NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण.

Submitted by सखा on 27 May, 2020 - 17:41

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.
खरं म्हणजे परदेशात जाणं आणि तिथेच स्थायिक होण हे एक फार मोठं डिसिजन असत आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दुसऱ्याच्या या खासगी जीवनात नाक खुपसायची सवय असल्यामुळे आपल्याकडे त्याची चर्चा होतेच. बहुतेक वेळा टाकल आईबापाला इथं आणि तिकडे मस्त मजा मारत आहेत असे एक करूण चित्र उभे केले जाते. माझ्या मते ते फार स्टरियोटाइप आहे.
नव्या पिढीचे पालक अत्यंत जागरूक आहेत आपल्या मुलांच्या पंखात बळ देणारे पालक हे जा जग जिंकून दाखवा ती धमक आम्ही तुला दिली आहे असे म्हणणारे आहेत. आता तुम्ही अर्जुन आणि कृष्णाचे पराक्रम वाचत मोठे झालात की कुठल्या दुसऱ्या रड्या गोष्टी यावर तुमचा विचारांचा पिंड आहे. सत्या नादेला, सुंदर पिचाई याच्या आई-वडिलांनी जर भोकाड पसरले असतं तर आज जे भारतीय अभिमानाने त्याच्याकडे बघतात ते होऊ शकलं नसत.
माझ्या माहितीतल्या एकेकाळी अमेरिकेला प्रचंड शिव्या घालणाऱ्या अनेक लोकांची मुले आज अमेरिकेत शिकत आहेत आणि आज आग पाखड करणाऱ्यांची मुलं उद्या तिथे जाऊन चमकतील, चमकू दया की त्यांना.
पैसे पण पाठवतात ते भारतात इकॉनोमी ला मदत करतातच. हुशार आणि धाडसी लोक आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणारच.
तुमच्यात धमक असेल तर तुम्ही पण जगाच्या पाठीवर कुठेही लाथ मारेल तिथे पाणी काढेल म्हणा. सच्चा भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरीही तो भारतावर प्रेम करतोच.
संपूर्णपणे नव्या जगात जाऊन शून्यातून स्वतःला पुन्हा एकदा उभं करणं, प्रुव्ह करणे, स्वत्व सापडत जाण यात एक झिंग आहे, मस्ती आहे, रग आहे!
We humans are explorers at the core so don't stop, explore!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेssष अगदी चोख उत्तर !!
"आपण सगळेच कधीना कधी काहीना काही प्रमाणात दुटप्पीपणे वागत असतो" टाईपच्या टोटल रटाळ ज्ञानकणांना हेच उत्तर पाहिजे.

हर्पेन स्विकारली
फक्त एक सर्वांना क्लीअर करतो नाबुआबुनमा माझा आयडी नाहीये. मला या धाग्यावर ती चर्चा नकोय Happy

ओह, मी अमेरिकेतील वंशभेदाची काही बातमी वाचली नाही. वंशभेद म्हटलं तर आधी ऑस्ट्रेलिया आठवते दुर्दैवाने! काय माहीत का?

राजसी, ऑस्ट्रेलीयालादेखील येथील मूळ रहिवास्यांच्या कत्तलीचा काळा इतिहास आहे. त्यावर इथल्या सरकारने बरच काम केलं आहे आणि करत आहेत. मध्यंतरी भारतातील मीडियाने भारतीय लोकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता रंजकपणे बातम्या पसरवल्या होत्या. याशिवाय तुम्हाला काही अधिक माहिती आहे का? तुमचा काही खास अनुभव आहे का
अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या हिसाचाराबद्दल गुगल करून बघा.

>>मध्यंतरी भारतातील मीडियाने भारतीय लोकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता रंजकपणे बातम्या पसरवल्या होत्या. <<
यावर वाचायला आवडेल. नविन धागा काढा, प्लिज...

अस्तित्वाची भीती मधून भेद निर्माण होतात.
मराठी लोकांना उत्तर भारतीय लोकांमुळे स्वतःचे अस्तित्व धोक्यात येईल ,आपली संस्कृती ,भाषा धोक्यात येईल अशी भीती वाटते मग ही भीती भेदभाव निर्माण करते.
तेच अमेरिकेत काळ्या लोकांमुळे गोऱ्या लोकांचे अस्तित्व धोक्यात येईल.परदेशी नागरिकांच्या वाढत्या संख्यमुळे मूळ अमेरिकन नागरिक धोक्यात येतील अशी भीती निर्माण होते आणि हिंसक घटना घडतात.
त्या प्रमाणे दुसऱ्या धर्मा मुळे माझा धर्म धोक्यात येईल ,माझ्या धर्माचे अस्तित्व संपेल ही भीती धार्मिक हिंसाचार घडवतात.
ही अस्तित्वाची भीती पूर्ण जगभर पसरली आहे त्या मुळे भेदभाव पण जग व्यापून आहे.
पूर्ण जगातील मानव एकच आहे त्या मध्ये काही भेदभाव नाही सर्व समान आहेत ही आदर्श स्थिती प्रत्यक्षात अस्तित्वात कधीच नसते..

ऑस्ट्रेलीयालादेखील येथील मूळ रहिवास्यांच्या कत्तलीचा काळा इतिहास आहे.  --- हो. Rabbit fence नावाचा भयानक सिनेमा बघितला होता Sad बाकी कधी फिरायला गेलो तर म्हणून माहिती गोळा करायची सवय आहे मग त्यानिमित्ताने इतिहास वाचन होतं. कित्येक वर्षांपूर्वी Andrew Symonds वेगळा का दिसतो इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा असा प्रश्न पडला होताच.

भारतातील मीडियाने भारतीय लोकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता रंजकपणे बातम्या पसरवल्या होत्या --- त्या बातम्या आणि स्पेसिफिक लक्षात नाही पण त्यादरम्यान मनांत एक प्रतिमा तयार झाली असावी.
इथे सगळीकडे फिरलेले भेटत असतात त्यामुळे त्यांची मत पण फॅक्टर आहे.
अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या हिसाचाराबद्दल गुगल करून बघा. --ओके. (सध्या बातम्या बंद Sad )

>>अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या वंश/वर्णभेदविरोधी चळवळी/ riots संदर्भात एखादा धागा आहे का?<<
सध्या वादग्रस्त असलेला टॉपिक पुलिस ब्रुटॅलिटि हा आहे; त्याला वर्णद्वेशाचा कंगोरा असण्याची शक्यता हि नाकारता येणार नाहि. परंतु मूळात असे प्रकार वारंवार का घडतात याला कारण वर्णद्वेश नसुन अमेरिकेतला सोश्यो-पोलिटिकल सेटप हा आहे. विषय खुप गुंतागुंतीचा आणि तितकाच सेंसिटिव असल्याने सगळे पोलिटिशियन (अपवाद ट्रंप, Wink ) पोलिटिकली करेक्ट बोलत/वागत असतात. थोडक्यात, हा इशु सहजा-सहजी मिटणारा नाहि...

>>त्याला वर्णद्वेशाचा कंगोरा असण्याची शक्यता हि नाकारता येणार नाहि. >> हलकटपणाची हद्द आहे. तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. बरे व्हा! बाय!

अमित +१
मलाही धक्का बसला ती पोस्ट वाचून.
एरवी राजकारणाबाबतचे मतभेद समजू शकतात, पण here I am disappointed in you, राज.

Submitted by राज on 1 June, 2020 - 12:15
>> या पोस्ट्स बाबत मी निषेध नोंदवत आहे.
पोलिस ब्रुटालिटी जेव्हा वारंवार विशिष्ठ वंशाच्या लोकांच्याच वाट्याला येत रहाते तेव्हा त्यात उघड उघड वर्णद्वेश असतो. देव करो आणि असा वर्णद्वेश कधी तुमच्या वाटयाला न येवो.

>>मलाही धक्का बसला ती पोस्ट वाचून.<<
ओके. तो सगळा प्रसंग वर्णद्वेशातुन उद्बवला असं तुमचं मत आहे का? कारण, तेच ध्वनीत होतंय तुमच्या प्रतिसादावरुन. माझं तसं मत नाहि. इट्स ए केस ऑफ पुलिस ब्रुटॅलिटि "एकेए" एक्सेसिव फोर्स. आता त्यात वर्णद्वेश आणतंच आहात तर त्या चौघांपैकि एक एशियन आहे; त्यातल्या दोघांची पास्ट हिस्टरी आहे पुलिस ब्रुटॅलिटिची. हाउ डु यु एक्स्प्लेन दॅट? झालं ते अतिशय चूक याबाबत दूमत अजिबात नाहि, आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. पण त्या घटनेला वर्णद्वेशाचा रंग देणं मला तरी पटत नाहि. हा गेल्या तीन वर्षांचा पुलिस ब्रुटॅलिटि डेटा, तुमच्या माहिती करता...

सो, मला आता आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलंच आहे, तर बर्डन ऑफ प्रुफ लाइज ऑन यु स्वाती_आंबोळे. हि घटना वर्णद्वेशातुनंच कशी ट्रांस्पायर झाली हे जरा एक्स्प्लेन करा. लागल्यास अंजलींची हि मदत घ्या...

>> देव करो आणि असा वर्णद्वेश कधी तुमच्या वाटयाला न येवो.
नवीन Submitted by स्वाती२ on 1 June, 2020 - 16:39<<

धिस इज दि मोस्ट पथेटिक अँड डिज्गस्टिंग कामेंट एव्हर.. गॉड ब्लेस यु, स्वाती२...

माझ्या मताने काही फरक पडेल वाटत नाही तरीपण मलादेखील हे पोलीस ब्रुटॅलिटी आहे असे वाटते. त्याला वर्णद्वेषाचा रंग देऊन उगाचच केऑस घडवला जात आहे .

राज, त्या साईटच्या graph वर एक महत्वाचा factor दाखविलेला नाहीये. The total population for that particular race in the US. हे पण त्या graph मध्ये हवंय तरंच पूर्ण चित्र कळायला मदत होईल.

शिवाय हकनाक मारले गेलेले आणि वीस डॉलर साठी/नुसता संशय आला पण प्रत्यक्षात खिशात बंदूक काय चाकू पण नाही अशा किती केसेस विरुद्ध पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवायसाठी बंदूक चालवली असेल तर ते विश्लेषण पण हवं. (मला स्वतःला अजूनही कमरेखाली गोळी मारणे बगैरे पर्याय असायला हवे असं किती वाटलं तरी हा देश फर्स्ट अमेंडमेंट वाल्यांचा आहे आणि त्यांना हे कसं शिकवतात हे माहित नाही पण तेही बाजुला ठेऊयात. Sad )

हा विषय निव्वळ रेसिझमसाठी नसावा असं तात्पुरतं जरी मान्य केले तरी वर्षानुवर्षे अशा घटना होत राहतात आणि कुणीच याचं रुट कॉज आणि रिलेटेड ट्रेनिंग यावर काम करत नाही याचा उद्वेग नाही का? इतर वेळी सगळ्या प्रोटोकॉल/ प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे फंडे उगाळून प्यालेल्या देशात हा पोलिसांना त्यांच्या अधिकाराच्या जबाबदारीची जाणीव न करू द्यायचा निष्काळजीपणा कसा काय चालतो आणि किती वर्षे चालू द्यायचा.
Sad

कुठल्याही अर्थाने पोलिस ब्रुटालिटी म्हणता येणार नाही. त्याने जो काही गुन्हा केला होता, किंवा पुढे काही करायची शक्यता होती त्या कामापासून त्याला परावृत्त करण्यासाठी जे किमान आवश्यक बळ होते त्यापेक्षा थोडे जास्तच बळ वापरले असे व्हिडिओ बघितल्यावर आणि तब्बल ९ मिनिटे गळा दाबल्यावर नाही म्हणता येत.

अनेक मिनिटे त्याच्या मानगुटीवर बसण्याचा उद्देश कायदेशीर हेतू साध्य करणे हा होता का ? नक्कीच नाही.

सोबत अनेक पोलिस मदतीला होते, पकडलेला आरोपी काहीच प्रतिकार करत नव्हता, निशस्त्र होता... आय कॅनॉट ब्रिद म्हटल्यावरही अनेक मिनिटे त्याला मोकळे सोडले नाही... Sad

राज, तुम्ही फार लिमिटेड डेटासेट दिला आहे. You must also look at the frequency of how many times African Americans are pulled over by the police, followed by the security at places like malls, arrested without evidence etc. The police behavior track records show very much biased behavior. I am sure that surveys with statistical data that support the assumption exist already. So there is an inherent bias that exists and such homicides are just tip of the iceberg. So don't look at it as a single case.
जसे आपल्याकडे पारधी समाजाच्या बाबतीत होते त्या स्वरूपाचा प्रश्न आहे हा. तेव्हा ही घटना वर्णद्वेषाची आहे हे उघड आहे. जर एरवी पोलिस विनाकारण आफ्रिकन अमेरिकन लोकांना दुजाभावाने आणि संशयाने वागवत नसते तर एवढे प्रोटेस्ट्स झाले नसते.

अमेरिकेत कोरोना ग्रस्तांची संख्या १९ लाखाच्या जवळ पोहोचली आहे... हजारो लोक निषेध मोर्चात सामिल होत आहेत, अशावेळी सोशल डिस्टंसिंग पाळणे अशक्यच आहे. नजिकच्या काळात याचे गंभिर दुष्परिणाम दिसतील. Sad

(गोर्‍यांच्या तुलनेने ) काळ्या लोकांमधे कोरोनाचे प्रमाण ३ ते ४ पटीने जास्त आहे.

>> हे पण त्या graph मध्ये हवंय तरंच पूर्ण चित्र कळायला मदत होईल.<<
तुमचा मुद्दा कळला, फेर इनफ. कंन्क्लुझिव डेटा अनॅलिसिस करायचंच असेल तर संपुर्ण पॉप्युलेशनच्या डेटा ऐवजी फक्त क्रिमिनल डेटा विचारात घ्यायला हवा. गुन्हा घडल्याशिवाय पुलिस येत नाहि, अणि पुलिस असल्याशिवाय पुलिस ब्रुटॅलिटि होत नाहि. होप यु गेट माय पॉइंट...

हा अ‍ॅप्रोच घेतला तर ब्रुटॅलिटि रेट (विथ रिस्पेक्ट टु क्राइम रेट), आफ्रिकन अमेरिकन्सचा ०.०१० येतो आणि व्हाइट अमेरिकन्स्चा ०.००८ येतो. आता या ०.००२ च्या फरकावरुन तुम्ही वर्णद्वेशाचा निष्कर्ष काढाल का?..

त.टि.:
१. डेटा २०१७ चा आहे, जो रेडिली सापडला.
२. व्हाइट अमेरिकन्स ब्रुटॅलिटि = व्हाइट्स किल्ड / व्हाइट्स क्रिमिनल्स * १०० --> ४५७ / ५६२६१४० * १०० = ०.००८
३. आफ्रिकन अमेरिकन ब्रुटॅलिटि = आअ किल्ड / आअ क्रिमिनल्स * १०० --> २२३ / २२२१६९७ * १०० = ०.०१०
४. ब्रुटॅलिटि रेटचा डेटा सोर्स
५. क्रिमिनल रेटचा डेटा सोर्स

>>राज, तुम्ही फार लिमिटेड डेटासेट दिला आहे.<<
वरच्या प्रतिसादात तुम्हाला उत्तर सपडलं असेल अशी आशा करतो...

उदयशेठ, तुमचा मुद्दा कळला नाहि. पुलिस ब्रुटॅलिटी हि ब्रुटॅलिटीच असते. त्यात टि शर्ट साइझ नसतो...

एकुणात अमेरिकेत वर्णद्वेष भयंकर आहे तर! माझा असा (गैर)समज होता की अमेरिकेत कोणत्याही वर्ण/वंशाचे लोक मजेत एकत्र रहातात. आ अ हे इतर देशातील आ migrants पेक्षा खुप पुढारलेले, चांगल्या हुद्द्यावर काम करणारे आहेत... ओबामा प्रेसिडेंट असतानाही हे सगळे असेच अत्याचार होत होते का? ट्रम्प कारभाराबद्दल खुप माहिती नाही पण एकूण फार काही आशादायक वाटत नाही ते नेतृत्व...

ही धक्कादायक माहिती आहे माझ्यासाठी. आज बघितलेल्या दंगलीच्या बातम्या तर खुपच भयंकर होत्या...

वत्सला तुमच्यासाठी ही लिंक. आणखी नेटवर शोधल्यास उत्तर /विडिओ सापडतील. जमल्यास बिकमिंग हे मिशेल ओबामाचं पुस्तक वाचा. काही संदर्भ आहेत. प्रे. ओबामाचा उल्लेख आला म्हणून हा संदर्भ देतेय. गैरसमज नसावा

https://www.nytimes.com/2020/05/30/us/politics/george-floyd-trump-obama-...

>>>>बिकमिंग हे मिशेल ओबामाचं पुस्तक वाचा. >>>> माझ्याही 'टु रीड' यादीत आहे हे पुस्तक. वरचा लेख माहीतीपूर्ण दिसतोय. वाचते वेळ मिळाला की. दुव्याकरता धन्यवाद. काही लोकं निव्वळ आकसातून 'शूटिंग फ्रॉम हिप' करताना दिसतात. वेस्ट ऑफ टाइम. त्यापेक्षा अशा लिंका शेअर कराव्यात. जेणेकरुन काहीतरी भरीव मिळतं सदस्यांना.

Pages