ती अन् पाऊस..

Submitted by मन्या ऽ on 16 May, 2020 - 23:37

ती अन् पाऊस..

खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजुन
भरलेल सावळ ते आभाळ
नजरेत साठवणारी ती

भिजावं का थोडंतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती

गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
रिमझिम पावसाकडे बघतीये
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये

हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे

शुष्क तिचे नयन अन्
मन तिचे व्याकुळलेल्या
त्या धरेसम
कोरडे-तहानलेले!
विचार करत
दाटल्या मळभाकडे पाहत
निष्फळ उसासा टाकत
दीनवाणे हसणारी ती

आता वाट
पाहते आहे ती
येत्या आषाढसरींची
अगदी आभाळासारखंच
तिच मनही भरुन आलंय
आता गरज आहे फक्त,
एकदा धो-धो कोसळण्याची!

अपुर्ण

-दिप्ती भगत
(१७मे,२०२०)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!