NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण.

Submitted by सखा on 27 May, 2020 - 17:41

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.
खरं म्हणजे परदेशात जाणं आणि तिथेच स्थायिक होण हे एक फार मोठं डिसिजन असत आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दुसऱ्याच्या या खासगी जीवनात नाक खुपसायची सवय असल्यामुळे आपल्याकडे त्याची चर्चा होतेच. बहुतेक वेळा टाकल आईबापाला इथं आणि तिकडे मस्त मजा मारत आहेत असे एक करूण चित्र उभे केले जाते. माझ्या मते ते फार स्टरियोटाइप आहे.
नव्या पिढीचे पालक अत्यंत जागरूक आहेत आपल्या मुलांच्या पंखात बळ देणारे पालक हे जा जग जिंकून दाखवा ती धमक आम्ही तुला दिली आहे असे म्हणणारे आहेत. आता तुम्ही अर्जुन आणि कृष्णाचे पराक्रम वाचत मोठे झालात की कुठल्या दुसऱ्या रड्या गोष्टी यावर तुमचा विचारांचा पिंड आहे. सत्या नादेला, सुंदर पिचाई याच्या आई-वडिलांनी जर भोकाड पसरले असतं तर आज जे भारतीय अभिमानाने त्याच्याकडे बघतात ते होऊ शकलं नसत.
माझ्या माहितीतल्या एकेकाळी अमेरिकेला प्रचंड शिव्या घालणाऱ्या अनेक लोकांची मुले आज अमेरिकेत शिकत आहेत आणि आज आग पाखड करणाऱ्यांची मुलं उद्या तिथे जाऊन चमकतील, चमकू दया की त्यांना.
पैसे पण पाठवतात ते भारतात इकॉनोमी ला मदत करतातच. हुशार आणि धाडसी लोक आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणारच.
तुमच्यात धमक असेल तर तुम्ही पण जगाच्या पाठीवर कुठेही लाथ मारेल तिथे पाणी काढेल म्हणा. सच्चा भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरीही तो भारतावर प्रेम करतोच.
संपूर्णपणे नव्या जगात जाऊन शून्यातून स्वतःला पुन्हा एकदा उभं करणं, प्रुव्ह करणे, स्वत्व सापडत जाण यात एक झिंग आहे, मस्ती आहे, रग आहे!
We humans are explorers at the core so don't stop, explore!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथली चर्चा वाचून आज बातम्या शोधल्या.
पोलिसांच्या अत्याचारात वर्णभेद असो वा नसो, पण आंदोलन पेटतेय याचा अर्थ वर्णभेद होतोय हे नक्की. उगाच कोणाचा वेळ जात नाही म्हणून एवढी जाळपोळ कोणी करणार नाही. अमेरीकेतली जनताही अडाणी नसणार की राजकारण्यांनी भडकावले आणि उतरले रस्त्यावर. आज वाचले की ट्रंप यांनाही एका पोलिस अधिकारयाने शट अप म्हटले आणि ते बंकरमध्ये जाऊन लपले.

Becoming documentary netflix वर बघितली. खरं सांगायचं तर मला काहीच मिळालं नाही. पुस्तक घ्यायचा अथवा library तून आणून वाचायचा विचार होता. तो रद्द केला. मिशेल ओबामा म्हणून काहीच special भारी वाटलं नाही, त्या celebrity वाटल्या kardashian सारख्या. फार वाईट वाटलं.

राजसी I have particularly requested वत्सला as she is particularly interested in what was done during Obama era. I am not sure what the documentary was about and how I would comment watching it but still not reading the book. So I am not sure if I have any say on you want to read or not
On the book thread please read comments by me and रायगड and hope that help you decide if the book has what you are looking for. I honestly read it partly cause it was available in the library and I had time. But again everyone’s time is precious so I understand if you do not want to invest in that.

वेका, मी फक्त becoming चा विषय /नाव आलं म्हणून मला काय वाटलं ते लिहिले. बाकी मतमतांतरे असूच शकतात. मी काही कोणतेही US administration follow केलेलं नाही. माझी धाव म्हणजे माझ्या फोन आणि वेगवेगळ्या app चे AI ज्या बातम्या /videos suggest करतात त्याचे शीर्षक catchy असेल तर वाचणे/बघणे. भारतात बसून मिशेल ओबामा यांच्याबद्दल जी hype वाचली/ ऐकली होती - बाकी कोणा US first lady चं नाव पण मला माहीत नाही-त्यामानाने माझे मत होते. आपले मत खोडणे अथवा support करणे यांपैकी काहीही नाही. ज्याअर्थी बाकी कोणा US first ladies ना social media इतके footage मिळत नाही जितके मिशेल ओबामा ह्यांना मिळाले अथवा मिळते आहे त्याअर्थी त्या नक्कीच खूप लोकांना आवडत असणार.
Hope no personal misunderstanding.

>Hope no personal misunderstanding.
नाही तुम्ही वेळ मिळाला की तो पुस्तक धागा शोधा. मी महाआळशी आहे शोधायला पण फार पेट घेतला तर शोधेनही Wink
असो. मला वरचं वाक्य लिहावंसं वाटलं कारण मी डॉक्युमेंटरी पाहिली नाही. सो मला थोडं कळलं नाही असं म्हणूया.
काही फॉलो करायची गरज आहे असंही नाही. मी समजू शकते. मेनली पँडेमिकमध्ये नेहमीपेक्षा संध्याकाळी वेळ मिळतो वेकापणा करायला. लोड घेऊ नका. चिल Happy

भारतात अनेकजण सर्वांना एनाआरआयच समजतात. अमिताभने ९०ज मधे एक वर्ष टॅक्स एनाआरआय कॅटेगरीतून भरला होता तेव्हा अमिताभने भारताचे नागरिकत्व सोडले अशी बातमी आली होती Happy

Pages