वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिलिकॉन व्हॅली चे फॅन्स आहेत का कुणी? सध्या सहावा सीझन आला आहे प्राइम वर. त्यानिमित्ताने आधी जुनेच सीझन्स पहातोय आम्ही आता.
मॅड फनी सिटकॉम आहे हा. टिपिकल सिलिकॉन व्हॅलीतलं स्टार्ट अप कल्चर आणि त्यातली एक से एक कॅरेक्टर्स. बघितली नसेल तर नक्की पहा.
सीझन १ ट्रेलर
https://www.youtube.com/watch?v=69V__a49xtw

पंचायत बघितली. खूप cute आहे.
सगळे कलाकार , गाव , घर सगळं मस्तच.
कोणी फार चांगल किंवा वाईट नाही. All grey .
तो हिरो भारीच आहे.
Beer वाला episode फार आवडला.

4 shots more please पाहिली. ठीक ठाक वाटली.
यापेक्षा जास्त बेगडी ती mentelhood होती.

द रायकर केस बघितली.
काही एपि नंतर चांगली वाटत असतानाच शेवटाने निराश केलं. शेवट काहीच्या काही आहे. पटला नाही.
आजकाल वेबसिरीजमधे दमदार मराठी कलाकार बघुन आनंद होतो.
अश्वीनी भावे, अतुल कुलकर्णी आणि माबोचा हार्ट्थृओब ललित प्रभाकर चं काम मस्त झालंय. इथे मला ललित आवडला.

स्पॉ अ‍ॅ -
निर्जन जागी असलेल्या घरात एखाद्याला चार वर्ष बंदी बनवुन कसं काय कोणी ठेवु शकतं? म्हणजे त्याचं खाणं पिणं, शरीरधर्म, स्वच्छता, कपडे वैगेरे कोण कसं मॅनेज करणार. काहीही दाखवतात.

हसमुख Dexter ची कौपी आहे? Dexter मला फार आवडलेली .
लोकहो क्रुपया कुठे पाहिली हे पण सान्गा.

द रायकर कुठे बघायची?

हंड्रेड बघतेय. दोघींची अ‍ॅक्टिंग अजून तरी बरी वाटतेय.
नेटफ्लिक्सवरच्या 'SHE' मधले काही काही कॉपी केलंय असं वाटलं फक्त याला कॉमेडीचा तडका दिलाय थोडा.

च्रप्स तुम्हाला ललित आवडत नाही यात काही आश्चर्य नाही कारण तुम्हाला मुक्ता बर्वे सुद्धा आवडत नाही Wink दिवा घ्या.

आजकाल वेबसिरीजमधे दमदार मराठी कलाकार बघुन आनंद होतो. ~~ येस.. ट्रेलर पाहून असचं छान वाटलं.. आता आजपासून बघेन.

यापेक्षा जास्त बेगडी ती mentelhood होती. ~~ +१२३४५ प्रचंड सहमत. इतक्या तुकड्या तुकड्यांमध्ये दाखवलय सगळ..कशाचा कशाला मेळ नाही.. दर एपि ला एका टॉपिक वर भाष्य आणि how every mother deals with it ... तेसुद्धा पूर्ण दाखवले नाहीये.. खुप उथळ आहे सिरीज.. मी ४ एपि. फॉरवर्ड करत करत पाहिले..

Never Have I Ever - Netflix
पाहिली आहे का कुणी? चांगली वाटते आहे.

काल unorthodox नावाची सिरीयल netflix वर बघायला घेतली. भयंकर प्रकार. सनातनी ज्यू लोकांच्या lifestyle आणि बंड करुन घर सोडून Berlin ला पळून जाणाऱ्या Esty ची गोष्ट आहे. तिचं पळून जाणं मला जरा अनाकलनीय वाटलं पण cinematic liberty म्हणून ठीक आहे. ज्यू लोकांच्या चालीरीती बघायला मिळाल्या, ज्या इतक्या detail मधे कधी कोणत्या सिरीयल मध्ये बघितल्याचे आठवत नाहीये. Shabbath, Eruv म्हणजे काय अजून wiki वर वाचायचं आहे. लग्न झाल्यावर केशवपन का ते काही कळलं नाही. बायकांना विद्रुप करणं जगभर सारखंच Sad दोन- तीन episode झाल्यावर ताण आला म्हणून that 70s show चा एक भाग बघून आनंदाने झोपले.
कित्येक वर्षांपूर्वी Loving Leah नावाचा एक सिनेमा पहिला होता. त्या मधे पण वेगळ्याच ज्यू संस्कृतीची ओळख झाली होती. इथे वेगळी संस्कृती.

Dexter बघितली.
छान आहे, पण हसमुख मला जास्त जवळची वाटली. तो यूपीचा लहेजा, एक डार्क कॉमिक रिलीफ वगैरे.
हसमुख मध्ये जेवढे लूपहोल्स दिसतात, तितके डेक्स्टर मध्ये मात्र नाहीत. Dexter ची बांधणी मजबूत आहे.

वेबसिरीजबद्दल लिहिताना कुठे पाहिली ते पण लिहीत चला. सगळे सबस्क्रिप्शन्स आहेत त्यामुळे कुठे कुठे शोधणार असं होतं. बऱ्याच वेळा नेटफ्लिक्स आणि प्राईम शिवाय दुसरीकडे बघितलंही जात नाही.

नेफिवर Outer Banks नावाची एक नवीन आली आहे. एक भाग बघितला. इण्टरेस्टिंग आहे. सुरूवातीची इन्ट्रो एकदम कॅची आहे. Out here, you either have two jobs, or two houses!

नॉर्थ कॅरोलीनाच्या किनार्‍यावर एक जमिनीचा मोठा पट्टा आहे इतर भूभागापासून विलग असलेला. त्याला आउटर बॅन्क्स म्हणतात, तेथील ही कथा आहे. येथे खूप Beach Towns आहेत. तेथील श्रीमंत व गरीब भागातील लोकांच्या संदर्भाने ते वरचे वाक्य आहे. या लोकांकरता वापरलेल्या Kooks आणि Pogues या टर्म्सही पहिल्यांदाच ऐकल्या. खरोखरच कितपत प्रचलित आहेत त्याबद्दल शंका आहे आणखी माहिती वाचल्यावर.

१०० सिरीज नाही आवडली >>>>>>>>> मी पण जशी पुढे बघतेय गोंधळून जातेय. त्या किडनी प्रकरणाचे काय झाले> मधेच सोडून दिल्यासारखं वाटलं. अर्थात मी ६एपिच बघितले अजून. २ बाकी आहेत.

पांडू कशीये
Mxplayer वर मराठी मध्ये आहे >>> एकदा बघायला हरकत नाही. काही भाग टचिंग आहेत, काही भागात विनोदी ढंगाने बोट ठेवलंय समाजावर.

Pages