Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Once a year बघितली mx वर,
Once a year बघितली mx वर, पहिले दोन एपी आवडले पण बाकीचे जरा बोर झाले, तरी एकदा बघायला हरकत नाही.
Never Have I Ever - Netflix
Never Have I Ever - Netflix
पाहिली आहे का कुणी? चांगली वाटते आहे.
>>
आजपासून पाहायला सुरवात केली. ४ एपिसोडस पहिले. आवडली मला. उद्यापर्यंत बिंज वॉच करून पाहणार आहे. Mindy Kaling चे 'व्हाय नॉट मी' पुस्तक वाचले होते. त्याचीच आठवण आली. काही काही dialogues स्ट्रिक्टली अमेरिकन देसीज ना relate होतील. पूर्ण पाहून मग अजून लिहीन
अरे किल्ली.. इथे पांडू विषयीच
अरे किल्ली.. इथे पांडू विषयीच लिहायला आले होते.
पांडू छान आहे. हलकीफुलकी.. काही एपिसोड बोर आहेत.. मिलनकोली वगैरे. शेवटच्या एपिसोडला डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. शेवटच्या एपिसोडमधला शेवटचा सीन (फुगा फुटतो तेव्हा) जाणीव करून देतो.. पोलीस होणं अजिबात सोपं नाही.
स्पॉयलर अलर्ट :
शेवटच्या एपिसोडमध्ये त्याच्या बायकोच्या डोळ्यात आलेलं पाणी तद्दन खोटं वाटतं. सॉर्ट ऑफ.. तिला परिस्थिती काही पार्टी न करण्याइतकी महत्वाची वाटत नाही. म्हणून मुलाच्या नावावर ढकलून 'हवं तर पार्टी कॅन्सल करू. विवेक घेईल समजून' अशी मखलाशी. कारण तिला ठाऊके की इतके लोक घरात आल्यावर समजूतदार नवरा काही त्यांना बाहेर काढून, मुलाला नाराज करून पार्टी कॅन्सल कर म्हणणार नाही. विवेकपण वडील घरी आल्यावर काही फार भारी रिऍक्ट नाही झाला (त्याला येऊन बिलगणे किंवा काहीही) की ज्यामुळे तिचं बोलणं जराही खरं वाटावं.
Once a year मी बघितली... खूप
Once a year मी बघितली... खूप खूप खूप बोर झालो. सगळी मंडळी अभिनयाच्या नावाने शंख आहे. निपुण धर्माधिकारी तर जराही, अगदी जराही प्रभाव पाडू शकत नाही.
Never Have I Ever - Netflix -
Never Have I Ever - Netflix ---मस्त आहे सिरीयल. बऱ्यापैकी the mindy project ची झाक जाणवते, संवादलेखन especially. Mindy project पहिले 2 ते3 सिझन छान होता मग जरा drag वाटलं होतं. कमला चं वागणं/बोलणं आणि दिसणं sofia vergera ची copy वाटते. तिचा accent पण विचित्र आहे.
आता ही १०० कुठे शोधायची? कुठे
आता ही १०० कुठे शोधायची? कुठे पाहिली ते लिहा की गं दिपांजलीन्जली... >>>>>>>>>> अय्यो सॉरी
हॉटस्टावर आहे
सध्याच्या बघितलेल्या
हंड्रेड - हॉटस्टार
फोर मोर शॉट्स - प्राईम
पंचायत - प्राईम
Once in a year चे प्रोमो ईतके
Once in a year चे प्रोमो ईतके कंटाळवाणे वाटले की बघायची हिंमत आणि ईच्छा उरली नाही. फोर मोर शॉट्स सीजन एक बघितला. एकदा बघू शकतो पण सेक्स चा अतिरेक आहे, ऊठ सुठ कुठेही कोणीही कोणाबरोबरही चालू होतात, जन्माचे वखवखलेले वाटतात सगळे.
एक थी बेगम बघतेय, पण मला भाषा
एक थी बेगम बघतेय, पण मला भाषा झेपत नाहीये. इतकी तगडी कास्ट असताना वाक्याच्या सुरूवातीला, मध्ये आणि शेवटी गलिच्छ शब्द आणि शिव्या घालायची खरंच गरज आहे का?
अंजली१२, थँक्स. १०० पहाता
अंजली१२, थँक्स. १०० पहाता येईल.
४ शॉट्स बहुतेक नाही पहाणार. मलापण तशा प्रकारच्या मालिका बोर करतात.
आजकाल वेबसिरीजमधे दमदार मराठी
आजकाल वेबसिरीजमधे दमदार मराठी कलाकार बघुन आनंद होतो. >> + १२३४५
हंड्रेड बघितली. खूपच आवडली. मे बी पांडू च्या पाठोपाठ बघितल्याने खूप उजवी वाटली. सगळ्यांचा अभिनय छान. रिंकूचा अभिनय लारा पुढे काहीच नाही.
फक्त अपूर्ण वाटली. कोणाला वाटतंय का की अजून काही एपिसोड्स बाकी आहे हंड्रेड चे? (याच सिझन मध्ये?)
फक्त अपूर्ण वाटली. कोणाला
फक्त अपूर्ण वाटली. कोणाला वाटतंय का की अजून काही एपिसोड्स बाकी आहे हंड्रेड चे? (याच सिझन मध्ये?) >>>>>>>>
एपिसोडस नाहीयेत अजून. आता ती बदला घेणार लाराचा असं समजून चालायचं.
त्या मॅडीचा टॅटू भारीच. लाल हेडफोन मानेभोवती

मला लारा दत्ता दिसली की ऐसा है कोई दिलवाला रे आठवत होतं सारखं
रिंकूची अॅक्टींग मस्तच!
ओके. तिला काय..
ओके. तिला काय..
पोलिसांना जाऊन भेटली की काम झालं.
स्पेशली असोले वगैरे
पंचायत बघितली. वरती सगळ्यांनी
पंचायत बघितली. वरती सगळ्यांनी पंचायत बद्दल लिहिलेल्या पॉईंट्स ना जोरदार अनुमोदन.
फारच भारी सिरीज एवढ्यात ज्या काही बघितल्या त्यात ही सगळ्यात वरचा नं.
किती मस्त कामं केलीयेत सगळ्यांनी. इन फॅक्ट खरंखुरंच जीवन जगतायत असं वाटलं. विकास, प्रधानजी, अभिषेक यांचं बाँडींग आवडलं.
रघुवीर यादव बद्दल तर काय बोलावं एकदम मस्त माणूस. भारी काम.
त्याची मुलगी का नाही दाखवत याची उत्सुकता लागून राहिलेली पण ती शेवटच्या शॉट मधे कळलं की दुसर्या सिजन साठी हा भाग राखीव
खूपसे पंचेस अगदी मनापासून हसू आणतात. तो युपीवाला अअॅक्सेंट फारच आवडला.
अभिषेक एंट्रन्स परिक्षा देऊन येतो तेव्हा लगेच प्रधानजी "एक देड लाख वाली नोकरी मिलेगी ना?" विचारतात तेव्हा हसून फुटलेच. फार भारी टायमिंग आहे सगळ्याचं.
एकूण मस्त मूड बनवणारी हलकीफुलकी पंचायत.
अंजली.. आपण दोघींनी बहुतेक
अंजली.. आपण दोघींनी बहुतेक सेम सिक्वेन्स ने वेबसिरीज पाहिल्यात
'पंचायत' बद्दल खरंच वरच्या सगळ्यांना अनुमोदन. इतकी सुंदर, निखळ, मनाचा पकड घेणारी सिरीज आहे. 'कम्प्युटर नहीं मॉनिटर' च्या एपिसोडला ते सगळे त्याच्याकडे येतात रात्री तेव्हा डोळ्यात पाणी आलं एकदम.
पुढचा सिझन कधी येतोय असं झालं. पण त्याला अशी लाखभराची नोकरी लागली आणि रिंकी पटली की पुढे काही स्ट्रगल उरणार नाही मग दाखवायला. त्यामुळे हे सगळं खूप हळूहळू दाखवलं तरच मजा राहील.
मला एकूण एक पात्र आवडलेलं आहे यातलं <3
त्याची मुलगी का नाही दाखवत
त्याची मुलगी का नाही दाखवत याची उत्सुकता लागून राहिलेली पण ती शेवटच्या शॉट मधे कळलं की दुसर्या सिजन साठी हा भाग राखीव >>>>> तो शेवटचा सीन फार म्हणजे फारच आवडला. मस्त नोट वर संपवला . तो अभिषेक काय मस्त हसतो .
अंजली.. आपण दोघींनी बहुतेक
अंजली.. आपण दोघींनी बहुतेक सेम सिक्वेन्स ने वेबसिरीज पाहिल्यात >>>>>> ओह गुड
आता पुढची कोणती बघणार आहेस??
मी ती नेफ्लि वरची नेव्हर हॅव आय बघणार आहे
तो शेवटचा सीन फार म्हणजे फारच आवडला. मस्त नोट वर संपवला . तो अभिषेक काय मस्त हसतो .>>>>>>>>>>> +१
मॉनिटर' च्या एपिसोडला ते सगळे त्याच्याकडे येतात रात्री तेव्हा डोळ्यात पाणी आलं एकदम.>>>>>>>>> हो गावाकडची माणसं किती गोड असतात ना!
अजून पण एक सीन - प्रधानजी विकासला विचारतात अभिषेक जेवला का? म्हणतोय मूड नाही. तर लगेच नीना गुप्ता २-४ रोटी और बना दें? विचारते फारच आवडलं.
नेव्हर हॅव आय एव्हर आवडली :),
नेव्हर हॅव आय एव्हर आवडली :), त्यात सगळी गोष्ट आमच्या आसपासच्या एरीयात घडते (व्हॅली एरीआ ऑफ लॉस अँजेलिस), शिवाय बॉलिवुड डान्स सीन आहे तो मैत्रीणीच्या गृपने परफॉर्म केलाय त्यामुळे आधीपासून उत्सुकता होती.
तो अॅक्सेण्ट बहुधा बिहार
तो अॅक्सेण्ट बहुधा बिहार मधला आहे - नालंदा वगैरे भागातील. एक कलीग तेथील आहे त्याचे हिंदी ऐकल्याने माहीत आहे. "मॉनिटर" एपिसोड मधला शेवटचा सीन फार धमाल आहे. अत्यंत बिलिव्हेबल सिच्युएशनवरचा विनोद.
प्रधान व त्याच्या बायकोमधले डायनॅमिक फार जबरी आहे. अनेक ठिकाणी स्त्रियांच्या राखीव जागांवर बायका निवडून आल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे नवरेच ते काम करतात असे अनेकदा ऐकले आहे. त्यातून निर्माण होणारी एक ढोबळ इमेज - डॉमिनंट नवरा आणि गरीब बिचारी बायको - कांद्याची एक लेयर सोलल्यासारखी उघडून आतले सूक्ष्म बारकावे बरोबर दाखवले आहेत यात. पंचायतीचे काम प्रधानच पाहतो. पण नीना गुप्ताही गरीब बिचारी वगैरे नाही. फक्त हे होणारे बदल एका बाजूला व गावातील पारंपारिक "मर्यादा" दुसर्या बाजूला - यातून जितका शक्य आहे तितकाच बदल हळुहळू होत जातो हे परफेक्ट दाखवले आहे. आणि तो बदल झेंडावंदनाच्या भागात आणलाही आहे. बहुधा दुसर्या सीझन मधे नीना गुप्ताचे कॅरेक्टर जास्त डेव्हलप करतील.
मला सर्वात आवडले ते जवळजवळ प्रत्येक विनोद हा कथेतून आपोआप होणारा आहे. कोठेही स्लॅपस्टिक विनोद, शाब्दिक कोट्या, विषयाशी संबंध नसलेले फालतू विनोद असली भरताड नाही. विशेषतः मराठीत "विनोदी" म्हंटले की असलेच भंकस जोक्स असतात त्यामुळे ही सिरीज एकदम वेगळी वाटते. लोकांच्या सहज वागण्यातून निर्माण होणारा विनोद आहे. अनेकदा तर नीट लक्ष दिले नाही तर चांगला सीन निसटतो. उदा: या सेक्रेटरीच्या स्वागताला पेठ्याचे चार तुकडे व पाणी घेउन तो उप-प्रधान व साहाय्यक बसलेले असतात. त्यातील एक तुकडा तो उप-प्रधान खातो. मग साहाय्यक म्हणतो की कोणाला असे "तीन" तुकडे देत नाहीत. म्हणून तो एक खातो. नंतर प्रधान येतो तो सेक्रेटरीला म्हणतो अरे हे तू हे दोनच तुकडे का वगळले, आणि ते दोन तो खाउन टाकतो. शेवटी सेक्रेटरीला एकही मिळत नाही.
पंचायतसाठी अंजलीला मम.
पंचायतसाठी अंजलीला मम.
तो अभिषेक काय मस्त हसतो . >>> क्युट एकदम.
पण रिंकी अगदी काही सेकंद आली ती मला चुटपुट लागली, एक आख्खा एपिसोड हवा होता. ती फार गोड वाटली. दुसरा सीझन आणतील की नाही काय माहीती, सध्या काहीच शक्य नाहीये.
तो अभिषेकच्या हाताखालचा मला फार आवडला, काय सहज डायलॉग्ज म्हणतो, (सेल्फ रीस्पेक्टभी कोई चीज होती है ना, कसलं भारी म्हणतो त्या एपिसोडमधे आणि प्रत्येक वेळी हिरोला मदत, ते सोलर लाईटवाल्या एपिसोडमधे पण कसा पंचायत ऑफीसवर लाईट लाऊन घेतो) . अर्थात सगळेच उत्तम.
Farend +11111
Farend +11111
Panchayat is classic !
या सेक्रेटरीच्या स्वागताला
या सेक्रेटरीच्या स्वागताला पेठ्याचे चार तुकडे व पाणी घेउन तो उप-प्रधान व साहाय्यक बसलेले असतात. त्यातील एक तुकडा तो उप-प्रधान खातो. मग साहाय्यक म्हणतो की कोणाला असे "तीन" तुकडे देत नाहीत. म्हणून तो एक खातो. नंतर प्रधान येतो तो सेक्रेटरीला म्हणतो अरे हे तू हे दोनच तुकडे का वगळले, आणि ते दोन तो खाउन टाकतो. शेवटी सेक्रेटरीला एकही मिळत नाही.>>>>>>>>>>>> हो सुरूवातच भारी
अंजू त्या लाईट बल्ब लावायच्या सीनला तो विचारतो ना रेल्वेसारखी फास्ट कि बाकबूक करणारी माळ पाहिजे या अर्थाचं काहीतरी. फारच हसू आलं त्या सीनला.
विकासचं काम ज्याने केलंय पर्फेक्ट घेतलंय कॅरेक्टर.
नेव्हर हॅव आय एव्हर आवडली >>
नेव्हर हॅव आय एव्हर आवडली >>>> हो मला पण आवडली. हायस्कूल डायनामिक्स जरा विनोदी अंगानी दाखवली आहेत.
Men Who Built America -
Men Who Built America - Amazon Prime
साधारण १८५० पासून पुढे अमेरिकेत मोठे उद्योग उभे केलेले लोक, त्यांच्या कंपन्या, त्यांची आपसातील स्पर्धा, ट्रेण्ड ओळखून त्यांनी केलेले बदल यावर एकदम इण्टरेस्टिंग सिरीज आहे. मी पहिले तीन भाग बघितले आहेत. यातील बहुतांश भाग कॉर्नेलियस व्हॅण्डरबिल्ट (रेलरोड), जॉन डी रॉकफेलर (ऑइल) आणि अॅण्ड्र्यू कार्नेगी (स्टील) यांच्यावर आहे.
रेल्वेसारखी फास्ट कि बाकबूक
रेल्वेसारखी फास्ट कि बाकबूक करणारी माळ पाहिजे >>>
तो आख्खा सीन धमाल आहे.
रघुवीर यादव सुरूवातीला "किल्ली शोधायला जाताना
" शेतीवरून होणारी भांडणे वगैरे माहिती देत असतो तेव्हा पुलंचे कोकणातील "अरे बर्बाद झालो तरी बेहत्तर..." आठवते 
Men Who Built America >>
Men Who Built America >> आम्ही पाहिली मधे ही. खूप आवडली. बर्याच गोष्टी माहित नव्हत्या या लोकांबद्दल. त्यांचे आपसातील डायनामिक्स पण समजून घ्यायला मजा आली.
फारच हसू आलं त्या सीनला. >>>
फारच हसू आलं त्या सीनला. >>> हो
विकासचं काम ज्याने केलंय पर्फेक्ट घेतलंय कॅरेक्टर. >>> अगदी अगदी. सगळ्यात तो बोलत असताना मी अगदी फार लक्ष द्यायचे, त्याचा डायलॉग एकजरी सटकला तरी चुकल्यासारखे व्हायचं. ग्रेट टायमिंग आणि अतिसहजता वाटली मला त्याच्यात.
सर्वांनी कामं उत्तम केलेली असताना प्रांजळपणे सांगते की त्यातही तो मला सर्वात आवडला आणि दोन नं नीना गुप्ता.
>>विकासचं काम ज्याने केलंय
>>विकासचं काम ज्याने केलंय पर्फेक्ट घेतलंय कॅरेक्टर.>>
+111
चंदन रॉय नाव आहे त्याचं.
Men Who Built America -
Men Who Built America - Amazon Prime
>>>
ही मी हिस्टरी tv वर बघितली होती. कमोडर vanderbuilt (स्पेलिंग चुकल्यास माफि) आणि J P Morgan या व्यक्तिरेखा जबरदस्त होत्या. Morgan तर दुसरा टोनी स्टार्कच वाटायचा.
एडिसन आणि टेस्ला मधील जुगलबंदी काही भागात येते, तेही जबरी...
विकासच्या खऱ्या नावासाठी आणि
विकासच्या खऱ्या नावासाठी आणि त्या लिंकसाठी सुनील. तुम्हाला धन्यवाद.
मलाही ही सिरीज खूप आवडली सहज
मलाही ही सिरीज खूप आवडली सहज सुंदर अभिनयासाठी! इथली चर्चा वाचून परत पहायची इच्छा होतेय...
Pages