आठ महिने थंडी असते तिथे कोणी घरी आले कि पाहुणचार करतातच. कारण घरात बसून बसून आधीच पकलेले असतात सगळे.

थोडक्यात हा एक संदेश आहे.
तू तेरा देख।
कामापुरता मामा आणि ताकापुरता ओबामा.
-------------------
NRI च कशाला? भारतातही कुठे/ दिल्ली / चेन्नई / भोपाळ / मुंबई / पुणे / बेंगळुरू / अहमेदाबाद / गोवा / कोकण इथे पर्यटनास गेल्यावर तिथल्या कुणाकडे जाऊच नये.
हॉटेलात राहावं.

भिजल्या उंदरासारखं वावरून चीज टोस्ट खाण्यापेक्षा वाघासारखे फिरून कचकून स्ट्रीटफुड गिळावं, फेसबुकवर रग्गड फोटो टाकावेत.

सनी, राजीव मिस्रा, अंशू जैन आणी इतर आर्थिक घोटाळ्यात अडकलेले व अ‍ॅक्टिव्हली घोटाळे कर णारे भारतीय ह्यांच्या करतुतींबद्दल वाचल्यावर तरी बरे झाले पीडा गेली असेच फीलिन्ग येते. आणि अमेरिकेची किंवा जनरल वेस्टर्न देशांमधील सेट लीगल फायनान्शिअल सिस्टिम हिचा फायदा घेउन भारतीय जुगाड वापरून कसे तरी वर जायचे श्रीमंत व्हायचे अशीच ह्या पब्लिकची आकांक्षा असते अस दिसते. बएर हे तिथे ही इथल्या सारखेच राहतात. त्यात एवढे काय कौतू क परत येउन इथे भापू नये . इथून बुक केले की मस्त हाटेले घरे राहायला मिळ तात आपली आपण ट्रिप आखता येते . मला तर कोणाच्या घरी राहायला जमतच नाही. त्यासाठी ओळख काढून जाणे लै बेकार. तुम्ही का लोड घेता. ग्रीन कार्ड रखलो डालरां रखलो उधरीच रहो. इधर वापस आओ नक्को.

काय म्हणतो तुमचा ओबामा किंवा काय म्हणतो तुमचा ट्रम्प मध्ये ओफेंड होण्यासारखे काय आहे?आमच्या दिल्लीत सेटल मित्राला आम्ही काय म्हणतात तुमचे केजरीवाल विचारत असतो.तसेच हे.

>>>हुशार आणि धाडसी लोक आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणारच.>>>> हसुन हसून पोट दुखू लागले
>>>>पैसे पण पाठवतात ते भारतात इकॉनोमी ला मदत करतातच.>>>> कुणाला पैसे पाठवतात? आपल्या आईवडीलांनाच ना? मग भारतावर उपकार नाहीत ते. कोणी कार्ला लेणी दत्तक घेउन कधी विचार केलाय का जीर्णोद्धाराचा किंवा तत्सम काही हातभार?

मी देखील अमेरीकेतच स्थाइक आहे परंतु धागा एकतर्फी वाटला मला. तुम्ही आता आता आलात का हो परदेशात? भारतात सारेजण मजेत रहातात. कार , हॉटेल, रेंट/बुक करुन, पर्यटन करतात. मायबोलीतील पुस्तके वाचतात, परिसंवादांना जातात, समृद्ध होतात. मी कधी गेले तर केवढं कोडकौतुक होतं, इतकी सुंदर पर्यटन स्थळे मला आवर्जुन दाखवतात. लाड लाड होतात माझे. पाय उचलवत नाही. अर्थात बाबा, भाऊ, वहीनीच नाही तर काका, मामी, काकवा, मावश्या याला अपवाद नाहीत. तेव्हा ज्याचा त्याचा आपला अनुभव आहे हा. पण डॉलरचा माज असेल तर तो अमेरीकेत सोडून जावे लागते मात्र. त्यांना आपली असुया नाहीच्चे. हे जे डोक्यात फिट्ट आहे ना, (तुमच्या नसेल पण काहींच्या) की डॉलर मिळाले म्हणजे आकाशाला गवसणी घातली ते चूकीचे व तद्दन बकवास आहे. आपणही इथे त्यांच्या काळजीत झुरतो, जरा भारतात खुट्ट झाले की आपल्या काळजात धस्स होते. का तर माझा भाऊ आहे, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांची लहान लहान पिल्लं आहेत. हे त्यांनाही माहीत असतेच की. संवाद मात्र नियमित हवा. मला वाटते (वैयक्तिक मत) परदेशात फक्त भोग आहे. भारतात योग व भोगाचा समन्वय आहे.

'सखा', आपल्याला काही कोती माणसे भेटलीही असतील, कदाचित संवाद नीट साधला गेला नसेल, पण सरसकटीकरण करता येणार नाही. मनोवृत्तीचे, असे २ कप्प्यात विभाजन करता येणार नाही.

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.>>
गोड गैरसमज आहे तुमचा. अहो इथे वेळ कुणाकडे आहे तुमच्या गोष्टीत नाक खुपसायला.
आणि आतातर गावाकडचीही बरीच मंडळी गेलीय विदेशात त्यामुळे काही विशेष वाटत नाही.

सखा यांचे बरेचसे लेखन विनोदी प्रकारातले आहे.
उपहासात्मक लेखनही ते छानंच करतात.
"लेकी बोले सुने लागे" अशी तर आपल्याकडची पूर्वीपासूनच परंपरा आहे.
कदाचित काही आजूबाजूच्या लोकांचा बडेजाव वाढलाय, त्यांची मतं, त्यांचं व्यक्त होणं जरा अंमळ (किंवा बरंच) जास्तच होतंय असं त्यांना कदाचित वाटून तशा मनोवृत्तीला परस्पर उत्तरं दिली जावीत या इच्छेने कदाचित ते स्वतःच लेकीची भूमिका तर निभावत नाहीयेत ना अशी एक आशंका (जरी हा लेख ललितलेखन या सदराखाली असला तरीही) मनात आली.

परदेशी जाणाऱ्या तिथे नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकं बद्द्ल बिलकुल असूया नाही
तेवढं वेळ पण नाही कोणाकडे.
जे अमेरिकेत, यूके किंवा बाकी पाश्चिमात्य देशात गेले आहेत तर तिथेच राहण्याची इच्छा बाळगून आहेत.
सर्वांना एकच माप लावणार नाही.
पण जास्त करून लोकात तिथे गेल्यावर भारत,भारतीय लोकांना कमी दर्जाचे समजले जाते.
बोलण्यात,वागण्यात ती भावना असते.
आम्हाला अभिमान आहे की आमचेच भारतीय बांधव परदेशात यश मिळवत आहेत.
पण त्या पेक्षा जास्त अभिमान इथेच राहून इथल्या विकासात योगदान देणाऱ्या लोकांबद्दल आहे
मग ते उद्योग पती असोत जे इथे नव नवीन उद्योग उभारून देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत.
Engineer असतील,डॉक्टर असतील,शेतकरी असतील,किंवा कर्मचारी असतील ह्या सर्वांचा अभिमान आहे ज्यांनी भारत देश समृद्ध होण्यासाठी कष्ट घेतले आहे
आपल्या बुध्दी चा,पैस्या चा वापर भारतासाठी करणारे भारतीय हे NRI लोकांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहेत .

>>>NRI च कशाला? भारतातही कुठे/ दिल्ली / चेन्नई / भोपाळ / मुंबई / पुणे / बेंगळुरू / अहमेदाबाद / गोवा / कोकण इथे पर्यटनास गेल्यावर तिथल्या कुणाकडे जाऊच नये.
हॉटेलात राहावं.

भिजल्या उंदरासारखं वावरून चीज टोस्ट खाण्यापेक्षा वाघासारखे फिरून कचकून स्ट्रीटफुड गिळावं, फेसबुकवर रग्गड फोटो टाकावेत.>>>> सॉलिड!!! + १००१ यावेळेस पुण्याला घर असूनही आम्ही हॉटेलात राहीलो होतो. कारण तीघे होतो. गर्दी गर्दी नको म्हणुन. त्यांनाही जरा श्वास घेता येउ देत, आम्हालाही.

वीरू तुम्ही अमेरिकेला कधी गेलात? रामगढ मध्ये होतात ना ?
नवीन Submitted by कटप्पा>>
कटप्पासर विषयांतर करु नका. लॉकडाउनमध्ये भारी धागा आलाय. अजुन अनेक मान्यवर यायचे आहेत धाग्याचा समाचार घ्यायला.

थोडं विस्कळीत लिहिलंय, पण भावना पोचल्या. दुटप्पी धोरणाबाबत - सुरुवातीला खटकतं, बट इवेंचुली यु ग्रो आउट ऑफ इट. पार्ट ऑफ द प्रोसेस...

बाकि, इंडियन एक्नामीला हातभार लावण्याबाबत - उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. अमेरिकेत रहाणारे सगळे भारतीय पाट्या टाकत नाहित...

....... मला यापुढे चर्चा करायची इच्छा नाही.
रॉंग धागा फॉर मी. लुझ-लुझ. (विन-विन च्या विरुद्ध) आधीचा प्रतिसादही कॅन्सल समजावा.

सखा कुणाला म्हणून ये. दादा करेक्टै. आपणही अमेरिकेत असं तर भारतात तसं का म्हणून विव्हळत बसू नये.
तू तेरा देख
पयले मै मेराच देखता.

सांगड लागायची कशी?एखादा निगेटिव्ह प्रतिसाद आला की लेखक तो मुद्दा लेखातून छाटून टाकत आहेत.(प्रतिसाद मात्र 4 तासांवर झाल्याने छाटता येत नाहीय लोकांना)

Pages