महाराष्ट्रात लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.
करोनाग्रस्त रुग्णांची वाढणारी संख्या पाहता केंद्र आणि बाकी राज्य सरकारे लवकरच असे निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे गरजेचे आहेच. कठोर पावले उचलल्याशिवाय हा आजार कंट्रोल मधे येणे अशक्यप्राय आहे.
या लॉक डाऊनमधे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे माझ्यासारखे अनेक भारतीय परदेशात अडकलेले आहेत. मंध्यतरी दुबईतील विमानतळावर अडकलेल्या काही भारतीयांचे हाल वर्णन करणारी बातमी वाचनात आली. जवळ जवळ प्रत्येक देश दुसर्या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरीकांसाठी विमानसेवा उपलब्ध करुन देत आहे. पण भारताकडून असे काही प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात नाही.
माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी एका २० ते २५ दिवसांच्या कामासाठी कतार मधे आलो होतो. आधी ८ दिवस विमानतळे बंद ठेवण्याची घोषणा झाली तेव्हा आम्ही ३० तारखेच्या दरम्यान भारतात परतता येईल या आशेवर होतो. पण त्यानंतर अचानक २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली गेली. आता परत लॉक डाऊन वाढविण्यात येईल अशी चर्चा चालू आहे. आता हा लॉक डाउन कधी संपणार आणि त्यानंतर आम्ही home quarantine संपवून किंवा सरकारने ठरवून दिलेला under observation period संपवून घरी कधी पोचणार? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध पालक आहेत त्यांना तर स्वतःला लागण झालेली नाही, हे नक्की होई पर्यंत लगेच घरी जाणे सुद्धा शक्य नाही. बाहेर कुठेतरी राहणे किंवा हॉटेलवर काही दिवस काढून मग घरी जाणे असे करावे लागणार आहे.
हा सर्व विचार करुन जास्तच वैताग येत आहे.
माझ्यासारखेच माझ्या कंपनीचे अंदाजे १०० जण असेच अडकून पडले आहेत. ईकडून कतार एअरवेजची सेवा चालू होती पण भारतातील विमानतळे बंद झाल्यामुळे त्यांनी सेवा बंद केली आहे.
असे अनेक जण अनेक देशात वेगवेगळ्या कारणांनिमित्त अडकून पडले असायची शक्यता आहे. बरेच विमान सेवा चालू होण्याची वाट पहात आहेत. अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास भारत सरकार कडून त्यांच्यासाठी काहीतरी सोय व्हायची शक्यता आहे.
आम्ही आमच्या कंपनी तर्फे भारतीय दुतावासाशी संपर्क केला आहे. अजून काय करता येईल याविषयी चर्चा चालू आहे. Ministry of External Affairs सोबत कसा संपर्क करता येईल, वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित करता येतील का? या बाबत प्रयत्नशील आहोत.
वेगवेगळ्या देशात अडकलेल्या नागरीकांना सोशल मीडियाचा वापर करुन एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी काही कल्पना हव्या आहेत. काय करता येईल, कसे करता येईल, कोणी, कुठे असे प्रयत्न चालू केले आहेत का?
वेगवेगळ्या देशातील नागरीकांना संपर्क कसा करावा, भारतीय सरकारसोबत संपर्क कसा करावा, काय केल्याने भारत सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विमानसेवा चालू करेल? शक्य तितक्या कल्पना सुचवा.
धन्यवाद
ता.कः- एक अपील होईल असा हॅशटॅग सुचवा. अस्तित्वात असल्यास सांगा.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करोनाची आजची आकडेवारी जाहीर केली असून कालच्या तुलनेत आज करोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. काल दिवसभरात मुंबईत करोनाच्या १८३ रुग्णांची नोंद झाली होती. तुलनेने आज दिवसभरात करोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. मृत्यूचे प्रमाणही स्थिर दिसत असून काल दोन जणांचा तर आज तीन जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-updates...
आम्ही भारतीय दुतावासासोबत
आम्ही भारतीय दुतावासासोबत संपर्कात आहोत. पण अजून तरी काही झालेले नाही. -> लवकरच सुवार्ता मिळू दे, हीच सदिच्छा!
इथे तर एक वेगळाच गोंधळ झाला
इथे तर एक वेगळाच गोंधळ झाला आहे..
HC of India यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे की सध्या तरी HC कडे ऑस्ट्रेलियातुन भारतात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी कोणतीही योजना/विमानसेवा नाही मात्र अशी काही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे अशी अफवा पसरली आहे तरी त्या अफवेकडे लक्ष न देता HC कडून येणाऱ्या पुढील सूचनांची वाट पहावी! याच पोस्ट वर एका aviation कंपनीच्या व्यक्तीने खुलासा केला आहे की ही अफवा नाही, आम्ही तुमच्या ऑस्ट्रेलियात अडकलेल्या 1000 भारतीय नागरिकांना भारतात घेऊन जाण्याची तजवीज करत आहोत, यासंदर्भात आपल्याशी (HC) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण आपल्या कडून काही उत्तर मिळाले नाही!
दरम्यान इथे ओळखीत एकांच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला... covid मुळे नाही पण इतर कारणाने... (सोलापूर जिल्ह्यात). मृत व्यक्तीची पत्नी इथे आलेली आहे... त्यांना परत जायची खूप इच्छा होती पण जाता आले नाही आणि असा प्रसंग आला.... एव्हढयात ऐकलेली ही पाचवी घटना आहे... खुप त्रास होतो आहे.....
(वर अश्या प्रकारच्या घटनांबद्दल लिहू नये अशी सूचना काही जणांनी केली आहे पण अगदीच रहावल नाही.)
परदेशात अडकलेले भारतीय म्हणजे
परदेशात अडकलेले भारतीय म्हणजे कोण.
1), जे कामानिमित्त बाहेरच्या देशात आस्थापना तर्फे किंवा वैयतीक रित्या गेले आहेत जिथे गेले आहेत तिथे त्यांचे घर नाही ते.
२) जे फिरायला किंवा शॉपिंग ल गेले आहेत आणि lockdown madhye अडकले ते.
ह्या लोकांना जगात काय चाललं आहे ह्याची जाणीव नव्हती असे कसे म्हणता येईल.
हा एक प्रश्न आहेच.
ह्या मध्ये चुकून अडकलेले आणि स्वतः हुन अडकलेले असे परत दोन उप प्रकार करता येतील .
स्वतः हुन स्वतला विदेशात अडकून घेणाऱ्या नागरिकांना विषयी मानवता का दाखवावी .
त्यांच्या चुकीचं फटका देशातील नागरिकांनी का सोसावा संक्रमा द्वारे.
जे मजबूरी मध्ये फसले आहेत फक्त त्यांनाच भारतात आण्याना विषयी किंवा तिथेच सोय करण्या विषयी अनुकूल निर्णय सरकारनी घ्यावा.
सरसकट नाही.
आपली सोय होणार आहे का? सरकार
आपली सोय होणार आहे का? सरकार अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणते आहे.
https://twitter.com
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1257571654164570114
f you are from Maharashtra & are stranded abroad, we request you to fill the form linked below. The State will pass this information & coordinate with the Ministry of External Affairs to facilitate your return as soon as the restrictions are lifted.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScQRFA86XkxESPusOMH96u5187eQY1U...
आम्ही सर्वांनी सकाळीच हे
आम्ही सर्वांनी सकाळीच हे फाॅर्म भरले.
सरकारने पहिल्या टप्प्यात ६४ विमानांची घोषणा केली आहे. ही ६४ विमाने वेगवेगळ्या देशातील नागरीकांसाठी आहेत. कतार वरून मुंबईला विमान नाही. केरळ साठी दोन विमाने आहेत त्यात दोन्ही मिळून ४०० जण जाऊ शकतील.
कामगार, मेडीकल कंडिशन असणारे आणि ज्यांच्या घरी मृत्यु झाले आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
कतार मधून जवळ जवळ ४०,०००
कतार मधून जवळ जवळ ४०,००० जणांनी भारतात परतण्यासाठी फाॅर्मस भरले आहेत म्हणे. त्यातले महाराष्ट्रात जाणारे किती ते काय माहित...
२०० जण एका विमानात म्हणजे २०० विमानं फक्त कतार साठी. कोणाला आधी न्यायचं आणि कोणाला नंतर हे सरकार ठरवणार.
क्या पता मेरा नंबर कब आयेगा.....
Ok. Something is better than
Ok. Something is better than nothing.
चला सुरुवात तर झाली. हे ही
चला सुरुवात तर झाली. हे ही नसे थोडके.
जेव्हा ही परत येण्याची बातमी
जेव्हा ही परत येण्याची बातमी समजली तेव्हा अगदी जवळच्या नातेवाईकांनंतर अतरंगी यांचेच नाव आठवले. त्यांना लवकरात लवकर सुखरूप परत यायला मिळो.
त्यांना लवकरात लवकर सुखरूप
त्यांना लवकरात लवकर सुखरूप परत यायला मिळो.>>> +१११११
अतरंगी
अतरंगी
वाचून वाईट वाटले मी पण मालूर ला अडकलो आहे समाधान इतकेच की भारतात आहे पुण्यात जाऊ शकत नाही lockdown मुळे घरचे पुण्यात रेड झोन मध्ये काळजी तर वाटणारच पण हे ही दिवस जातील पुस्तके वाचा , ऑनलाइन नाटक बघा आणि positive attitude ठेवा सध्या स्वतः ला करोना पासून वाचवणे हेच महत्वाचे बाकी सगळे गौण
क्या पता मेरा नंबर कब आयेगा >
क्या पता मेरा नंबर कब आयेगा >>> लौकरच! ऑल द बेस्ट.
सध्या जेथे आहात तेथे काय सिच्युएशन आहे, निदान लॉकडाउन रूटिन व्यवस्थित आहे का - म्हणजे जीवनावश्यक वस्तू वगैरे मिळत आहेत का? नेट, टीव्ही वगैरे?
सर्वांचे सदिच्छांबद्दल
सर्वांचे सदिच्छांबद्दल मनापासून आभार.
सध्या जेथे आहात तेथे काय सिच्युएशन आहे >>>>>>>
मी लोकांचे हाल बघतो आहे, वाचतो आहे. त्यामुळे माझे हाल होत आहेत असे म्हणायला माझी स्वप्नात सुद्धा हिंमत होणार नाही.
पुस्तके वाचा , ऑनलाइन नाटक
पुस्तके वाचा , ऑनलाइन नाटक बघा आणि positive attitude ठेवा सध्या स्वतः ला करोना पासून वाचवणे हेच महत्वाचे बाकी सगळे गौण >>>>>>
शेअर मार्केट शिकणे, उर्दु शिकणे, 10000 steps a day challenge आणि मागच्या दोन दिवसांपुर्वी खूप दिवस करुन बघू म्हणून ठेवलेलं Intermittent fasting हे सगळं चालू केलं आहे.
एक महिना झाला आता काम संपून. भारतात परत गेल्यावर अजून १५ दिवस isolation आहे.
वेळच वेळ.....
तुमची positivity बघून फार छान
तुमची positivity बघून फार छान वाटलं अतरंगी. लवकरच तुम्हाला लवकरच इष्टस्थानी जायला मिळो!
तुमच्याइथे बाहेर काय
तुमच्याइथे बाहेर काय परिस्थिती आहे माहीत नाही पण इथे मुंबईत दिवसेंदिवस परिस्थिती फार वाईट होते आहे. खाजगी सुंदर गृहसंकुले आणि लागूनच झोपडपट्टी पुनर्निमाणच्या मोठमोठ्या इमारती. गाड्या पुसणारे, कामवाल्या बाया, पाणीपंप बंदचालू करणारे लोक, इलेक्ट्रिशिअन, प्लंबर, केबल टीवीचे सेवादार यांचा पुरवठा या झोपु इमारतींमधून होतो. यातले लोक डिलिवरी बॉयिज, कूरिअर्स अशी कामे करतात. आठ दिवसांपूर्वी एक पिझ्झा डिलिवरी बॉय एका इमारतीत शिरताना दिसला. आणि परवा कळले की त्या इमारतीत एक रुग्ण निघाला. आमच्या आजूबाजूचा भाग सील झाला. आता भाजीचा, पिठाबिठांचा टेंपो दारात मागवायचो ते अनिश्चित. वाशीवरून भाजी आणताना त्या टेंपोवाल्याला अनेक सील्ड भागांना वळसा घालून यावे लागते. कधीही पोचतो. त्याची अडचण वाढली.
अर्थात हे तसे इतरांच्या मानाने किरकोळ आणि धाग्यावर अवांतर आहे, पण लवकरच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अडचणीत येईल अशी शंका येते.
आम्ही सगळे हॉटेल वर राहतोय.
आम्ही सगळे हॉटेल वर राहतोय. काही जण बाहेरून जेवण मागवत आहेत. पण मी ती रिस्क नको म्हणून हॉटेल मधूनच जेवण घेत आहे. हॉटेल चा स्टाफ नजरे समोर आहे. सॅनिटायजर वापरणे, हँड ग्लोव्ज वापरणे यात दुर्लक्ष झालेले दाखवून दिले की लगेच सुधारणा करतात.
आठवड्यातले चार चार दिवस एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे खाणे, कधी कधी दोन तीन दिवस शिळा ब्रेड, खबूस ( रेडीमेड मिळणारी अरबी रोटी) खायला लागणे याशिवाय काही प्रॉब्लेम्स आले नाहीत. म्हणून म्हणालो की माझे हाल होत आहेत असे स्वप्नात सुद्धा म्हणणार नाही.
एअर इंडियाची एक Mumbai to
एअर इंडियाची एक Mumbai to Newark फ्लाईट 9 मे ला आहे. तिकीट विक्री चालू आहे एअर इंडियाच्या साईटवर.
सरकार अडकलेल्या भारतीय
सरकार अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणते आहे.>>> आधी ज्यांना आणले त्यामुळे इथे गोंधळ माजला. त्यावर काही उपाय योजना दूर. त्यात पुन्हा नव्याने पिडा आणायची कशाला? पीएम केअर मध्ये पैसे भरल्याची परतफेड का? इथे गरीब, मजुरांना कोंडून, उपासमारीत मरत सोडले आहे आणि ह्यांचे इतके लाड कशाला? तिक्कडेच रहा, जगलात तर या म्हणावं.
विमानाने मढ़े आणायचे तर एक
विमानाने मढ़े आणायचे तर एक वर्षाचा पगार जाईल
"त्यात पुन्हा नव्याने पिडा
"त्यात पुन्हा नव्याने पिडा आणायची कशाला?" - शॉकिंग प्रतिक्रिया आहे! सगळ्या विश्वबंधुत्वाच्या, भूतदयेच्या पोकळ गप्पा आहेत. स्वतःच्याच अडचणीत सापडलेल्या देशबांधवांना, सरकार मदत करत असताना - किंवा खरं तर, कुठल्याही अडचणीत सापडलेल्या माणसांना कुणीतरी मदत करत असताना - त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याऐवजी, ते पीडा वाटावे हे दुर्दैवी आहे. आपण त्या परिस्थितीत नाही हे सुदैव, पण जे आहेत त्यांच्याविषयी किमान empathy तरी बाळगावी असं मला वाटतं.
प्रत्येक प्रवाश्यकडून
प्रत्येक प्रवाश्यकडून तिकिटांची रक्कम घेत आहेत ना? मी वाचले होते की न्यूयॉर्क मुंबई प्रवासाचे 1लाख रुपये फी आहे. फुकट पीएम केअर फन्ड मधून आणत आहेत का?
फुकट काही नाही ..
फुकट काही नाही ..
फिल्मी - बरेच लोक मजबुरी
फिल्मी - बरेच लोक मजबुरी मध्ये अडकले आहेत. काही ट्रीटमेंट करण्यासाठी आले होते, काही ऑफीस टूर मुळे ,काही टुरिसम साठी. ऑफिस साठी आलेले बरेच असे आहेत कि ज्यांची फॅमिली इंडियात आहे. अशा वेळी त्यांना बाहेर राहा, जगलात तर या म्हणने चुकीचे नाही वाटत का ?
<< आम्ही सगळे हॉटेल वर राहतोय
<< आम्ही सगळे हॉटेल वर राहतोय. काही जण बाहेरून जेवण मागवत आहेत. पण मी ती रिस्क नको म्हणून हॉटेल मधूनच जेवण घेत आहे. हॉटेल चा स्टाफ नजरे समोर आहे. सॅनिटायजर वापरणे, हँड ग्लोव्ज वापरणे यात दुर्लक्ष झालेले दाखवून दिले की लगेच सुधारणा करतात.
आठवड्यातले चार चार दिवस एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे खाणे, कधी कधी दोन तीन दिवस शिळा ब्रेड, खबूस ( रेडीमेड मिळणारी अरबी रोटी) खायला लागणे याशिवाय काही प्रॉब्लेम्स आले नाहीत. म्हणून म्हणालो की माझे हाल होत आहेत असे स्वप्नात सुद्धा म्हणणार नाही. >>
----लवकरात लवकर तुम्हाला घरी परतायला मिळेल अशी आशा आहे. शुभेच्छा.
<< "त्यात पुन्हा नव्याने पिडा
<< "त्यात पुन्हा नव्याने पिडा आणायची कशाला?" - शॉकिंग प्रतिक्रिया आहे! सगळ्या विश्वबंधुत्वाच्या, भूतदयेच्या पोकळ गप्पा आहेत. स्वतःच्याच अडचणीत सापडलेल्या देशबांधवांना, सरकार मदत करत असताना - किंवा खरं तर, कुठल्याही अडचणीत सापडलेल्या माणसांना कुणीतरी मदत करत असताना - त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याऐवजी, ते पीडा वाटावे हे दुर्दैवी आहे. आपण त्या परिस्थितीत नाही हे सुदैव, पण जे आहेत त्यांच्याविषयी किमान empathy तरी बाळगावी असं मला वाटतं. >>
----- सरकार मदत करत आहे हे खूप चांगले आहे. अशाच प्रकारची मदत भारतात ठिकठिकाणी अडकलेल्या कष्टकर्यांना, परप्रांतिय मजुरांना मिळाली असती तर दिल्ली बस अड्डा, बांद्रे स्टेशन , सुरत... आदी अनेक ठिकाणी जे विदारक दृश्य दिसले तसे दिसले नसते.
अनेकांनी आहे त्या साधनांचा (सायकल, पायी, गाडी) वापर करुन घरी जाण्याचा प्रयत्न केला..... या प्रयत्नात काहींचा अकाली मृत्यु झाला. मनाला चटका लावणार्या हजारो घटना बघायला मिळाल्या... त्यातली एक.
https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/tribal-girl-12-treks-...
लॉकडाऊन च्या काळातही या लोकांना मदत करणे सहज शक्य होते.... पण... यांना तसेच अडकलेल्या लाखो गरिबांना वेळेवर मदत मिळू शकली नाही. मदत मिळणारे (कोटाचे गर्भश्रीमंत विद्द्यार्थी, यात्रेत अडकलेले भाविक) आणि अजिबातच मदत न मिळणारे गरिब/ अशिक्षित असे दोन वर्ग आहेत ... आर्थिक दृष्टीने कमजोर वर्गाकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, केले गेले आहे.
त्या १२ वर्षाच्या मुलीच्या पालकांना किंवा ज्या श्रमिकांची शेकडो/ हजारो कि मी पायपिट झालेली आहे अशांना, किंवा ज्यांची अनेक दिवस उपासमार झाली आहे अशां बहुसंख्य लोकां साठी विश्वबंधुत्व, आणि भूतदया का जागृत होत नाही. त्यांना का खड्यासारखे वगळले जाते.
<< सरकार अडकलेल्या भारतीय
<< सरकार अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणते आहे.>>> आधी ज्यांना आणले त्यामुळे इथे गोंधळ माजला. त्यावर काही उपाय योजना दूर. त्यात पुन्हा नव्याने पिडा आणायची कशाला? पीएम केअर मध्ये पैसे भरल्याची परतफेड का? इथे गरीब, मजुरांना कोंडून, उपासमारीत मरत सोडले आहे आणि ह्यांचे इतके लाड कशाला? तिक्कडेच रहा, जगलात तर या म्हणावं. >>
------ जगलांत तर या असे म्हणता येणार नाही....
सरकार त्यांना आणत असेल तर चांगलेच आहे. ते देशाचे नागरिक आहेत, आणि सरकार त्यांची काळजी घेते हे योग्यच आहे. पण त्याच वेळी देशांतल्या गरिबांची, परगावी तसेच परराज्यातल्या अडकलेल्या लाखो मजुरांची तेव्हढीच काळजी घ्यायला हवी होती... ते पण भारताचे सन्माननीय नागरिक आहेत, लॉकडाऊन च्या कसोटीच्या काळांत त्यांना असे वार्या वर सोडायचे नव्हते.
ज्यांच्या खांद्यावर सगळा
ज्यांच्या खांद्यावर सगळा डोलारा उभा आहे त्या मजुरांना, गरिबांना कुत्रं विचारत नाही अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊन नंतर सगळं सुरळीत व्हायला हेच गरीब लोक कामी येणार म्हणून गेले दीड महिने त्यांची वाईट अवस्था करून ठेवली आहे. कसली डोंबल्याची विश्वबंधुता, भूतदया? मोलकरणीला मदतनीस म्हणणं, समतेला समरसता म्हणणं याला जर विश्वबंधुत्व म्हणत असाल तर म्हणा बापडे.
रच्याकने, Craps ते बाहेर कामानिमित्त गेलेल्या लोकांचे दुःख समजू शकतो पण त्यातुलनेत इथलं दुःख, परिस्थिती खूपच गंभीर आहे. बाहेर असलेल्यांनी टाळ्या थाळ्या दिवा बत्ती करावी असे सुचवू नाही शकणार मी तरी. तितके मेलेपण नाही आले अजून.
Pages