Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा skillet, अजून वापरला नाही
हा skillet, अजून वापरला नाही. दोन्ही एकाच कंपनीचे आहेत.
Cast iron म्हणजे बीडाचा तवा
Cast iron म्हणजे बीडाचा तवा का?
हो
हो
बिडाचा तवा वापरण्यालायक कसा
बिडाचा तवा वापरण्यालायक कसा करावा हे कोणी सांगु शकेल का??
आईने ओळखीच्या भांडेवाल्याकडुन आणला आहे. पण त्यावर एक-दोनदा केलेली घावण खाताना कचकच लागत होती. सहा महिने होतील आता परत वापरलेला नाहीये.. काय करु??
Cast iron म्हणजे बीडाचा तवा
Cast iron म्हणजे बीडाचा तवा का? >>>> माझ्या मते नाही. दोन्हीत फरक आहे. बिडाची भांडी/तवे फुटू शकतात. कास्ट आर्यनची नाही. का आ लोखंडाचा 'रस'/लिक्वीड, माती, केमीकल्स इत्यादी साच्यात घालून तयार करतात. मला वाटतं बिडाच्या भांड्यांमधे मातीचे (सिलीकॉनचे) प्रमाण जास्त असते.
बिडाचा तवा वापरण्यालायक कसा
बिडाचा तवा वापरण्यालायक कसा करावा हे कोणी सांगु शकेल का?? ] तवा बेस बुडेल ईतके ताक घालून रात्रभर ठेवा. मंडईतून घेतला त्या दुकानदाराने सांगितला होता हा उपाय.
धन्स लंपन.. उपाय नक्की करुन
धन्स लंपन.. उपाय नक्की करुन बघते.
मी नॉनस्टिक , प्लस्टीक कधीच
मी नॉनस्टिक , प्लस्टीक कधीच वापरायचं सोडून दिलंय. साध्या लोखंडी तव्यावर एक दोन पराठे करायचे व नुस्त्या पाण्याने धुवून ठेवायचा लगेच दोसे करायचे नसतील तर. दोसे करतेवेळी पाणी टाकून ग्यासवर ठेवायचं पाणी उकळलं की फेकून द्यायचं थोडक्यात तवा स्यानिटाईज (आजकाल मेलं जळीस्थळीकाष्ठीपाषाणी स्यानिटाईजरच दिसतंय) केला की हवं ते करा. प्लस्टीकच्या हल्दिराम वै च्या पिशव्या फाडून त्यावर थापते थालीपीट.... कढई, लंगडीतही होतात.
<<बिडाचा तवा वापरण्यालायक कसा
<<बिडाचा तवा वापरण्यालायक कसा करावा हे कोणी सांगु शकेल का?? >>>
लंपन यांनी सांगितलेला उपाय करून पहा.
अजून एक उपाय.. scrubber साबण वापरून तवा चांगला घासून घ्या. इव्हन surface नसेल तर घासून करा. मग घासून झाल्यावर कडक तापवा. त्यावर कांदा कापून चमचा भर तेल टाकून medium flame वर कांदा परतत राहा.
जमल्यास फ़ोटो टाका तव्याचा.. बघून कळेल अजून काय कंडिशन आहे ते.
कास्ट आयर्नची भांडी फुटु
कास्ट आयर्नची भांडी फुटु शकतात. खुप जास्त जाळावर ठेवली किंवा गरम तव्याला एकदम गार पाण्यात घातल तर लगेच कास्ट आय्र्न तवा फुटतो एकदम. बीडाचा तवा आणि कास्ट आयर्न माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे एकच.
>>>बिडाचा तवा वापरण्यालायक कसा करावा हे कोणी सांगु शकेल का?? >>
कास्ट आयर्न सिझनिंग अस यु ट्युब वर टाका. बरेच व्हिडिओ आहेत. तेल घालून ठेवणे, बारीक गॅस वर गरम करून हळु हळु तेल लावून मुरवणे अस केल तर कचकच जाईल.
कास्ट आयर्नचा तवा धुतल्यावर कोरडा करण मस्ट आहे. गंजाचे डाग नाहीतर लवकर जात नाहीत. पण डोसा वगैरे एकदा यावर करायची सवय झाली कि नॉन स्टीकवरच काही चांगल लागत नाही. चपाती पण एकदम खमंग खुसखुशीत भाजली जाते.
दुसरा ऑप्शन कमी कटकटीचा म्हणजे इनॅमल कास्ट आयर्नची भांडी. भाज्या करायला वगैरे एकदम छान आहेत ही भांडी. हे माझ्याकडे आहे. अर्थात चवीत ओरिजिनल पेक्षा नक्कीच फरक पडेल.
सीमा हे महाग आहे का? तुम्ही
सीमा हे महाग आहे का? तुम्ही कुठून घेतला?
भारतीय स्वयंपाकाला instant
भारतीय स्वयंपाकाला instant पॉट चा काय उपयोग होतो?माशेऑ मधे खूपवेळा बघितलाय पण नॉन-veg cooking साठी. आम्ही शाकाहारी आहोत, तर उपयोग होईल का? आज amazon वर दिसला म्हणून प्रश्न पडला. विकत घ्यावासा वाटतोय.
राजसी, इंस्टंट पॉट अनेक
राजसी, इंस्टंट पॉट अनेक प्रकारे वापरता येतो
१. शिट्या न मोजावा लागणारा आणी चूल न अडवणारा प्रेशर कूकर हा देशी स्वैपाकातला मुख्य रोल
२. थंड हवेच्या प्रदेशात दही नीट लागत नाही, इडली डोशाचं पीठ नीट आंबत नाही त्या करता वापरता
३. घट्ट झाकणाचा स्लो कूकर - वाफ बाहेर जात नाही ( आणि बंद दारं - खिडक्यांच्या घरात वास पसरत नाहीत) - सकाळी कामावर जायच्या आधी सेट करुन गेल्यास ७-८ मंद आचेवर शिजलेले पदार्थ तयार असतात
माझ्याकडल्या इं पॉ चा वापर १ आणि ३ साठी होतो. विरजण , पीठ आंबवणे हे इंपॉ शिवाय नीट जमते त्यामुळे मी कधी केलं नाही.
व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ दोन्ही करता समसमान वापर होतो .
धन्यवाद मेधा.
धन्यवाद मेधा.
Deal बघायला सुरुवात करते. अर्थात आता इतक्यात deals मिळणे अवघड आहे. नवा कुकर घ्यायचा असेल तेव्हा नक्की विचार करता येईल.
मेधाने सान्गितलेले सगळेच
मेधाने सान्गितलेले सगळेच पोईन्ट्स पण तरी घरचा प्रेशर कुकर मोडित काढता येत नाही कारण नथिन्ग इज इन्स्तन्ट अबाउट इपॉ, पटकन खिचडी टाकु, झट की पट या कॅटेगरी मधे तो नाही, वाफ भरणे आणि पड्णे यालाच १०-१० मिनिट लागतात. तेव्हा हा त्याला रिप्लेस्मेन्ट नाही निदान माझ्या साठि तरी
बाकि फायदे चिक्कार, एका बाजुला पदार्थ शिजत राहतो, डिले टायमर आहे त्यामुळे प्लॅन करुन अहेड ओफ टाइम मिल प्लॅन करता येते, कीप वॉर्म मुळे केलेला पदार्थ सर्व्ह टाइम पर्यत गरम राहतो,लक्ष ठेवा शिट्ट्या मोजा नाही. दही अप्रतिम लागते, उसळीला मोड आणने, इडली -डोशे पिठ आन्बव्णे पण मस्त होत.
व्हेज पदार्थ मी ट्राय केलेले- पाव भाजी, छोले, राजमा,चवळी, डाळ-पालक, चिकन करी इत्यादी
चिकन व्हेज मध्ये येतंया आजकाल
चिकन व्हेज मध्ये येतंया आजकाल चला अता मी सुडोमी.

आता कोमडीन साबुदाणा खाल्लान त ती उपासास सुद्धा 'चालते' ब्र का बेमट्यां...
धन्यवाद प्राजक्ता.
धन्यवाद प्राजक्ता.
कीप वॉर्म मध्ये खालचा layer खरपुडी होत नाही ना? एकेकाळी rice cooker वापरला होता, त्याच keep warm इतकं आवडलं नव्हते.
रात्री भाजी/उसळ फोडणीला टाकून सकाळी शिजलेली मिळाली तर बेस्ट. सकाळी उठून फक्त पोळ्यांचं बघावं लागेल. फक्त slow cooking मध्ये शिजलेले अन्न इथे भारतीय वातावरण तापमानात टिकेल का दुपारच्या जेवण वेळपर्यंत? ते पण एक बघावं लागेल. परतलेल्या भाज्या पण होतात का त्याच्याकडे न बघता? का आपण कढई ऐवजी instant pot मध्ये परतायचं? वेगळा instant pot bb आहे का बघते, असेल तर प्रश्न तिकडे हलवते.
योकु गुड कॅच ! तुझी एवढी भारी
योकु गुड कॅच ! तुझी एवढी भारी कोटी वाया जाउ नये म्हणून एडिट करत नाही ते
का आपण कढई ऐवजी instant pot मध्ये परतायचं?>> हो हो तिकडे साते मोड असतो सगळी परतापरती करता येते,झिरो वॉटर गोश्टी खालि करपु शकतात तेव्हा तिथे मात्र लक्ष द्याव लागत.
स्लो कुकर मी अजुन ट्राय नाही केलाय.
नवीन धागा काढा कि कुणीतरी..
नवीन धागा काढा कि कुणीतरी.. 2119 प्रतिसाद झालेत!
अमेरिकेत knives कोणत्या
अमेरिकेत knives कोणत्या कंपनीच्या घ्याव्यात? येथे इतके प्रकार आहेत की गोंधळून जायला होते. मला फार मोठ्या सुरीने चिरणे जमत नाही. आकाराने छोटी पण धारदार असणारी असे काही प्रकार असल्यास सुचवावे. धन्यवाद .
good cook कंपनीच्या सुर्या
good cook कंपनीच्या सुर्या छान आहेत. amazon वर मिळतात.
मला फुलक्यांसाठी तवा घ्यायचा
मला फुलक्यांसाठी तवा घ्यायचा आहे, आणि कधी कधी घडीच्या पोळ्या पण करता येतील असा. कुठल्या कंपनीचा आणि कुठल्या प्रकारचा घ्यावा plz सुचवा.
hawkins futura
hawkins futura
धन्यवाद अनुश्री.
धन्यवाद अनुश्री.
अमेरिकेत knives कोणत्या
अमेरिकेत knives कोणत्या कंपनीच्या घ्याव्यात? येथे इतके प्रकार आहेत की गोंधळून जायला होते. मला फार मोठ्या सुरीने चिरणे जमत नाही. आकाराने छोटी पण धारदार असणारी असे काही प्रकार असल्यास सुचवावे. धन्यवाद .>>> Wusthop Utility knife is the best investment for life!
शिकागो कटलरी पहा. सध्या बरीच
शिकागो कटलरी पहा. सध्या बरीच दुकाने (सॅडली) बँकरप्ट होताहेत. मी पाहिलं नाही पण कदाचीत कोह्ल्स जेसीपेनीच्या किचन सेक्शन मध्ये तुम्हाला चांगल्या किंमतीत मिळून जाईल. ही चर्चा आधी पण झाली असावी असा देजावू फील येतोय. सर्च करून पहा. काय कापायला कुठला (कंपनी नव्हे साइज्/प्रकार इ.) नाइफ ही चर्चा.
https://www.cutco.com यांचे
https://www.cutco.com यांचे अनेक प्रकार आहेत. आमच्याकडे एक ७ इंच शेफ'स नाइफ बारक्या गेली ३-४ वर्षे वापरतो आहे .
रोजच्या वापरासाठी ginsu chikara knives यांचा एक सेट घेतला होता दहा बारा वर्षांपूर्वी. त्याचे पण सुटे चाकू मिळतात ऑनलाईन. त्यातल्या सर्व गोष्टी पण अतिशय चांगल्या चालल्या आहेत. डिशवॉशरमधे न घालणे आणि १०-१५ दिवसात एकदा घरच्या घरी धार लावणे एवढीच काळजी घ्यावी लागते. ( आणि घरच्या इतर सदस्यांना बॉक्स उघडणे, सोप कार्व्हिंग आणि तत्सम प्रॉजेक्टसाठी वापरु न देणे )
धन्यवाद पल्वली, वेका,मेधा.
धन्यवाद पल्वली, वेका,मेधा.
Microwave oven convection and
Microwave oven convection and grill.. याबद्दल कुठे चर्चा आहे? लिंक द्याल का?
(No subject)
Pages