परदेशात अडकलेले भारतीय

Submitted by अतरंगी on 11 April, 2020 - 14:46

महाराष्ट्रात लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

करोनाग्रस्त रुग्णांची वाढणारी संख्या पाहता केंद्र आणि बाकी राज्य सरकारे लवकरच असे निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे गरजेचे आहेच. कठोर पावले उचलल्याशिवाय हा आजार कंट्रोल मधे येणे अशक्यप्राय आहे.

या लॉक डाऊनमधे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे माझ्यासारखे अनेक भारतीय परदेशात अडकलेले आहेत. मंध्यतरी दुबईतील विमानतळावर अडकलेल्या काही भारतीयांचे हाल वर्णन करणारी बातमी वाचनात आली. जवळ जवळ प्रत्येक देश दुसर्‍या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरीकांसाठी विमानसेवा उपलब्ध करुन देत आहे. पण भारताकडून असे काही प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात नाही.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी एका २० ते २५ दिवसांच्या कामासाठी कतार मधे आलो होतो. आधी ८ दिवस विमानतळे बंद ठेवण्याची घोषणा झाली तेव्हा आम्ही ३० तारखेच्या दरम्यान भारतात परतता येईल या आशेवर होतो. पण त्यानंतर अचानक २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली गेली. आता परत लॉक डाऊन वाढविण्यात येईल अशी चर्चा चालू आहे. आता हा लॉक डाउन कधी संपणार आणि त्यानंतर आम्ही home quarantine संपवून किंवा सरकारने ठरवून दिलेला under observation period संपवून घरी कधी पोचणार? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध पालक आहेत त्यांना तर स्वतःला लागण झालेली नाही, हे नक्की होई पर्यंत लगेच घरी जाणे सुद्धा शक्य नाही. बाहेर कुठेतरी राहणे किंवा हॉटेलवर काही दिवस काढून मग घरी जाणे असे करावे लागणार आहे.

हा सर्व विचार करुन जास्तच वैताग येत आहे.

माझ्यासारखेच माझ्या कंपनीचे अंदाजे १०० जण असेच अडकून पडले आहेत. ईकडून कतार एअरवेजची सेवा चालू होती पण भारतातील विमानतळे बंद झाल्यामुळे त्यांनी सेवा बंद केली आहे.

असे अनेक जण अनेक देशात वेगवेगळ्या कारणांनिमित्त अडकून पडले असायची शक्यता आहे. बरेच विमान सेवा चालू होण्याची वाट पहात आहेत. अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास भारत सरकार कडून त्यांच्यासाठी काहीतरी सोय व्हायची शक्यता आहे.

आम्ही आमच्या कंपनी तर्फे भारतीय दुतावासाशी संपर्क केला आहे. अजून काय करता येईल याविषयी चर्चा चालू आहे. Ministry of External Affairs सोबत कसा संपर्क करता येईल, वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित करता येतील का? या बाबत प्रयत्नशील आहोत.

वेगवेगळ्या देशात अडकलेल्या नागरीकांना सोशल मीडियाचा वापर करुन एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी काही कल्पना हव्या आहेत. काय करता येईल, कसे करता येईल, कोणी, कुठे असे प्रयत्न चालू केले आहेत का?

वेगवेगळ्या देशातील नागरीकांना संपर्क कसा करावा, भारतीय सरकारसोबत संपर्क कसा करावा, काय केल्याने भारत सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विमानसेवा चालू करेल? शक्य तितक्या कल्पना सुचवा.

धन्यवाद

ता.कः- एक अपील होईल असा हॅशटॅग सुचवा. अस्तित्वात असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच बातमी. अभिनंदन. आणि हो, झोपबीप पूर्ण होऊन सर्व शीण जाऊन ताजेतवाने झाल्यावर सविस्तर लिहा. तुम्हांला काय वाटले, नातेवाईकांची प्रतिक्रिया, इथल्या आणि तिथल्या विमानतळ आणि नोकरशाहीचे अनुभव वगैरे.

अ भि नं द न!!!
खूप मस्त वाटलं बातमी ऐकून..!!
काळजी घ्या!

अभिनंदन !!!
खूप मस्त वाटलं बातमी ऐकून..!!
काळजी घ्या!++१११११ माझी जाउ पण ७ दिवसांपूर्वी USA हून आली, ७ दिवस हॉटेलमध्ये आता आज घरी आली.

अतरंगी !
शुभेच्छा , काळजी घ्या .
धाग्यांचा विषय न पाहता केंद्र सरकार कसे फेल गेले हे जीवाचा आटा पिटा करून सांगणाऱ्या ची किव् येते .
त्यांचा विचार पाहता युरोप , अमेरिका , रशिया आणि चीन ( सर्वात आवडता चीन ) यांनी व्यवस्थित करोणा परतावून लावला त्यामुळे त्यांच्या कडे रुग्ण संख्या बिलकुल नाही .

फक्त भारत सरकार ने परदेश वरून येणाऱ्या प्रवाशांना व्यवस्थित हँडेल न केल्या मूळे रुग्ण संख्येत आपण एक न आहोत Happy

मागच्या महिन्यात वंदेमातरम् पहिल्या batch मधे लंडनहून माझी भाचेसून आली, तिला चौदा दिवस हॉटेलमध्ये राहायला सांगितलं होतं, ती प्रोजेक्टसाठी गेलेली, नवरा मुली आणि बाकी family इथेच होती.

आता सात दिवसाचा नियम केलाय का.

आता सात दिवसाचा नियम केलाय का.>>>>माहित नाही अन्जू,
जसं अतरंगींना सांगितलं तसंच,

७ दिवस हाॅटेलमधे राहायचे आहे. मग नंतर घरी ७ दिवस home quarantine.>>>>असं सेम माझ्या जावे ला सांगितलय

इथे एव्हढया पोस्ट्स बघुन वाटलंच की अतरंगी भारतात सुखरूप पोहोचले असावेत!!! छान झालं मुंबईत आहात हे!
सवडीने लिहा.

मायदेशात परत जायला मिळाल्याबद्दल तुमचे अभिनंदन!

कुणावरही कुठलंही खापर न फोडता , तुमचा नंबर यायची वाट पाहिलीत याबद्द्ल आणखी अभिनंदन!

बाकीचे अनुभवही विस्ताराने लिहालच. काळजी घ्या.

Pages