NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण.

Submitted by सखा on 27 May, 2020 - 17:41

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.
खरं म्हणजे परदेशात जाणं आणि तिथेच स्थायिक होण हे एक फार मोठं डिसिजन असत आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दुसऱ्याच्या या खासगी जीवनात नाक खुपसायची सवय असल्यामुळे आपल्याकडे त्याची चर्चा होतेच. बहुतेक वेळा टाकल आईबापाला इथं आणि तिकडे मस्त मजा मारत आहेत असे एक करूण चित्र उभे केले जाते. माझ्या मते ते फार स्टरियोटाइप आहे.
नव्या पिढीचे पालक अत्यंत जागरूक आहेत आपल्या मुलांच्या पंखात बळ देणारे पालक हे जा जग जिंकून दाखवा ती धमक आम्ही तुला दिली आहे असे म्हणणारे आहेत. आता तुम्ही अर्जुन आणि कृष्णाचे पराक्रम वाचत मोठे झालात की कुठल्या दुसऱ्या रड्या गोष्टी यावर तुमचा विचारांचा पिंड आहे. सत्या नादेला, सुंदर पिचाई याच्या आई-वडिलांनी जर भोकाड पसरले असतं तर आज जे भारतीय अभिमानाने त्याच्याकडे बघतात ते होऊ शकलं नसत.
माझ्या माहितीतल्या एकेकाळी अमेरिकेला प्रचंड शिव्या घालणाऱ्या अनेक लोकांची मुले आज अमेरिकेत शिकत आहेत आणि आज आग पाखड करणाऱ्यांची मुलं उद्या तिथे जाऊन चमकतील, चमकू दया की त्यांना.
पैसे पण पाठवतात ते भारतात इकॉनोमी ला मदत करतातच. हुशार आणि धाडसी लोक आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणारच.
तुमच्यात धमक असेल तर तुम्ही पण जगाच्या पाठीवर कुठेही लाथ मारेल तिथे पाणी काढेल म्हणा. सच्चा भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरीही तो भारतावर प्रेम करतोच.
संपूर्णपणे नव्या जगात जाऊन शून्यातून स्वतःला पुन्हा एकदा उभं करणं, प्रुव्ह करणे, स्वत्व सापडत जाण यात एक झिंग आहे, मस्ती आहे, रग आहे!
We humans are explorers at the core so don't stop, explore!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

A chal chal

मलाही सांगड नाही लागली.
लेख प्रतिसादानंतर एडिट केला असेल तर वाईट झाले. मला वाचता आले नाही.
आणि चुकीचेही केले. काही लोकं तुमची बाजू घेऊनही वादात उतरले असते. थोडं थांबायचे होते.

बाकी परदेशात जाणारे कित्येक जण आजही स्वत:ला फार महान समजतात. विमानतळावरून कुठे आपण ऊडतोय त्याचे स्टेट्स टाकत राहतात. जसे काय यांचे यान चंद्रावरच जातेय. स्पेशली अमेरीकेत राहणारया भारतीयांना वाटते की अमेरीका महासत्ता त्यांच्यामुळेच आहे. जसे राजपूत कॉलेजवाले मॉडेल कॉलेजवाल्यांकडे बघतात तसे हे भारतीयांकडे बघतात.

याऊलट संधी न मिळाल्याने अमेरीकेत जाता न येणारे कित्येक भारतीय सुशिक्षित मंडळी स्वत:ला स्वदेशचा शाहरूखच समजतात. जसे काही मुद्दाम देशसेवा करायलाच हे भारतात थांबले आहेत.

आणि हा मनुष्यस्वभावच आहे. यात काही गैर नाही. अगदी महाराष्ट्रातही मुंबईकर आणि पुणेकर वा ईथे जॉबला असणारे स्वत:ला हायफाय समजतात. त्यात कोणी आयटीत असेल तर दरदिवशी आपण आयटीत आहोत याचा उगाचच या ना त्या कारणाने संदर्भ देत उल्लेख करत राहतात. जणू काही आपलीच फिल्ड जगात सर्वात मॉडर्न आहे.

पण ठिक आहे हा मनुष्यस्वभावच आहे. जिथे जेव्हा डिमांड असते तिथे तेव्हा कॉम्पिटीशन असते. त्यावर कोणी मात करत असेल तर खुशाल मिरवावे. त्यात गैर काही नाही.

मी सुद्धा नवीन नवीन छोट्या कंपनीतून मोठ्या कंपनीत आई मीन एमेनसीत कामाला लागलो तेव्हा काय फुशारक्या मारायचो. जगभरातल्या मोठमोठ्या प्रोजेक्टसवर काम करतोय म्हणजे आपणच ते ईन्फ्रास्ट्रक्चरचे साम्राज्य उभारतोय असे वाटायचे. प्रत्यक्षात दोन्ही कंपन्यात खुर्चीवर लोळत गवंडीकामच करायचो.

पण चालतंय.. मनुष्यस्वभावच आहे तो. आणि मी कुठे एलियन आहे...

बरोबर . मनुष्यस्वभाव आहे पण जनरलाईझ करू नका .

माझ्या ओळखीची एक मुलगी - वयाने चार पाच वर्ष मोठी - आपण ताई म्हणूया . तिचा किस्सा .
मी कॉलेजात असताना हि अमेरिकेत पोचली होती . आमच्या कोलोनीत सुट्टीला असायची तर फुल भाव खायची कि अमेरिकेत आहे . माझ्या फायनल इयर ला प्रोजेक्ट साठी गाईड करते का तर हसून म्हणे अरे हे शाळेतले प्रोजेक्ट वगैरे साठी वेळ नसतो माझ्याकडे . माझा वेळ महत्वाचा आहे . बिलियन डॉलर चे सॉफ्टवेयर लिहिते मी . आम्ही पण एकदम आदराने बघायचो .

नंतर काही वर्षांनी मी पण अमेरिकेत आलो . काही वेळानंतर जॉब चेंज केला - एका प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत आलो.
त्या ताई ला मी विसरूनही गेलो होतो साधारण एका वर्षानंतर तिचा पिंग आला . ती माझ्याच कंपनीत होती पण दुसऱ्या शहरात. तिच्याशी बोलणे झाले तेंव्हा कळले कि ताई प्रोडक्शन सपोर्ट मध्ये आहे जेव्हापासून अमेरिकेत आली तेंव्हापासून . टिकेट्स घेते आणि पुढच्या लेवल ला ट्रान्सफर करते . मी बिलियन डॉलर ची सॉफ्टवेयर लिहिते तुझ्या कॉलेज प्रोजेक्ट ला मदत करू शकणार नाही म्हणणारी हि बाई आज मीच लिहिलेल्या प्रॉडक्ट साठी पहिल्या लेव्हल चे सपोर्ट करत होती Happy
बरे कॉन्टॅक्ट का केला तिने तर तिला आमच्या कंपनीचा लेटेस्ट फोन पाहिजे होता जो मी घेतला तर मला डिस्काउंट मिळून स्वस्त मिळाला असता.
कारण कि ती काँट्रॅक्टींग जॉब मध्ये होती . म्हणजे आमच्या कंपनीचा व्हेंडर इन्फोसिस आणि ती इन्फोसिस च्या सब व्हेंडर ची सब व्हेंडर वगैरे लेयर मध्ये .
Linkedin मध्ये दिमाखाने अजूनही technical architect लिहिते Lol currently working at मध्ये नाव स्वतःच्या एम्प्लॉयर चे टाकत नाही . इन्फोसिस हि टाकत नाही . आमच्या कंपनीचे नाव टाकते Happy

<< Linkedin मध्ये दिमाखाने अजूनही technical architect लिहिते Lol currently working at मध्ये नाव स्वतःच्या एम्प्लॉयर चे टाकत नाही . इन्फोसिस हि टाकत नाही . आमच्या कंपनीचे नाव टाकते >>
Rofl

आमच्या कोलोनीत सुट्टीला असायची तर फुल भाव खायची कि अमेरिकेत आहे .
>>>>

एकेकाळी दुबईत काम करणारे लोकं असेच गॉगल वगैरे लाऊन भाव खायचे. लोकांना टेप रेकॉर्डर वीसीआर घड्याळे वगैरे इम्पोर्टेड वस्तू आणून द्यायचे आणि ईज्जत कमवायचे आणि दुबई रिटर्न म्हणून मिरवायचे.

दुबई लय लांब
पाहिले मुंबई वरून गावी येणारे पण लय भाव खायचे.
पाहिले म्हणजे त्यांची भाषा .
हिंदी बोलणार मध्ये मध्ये त्यांना हिंदी बोलता येणे हे अभिमानाचे वाटायचे,आणि मराठी गावठी वाटायचे आणि इथेच आपण स्व ओळख विसरली आणि मुंबई मधून मराठी कमी झाली.
आता सकाळी लोक मुंबई ला येतात आणि संध्याकाळी परत झोपायला गावी.
त्या मुळे मुंबई कर हे अप्रूप राहिले नाहीत.
नंतर दुबई चा ट्रेड आला तिथे मजुरी करायचे पण इथे आल्यावर सेंट काय ,आणि. Sony कंपनीचे टीव्ही, व्हीसीआर,कॅमेरा,rebone चा गॉगल काय विचारूच नका.
आता एवढी लोक दुबई ला गेलेत की अरबी लोकांनी त्यांची किंमत वाटेनाशी झाली.
कोणी विचारत नाही.
मग शिकलेल्या लोकांची अमेरिका आली.
साधा इंजिनिअर पण तिथे लाखात पगार घेवू लागला त्याची दहा हजार पण कमवायची लायकी नव्हती .
सर्व टॉपर अमेरिकेने जास्त पगार देवून स्वतः च्या देशात नेले नवीन च आलेल्या आयटी क्षेत्रात.
आता परत स्थिती मूळ पदावर आली आहे.
दहावी,बारावीत,99.99 टक्के मिळालेले गेले कुठे हा प्रश्न आपल्याला पडतो ना?,
ही सर्व हुशार मुल जातात कुठे देशात तर त्यांचे अस्तित्व दिसत नाही.
तर हे अमेरिकेत जातात.

Te kuthe जातात याच्याशी काय करायचंय.जिथे ज्यांची प्रगती,मुख्य म्हणजे जॉब satisfaction asel tithe jau de ki. Ha mtra ithe alyavar attitude दाखवू नये.आणि काहींनी dakhvalach तर टाळण्याचा पर्याय आहेच की.

. Ha mtra ithe alyavar attitude दाखवू नये
>>>>>
हे घडणे स्वाभाविक अस्स्ते. अपवाद असलेल्यांबद्दल आदर आहेच. पण नसलेल्यांनाही ईथे समजून घ्यायला हवे.
जसे गावातला हुशार मुलगा आपल्या योग्य नोकरीची संधी साधायला शहरात येतो तसेच हे परदेशात जाणे आहे. आता त्या
शहरात वा परदेशात त्याच्याच लेव्हलचे बरेच असतात. त्यात तो हजारोंपैकी एक असतो. पण मूळगावी आल्यावर हजारोंतला एक असतो. तर त्यांच्यात त्याला भारी वाटणे स्वाभाविक आहे. आता कालांतराने गावच्या दर दुसरया घरातील शहरात जाऊ लागला तर हे वाटणे कमी होते म्हणा.

असो
जर कोणी पैसा कमवायला परदेशात गेला असेल तर मला सांगा पैसा माणसाला आनंद केव्हा देतो. जेव्हा तो तुमच्याकडे असतो आणि तुमच्या शेजारच्यांकडे नसतो. त्यामुळे हा आनंद पैसा कमावून परत आल्यावर मिळायला सुरुवात होते. दुबई रिटर्न लोकं हाच आनंद लुटायचे Happy

ऋन्म्याने मूळ विषयाला नविन फाटे फोडल्याने धागाकर्त्याला अपेक्षित असा एक मजेशीर किस्सा जो माझ्या बाबतीत साधारण २०-२५ वर्षांपुर्वी घडलेला तो इथे मांडतो -

माझं ग्रीनकार्ड तेंव्हा झालेलं असल्याने मी आता काय भारतात परत जात नाहि हे जवळच्या मंडळींना ठाउक झालेलं. एक समवयस्क शेजारी अटलांटाला त्याच्या कामानिमित्त (एच-१) असतानाच्या भेटित इतर चौकशी (अमेरिका कशी वाइट इ. वर माझं बौधिक घेउन) झाल्यावर त्याने विचारलेला थेट प्रश्नः
मित्र - राजा, तु काहि वर्षांनी सिटिझन होणार. मग अमेरिका आणि भारत यांच्यात युद्ध झालं तर तु काय करणार?
मी - पेंटगानचे सॅटेलाइट्स हॅक करुन, भारताचे कोऑर्डिनेट्स पाकिस्तान/चीन वर पॉइंट करणार म्हणजे बी२ बाँबर कार्पेट बाँबिंग पाकिस्तान/चीन वर करेल.
मित्र - काय साला, मस्करी करतोस काय माझी?
मी - भो***, सुरुवात कोणी केली?

तर मंडळी, हा सदग्रहस्थ त्यावेळेला संधी असताना बाणेदारपणे अमेरिकेत रहाणार नाहि अशी भीष्मप्रतिज्ञा करुन भारतात परत गेला. १०-१५ वर्षांपुर्वि त्याने परत एकदा युद्धपातळीवर अमेरिकेत येण्याचे प्रयत्न सुरु केले पण वेळ निघुन गेली होती. आता कनेडियन पीआर घेउन तिथेच स्थायीक झाला आहे...

अश्या दुटप्पी लोकांचे किस्से भरपूर आहेत. अमेरिकन सिटिझन झाल्यावर भारताला शिव्या घालणारे, आणि ग्रीनकार्ड मिळाल्यावर, ग्रीनकार्ड/विजा न-मिळाल्याने, सिटिझन झाल्यावर अमेरिकेला शिव्या घालणारे सुद्धा. पण ते सगळं नंतर कधीतरी... Wink

ऋन्म्याने मूळ विषयाला नविन फाटे फोडल्याने...>>>> मूळ विषय मी धाग्यावर यायच्या आधीच धागाकर्त्याने संपादित केल्याने मला तसही त्याचा फारसा गंध नाही. अंदाजाने माझे विचार प्रकट करतोय कारण शाहरूखचा स्वदेशमुळे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

मी - भो***, सुरुवात कोणी केली?
>>>>
हे वाक्य दाखवून देते की आजही भारतीय हृदयच तुमच्या काळजात धडकत आहे. तुमच्या मित्रालाही हे समजले असेल.

असो, मुळात जेव्हा युद्ध होईल तेव्हा कुठल्याही देशाचा नागरीक म्हणून त्या युद्धात भाग घेण्याअगोदर एक माणूस म्हणून ते युद्ध कसे रोखता येईल याचा विचार केला पाहिजे सर्वांनीच असे मला वाटते Happy

कुणाला पैसे पाठवतात? आपल्या आईवडीलांनाच ना? मग भारतावर उपकार नाहीत ते.
>>> उपकार नाही पण मदत होतेच.... इकडे बँकेत तुम्ही पैसे ठेवण्याऐवजी भारतात आईवडिलांच्या बँकेत ठेवले तर त्या पैशांचा फायदा भारतालाच होतो....

भारतात आईवडिलांच्या बँकेत ठेवले तर त्या पैशांचा फायदा भारतालाच होतो....
>>>>
बॅंकेतले पैसे घेऊन काही भमटे परदेशात पळून जातात.. लक्ष्मी पुन्हा विलायतेला जाते. काही फायदा होत नाही. उलट ते पैसे बॅंक आणि सरकार मग आमच्याकडूनच वसूलते.

आता भारतातल्या लोकाना डॉलर ची नवलाई नाही.
या भारत भेटीत जावेला बरोब र घेउन खरेदिला गेले होते.
माझी खरेदि पाच हजार रुपये, तिची पन्नास हजार..... साड्या आवडल्या म्हणुन सहज!
कसला आलाय डॉलरचा माज!

आता सगलीकडचा माल सगळीकडे जात असल्याने अपूर्वाई कमी झालीय हे खरे.
पूर्वी मोदक चॉकलेट(हर्षीज किसेस) पाहिली की त्याभोवती एक वेगळं ग्लॅमर निर्माण व्हायचं.फरेरो रोशर पाहिली की भोवती युरोपच्या ख्रिसमस सिझन घंटा वाजू लागायच्या. आता मोदक चॉकलेट 'चारभुजा स्वीटस अँड ड्राईफ्रुटस' असं लिहिलेल्या कोपऱ्यावरच्या दुकानात मिळतात आणि फरेरो रोशर नारायणगाव का कुठेतरी घाऊक प्रमाणात बनतात(पुढच्या वेळी आणलं की बघून सांगते) ☺️☺️

@mi_anu, अगदि बरोबर!
मी 'dove soap' वाहुन नेत असे. मग एकदा आईच्या घराशेजारि छोट्या दुकानात तोच साबण पाहिला! तेव्हा पासुन कानाला खडा!
असे भरपुर अनुभव आहेत.

Online shopping mule जगातील सर्व वस्तू उपलब्ध होतात.
अमेझॉन,फ्लिपकार्ट ची कृपा.

लेखात फक्त अमेरिकन भारतीयांची उदाहरणे दिलीत म्हणून - यातले बहुतेक इथल्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय गटातून तिक डे गेलेले असतात. त्यांच्या आईवडिलांना उदरनिर्वाहासाठी अमेरिकेतून येणार्‍या मनी ट्रान्सफरची गरज असते का?

अनिवासी भारतीयांकडून येणार्‍या पैशांतला ५३% पैसा आखाती देशांतून बव्हंशी कुशल, अर्धकुशल कामगारांकडून येतो . अमेरिकेतून २२ % तर ब्रिटनमधून ३% येतो.

६० % पैसा हा कुटुंबाच्या निर्वाहासाठी तर २०% बँकेत बचत म्हणून जमा करण्यासाठी येतो.

इथल्या बँकांत पैसा ठेवणारे भारतातले व्याजदर आणि अमेरिकेतले व्याजदर , डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत यांचा विचार करत नाहीत का?
ते फायद्याचे नसतील तर इथे पैसे ठेवतील का?

अनिवासी भारतीयांच्या दुटप्पीपणाची उदाहरणे

अमेरिकेत तिथल्या लोकशाही, व्यक्ति स्वातंत्र्याचे गोडवे गाताना भारतासाठी मात्र उलट मानदंड लावतात.

जॉर्ज फ्लॉयडच्या खुनाविरोधात बोलतील, तेच इथल्या दडपशाहीचं आणि पोलिसी क्रौर्याचं कौतुक करतील.

आखाती देशांत जाऊन पैसे कमवतात आणि इस्लामला आणि मुसलमानांना शिव्या देतात.

यादी वाढवता येईल.

आपण सगळेच, कधीना कधी काहीना काही प्रमाणात दुटप्पीपणे वागत असतो

आखाती देश किंवा अरबी मुस्लिम ह्यांना कोणी शिव्या देत नाही उलट त्यांचे कौतुक च केले जाते.
ज्या पद्धतीने ते राज्य व्यवस्था चालवतात त्याचे कौतुक होते.
शिव्या फक्त पाकिस्तानी,बांगलादेशी अतिरेकी ,lawless muslim लोकांना दिल्या जातात.
आणि आपल्या देशातील राष्ट्र द्रोही मुस्लिम लोकांना.
अब्दुल कलाम साहेब न विषयी एक शब्द पण वाईट बोलणारा एक पण भारतीय मी बघितला नाही.

आणि आपल्या देशातील राष्ट्र द्रोही मुस्लिम लोकांना.
अब्दुल कलाम साहेब न विषयी एक शब्द पण वाईट बोलणारा एक पण भारतीय मी बघितला नाही.

नवीन Submitted by prashant255 on 31 May, 2020 - 09:44

>>>>>

पण शाहरूख खान आणि आमीर खान बद्दल बोलणारे सापडतील.
का? कोणी ठरवले हे की अब्दुल कलाम आणि सारेच हिंदू देशभक्त आणि हे लोकं देशद्रोही?

जर दुटप्पीपणा धाग्याचा विषय असेल तर हि पोस्ट अवांतर नाही.

आणि आखाती देशांचे कौतुक म्हणाल तर दुबईचा ब्राण्ड ॲम्बसेडर शाहरूख आहे. आता बोला !

आपण सगळेच, कधीना कधी काहीना काही प्रमाणात दुटप्पीपणे वागत असतो
Submitted by हर्पेन on 31 May, 2020 - 09:36
>>>>>

ऋन्मेष अपवाद लिहा.
मी नाही वागत
जनरलायझेशन नको

यादीत भर -
वंश, धर्म, मूळ देश यांच्यावर आधारित भेदभावाला प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे समर्थन करणारे ब्रिटनवासी भारतीय जात्याधारित भेदभावाचा त्या कायद्यात समावेश करायला विरोध करतात.

मला आजकाल ज्या लोकांना दुसऱ्या लोकांकडून वाईट अनुभव येतात त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटायला लागली आहे. त्यांच पूर्ण आयुष्य, मतमतांतरे ही दुसरी लोकं ठरवतात. मला वाईट वागायचे आहे, मला द्वेष करायचा आहे म्हणून किती लोकं असतील! असो.

ऋन्मेष अपवाद लिहा.
मी नाही वागत
जनरलायझेशन नको
मी नाही वागत म्हणणं हाच तो सगळ्यात मोठा दुटप्पीपणा

हे म्हणजे तुम्ही राजा हरिश्चंद्राला विचाराल कि तू कधी खोटे बोलतोस का? सत्यवादी हरिश्चंद्राने नाही बोलताच हेच तू खोटे बोलतोस असे सुनावण्यातला प्रकार झाला.
असो सुनवा
राजा हरिश्चंद्र डोन्ट केअर Happy

Pages